क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिंकू ह्या सिरीज चे फाईंड म्हणायचे का ? मिळालेल्या संध्यांचे सोने केलय पोराने. फास्ट बॉलिंग मधे बरेच काम करायला लागणार असे दिसतेय एकूण. सगळा हिट अँड मिस कारभार वाटतोय.

तिलक वर्माला आज का बाहेर बसवल ?

“रिंकू ह्या सिरीज चे फाईंड म्हणायचे का ?” - गेल्या दोन मॅचेसपेक्षा आजचा रोल खूप वेगळा होता त्याचा आणि त्याने छान निभावला. जितेश शर्माविषयी दोन वर्षांपूर्वी कुंबळेच्या इंटरव्ह्यूमधे ऐकलं होतं. मग आयपीएल मधे पाहिलं, आज मस्त डेब्यू केला. फास्ट बॉलिंगमधे चहर तसा भरवशाचा आहे. आज बहुदा कमबॅक चा - पहिला डाव भुताचा - म्हणून सोडून देऊ. मुकेश पण हुशार बॉलर आहे. लेफ्ट आर्मर्सचं गणित मात्र काही केल्या सुटत नाही. झहीर नंतर उनाडकट, खलिल, अर्शदिप - असे प्रयोग झाले, पण बात कुछ जमीं नहीं.

२०-२० विश्वचषकात आकाराच्या संघात बुमराह असेल.
शमीने जो धुमाकूळ घातला तो पाहता तो सुद्धा असू शकतो.
तिसरा वेगवान गोलंदाज फलंदाजीच्या जीवावर दीपक चहर असू शकतो.
चौथा पांड्या आहेच.
स्पिनरमध्ये जडेजा किंवा अक्षर
आणि कुलदीप किंवा बिष्णोई..
असे सहा प्लेअर झाले.
आता किपर धरून पाच फलंदाज हवेत.
म्हणून एक राहुल किंवा ईशान
उर्वरित चार फलंदाजमध्ये सूर्या फिक्स आहे जो चौथा येतो.
मग बाकी ३ कोण?
जर शर्मा कोहली आले तर नवीन पोरे उपाशी.
एका जागेसाठी यशस्वी, गायकवाड, शुभमन, अय्यर...
आणि आता रिंकू सिंग.. मी तर याला केव्हाही घेईन. हा आपल्याला नॉकआऊट प्रेशर गेम मध्ये कामाला येईल.

शर्मा कोहली यांनी खेळायचे ठरवल्यास अंतिम ११ असे राहतील.

रोहीत
ईशान/राहुल
कोहली
सूर्या
रिंकू
पांड्या
जडेजा / अक्षर
दीपक चहर
कुलदीप / बिष्णोई
शमी
बूमराह

वर्ल्ड कप विंडीज - युएस मधे आहे जिथे पिचेस स्लगिश असतात . स्पिन्र धार्जिणी असली तरी प्रकार वेगळा असतो ते लक्षात ठेवून संघ निवडलेला उत्तम. उदा . : सूर्याचे स्लो पिचेस वर काय होते बघता त्याला तशा प्रकारचे बरेच एक्स्पोजर आधीच मिळाले तर बरे होईल. तीन पेसर्स पांड्या असताना खरह गरजेचे ठरतील का हे बघायला हवे. कोहलीपेक्षा जैस्वाल ला आत आणणे जास्त मह्त्वाचे ठरेल का ?

यू एस मध्ये चांगले असतील ना पीच.. मागे इंटरनॅशनल सामने हाय स्कोरिंग झाल्याचे आठवतेय. विंडीज केरेबियन लीग कधीच फॉलो केले नाही. स्लगीश पीच आहेत तिथले आणि त्यानुसार संघ हवा हा मुद्दा बरोबर आहे. आयत्या वेळी पुन्हा नेहमीसारखा आश्विन येऊ शकतो जर आपण तीन स्पिनर दोन वेगवान एका पांड्या घेऊन उतरलो तर. कारण सुंदरने सुद्धा म्हणावी तशी चमक अजून दाखवली नाहीये. कदाचित अय्यर सुद्धा तिथे चांगला खेळू शकतो आणि म्हणून जागा मिळवू शकतो संघात. त्याला तर आफ्रिकाला कसोटी संघात सुद्धा घेतले आहे. अजून शॉर्ट बॉल खेळता येत नाही हा शिक्का पुसला नाही त्याचा. बघूया तिथे काय करतो.

शर्मा कोहली जो निर्णय घेतील किंवा बोर्ड घेईल तो जोडीबाबत घेतला जाईल वाटते.
खेळले तर दोघे.. नाही तर दोघे नाही..
मला पर्सनली भावनिक दृष्ट्या विचार करता वाटतेय की हा शेवटचा २०-२० त्यांनी खेळावा. आणि त्यात काही नुकसान आहे असेही नाही. कोहली २०-२० रन मशीन आहे. शर्माचा सध्याचा अप्रोच फायदेशीर आहे. राहुल मात्र नको वाटते. शर्मा कोहली नसले तरी तो नको

शर्मा, कोहली आणि राहुल T २०मध्ये नकोच. कशाला भावनिक व्हायचय. दोघांना भरपूर संधी मिळाल्या आहेत आणि त्या त्या वेळी त्यांनी त्यांची निवड सार्थ ही ठरवली आहे. पण दोघानाही एकही ICC ची ट्रॉफी मिळवता आली नाही.२००८ सारखी नवीन टीम पाहिजे. नाहीतर परत सेम पॅटर्न रिपीट होईल.

पण दोघानाही एकही ICC ची ट्रॉफी मिळवता आली नाही.
>>>
मग धोनीला आणा पुन्हा
आयसीसी स्पर्धा जिंकलो नाही, आता हा गेला वर्ल्ड कप सुद्धा जिंकलो नाही हे खरे आहे. पण म्हणून जे खेळले त्यांनाच काढायचे का.. की त्यांच्या भोवती नवीन कॉम्बिनेशन बनवायचे..

कशाला धोनी? त्यांना One day मधून काढा कोण म्हणतय. त्यांच्या भोवतीच टीम कशाला बनवायला पाहिजे. पंड्या कडे टीम देऊन शर्मा, कोहली आणि राहुल ला One day आणि कसोटी वर फोकस करायला पाहिजे. आणि हे शर्मा कोहली bilateral T20 खेळणार नाहीत ते फक्त महत्वाच्या सिरीज लाच येणार. त्यांच्या वायचाही विचार करायला पाहिजे.

वयाचा विचार का करायचा?
खेळाचा विचार करावा
आपण गेले तीन वन डे वर्ल्ड कप टेबल टॉप करत आहोत. पण नॉकआऊटला कच खात आहोत. अय्यर दुर्दैवाने लवकर बाद होताच राहुल शेल मध्ये गेला. कोहली फायनलला शतक मारून खुश असा खेळू लागला. या दोन्ही गोष्टी मी आधीपासून सांगत होतो की कोहलीच्या डोक्यात पर्सनल माईल स्टोन सुरू झालेत आणि राहुल मोठ्या सामन्यात नॉकआऊट प्रेशर मध्ये दबतो हे देखील राहुल सातत्याने धावा करत असतानाही सांगत होतो.. जर राहुल बाद झाला असता आणि कोहली सोबत अय्यर खेळला असता तर गेम वेगळा असता.. या जर तर च्या गोष्टी आहेत पण म्हणूनच आपल्याला धोनी युवराज हवे आहेत. आणि म्हणून नवीन दमदार आणि जिगरबाज खेळाडूमध्ये रिंकू सिंग आणि यशस्वी दोघे विश्वचषकात मलाही हवेच आहेत.
ऋतुराज आणि गिल यापैकी एकच न्यावा असे वाटते.
२०-२० बेभरवशाचा खेळ आहे. पण आपण एखादा वरून चक्रवर्ती,. हर्षल पटेल वगैरे ट्रंप कार्ड ठरतील म्हणत संघ बेभरवशाचा निवडू शकत नाही. आताही सूर्या एखादी धमाकेदार खेळी करून सामना फिरवेल या विश्वासावर त्याला खेळवत गेले आणि तिथे घात झाला. अन्यथा ८० ला ३ विकेट जाता जगातला कुठला संघ इतका प्रेशर मध्ये येतो.. आपल्याला हेच प्रेशर झुगारणारे हवे आहेत. बाकी संघ आणि अप्रोच ओके आहे.

गेले ३ T२० वर्ल्ड कप आपण सेमीच्या वरती गेलेलो नाही. ५० विश्वचषकात मोक्याच्या वेळी कच खाणारा राहुल T २० मध्येही कच खाऊ शकतो. कोहली ५०साठी खेळू शकतो. एकाच वेळी शर्मा, कोहली आणि राहुल संघात असतील तर आपण फार फार तर सन्मानजनक धावाची अपेक्षा करू शकू. विनिंग टोटल साठी राहिलेल्यावर दबाव. अनुभवी पलयर्सच पाहिजे असं असेल तर माझ्या मते तरी फक्त शर्माचं पाहिजे तोही फक्त प्लेअर म्हणून कॅप्टन साठी पंड्या ठीक आहे.

कोहली नको शर्माचं हवा असे होणे अवघड. कोहली नाही ऐकणार.
आणि शर्मा असताना पांड्या कर्णधार यात सुद्धा परत इगो प्रॉब्लेम होतील.
एकजूट नका घालवू आता संघाची. दोघे खेळवा किंवा दोघे बसवा. पण असे काही करू नका.

कोहली नको शर्माचं हवा असे होणे अवघड. कोहली नाही ऐकणार.
आणि शर्मा असताना पांड्या कर्णधार यात सुद्धा परत इगो प्रॉब्लेम होतील.
एकजूट नका घालवू आता संघाची. दोघे खेळवा किंवा दोघे बसवा. पण असे काही करू नका.

आता कोहली, राहुल आणि रोहित ला T20 मध्ये खेळवू नये, नवीन खेळाडूंसोबत हरलो तरी चालेल, खरे तर कोच पण नवीन हवा, द्रविड नको

त्या त्या फॉरमॅटला साजेशी खेळाची शैली वापरण्याचं कसब , फिटनेस, फॉर्म व उच्चतम दर्जाच्या स्पर्धांचा अनुभव यावर निवड समिती भर देईल/द्यावा; वय हा एकमेव किंवा फार महत्त्वाचा निकष निदान टी 20 वर्ल्डकपसाठी तरी नसावा, असं मला वाटतं. माझ्या टी20 विश्वचषक संघात रोहित, कोहली व राहुल , तिघेही गुणवत्तेच्या जोरावर बसू शकतात .

वय हा एकमेव किंवा फार महत्त्वाचा निकष निदान टी 20 वर्ल्डकपसाठी तरी नसावा, असं मला वाटतं
>>
2007 ला आपण हाच निकष लावला होता

त्या त्या फॉरमॅटला साजेशी खेळाची शैली वापरण्याचं कसब , फिटनेस, फॉर्म व उच्चतम दर्जाच्या स्पर्धांचा अनुभव यावर निवड समिती भर देईल/द्यावा
>>
2009 पासून निवड समिती हेच करत आली आहे. प्ले सेफ.

एक टी 20 वर्ल्डकप न खेळल्याने कोहली, शर्मा, राहुल ला काही फरक पडणार आहे का, तर नाही. पण प्रयोग केल्याने नव्या खेळाडूंना फरक पडेल का, तर नक्कीच.
07 मधे सचिन, द्रविड, दादा बसले ना बाहेर. त्यामुळेच शर्मा सारख्यांना संधी मिळाली. परत एकदा तो फॉर्म्युला ट्राय तर करून बघू. रिस्क है तो ईश्क है...

2009 पासून निवड समिती हेच करत आली आहे. प्ले सेफ.

सहमत, रिस्क घ्यायचीच नाही. कोहली ला काढल तर कोहली फॅन्स नाराज होणार. त्यापेक्षा महत्त्वाचं sponcers च नुकसान होणार. ह्याच दबावापोटी एकाचवेळी सगळ्यांना खुश करायचं धोरण निवड समितीचं दिसतय.

*प्ले सेफ.* - विश्वचषक ही प्रयोग करण्याची व बेदरकारपणे धोका पत्करण्याची स्पर्धा समजू नये, असं आपलं माझं मत. सामने जिंकण्यासाठी तिथे जरूर धोका पत्करावा पण टीम निवडताना नको !

2007 ला आपण हाच निकष लावला होता
07 मधे सचिन, द्रविड, दादा बसले ना बाहेर.
>>
तेव्हा हा फॉर्मेट अंड्यात होता म्हणून बसले.

एक टी 20 वर्ल्डकप न खेळल्याने कोहली, शर्मा, राहुल ला काही फरक पडणार आहे का, तर नाही.
>>>
एक नाही ओ, हा लास्ट ठरेल Happy

टीम इंडिया चोकर आहे. जो पर्यंत ६ फलंदाज आणि 5 गोलंदाज हा फॉर्म्युला संपत नाही , तो पर्यंत कुठलीही मोठी स्पर्धा जिंकता येणार नाही. संघात 7 गोलंदाज (गोल्डन अर्म ) आणि 8 फलंदाज हवेत ( अष्टपैलू धरून) हवेत.
प्रशिक्षक आणि कप्तान ला ६ गोलंदाज वापरणे म्हणजे पाप करणे वाटत. दुरंगी लढती मध्ये पण पार्ट टाइमर वापरत नाही.

*संघात 7 गोलंदाज (गोल्डन अर्म ) आणि 8 फलंदाज हवेत ( अष्टपैलू धरून)* - हवेत , पण आहेत का ? जे उपलब्ध आहेत, त्यांचा कल्पकतेने उपयोग करून घेणं, हे खरं कसब आहे.

आजच्या सामन्यातल्या दोन गोष्टी खटकल्या.
आर्शदीपचा पहिला चेंडू वाईड होता. अंपायरने जाणून बुजून चौकार अडवला!

माझी टी २० चा संघ टेंपलेट - रोहित, जैस्वाल,, सूर्या , रिंकू, पांड्या (कप्तान), जितेश्/इशान ( अ‍ॅटॅकिंग कीपर), तिलक (तो एखादी ओव्हर तरी टाकेल असे धरतोय), जडेजा/अक्षर (स्पिनिंग ऑल राऊंडर) , कुलदीप्/चहल्/बिष्नोई (विकेट टेकिंग स्पिनर), बुमरा, मुकेश्/सिराज्/ शमी/ (अजून कोणी आइअपील मधे निघाला तर तो) - सँमसन बॅकप मधे जाईल.

NZ 55-5
BAN 172
Glenn Phillips*: 5 (6)
Daryl Mitchell: 12 (10)
Taijul Islam 5.4-0-29-2
Day 1: Stumps - New Zealand trail by 117 runs

BAN v NZ, 2nd Test
NZ 4-0 & 180
BAN 144 & 172
Devon Conway*: 1 (12)
Tom Latham: 2 (6)
Shoriful Islam 2-1-1-0
Day 4: Lunch Break - New Zealand need 133 runs

Pages