आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यश, अनीश, नितीन अप्पांच्या प्रत्येक वाक्याला शास्त्रीय संगीताच्या मैफलीत बसल्यासारखे दाद देत होते. >>> Lol

इथले comments "OUTSTANDING" आहेत. हसुन हसुन पुरेवाट झाली!!! Happy

कोर्ट केस छान सुरू आहे. तारखा पडत नाहीत. न्यायाधीशाकडे यांचीच एक केस आहे.
टीम अरुंधती तिच्या घरी किंवा सुलेखाताईंच्या हापिसात बसून डिस्कस आणि प्लान करतात.

संजना हिअरिंग सुरू व्हायच्या आधी कोर्टाच्या आवारात वकिलाला सूचना आणि आदेश देते. बरं तिचा वकील अरुंधतीवर जे आरोप करतो, ते संजनालाच जास्त लागू होतात , हे यांच्या गावीही नाही. शीशे के घरों में ...... जानी.

टीम अरुंधतीला वाटलं होतं आपण अभिषेकला आपल्या बाजूला वळवलं. तो अनिरुद्धविरोधात साक्ष देईल. पण त्याने नेहमीप्रमाणे कच खाल्ली. तिकडे संजनाने हीच युक्ती वापरून ईशाला अरुंधतीविरोधात उभं केलं. आजच्या भागात सुलेखा ओव्हरकॉन्फिडंट ईशाला पुढे खेळवत क्रीजच्या बाहेर आणत स्टंप्ड किंवा हिट विकेट करवतील.

हिंदी अनुपमा मध्ये हा सगळा प्रकार झाला होता का? मध्ये मी एक एपिसोड पाहिला तेव्हा हे लोक शेजारी शेजारी झालेले असतात आणि काही लोक अनुपमा कडे व काही तिच्या एक्स नवर्‍याच्या घरी अशी वाटणी झालेली दिसली. सासू आपल्या मुलाकडे आणि सासरा सुनेकडे .

कोर्ट केस कसली? आणि अरुंधतीविरोधात का? तिचा काय बंगला विकण्याशी संबंध आता? डिव्होर्स झाला ना?

अनिरुद्ध आणि अभिषेक यांनी अप्पांना फसवून त्यांच्या सह्या घेतल्या आणि समृद्धी बंगला बिल्डरला विकला. मग ते घर सोडून वणवण भटकले आणि अर्थात अरुंधतीला मिळाले. अरुंधती अप्पांना अनिरुद्धवर केस करायला सांगते. नाहीतर बंगला पडताना बघावा लागेल.

अनिरुद्धचा वकील अरुंधतीचा अप्पांच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे, ती पैशासाठी आतापर्यंत सगळं करत आली ( अठराव्या वर्षी अनिरुद्धशी लग्न, मग आशुतोषशी लग्न , तो मेल्यावर आणि आधीही यांच्या घरी येणं ), तीच अप्पांना इन्स्टिगेट करते आहे, असं सांगतो.

अप्पांनी अर्ध घर अरुंधतीच्या नावावर करून दिलं होतं हे कोणाच्याच लक्षात नाही.

मग ते घर सोडून वणवण भटकले आणि अर्थात अरुंधतीला मिळाले >> Lol

यातही एक आत्या आहे असे दिसते. कोण लक्षात नाही.

बाय द वे त्या खटल्याचा काही भाग बघतोय. हा दिवाणी दावा आहे की फौजदारी? दिवाणी असेल तर आप्पांनी जिंकल्यावर केस मागे घेतली तर कोणाला जेल बिल होण्याचा संबंध नाही राहणार ना? की तसे हवे असेल तर केस निकालाच्या आधी मागे घ्यावी लागेल? मुळात सह्या केल्यानंतर या सह्या मी स्वखुशीने केल्या नाहीत सांगितले तर त्यावेळेस कोण साक्षीदार होते वगैरेची चर्चा व्हायला हवी. ती झाली का कल्पना नाही. ८-१० दिवसांत हे कळाले असेल तर हे सगळे आपोआपच रद्द व्हायला हवे होते. अजूनही बंगला शाबूत आहे, कोणाला पैसे दिलेले नाहीत. मग डील रद्द होण्यात काय अडचण आहे?

दुसरे म्हणजे सह्या आप्पांनी स्वखुशीने केल्या का इतकेच महत्त्वाचे आहे. अरूंधती कशी आहे, तिचा प्रॉपर्टी हडप करण्याचा डाव आहे, घर किती जुने आहे याचा या केस शी काय संबंध आहे? बरीच चर्चा तीच चालली आहे. जजही असल्या गोष्टी "नोट" करत आहेत.

यातही एक आत्या आहे असे दिसते. कोण लक्षात नाही.>>> ती अनिरुद्ध आणी संजना टिममधे आहे. अप्पांशी भांडून आणी केस मागे न घेतल्यास सगळे संबंध तोडेन अशी धमकी देऊन गेली.
अजूनही बंगला शाबूत आहे, कोणाला पैसे दिलेले नाहीत. मग डील रद्द होण्यात काय अडचण आहे? >>> बंगला पाडू शकत नाहीत, स्टे ऑर्डर मिळवली अप्पा आणी अरु टीमने. संजना आणी अनिरुद्ध बिल्डकर कडून पैसे घेऊन बसलेत, अभि आणी इशाला हे माहिती नाही.

अविनाश भावजी केळ करांच्या कंपनीत कामाला लागले होते. सुरुवातीचं त्यांचं काम कन्स्ट्रक्शन साइट वर जाऊन को ऑर्डिनेट करणं असं काहीसं होतं. मग केळकरांच्या कंपनीला इंग्लंडमधलं एक प्रोजेक्ट मिळालं आणि त्यासाठी अविनाश भावजींना तिथे पाठवलं. केळकर संपले पण हा प्रोजेक्ट संपला नसावा. मध्ये मी मालिका पाहायची थांबवली तेवढ्या काळात त्यांना तिथे दुसरी नोकरी मिळाली असेल तर माहीत नाही, पण तिथेच आहेत.
समृद्धी वडिलोपार्जित असल्याने तो (बंगला) विकायला आणि पाडायला सगळ्या वारसांची संमती लागते म्हणे. तर अनिरुद्धने अविनाशची संमती मिळवली. याचं याच्या भावापेक्षा वहिनीशी चांगलं नातं होतं. शिवाय अडचणीत तो वहिनीकडेच जायचा आणि तीही मदत करायची. पण ही संमती देताना त्याला वहिनीशी बोलायची गरज पडली नाही किंवा वडिलांशी. या दोघांपैकी कोणीही त्याला आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न केला नाही.

बंगला पाडून टॉवर हवा या टीममध्ये अनिरुद्ध , त्याची दुसरी बायको संजना (टीम लीडर), अनिरुद्धचा मोठा मुलगा अभिषेक , मुलगी ईशा आणि अनिरुद्धची बहीण विशाखा हे आहेत. विशाखा म्हणजे तिच्या सासूला कसला तरी आजार आहे , त्यासाठी कसलं तरी ऑपरेशन करावं लागणार आहे आणि कितीतरी पैसे लागणार आहेत, ती. तर बंगला पाडल्याने तिला ऑपरेशनसाठी पैसे मिळतील शिवाय तिचं फ्युचर सेक्युअर होईल. हिचा नवरा आहे. पण .. जाऊ दे ... मालिकेत तो परत दिसला तर त्याच्याबद्द्ल लिहू.

टॉवर नको बंगलाच हवा या टीममध्ये अर्थात अप्पा, कांचन , अभिषेकची बायको अन्घा, अनिरुद्धचा धाकटा मुलगा यश आणि त्याची बायको आरोही एवढे आहेत. यांची नॉन प्लेइंग कॅप्टन अरुंधती (कारण तिला बंगल्यात हक्क नाही. कोणे एके काळी अर्धा बंगला तिच्या नावावर होता - तेव्हा वडिलोपार्जित संपत्तीत असं कोणाचंही नाव लावता येत नाही, असा नियम नव्हता ) आणि टीम मॅनेजर नितीन.

बंगला वडिलोपार्जित असल्याने तो विकायला सगळ्या वारसांची संमती हवी. नाहीतर वाटण्या करायला हवात.

फारेण्ड यांचा मुद्दा पटला. फसवून सह्या घेतल्या हा मुद्दा असेल तर मला वाटतं ती पोलिस केस होईल. पोलिस चौकशी करतील, फसवून सह्या घेतल्या असं वाटलं तर अनिरुद्धवर कारवाई करतील. तिथे सरकार पक्ष आणि आरोपी अशा पार्टीज असतील. बरोबर?

पण यांनी हा दिवाणी स्वरूपाचा केला असं दिसतं (म्हणजे यांनी एवढा अभ्यास केला असबरोबर?) म्हणजे बंगल्यावर हक्क कोणाचा इ. त्यात एक मुद्दा अप्पांना फसवून सह्या घेतल्या.

यांच्या ऑर्ग्युमेंट्समध्ये काँट्रॅडिक्शन्स असतत. संजनाचा वकील सांगतो की अरुंधतीचा प्रॉपर्टीवर डोळा आहे आणि अनिरुद्ध आणि ती वेगळे झालेत, त्यामुळे ती सासू सासर्‍यांना चिकटून अनिरुद्धला बेदखल करायचा प्रयत्न करते. तेच संजना सांगते की अरुंधती सासू सासर्‍यांशी curtly वागायची.

साक्षीदार उलटला असं आपण बातम्यांत वाचतो, काल अर्ध्या साक्षीत साक्षीदार उलटलेला दाखवला. ईशा ही टीम संजनाच्या बाजूने साक्षीदार. पण उलट तपासणीत टीम अरुंधतीच्या वकील सुलेखाताईंनी तिच्याकडून असं काही वदवून घेतलं की संजनाच्या वकीलाला, ही इमॅच्युअर आहे, तिच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका, असं सांगावं लागलं. मग त्याने तिच्याकरवी जे मुद्दे मांडले होते, तेही सोडायचे का?

शिवाय संजना जे करत आलीय, ते करण्याचा आरोप अरुंधतीवर करणं याबद्दल आधी लिहिलंच आहे.

आधी अप्पा आणि आता यशला हाणामारी आणि धमकावण्याचे प्रकार झाले. हा बिल्डर यांच्या घरी आधी येऊन गेलाय, आणि त्याने तूच का तो यश? असा प्रश्न विचारला होता. तरीही त्याला बघून यशला हाच तो बिल्डर हे कळत नाही. केस मागे घे, अशी त्याने धमकी दिल्यावर तो विचारतो, म्हणजे तूच का तो बिल्डर ? (आधीच्या प्रश्नाचा बदला पण घेतला)

कांचन अजूनतरी अप्पांसोबत आणि बंगला पाडू नका टीम मध्ये आहे. पण तिला हल्ली चालतानाही आधार लागतो. हा कांचनचा प्रॉब्लेम नसून अर्चना पाटकरांचा असावा. तरी एक दिवस तिला कोर्टात आणलं. हे लोक घर सोडून गेले तेव्हा एका देवळाशी तिला जमिनीवर बसवलं होतं

हा बिल्डर यांच्या घरी आधी येऊन गेलाय, आणि त्याने तूच का तो यश? असा प्रश्न विचारला होता. तरीही त्याला बघून यशला हाच तो बिल्डर हे कळत नाही. >> Lol
टीम अरुंधती म्हणजे सगळेच फेयर आणि गोग्गोड असे असते यांच्यात!
बहुधा कांचन अजून तळ्यातमळयात आहे आणि कधीही यांची टीम सोडून जाईल....
संजना फारच फॅशनेबली कोर्टात येते. तिचे ते केसांचे कलरिंग अजूनही जमलेले नाही, त्यामुळे ब्राऊन-पांढरट बारीक वायरींचं भेंडोळं डोक्यावर ठेवल्या सारखं दिसतं! ईशा नाक फेंदारुन बोलते. अन्या नुसताच खुळचटा सारखा पाहत बसतो. यांना कुणालाच नऊ ते सहा असे ऑफीस नाही! इव्हन नितीन ला ही नाही.
ते वीणा संगीत विद्यालय तर राम भरोसे चाललेय. ती वीणा तर आशुतोष गेला तरी आली नाही!
केदार, अविनाश, वर्षा, अरुंधतीचा भाऊ -अरुंहे सगळे गायब आहेत.

भरत, छल्ला Lol

हा बिल्डर यांच्या घरी आधी येऊन गेलाय, आणि त्याने तूच का तो यश? असा प्रश्न विचारला होता. तरीही त्याला बघून यशला हाच तो बिल्डर हे कळत नाही >>> Lol

हिचा नवरा आहे. पण .. जाऊ दे ... मालिकेत तो परत दिसला तर त्याच्याबद्द्ल लिहू. >>> Rofl ही कॉमेण्ट सर्वात भारी आहे. अनेक सिरीयल्सच्या कॅरेक्टर्स बद्दल किंवा उपकथानकांबद्दल लागू होईल.

ते वीणा संगीत विद्यालय तर राम भरोसे चाललेय >>> Happy त्या रेस्टॉ चे काय झाले? ते ती सोडत असल्याचा सीन पाहिला होता. तो धागा अधिकृतरीत्या बंद झालेला दिसतोय.

या सिरीयलवाल्यांच्या लॉजिकमधे नवरा हा कमी वाईट असतो व त्याला भुलवणारी फॅशनेबल स्त्री ही खरी व्हिलन असते (मानबा ची आख्खी थीम शनायाबद्दल आहे, लफडेबाज नवर्‍याबद्दल नाही). इथेही संजना मेन व्हिलन व अनिरूद्ध चुकीचा दाखवला असला तरी त्याला पूर्ण व्हिलन रंगवत नाहीत. थोडाफार सेन्स असलेला व जरी घर पाडून टॉवर बांधायचा असला, तरी घरातील लोकांनाही त्यात सामावून घ्यायची इच्छा असलेला दाखवला आहे. ठीक आहे. व्यक्तिरेखा कशी दाखवावी याचे स्वातंत्र्य त्यांना आहे. पण मग असा अनिरूद्ध त्याच्या मुलावर हल्ला होतो तेव्हा त्याचे पहिले इन्स्टिंक्ट मुलाला किती लागले, हल्लेख्रोरावरचा राग हे असायला हवे, कोणत्याही नॉर्मल व्यक्तीचे असेल त्याप्रमाणे. पण यात त्याचे त्यावेळचे संवाद संजनाला हे सगळे केस मधे कसे अडचण निर्माण करते वगैरे सांगण्याबद्दल आहेत.

या मालिकांमधे एखादे उपकथानक, एखादी घटना, एखाद्य कॅरेक्टरची स्पेसिफिक सवय - हिंदी पिक्चर्स मधे "उसूल" असतो तसे- त्या त्या एपिसोड पुरतेच असतात. पुढे काही एपिसोड्सनंतर कथानक वाट फुटेल तिकडे वाहात जाते. ते आधीचे उपकथानक ई शी पूर्ण फारकत असलेले सीन्सही मग बिनदिक्कतपणे खपवले जातात. भरत यांच्या पोस्ट्स मधे १-२ उदाहरणे आहेत. वडिलोपार्जित घराची मालकी वगैरे. त्यामानाने हिंदीतले उसूल किमान पिक्चरभर टिकत.

आजचा भाग फारच विनोदी होता.
आधी अरूंधती आणि अप्पा एका अगदीच तुटपुंज्या स्टॉल वर ( जिथे दोन कप चहा देखील बनवणे कठीण आहे असा सेटअप!) चहा पिताना तिथे यश आणि अनिश येतात. रस्त्यावर यांच्याखेरीज कुठलेही वाहन अथवा पायी चालणारे देखील कुणी नसते. तिथे केसांचा जुडा बांधलेला एक गुंड ( ज्याने आधी अरुंधतीवर आणि अप्पांवर हल्ला केला होता!... ज्याचा चेहेरा अरुंधतीचा बरोब्बर लक्षात आहे...घाबरत नाही ती आपल्यासारखी!!..)तर तो जात असतो ...
अरुंधती ने सांगितल्यावर यश आणि अनिश त्याचा पाठलाग करून त्याला पकडतात. नुसती कॉलर धरल्यावर तो एव्हढा सपोझेडली गुंड असणारा आडदांड माणूस; मेणागत मऊ होऊन..प्लीज मला मारू नका, मी तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे...असा.
कबूल होतो!!!
आणि नेक्स्ट सीन मध्ये यश घरी येऊन अप्पांना सांगतो की आम्ही त्याला पोलिसात दिले...
अरे! पोलिस काय असे कुणीही आलेल्याला ठेऊन घेतात की काय?
काही पुरावा, फिर्याद वगैरे नसताना?
कमाल आहे!
या सिरीज मध्ये, कुणी कुणावर हल्ला करताना.. पात्रांच्या लक्षात राहिला तरी...प्रेक्षकांच्या लक्षात हल्लेखोरांचा चेहेरा नक्कीच राहणार नाही हे निर्मात्यांना माहिती असल्याने .आपल्याला फ्लॅश बॅक दाखवतात..तेव्हढे तरी बरे! Happy
कारण टीम अरूंधती मधल्या मेंबरांवर इतक्यंदा इतक्या वेगवेगळ्या वेळी हल्ले झालेत..की कोणता हल्लेखोर केव्हा होता हे साहजिकच लक्षात राहत नाही. ... Happy

लो बजेट करण्याच्या नादात खूपच विनोदी आणि इल्लोजिकल होत चालली आहे ही सिरियल...!!
Happy

बऱ्याच दिवसांनी इथले प्रतिसाद वाचले आणि अपेक्षित मनोरंजन झालं Lol
ईशा ही टीम संजनाच्या बाजूने साक्षीदार. पण उलट तपासणीत टीम अरुंधतीच्या वकील सुलेखाताईंनी तिच्याकडून असं काही वदवून घेतलं की संजनाच्या वकीलाला, ही इमॅच्युअर आहे, तिच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका, असं सांगावं लागलं. >> म्हणजे वकीलच उलटला म्हणायला पाहिजे!

पोलिस काय असे कुणीही आलेल्याला ठेऊन घेतात की काय?
Lol Lol

म्हणजे वकीलच उलटला म्हणायला पाहिजे!
>>>>
आत्तापर्यंत साक्षीदार उलटल्याचं ऐकलं होतं. हे नवलच.

आणि या भानगडीत अनिश का आहे? त्याचं नी इशाचं फाटलंय ना? का त्याला नेक्सजेन अरू व्हायचंय? आणि सुलेखाताईंनी अरूला बाहेर काढलं होतं ना आशुच्या मृत्यूनंतर? मग त्या अचानक तिच्या बाजूने केस का लढवताहेत? अरूचं रेस्टॉरंट, पनवेलचा आश्रम, केळकरांचा कसलासा बिझनेस आणि वर्ल्ड फेमस म्युझिक स्कूल सगळं बेवारस का आता? अनिरुद्ध, संजना, इशा यांचा आर्थिक सोर्स काय? अभीची बायको आणि मुलगी कुठे गेली?

गुंड बावळट होता. अप्पांना घाबरवायचे कामही त्याला जमले नव्हते. त्यांना वाटले, आपली पेन्शन पळवायला आलेत.

सुलेखातईंच्या प्रश्नांच्या उत्तरात ईशा संजना आणि अनिरुद्धला अडचणीत आणणारी विधाने करू लागली. अप्पांच्या सह्या घ्यायचा त्यांचा प्लान रेडी होता, असं ती म्हणाली. त्यामुळे वकिलाने तिला इमॅच्युअर म्हटले. याची शिक्षा म्हणून संजनाने ईशाला कॉफी आणि फ्रेंच ऑम्लेट दिलंच नाही.

पुढची काँट्रॅडिक्शन - सुलेखाताईंनी सांगितलं की अनिरुद्ध, संजना, अभिषेक आणि ईशा हे सगळे बेकार बसलेत, कोणीही कमवत नाही. संजनाच्या वकिलाने यशला विचारले की बंगल्याच्या डागडुजीचा खर्च तुम्हांला कसा परवडणार? तर हा म्हणाला आम्ही संयुक्त कुटुंबात राहतो, सगळे मिळून करू. याच्याही उत्पन्नाचा काही पत्ता नाही आणि त्या वकिलाने हे काढलेच. मग गप बसला. खरं तर ते डागडुजी करतील नाहीतर इतका व्यवस्थित दिसणारा बंगला पडला की त्याखाली दबले जातील , वकिलाला आ णि कोर्टाला काय करायचंय? पण बंगला पाडून टॉवर बांधायची आणि न बांधायची कारणे असा घरी करायचा वादविवाद हे लोक कोर्टात करतात आणि जज वादविवाद स्पर्धेचा परीक्षक आहे.
यशने बंगलाच हवा टॉवर नको, याचं एक कारण आमच्या परसबागेत पिकवलेल्या ताज्या भाज्या आम्ही खातो असं सांगितलं. टेरेस गार्डन, किचन गार्डन येईल की करता.

वकिलाच्या यशच्या कामासंबंधीच्या प्रश्नावर त्याने काशिनाथ घाणेकर स्टाइलमध्ये डायलॉगबाजी केली, त्याचे संवाद मात्र बाळ कोल्हटकरी होते आणि अनिशने भर कोर्टात टाळ्या वाजवल्या. दोघांच्या कामाची स्थिती सारखीच आहे.

जज वर्ल्ड फेमस अरुंधतीला ओळखत नाही आणि तिचा फॅन नाही, हेच नवल.

फार धमाल पोस्टी आहेत. तुफान हसलो Happy

प्लीज मला मारू नका, मी तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे...असा. >>> Lol यातले सगळे गुंड, पोलिस, कामगारवर्ग हे "प्रमाण" भाषेत बोलतात, किंवा नकली ग्रामीण. त्यामुळे शाळेच्या गॅदरिंगच्या नाटकातील प्रसंग वाटतात ते.

अरे! पोलिस काय असे कुणीही आलेल्याला ठेऊन घेतात की काय? >>> Lol पोलिसखाते यांच्या मर्जीने चालते. तिकडे डेडली आत्यामधे सुद्धा आकाशने "केस ओपन करायला सांगितले आहे" पोलिसांना.

म्हणजे वकीलच उलटला म्हणायला पाहिजे! >>>>
आत्तापर्यंत साक्षीदार उलटल्याचं ऐकलं होतं. हे नवलच. >>> Lol

वकिलाच्या यशच्या कामासंबंधीच्या प्रश्नावर त्याने काशिनाथ घाणेकर स्टाइलमध्ये डायलॉगबाजी केली >>> Lol हो पाहिला तो सीन.

जज वर्ल्ड फेमस अरुंधतीला ओळखत नाही आणि तिचा फॅन नाही, हेच नवल. >>> Lol खरे आहे.

पण बंगला पाडून टॉवर बांधायची आणि न बांधायची कारणे असा घरी करायचा वादविवाद हे लोक कोर्टात करतात आणि जज वादविवाद स्पर्धेचा परीक्षक आहे. >>> Lol भरत -या असल्या संवादांतही तो जज हे सगळे "नोट" करत होता Happy पण जज भारी आहे. निर्विकारपणे सगळे ऐकत असतो व एखाद्या वकिलाने ऑब्जेक्शन घेतल्याशिवाय कोणतीही निरर्थक चर्चा थांबवत नाही. उद्या "बागबान" मधल्या अमिताभच्या मोनोलॉगसारखे भाषण आप्पांनी सुरू केले तर ते ही नोट करेल तो.

जाऊ दे उगाच आयडिया द्यायला नको. पाणी घालून त्यावर एक आख्खा एपिसोड बनवतील. पाणी किती घालावे यालाही लिमिट असते यांना सांगायला हवे. यश व नितीन वर हल्ला होतो तो सीन पूर्ण दाखवला आहे. त्यानंतर यश घरी येउन तो सीन कसा घडला ते व्हर्बली सांगतो. त्यानंतर तोच सीन परत फ्लॅशबॅक मधे दाखवला आहे. अरे दोन मिनिटांपूर्वी झालेला सीन कसला फ्लॅशबॅक मधे दाखवता.

Biggrin
फारएंड,
खरंच खूपच पाणी घालतात...!
जज सारखे मान खाली घालून नोट करत असतात...वकिलांनी सांगितल्याबरहुकूम!
मूळ मुद्दा हा अप्पांना फसवून सह्या घेतल्याचा आहे...पण निकाल हा समृद्धी बंगला तसाच रहावा, पाडू नये...असा लागणार आहे!!
धमाल सुरू आहे..
Lol

दोन दिवस प्रोमो दाखवताहेत, अभिषेक कोर्टात एंट्री घेतो आणि अनिरुद्धवर डाव उलटवतो. अनिरुद्धने बिल्डरकडून पैसे घेतलेत आणि हे आपल्यापासून लपवून ठेवलंय हे कळल्यावर तो बिथरला.
जज अनिरुद्धला एक वर्षाची शिक्षा देणार. Fir वगैरे नाही, सरळ शिक्षा.
बरं ते दोन बाजूंच्या साक्षीदारांसाठी दोन वेगवेगळे चौथरे का?
हे जिल्हा आणि सत्र न्यायालय दाखवलंय.

खरंच खूपच पाणी घालतात...!>>> हो ना! आक्खी सिरियल वाहुन जावी इतक पाणी घालतात पण परिस्थिती जैसे थे.

अगदी विनोदी मालिका झालेली आहे कोर्ट केस सुरू झाल्यापासून. नक्की मुद्दा काय आहे ते जज विसरून जाणार आहेत.

संगीत विद्यालय, हॉटेल, कॉलेज ह्याबरोबरचं अरु क्लास घ्यायची तेही बंद झालेत. नितिनही २४ तास ह्यांच्याबरोबर फिरतो. त्याची बायको कधीकाळी आजारी होती हे तो विसरला असावा. विशाखालाही केस कशी चालू आहे ह्याच पडलेलं नाहीये. बिल्डरकडून घेतलेले पैसे संजनाने खर्च करून टाकले म्हणे. लाखो रुपये कशात घालवले देव जाणे.

संसदेतल्या अविश्वासाच्या प्रस्तावावरील चर्चेची आठवण व्हावी अशी सुनावणी सुरू आहे. कोणीही काहीही मुद्दे मांडतोय, अरुंधती संजनाला प्रश्न विचारतेय , संजना आणि अरुंधती जागा सोडून पुढे येतात . प्रत्येक पक्ष आपल्यावर झालेल्या आरोपांचं उत्तर देण्या ऐवजी प्रत्यारोप करतोय.
जजला या कुटुंबांतील भानगडींत भलताच रस आहे. खटल्याशी संबंध नसला तरी आलेला प्रत्येक मुद्दा नोंदवून घेतोय. निवृत्त झाल्यावर त्यावर पुस्तक नाही, तरी पेपरात लेख लिहील.
अभिषेक आज येईल, उद्या येईल असं प्रोमो- गाजर दाखवणं सुरू आहे.

भरत Lol

मीही हे भाग पाहतोय. सिरीयसली. आता लोकसत्तामधे "उद्या अभिषेक कोर्टात येणार" टाईप बातमी येणे बाकी आहे फक्त. यश "सेन्सिबल" आहे. यश गुंड आहे. यशने तेव्हा कधीतरी हिला वाचवले. तिला मदत केली. अरूंधती घर हडप करणार आहे. ती आई-वडिलांकरता करणार आहे. संजनाने गुंड पाठवले. पण ते फक्त धमकी द्यायला पाठवले. संजनाने अरूंधतीची मैत्रिण म्हणून येऊन तिला फसवले. अनिरूद्धने संजनाला आय लव्ह यू म्हंटले (मागे अरूंधती उभी असताना. का कोणास ठाऊक पण फ्लेक्स वरच्या स्थानिक नेत्यासारखे दागिने घालून). हा चांगला आहे. तो वाईट आहे. हिने तिला फसवले. तिला घर हडप करायचे आहे.

या सगळ्याचा "अप्पांनी सही स्वखुशीने केली की त्यांना फसवून ती घेतली गेली" इतकीच मर्यादित असलेल्या केसशी काय संबंध आहे. उद्या अरूंधतीने अप्पांना काय वाट्टेल ते खोटे सांगितले आहे व त्यामुळे त्यांनी सही केली असे निष्पन्न झाले तरी या केसचा संबंध त्यांनी सही स्वखुशीने केली, की नाही इतकाच आहे. त्यामागच्या प्रेरणा ई शी नाही.

तरी तो जज नोट करतोच आहे. या रेटने उद्या अरूंधतीच्या साठीसमारंभाला तिच्याबद्दल लेख/कविता करायला या जजपेक्षा जास्त माहिती असलेली व्यक्ती सापडणार नाही.

{अरूंधतीच्या साठीसमारंभाला तिच्याबद्दल लेख/कविता करायला या जजपेक्षा जास्त माहिती असलेली व्यक्ती सापडणार नाही.}
Lol

Pages