Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसलाच विचार करून खेळलं नाही
कसलाच विचार करून खेळलं नाही असच वाटलं >> +१
पण जास्त डोक्यावर चढवून ठेवले त्यात गेले. >> +१ पहिल्या इनिंग मधे अवास्तव क्षुल्लक समजून मारत होते नि दुसर्या इनिंगमधे समोर बेदी असल्यासारखे खेळत होते.
द्रविडला सुद्धा मग क्लीन चीट देऊ नये. >> कुठे दिलेली दिसली तुला क्लीन चीट द्रविडला ? विषय शर्माचा सुरू आहे तेंव्हा दोषारोप त्याच्याकडे केले आहेत. मधेच द्रविड ला मधे आणून शर्मा वरचा ठपका दूर नाही होणार. कोचपेक्षाही कप्तानाचा प्रभाव टीम वर अधिक असतो असे माझे मत आहे.
एकूनच सगळी इंग्लिश टीम आता स्विच हिट्स नि रीव्हर्स स्वीप करत पीळ आणणार
“पहिल्या इनिंग मधे अवास्तव
“पहिल्या इनिंग मधे अवास्तव क्षुल्लक समजून मारत होते नि दुसर्या इनिंगमधे समोर बेदी असल्यासारखे खेळत होते.” +१ इंडियाची हिस्टरी आहे कुणालातरी मोठ्ठ करून ठेवायचं जो प्लेयर नंतर फारसा दिसतही नाही - उदा. जेसन क्रेझ्झा, एजाज पटेल.
“मधेच द्रविड ला मधे आणून शर्मा वरचा ठपका दूर नाही होणार.” - कात्रज रे.
कोचपेक्षाही कप्तानाचा प्रभाव
कोचपेक्षाही कप्तानाचा प्रभाव टीम वर अधिक असतो असे माझे मत आहे.
>>>>>>
हो, पण कप्तान स्वतः योग्य अप्रोचने खेळून दाखवत होता असे मला वाटते. आणि कप्तान कधी स्वतःचा विचार करून खेळूच शकत नाही. तो नेहमी जिंकायचा विचारच करणार. त्यामुळे त्यानेही हे टीम मीटिंग मध्ये डिस्कस केले असणारच. इथे प्लेअर स्वतःच गंडलेले होते असे वाटले. आणि हे आधीही आपण पाहिले आहे. हे पहिल्यांदा झाले नाहीये. आधी हे झाकले जात होते कारण स्पिनर जिंकवत होते. यावेळी इंग्लंडने स्कोअर टाकला आणि ते नडले.
पूजाराला जर फॉर्म गवसला असेल तर त्याला का आणत नाहीयेत परत हे अनाकलनीय... फॉर्म गेल्याने मधल्या काळात फार शेल मध्ये जात होता. पण जर त्याच्या धावा होऊ लागल्या तर तो असा कुंथाणार नाही आणि फिरकीला योग्य उत्तर देऊ शकतो.
आज दुसरा कसोटी सामना....
आज दुसरा कसोटी सामना....
पहिला हरल्याने मालिकेची रंगत वाढली आहे..
भारत टॉस विजयी.. फलंदाजी
मुकेश कुमार, पाटीदार, कुलदीप आत..
राहुल. जडेजा, सिराज बाहेर..
इंग्लंड मध्ये अजून एक नवीन स्पिनर..
आता त्याला सुद्धा हिरो बनवून आपली परंपरा कायम ठेवतात का हे बघणे रोचक
लंच ब्रेक भारत 103-2
लंच ब्रेक भारत 103-2
शर्माने फालतू विकेट टाकली. त्याच्याकडून आशा होती.
गिल पुन्हा आज कसोटी फॉरमॅटला कच्चा वाटला.
यशस्वी आज शतक मारेल अशी भविष्यवाणी अंदाज मी आज सकाळी सामना सुरू व्हायच्या आधी वर्तवला होता. सध्या 51 झालेत... पण शतकाचे सुद्धा मोठे रुपांतर केलेले आवडेल. या मालिकेत भारतातर्फे सर्वाधिक धावा त्याच्याच असतील असे वाटते.
यशस्वीने माझ्या शब्दाची लाज
यशस्वीने माझ्या शब्दाची लाज राखली
बाकीच्यांनी मात्र फालतू विकेट फेकल्या.. इथे ५५० + धावांचा डोंगर रचला असता आपण
यशस्वी १७९ नाबाद... त्याखालोखाल थेट ३४
हळू हळू भारतीय संघाची अवस्था
हळू हळू भारतीय संघाची अवस्था ५० वर्षंपूर्वी होती तशी होणार. कागदावर ६ पक्के फलंदाज, पण प्रत्यक्षात एक कुणितरी खेळतो, बाकीचे बाद होऊन परत.
आजचा श्रेयस नि गिलचा खेळ बघता
आजचा श्रेयस नि गिलचा खेळ बघता दोघांनीही पुढच्या टेस्ट साठी कोहली नि सर्फराझसाठी जागा करून देण्याची गरज आहे. मुकेश ला घेण्याची खरच गरज होती का ? पहिल्याच दिवशी बॉल रीव्हर्स होत होता म्हणजे उमेश हवा होता का ? किंवा आपली बॅटींग येईतो पेसर्स ना काही काम उरणार आहे का कोण जाणे !
“ मुकेश ला घेण्याची खरच गरज
“ मुकेश ला घेण्याची खरच गरज होती का ?” - मला वाटतं मुकेश चं सिलेक्शन हा चांगला निर्णय ठरू शकेल. डोमेस्टिक क्रिकेटमधे फ्लॅट पिचेसवर अनेक वर्षं बॉलिंग वर्कहॉर्स असण्याच्या त्याच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो.
जयस्वाल द्विशतक..
जयस्वाल द्विशतक..
पण उगाच अँडरसनला चुम्मा शॉट खेळायला गेला आणि बाद झाला.
त्यात तो अँडरसन इंग्लंडमध्ये बॉलिंग टाकत आहे असा स्पेल चालू होता.
मस्त खेळला पोरगा..
पण कसोटीत समोरच्या प्रमुख आणि फॉर्मातल्या गोलंदाजाला इज्जत देणे आणि विकेट न देणे यात फलंदाजांचा विजय असतो हे त्याला कोणीतरी उद्या सांगायला हवे.
मस्तच खेळला यशस्वी. वेल प्लेड
मस्तच खेळला यशस्वी. वेल प्लेड!! पण उगाच टाकली विकेट. बॉल काही विकेट टेकिंग नव्हता आणि दुसरीकडून कुलदीप पण चांगला खेळत होता
396 सर्वाबाद..
396 सर्वाबाद..
जयस्वाल नंतर टॉप 7 फलंदाजांचे आकडे 14, 34, 27, 32, 27, 17, 20 असे आहेत.. हे नडू नये. इंग्लिश फलंदाजांना पहिल्या डावात रोखणे गरजेचे आता..
भारत ही मालिका 5-0 ने हरला
भारत ही मालिका 5-0 ने हरला तरीही आश्चर्य वाटणार नाही
असे नाही होणार.
असे नाही होणार.
आधी या सामन्याचे काय होते ते बघूया.
पण कोहली येत आहे पुढच्या सामन्यात.
राहुल सुद्धा आला तर बरे होईल. कारण गिल अय्यर फार वाईट खेळत आहेत.
या सामन्यात सुद्धा आपल्याला मुकेश कुमार ऐवजी अतिरिक्त फलंदाज घेता आला असता.
टॉस जिंकलो होतो. पण इथे पहिल्या इनिंगला भारताला 500+ धावा मारता न येणे हे फलंदाजीचे अपयश आहे असे मला वाटते.
बूम बूम... मस्त घेतला रूटला..
बूम बूम...
मस्त घेतला रूटला..
आई ग.. काय दांडका काढला.. पोप
आई ग.. काय दांडका काढला.. पोप गेला.. बूम बूम अगेन
बूमाराहने खोलला इंग्लंडला
बूमाराहने खोलला इंग्लंडला
पहिल्या सामन्यात सुद्धा हेच बोलत होतो की जास्त वापरा त्याला जरा.. तोच विकेट टेकर वाटत होता तेव्हाही..
पण पाच कसोटी आहेत.. आराम सुद्धा हवा बिचाऱ्याला..
दुसऱ्या डावात स्पिनर येतील रंगात आणि बुमराहला जास्त जीव जाळावा लागू नये.
यशस्वी आजच पुन्हा फलंदाजीला येणार वाटते आता..
डोमेस्टिक क्रिकेटमधे फ्लॅट
डोमेस्टिक क्रिकेटमधे फ्लॅट पिचेसवर अनेक वर्षं बॉलिंग वर्कहॉर्स असण्याच्या त्याच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो. >> नाहि रे. अगदीच पोपट केलाय आज त्याने. अॅश ला एकही विकेट मिळाअली नाही हि चांगली गोष्ट आहे. दुसर्या डावात उट्ट काढेल.
शर्मा अन् जयस्वाल दोघांना
शर्मा अन् जयस्वाल दोघांना अँडरसन नी काढलं.
आता गिल अन् अय्यर ची खरी कसोटी...
संपला बाबा अँडरसनचा मॉर्निंग
संपला बाबा अँडरसनचा मॉर्निंग स्पेल
लीड खूप मोठा आहे हे चांगले
पण उगाच अगदीच कोसळून बझबॉलला गेममध्ये येऊ देऊ नका..
नुसते जिंकायचे नाही तर असे जिंकायचे आहे की इंग्लंडला त्यांनी लढत दिली असे वाटले नाही पाहिजे.
संपला बाबा अँडरसनचा मॉर्निंग
संपला बाबा अँडरसनचा मॉर्निंग स्पेल
लीड खूप मोठा आहे हे चांगले
पण उगाच अगदीच कोसळून बझबॉलला गेममध्ये येऊ देऊ नका..
नुसते जिंकायचे नाही तर असे जिंकायचे आहे की इंग्लंडला त्यांनी लढत दिली असे वाटले नाही पाहिजे.
AUS v WI, 2nd ODI
AUS v WI, 2nd ODI
AUS 93-5 (17)
111-2
111-2
अँडरसन चा स्पेल संपताच गेम पलटला.
स्पिनरना अय्यर गिल दोघेही आज मारून खेळत आहेत.
..
श्या नजर लागली माझी
आली विकेट.. गेला अय्यर.. मारण्यातच गेला.. बाहेर जाणार हा
111-3
अय्यरने अत्यंत अनावश्यक शॉट
अय्यरने अत्यंत अनावश्यक शॉट मारून विकेट टाकली. पथेटिक सेन्स ऑफ द मॅच सिच्युएशन!! ‘मला बॉल्स सोडायला कंटाळा येतो‘ ही ज्याची टेस्ट क्रिकेटविषयी धारणा असेल अश्या बॅट्समनविषयी टेस्ट क्रिकेटपुरतं तरी मला फारसा आदर नाही.
एके काळी मुंबईचे बॅट्समन विकेटवर प्राईसटॅग लावण्यासाठी प्रदिद्ध होते. शर्मा (मधली दोन वर्ष सोडली तर त्याआधी आणि त्यानंतर), अय्यर, शॉ प्रभृती अगदीच अन-मुंबई क्रिकेट खेळतायत.
“अगदीच पोपट केलाय आज त्याने.”
“अगदीच पोपट केलाय आज त्याने.” - हो ना रे. दुसर्या इनिंगला काही करतो का ते बघू. नाहीतर पुढच्या मॅचला परत बॉलिंग अॅटॅक चेंज होऊ शकेल.
पिच काही फारसे डेंजरस वाटत
पिच काही फारसे डेंजरस वाटत नाही. बुमरा लागला तर बरय नाहि तर साडेतीनशे आरामात काढतील असे वाटले दुपारचा खेळ बघून
SL v AFG, Only Test
SL v AFG, Only Test
AFG 199-1 & 198
SL 439
Day 3: Stumps - Afghanistan trail by 42 runs
त्या दिवशी विंडीजने ऑस्ट्रेलियाचा गेम केला.. सोबत आपला सुद्धा झाला...
आता अफगाण लंकेचा गेम करेन...
आणि सोबत
“नाहि तर साडेतीनशे आरामात
“नाहि तर साडेतीनशे आरामात काढतील असे वाटले” - शुभ बोल रे नार्या!! बुमराह, अश्विन, कुलदीप, अक्षर, मुकेश (or any combination there of) पैकी कुणीही चालो पण इंडिया ही मॅच जिंको!
शेपूट गुंडाळून टाकलं पाहिजे
शेपूट गुंडाळून टाकलं पाहिजे
हर्टली अन् फोक्स फोकलत आहेत
ओव्हर ला एक तरी बाऊंड्री मारताहेत...
१० ओव्हर मधे ४८ ची पार्टनरशिप झाली
जिंकलो बुवा १००+ धावांनी...
जिंकलो बुवा
१००+ धावांनी...
Pages