Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान जिंकलो, नाईट वॉचमन
छान जिंकलो, नाईट वॉचमन खेळताना बघून आणि तो गेल्यावर सुद्धा डाव पुढे सरकताना बघून टेंशन आलेले जरा.... कारण ईंग्लड खेळच हल्ली तसा करत आहे.. त्यात अक्षरला सुरुवातीला ईतके का वापरत होते समजले नाही.
पुढेही स्टोक्स धावबाद होईपर्यंत टेंशन होतेच.
सामनावीर दोघांना द्यायला हवे होते. दोन्ही परफॉर्मन्स स्टॅण्ड आऊट होते. भले या पिचेसवर बुमराहचा परफॉर्मस भारी असला तरी सध्या आपली जी गचाळ फलंदाजी चालली आहे ते पाहता आपल्यासाठी यशस्वीची खेळी सुद्धा फार फार मोलाची होती. अन्यथा त्या धावा आणखी कुठून जमणे अवघड होते.
अभिनंदन, भारत. !!!
अभिनंदन, भारत. !!!
पहिल्या डावातील पोपची स्विंगिंग यॉर्कर वर बुमराने घेतलेली विकेट सदैव आठवणीत राहील !
सामनावीर दोघांना द्यायला हवे
सामनावीर दोघांना द्यायला हवे होते. >> +१
आज द्रविड चे ऐकून बहुधा पुढच्या मॅच मधे अय्यर राहिल असे वाटते. मॅच सिच्युएशन रीड करून प्रेशर अॅब्सॉर्ब करणे ह्याबाबत द्रविड खूश वाटला. (जे बरोबर आहे) . रिस्क घेतल्यावर विकेट्स जातील हे ग्रूहित धरायला हवे असे म्हणाला जे पटलय पण स्पिन डोमिनेट करण्यासाठी असलेल्या प्लेयर जर ते करत नसेल तर मूळात बेसिक मधे काहीतरी राडा झालाय हे उघड आहे नि जेंव्हा तुमचे अनुभवी प्लेयर्स नाहियेत्तेंव्हा ईन द गेम लर्निंग गँबीट घ्यायची का हा प्रश्न उभा राहतो. पुढच्या मॅच मधे राहुल पटिदार च्या आत येईल असे वाटते. कोहली उपलब्ध असेल तर अय्यरची जागा जाईल असे वाटते. किशन नसल्यामूळे भरतची लॉटरी लागली आहे असे धरूया. जाडेजा फिट असेल तर मात्र मजा येणार आहे - राजकोट मधे जाडेजा नाही असे असू शकत नाही. अक्षर कि मुकेश हा प्रश्न फक्त !
जाता जाता रोहित बॅटर्स ने अजून रीसपाँसिबिलिटी घ्यायला हवी असे म्हणालाय. नवखे प्लेयर्स असल्यामूळे त्यांना लीवे द्यायल अहवा असेही म्हणालाय (जे बहुधा जैस्वाल, गिल, पटीदार नि भरत ला उद्देशून असावे) ह्यातले पहिले दोघे धावा काढत आहेत तेंव्हा हे उरलेल्या दोघांसाठी असेल बहुधा. अय्यर ला ह्यात धरले नसावे अशी आशा धरूया. तेंव्हा अय्यर नि रोहित च्या खेळाबद्दल रोहित चे काय म्हणाणे आहे देव जाणे
या विजयाने समीकरणे बदलू शकतील
या विजयाने समीकरणे बदलू शकतील. विजयाने आत्मविश्वास येतो त्याचा फायदा होऊ शकतो. कागदावर फलंदाजी वाईट नाही आपली. आणि कोहली येताच (भरतचा अपवाद वगळता) पुरेशी भक्कम होईल..
बाकी जो रूट सुद्धा धावा करत नाहीये. आणि तो जसा फटका मारून आज बाद झाला, कीबहूना आल्यापासूनच जसा खेळत होता ते पाहता नशीब त्याचे तो भारतीय खेळाडू नाहीये
अरे रूट इंजर्ड होता म्हणून
अरे रूट इंजर्ड होता म्हणून त्याला लायसन्स टू किल दिले होते असे बेन म्हणाला. एरवी बाझबॉल चेस मधे रूट एका बाजू लावून धरतो .
अरे रूट इंजर्ड होता म्हणून
अरे रूट इंजर्ड होता म्हणून
>>>
ओके.. म्हणून बोलिंग टाकली नाही हे माहीत होते.. तरी फलंदाजी त्यामुळे अशी का केली? नक्की काय दुखापत होती. दोनेक नंबर मागे आला असता तर चालले नसते का.. पण असेल काहीतरी सीन.. सुरुवातच वेगळी केली.. पण मग येणे गरजेचे होते का तेव्हा.. आधी नाईट वोच्मान आणि मग रूट अश्या दोन विकेट आपल्या खात्यात आल्या आणि आपल्याला कॉन्फिडन्स आला..
आता ह्या सर्व प्रश्नांची
आता ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला बाझ नि बेनच देउ शकतील रे फक्त
मला रूटची खेळी बघून गाब्बाचा
मला रूटची खेळी बघून गाब्बाचा रहाणे आठवला. तो सुद्धा असेच इंटेंट घेऊन तेव्हा उतरला होता.
इथे परवा कोणी भारत आफ्रिका
इथे परवा कोणी भारत आफ्रिका अंडर 19 वर्ल्डकप सेमी पाहिली का?
245 चे टारगेट आपण 11 ओवर 32-4 अश्या स्थितीतून चेस केले..
आज पाक ऑस्ट्रेलिया सेमी आहे.. रविवारी फायनल..
* अंडर 19 वर्ल्डकप * - ऑसिज
* अंडर 19 वर्ल्डकप * - ऑसिज वि. पाक सामना अनपेक्षितपणे सनसनाटी झाला ! आता, भारत वि. ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल ! सिनियर्सचा बदला ज्यूनियर्स घेतील ? भारत (ज्यु.) खूप खूप शुभेच्छा !!!!
हो धमाल झाला कालचा सामना..
हो धमाल झाला कालचा सामना..
मी स्कोअर फॉलो करत होतो..
विकेट पडतात बघू लागलो..
शेवटी विकेट घेतलेले बॉलर संपले त्यांचे.
क्लोज सामन्यात नेहमी ऑस्ट्रेलियाच किंचित सरस वाटते..
मी पण फॉलो केल्या होत्या.
मी पण फॉलो केल्या होत्या. दोन्ही मॅचेस झक्कास झाल्या. मजा आली. सहारान चे कंपोजर जबरी आहे. पूर्ण टूर्नामेंट भर कडा म्हणून राहिलाय संघाचा.
अय्यर ला पाठ दुखीचा त्रास आहे म्हणून बॅटींगमधे गडबड होते आहे म्हणे. तसे असेल त पुढच्या टेस्ट मधे पटिदार असू दे त्याच्या जागी.
पूर्ण टूर्नामेंट भर कडा
पूर्ण टूर्नामेंट भर कडा म्हणून राहिलाय संघाचा
+७८६
पण सेमीचे सामनावीर सचिनचे होते.. नक्की काय विचार केला समजले नाही.
* अंडर 19 वर्ल्डकप* -
* अंडर 19 वर्ल्डकप* -
ऑस्ट्रेलिया - 254
भारत - 52 - 2 (15 ओव्हर्स ) .
४ झाल्या..
४ झाल्या..
गेला वाटते वर्ल्डकप
भारताची दारुण परभावकडे वाटचाल
भारताची दारुण परभावकडे वाटचाल
अय्यर पुढच्या तीन टेस्ट्स
अय्यर पुढच्या तीन टेस्ट्स साठी बाहेर. ( नि ह्या वेळी फिटनेस चे कारण नाही दिले आहे म्हणजे खरच फॉर्म चा आधार घेतलाय. हे असे पहिल्यांदाच केलेय सध्याच्या काळात) राहुल पण तिसर्यामधे नाही म्हणजे सर्फराज फायनली खेळणार असे दिसतेय.
मला वाटते की सर्फराज ला नाही
मला वाटते की सर्फराज ला नाही खेळवणार, paddikal ला खेळवतील. तो डावखोरा आहे
“ सर्फराज ला नाही खेळवणार,
“ सर्फराज ला नाही खेळवणार, paddikal ला खेळवतील. तो डावखोरा आहे” - मलाही तशी शक्यता वाटतेय. तो डावखोरा आहे (जडेजा नाही खेळला तर यशस्वीनंतर थेट अक्षरच लेफ्ट हँडेड ऑप्शन आहे) , रेड हॉट फॉर्ममधे आहे आणि सर्फराझपेक्षा फिट आहे (मागच्या मॅचला सर्फराझला फिल्डिंग करताना, बॉलच्या मागे धावताना पाहून निराशा झाली). पण ह्या टीम मॅनेजमेंटचा FiFo अॅप्रोच बघता, सर्फराझला संधी मिळू शकते असंही वाटतं.
“ सर्फराज ला नाही खेळवणार,
“ सर्फराज ला नाही खेळवणार, paddikal ला खेळवतील. तो डावखोरा आहे” >> +१ फक्त इंग्लंड कडे दोन ऑर्थोडॉक्स स्पिनर्स आहेत हा मुद्दा आहे. पण सरफराझ सवतीचा आहे
जुरेल ला संढी मिळेल का ? जाडेजा आला तर चार स्पिनर्स घेऊन खेळू का ?
“पण सरफराझ सवतीचा आहे” - हे
“पण सरफराझ सवतीचा आहे” - हे वाचलं असशील कदाचित.
https://www.hindustantimes.com/cricket/reason-is-not-just-cricketing-one...
“जुरेल ला संढी मिळेल का ?
“जुरेल ला संढी मिळेल का ? जाडेजा आला तर चार स्पिनर्स घेऊन खेळू का ?” - जुरैलचं माहित नाही. इतके होलसेल चेंजेस करतील का असं वाटतं. चार स्पिनर्सचा बोल्ड कॉल असेल, विशेषतः रिव्हर्स स्विंग होत असेल तर. पण खरं तर हरकत नाहीये. चारातले तिघे बॅटिंगही करतात आणि चौघंही चांगले स्पिनर्स आहेत.
हे वाचलं असशील कदाचित. >> हो
हे वाचलं असशील कदाचित. >> हो पण मला ती नुसती कारणे वाटतात. पूर्ण फिट नसणे वेगळे नि फिटनेस इंटरनॅशनल लेव्हल चा नसणे ह्यात फरक आहे. इंटरनॅशनल लेव्हल स्टँडर्ड असेल तर त्याला टेस्ट घ्यायला सांगून बघा ना ? परत तो रणाजी नि इंडीया अ खेळतो तिथे कसे काय चालते ? त्या सेलीब्रेशनचे मी आधी पण वाचले होते नि खरी मेख ती आहे असे मला वाटते. नौशाद खान ने पोरगा एक्साईट झाला नि त्याने ड्रेसिंङ रूम कडे बघून हातवारे केले असे स्पष्टीकरण दिले होते. पण त्यामागची कथा त्याला ड्रॉप केले होते ही होती हे सोयीस्करपणे लोक विसरतात. त्यानंतर त्याने माफि वगैरे मागितली होती. अर्थात त्याचा रब अजून आहे हे उघड आहे. त्याचे स्टॅट्स इतर कुठल्याही र्अणजी खेळाडू पेक्षा एकदम वेगळ्या स्तरावर आहेत. इतक्या वर्षांमधे इतक्या दिग्गज लोकांना त्या लेव्हल ला जाता आलेले नाही ह्याचा अर्थ काही तरी बात त्या पोरामधे आहे हे नक्की. त्याला कमीत कमी क्रिकेट खेळून फेल होण्याची संधी तरी मिळायला हवी असे मला वाटते. शॉर्ट बॉल वगैरे चे मी नवीनच वाचले. आयपील मधे तो १-२ मॅचेस खेळला होता फक्त. त्यापेक्षा अय्यर जास्त एक्स्पोज झाला होता तरीही त्याला संधी मिळालीच. सवतीचा हे मी म्हणून म्हटले होते.
चार स्पिनर्सचा बोल्ड कॉल असेल
चार स्पिनर्सचा बोल्ड कॉल असेल, विशेषतः रिव्हर्स स्विंग होत असेल तर. पण खरं तर हरकत नाहीये. >> इंग्लंड करते आहेच. अश्विन टाकू शकतो नविन बॉल ने. जुरेल बद्दल अनुमोदन. तीनच स्पिनर आणणार असतील तर अक्षर बाहेर निघेल असे वाटाते. त्यातल्या त्यात तोच कमी पडतो - विशेषतः रीव्हर्स स्वीप पुढे.
“ इंग्लंड करते आहेच.” -
“ इंग्लंड करते आहेच.” - इंग्लंड ह्या मॅचला दोन सीमर्स खेळवतायत. राजकोटची विकेट पहिले दोन दिवस तरी हार्ड असेल. त्यामुळे भारताने सुद्धा दोन सीमर्स खेळवले तर मला आश्चर्य वाटणार नाही. दुसर्या इनिंगमधे एक सीमर रिडंडंट होईलच.
सर्फराझ आणि जुरैल - दोन
सर्फराझ आणि जुरैल - दोन डेब्यूटंट्स!! दोन सीमर्स! होपफुली इंडिया चांगल्या बॅटिंग कंडिशन्सचा पुरेपूर फायदा करून घेईल.
सकाळी आपली पाहिली फलंदाजी
सकाळी आपली पाहिली फलंदाजी आल्यावर खालील नकारात्मक पोस्ट टाकली होती.
हा सामना आपण डावाने हरणे शक्य आहे. पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते पण खेळपट्टी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चांगली आहे.
जर आपण आजच विकेट टाकल्या तर इंग्लंड दुसरा तिसरा दिवस तुडवून इतका लीड घेईल की चौथ्या पाचव्या दिवशी आपण त्यातच गुंडाळले जाऊ
....
दुर्दैवाने सुरुवात तशीच झाली आहे.
24-2
आशा करतो आता कोणीतरी धैर्याने आणि चिवटपणे फलंदाजी करून आपल्याला या स्थितीतून बाहेर काढेन.
सरफराज भावा हिरो बनू शकतोस तू आज पहिल्याच सामन्यात..
33-3 अरे काय चालू आहे हे
33-3
अरे काय चालू आहे हे
तिथे आफ्रिका न्यूझीलन्ड सामना
तिथे आफ्रिका न्यूझीलन्ड सामना सुद्धा नेक टू नेक चालू आहे..
चहापानाला १८५-३
चहापानाला १८५-३
शर्मा ९७*
जडेजा ६८*
Pages