क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिंकलो

आश्विन चं दशक नाही झालं, लाँग स्पेल टाकून थकला असेल असं म्हटलं असतं पण मधे लंच ब्रेक मिळाला होता. तसंच आठव्या विकेट च्या पार्टनरशिपमधे कुलदीप-बुमरा च्या स्पेल चा पण ब्रेक होता.
जडेजा ऐवजी त्याला आणून एक विकेट घ्यायला चान्स द्यायला हवा होता. स्टँड इन् कॅप्टन बुमारा स्वतः बोलर असल्याने त्याच्याकडून हे अपेक्षित होतं, पण as a captain तो फार साधारण वाटला.

वरच्या काही पोस्ट पाहून असं वाटेल की ही रोहित शर्मा वि इंग्लंड मॅच होती की काय.
,>>>>

माझा आवडता प्लेअर आहे तो म्हणून जास्त कौतुक Happy
आणि खेळतो सुद्धा कौतुक करावे असाच..

कसोटीत बारा शतके झाली त्याची..
आणि सगळे सामने आपण जिंकलो Happy

त्याची फलंदाजी बघणे एक नेत्रसुख असते..
आणि माणूस म्हणून सुद्धा तो धमाल कॅरेक्टर आहे.. खूप छान माणूस आहे. त्यामुळे अश्या खेळाडूचे चाहते व्हायला सुद्धा मजा येते.

लोक काही नाही सापडले के त्याच्या फिटनेस ला नावे ठेवतात..
पण आज तीस वर्षानंतरच्या धावा आणि शतकांचे तो रेकॉर्ड रचत आहे Happy

“ शर्मा ची पाठ अवघडली होती” - ओह! Hope he feels better soon.

On a lighter note: सर्वाधिक पाठ दुखावणार्या प्लेयरच्या यादीतलं त्याचं अग्रस्थान दाखवणार्या पोस्ट च्या प्रतिक्षेत. Happy

आता न पुढे काय हो?
संपले का भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट?

On a lighter note: >> Lol निव्वळ इथे पोस्ट्स चा रतिब बघून वैताग येतो म्हणून शर्मा ने खेळू नये असे वाटायला लाग्णार कि काय आता ? Wink

ह्या सिरीजचे फाईंड्स गिल नि जैस्वाल आहेत. त्यांचे टॅलेंट वगैरे आधीच दिसत होते पण त्यांनी दाखवलेली मॅच्युरिटी नि अ‍ॅडाप्टेबिलिटी जबरदस्त होती. कोहली, शर्मा नंतर कोण ह्याचे ठाम उत्तर मिळाले आहे.

सर्फराज फास्ट बॉलिंग समोर पण नीट खेळला हे बघून हुश्श झाले. स्विंगिंङ कंडईशन्स मधे सगळेच चाचपडतात.

सर्फराज फास्ट बॉलिंग समोर पण नीट खेळला हे बघून हुश्श झाले.
>>>>

बरेच लोकं आधीच ठरवून मोकळे आहेत की तो वेगवान गोलंदाजी नाही खेळू शकत. दादा गांगुलीचे मात्र स्टेटमेंट होते की आधी त्याला खेळवा तर मग बोला. कारण त्याच्यामते काही विशेष प्रॉब्लेम नाहीये.
पृथ्वी शॉ च्या बचावातील त्रुटी जश्या या लेव्हलला उघड झाल्या तसे याचे काही झाले नाही अजून..
वूडला फटकवताना त्याचा जो बॉडी बॅलन्स होता ते पाहता हा अय्यर नाहीये हे लक्षात आले.

वूडला फटकवताना त्याचा जो बॉडी बॅलन्स होता ते पाहता हा अय्यर नाहीये हे लक्षात आले.
>>
ये तो आनेवाला वख्त ही बताएगा...

अय्यर आला तेंव्हा आज घडीचा बेस्ट स्पिन प्लेअर अन् ओव्हर ऑल बरं पॅकेज वाटला होता. भारताबाहेर गेल्यावर त्याच्या मर्यादा जास्त जाणवल्या. आणि आता त्याचा attitude त्याचा प्रॉब्लेम बनतोय. मी महान हे त्याच्या डोक्यात आडकलं आहे अन् त्यानी त्याचं क्रिकेट सफर होतंय. (आत्ता आत्ता वर्ल्डकप पर्यंत बरा होता गडी)

अन् ओव्हर ऑल बरं पॅकेज वाटला होता
>>>>>
मी अय्यरचा शॉर्ट बॉल प्रॉब्लेम त्याला पुढे इंटरनॅशनल मध्ये त्रास देणार हे आधीपासूनच बोलत होतो. पण तेव्हा दिल्लीमध्ये पंत आणि अय्यर वाद चालू होता. त्यात पंत माझ्या आवडीचा. म्हणून मी मुद्दाम अय्यरचे दोष काढत आहे असे मला इथेच कोणाकडून तरी ऐकावे लागले होते Happy

बाकी स्पिन खेळायचा चांगला खेळाडू तो आजही आहेच. या मालिकेतील अपयश हे फॉर्म आणि कॉन्फिडन्स गेल्याचा परीणाम आहे. तसेच त्यांचे अंतर्गत वाद सुद्धा चालू असतील. कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर गेला म्हणजे सारे काही आलबेल नाहीये.

बाकी सरफराज असो किंवा जुरेल, किंवा 20-20 मध्ये रिंकू सिंग.. आनेवाला वक्त बतायेगा हे सर्वांनाच लागू असते हेच माझेही म्हणणे आहे. आपण तूर्तास फक्त नोंदी करायच्या.

गिल पाठोपाठ आता यशस्वीने सुद्धा आपण लंबी रेस के घोडे आहोत हे सिद्ध केले आहे. त्याच्या बाबत सुद्धा मी फार आधी म्हटले होते की या पोरात गुणवत्ता अफाट आहे, पण फटक्यात ताकद नाहीये. ती याने कमवायला हवी.. गेल्या वर्ष दीड वर्षात ती अचानक कुठून कशी आली याची चौकशी व्हायला हवी Happy

आता हा सामना बघूया...
धमाल होणार आहे

NZ v AUS, 2nd Test
AUS 23-2 & 256
NZ 372 & 162
Cameron Green*: 1 (5)
Usman Khawaja: 7 (19)
Matt Henry 4.3-0-13-1
Day 3: 3rd Session - Australia need 256 runs

ज्या दोन विकेट गेल्या आहेत त्या स्मिथ आणि लाबुशान आहेत

ध्रुव ज्युरेल ला विसरु नका!!

जयस्वाल आणि ज्युरेल दोघेही मस्त खेळल्यामुळे आता एकाएकी राजस्थान रॉयल्स भरभक्कम वाटायला लागलीय!!

सहज मनांत आलं, सामन्यांचं मानधन फक्त खेळ होईल त्या दर दिवशी खेळाडूंना दिलं, तर कसोटी सामने पूर्ण 5 दिवस होण्याचे दिवस पुन्हा येतील का ? Wink

आता एकाएकी राजस्थान रॉयल्स भरभक्कम वाटायला लागलीय!!
>>>>>

एकीकडे आपण म्हणतो की आयपीएल वरून कसोटी संघ निवडू नका.. तर दुसरीकडे कसोटी फॉर्म वरून आयपीएल चे गणित मांडत आहोत Wink

जोक्स द अपार्ट,
यशस्वी तर 20-20 मध्ये तूफान आहेच.. येत्या वर्ल्डकपला शर्मा सोबत ओपनिंगला असेल. त्याचा फॉर्म कायम रहावा.. अन्यथा गिल अकरात येईल का हा प्रश्न आहे. त्यासाठी नक्कीच तो तुटून पडणार यंदा असे वाटतेय..

तर कसोटी सामने पूर्ण 5 दिवस होण्याचे दिवस पुन्हा येतील का ?
>>>>

या सिरीज मध्ये चांगल्या होत्या खेळपट्ट्या. बरेच धावा आणि बरीच शतके झाली. गोलंदाजांनाही विकेट मिळाल्या. वेगवान फिरकी सगळे चालले. खेळपट्टी अनप्लेयेबल कधी वाटली नाही. चांगले क्रिकेट बघायला मिळाले.

तरी सामने पाचव्या दिवशी गेले नाही याला bazzball जबाबदार आहे. आणि ते दोन्ही संघ खेळत होते Happy

शेवटच्या दिवशी ऑल रिझल्ट पॉसिबल या सिच्युएशनचा आनंद लुटण्याचा नादात सामने अनिर्णीत होण्यापेक्षा हे परवडेबल आहे. कारण याने कसोटी क्रिकेटचा रोमांच नवीन पिढीत कायम राहील.

बाकी डब्ल्यूटीसी पॉईंट सिस्टीम मुळे आता बहुतांश रिझल्ट लागणारेच सामने होणार...

>>तर दुसरीकडे कसोटी फॉर्म वरून आयपीएल चे गणित मांडत आहोत Wink
याला bazzball जबाबदार आहे. आणि ते दोन्ही संघ खेळत होते Happy

तुझे तूच उत्तर दिलेयस Wink

खेळाचा फॉर्मॅट हा एक भाग झाला पण मिळालेले exposure; भारतीय संघाकडून परफॉर्म करुन मिळालेला आत्मविश्वास आणि स्वताबद्दलच्याच उंचावलेल्या अपेक्षा याने फरक नक्कीच पडेल!!

अनुनभवी भारतीय फलंदाज ही राजस्थानची बरीच वर्षे कमकुवत बाजू राहिलेली आहे पण आता जयस्वाल, ज्युरेल, सॅमसन मुळे ती बाजू मजबून वाटत आहे शिवाय बटलर आणि हॅट्मायर आहेतच..... बोल्टच्या जोडीला अश्विन आण्णा. चहल आणि प्रसिध कृष्णा आहेत.... त्यामुळे यंदा for a change ॲनालिस्ट लोकांच्या फॅव्हरिट मध्ये असतील ते!!

मुंबई
81-0
111-6

मिडल ऑर्डर नेहमीप्रमाणे..
रहाणे अय्यर नेहमी प्रमाणे..
शेपूट आता नेहमी प्रमाणे खेळून 200 ला नेते का बघायला हवे

त्यामुळे यंदा for a change ॲनालिस्ट लोकांच्या फॅव्हरिट मध्ये असतील ते!!
>>>>>

जितेगा तो धोनी ही Happy

शर्मा कप्तान नसल्याने मुंबई सपोर्ट काढून घेण्यात आला आहे...
पंत परत आला तर दिल्लीला सुद्धा सपोर्ट राहील.

bazzball किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कसोटी क्रिकेट इतकं आमुलाग्र बदलत असेल व मर्यादित षटकांच्या ( व मर्यादित दिवसांच्या ) क्रिकेटशी इतकी जवळीक साधत असेल, तर ' कसोटी क्रिकेट ' हेंच खरं क्रिकेट व ते जगलं व फोफावलं पाहिजे म्हणणाऱ्यांना नेमकं ' कसोटी क्रिकेट ' म्हणजे आता काय अभिप्रेत आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे.

bazzball किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कसोटी क्रिकेट इतकं आमुलाग्र बदलत असेल
>>>>>>

जर खेळपट्टी, चेंडू, नियम वगैरे बदलत नसतील आणि फक्त ॲप्रोच बदल कोणी करत असेल तर कसोटी क्रिकेट आपल्या जागी कायम राहणार. Technique, temperament, adjustment, adaptability, Line and length, wicket taking ability हे सगळे आपल्या जागी कायम राहणार.. ना सरफराजची जागा सूर्या घेणार ना आश्र्विनची जागा चहल घेणार..

*...फक्त ॲप्रोच बदल कोणी करत असेल तर कसोटी क्रिकेट....* - मुळात, कसोटी क्रिकेटसाठीचा व मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठीचा अप्रोच हाच तर त्या दोन क्रिकेटमधला फरक आहे, असं नाही वाटत ? की, फक्त तांबडा चेंडू वापरला तरच तें ' कसोटी क्रिकेट ' समजायचं ?

“ ह्या सिरीजचे फाईंड्स गिल नि जैस्वाल आहेत”
“अन् बोलिंग मधे कुलदीप फॅक्टर”
“ ध्रुव ज्युरेल ला विसरु नका!!”

ह्या सगळ्यांशी सहमत. पहिल्या मॅच नंतर अक्षरऐवजी कुलदीपला आणि भरत ऐवजी जुरेलला खेळवण्याचा निर्णय अचूक ठरला. कुलदीपने दोनदा बॅटिंगमधेही चमक दाखवली. गिलने तिसर्या नंबरवर जम बसवायला वेळ घेतला, पण नंतर त्यालाही सूर गवसला. hope he owns that position for long time. यशस्वी छानच खेळला. जबरदस्त टॅलेंट आहे. SENA मधल्या टेस्ट्स खेळताना तो गेम कसा अ‍ॅडाप्ट करतो ह्याची उत्सुकता आहे.

अप्रोच हाच तर त्या दोन क्रिकेटमधला फरक आहे, असं नाही वाटत ? की, फक्त तांबडा चेंडू वापरला तरच तें ' कसोटी क्रिकेट ' समजायचं ?
>>>>>>>>>

लाल चेंडू इतकाच फरक कुठे, कसोटी क्रिकेटचे सगळेच नियम आणि परिस्थिती आजही तसेच आहेत जे काही वर्षांपूर्वी होते. लिमिटेड फॉरमॅट सारखे ते बदलले नाहीत.

आणि एप्रोच खेळाडू स्वतः ठरवतात. त्याला तुम्ही कसे नियमात बांधणार..
म्हणजे कसोटी आहे तर रिव्हर्स स्वीप मारायचाच नाही, गोलंदाजांनी चेंज ऑफ पेस करायचा नाही, नवीन बॉल खेळताना स्ट्राईक रेट 100 च्या वर गेला नाही पाहिजे. किंवा एका सेशनला 150 च्या वर धावा मारू नये असे नियम बनवणार का?

एकाच वेळी कसोटी क्रिकेटने द्रविड आणि सेहवाग असे दोन्ही भिन्न एप्रोचने सक्सेसफुल होणारे खेळाडू पाहिले आहेतच. कारण तो एप्रोच त्यांच्या नैसर्गिक खेळाला साजेसा होता. तंत्राशी फारकत घेऊन नव्हता.

या मालिकेच्या सुरुवातीलाच माझी एक पोस्ट होती. जशीच्या तशी कॉपी पेस्ट करतो.
----------------
Bazball बद्दल मला वाटते की तो काही दांडपट्टा नाही. कारण तो कधी कसोटीत सक्सेसफुल नाही होणार.
या मध्ये फक्त एप्रोच बदलला आहे त्यानी. स्कोरिंग opportunity Miss नाही करायची. पण धावा जमवताना शॉट प्रोपरच खेळायचे.

आता प्रश्न आहे की बॉल वळू लागल्यावर स्पिनर ना प्रॉपर शॉट खेळायची टेकानिक त्यांच्याकडे आहे का...
तर त्याचे उत्तर आपल्या सर्वाँना माहीत आहे. तेच या मालिकेत सिद्ध होणार आहे.
--------------------------

मालिका संपता संपता सिद्ध झाले Happy

बायकांच्या आयपीएल कोणी बघते का?
त्यांच्यात सुद्धा सगळेच सामने लास्ट बॉल फिनिश होतात. आयपीएलची ओळखच झाली आहे ती..

ऑस्ट्रेलिया पाच विकेटने जिंकतील असे वाटत असतानाच लागोपाठ दोन विकेट पडल्या.. बघू आता काही टविस्त टर्न येतो का

Rohit Sharma in ENG Test Series!*

- Most Centuries in WTC Wins (9)
-
- 1st Indian Captain to Win Test by 400+ runs
-
- Oldest IND Captain to Score Century (36yr 312d)
-
- 1st Asian to Smash 50 6s in WTC
-
- 3rd IND Captain to Score 1000 runs all formats
-
- 4th Most Runs among Indians (Surpassed Dada)
-
- 2nd Most 6s for India in Test (Surpassed MSD)
-
- 3rd Most Wins among Indians (Surpassed MSD)
-
- Joint 3rd Most Centuries for India (48)
-
- Joint Most Wins by IND Captain in the Test Series (4)
-
- Joint Most 6s by an IND Captain in a Test Series (7)
-
- Joint Most Centuries for India after 30 age (35)
-
- Only Fielder to take 60 catches in all formats
-
- Oldest IND Cap to score 400 runs in a Test Series
-
- Only Indian Captain in Last 23 yrs to Score Half Century in 4th Inning Successful Run Chase.
-
- 1st Captain in Last 100yrs to Win a Test Series by 4-1 after being 0-1
-

Most Successful Captain in History of Cricket
रोहीत शर्मा

100+ इंटरनेशनल मैचों में कप्तानी करने वाले क्रिकेटर्स के जीत के प्रतिशत पर नजर डालें तो रोहित सबसे टॉप पर नजर आते हैं.

रोहित ने अब तक 113 मैचों में टीम इंडिया की कप्तानी की. यहां उन्होंने 83 मैचों में अपनी टीम को जीत दिलाई. उनकी कप्तानी में भारत को केवल 26 मैचों में हार का सामना करना पड़ा. यानी रोहित का बतौर कप्तान अपनी टीम को जीत दिलाने का प्रतिशत 73.45% रहा.

इस मामले में दुनियाभर के दिग्गज कप्तान भी उनके इस आंकड़े के आसपास नहीं हैं.

सबसे ज्यादा मैच जीताने का रिकॉर्ड ऑस्ट्रेलिया के रिकी पोंटिंग के नाम है. पोटिंग ने अपनी कप्तानी में कंगारू टीम को 324 में से 220 मुकाबले जिताए. लेकिन पोंटिंग का बतौर कप्तान जीत का प्रतिशत 67.9 ही रहा. इस मामले में रोहित अब काफी आगे निकल चुके हैं.

वहीं, इंटरनेशनल क्रिकेट में सबसे ज्यादा मैचों में कप्तानी करने का रिकॉर्ड एमएस धोनी के नाम है. उन्होंने 332 मैचों में भारत की कप्तानी की लेकिन वह केवल 178 मैचों में ही टीम को जीत दिला सके. यानी धोनी का विनिंग पर्सेंटेज 53.61 रहा.

रोहित ३२४ किंवा ३३२ सामने कप्तान असेल तेंव्हा हे आकडे बघूया. अशा सिलेक्टीव्ह आकडे वारीने तुझ्यातल्या फॅनला शांती मिळत असेल तर ......

सहज मनांत आलं, सामन्यांचं मानधन फक्त खेळ होईल त्या दर दिवशी खेळाडूंना दिलं, तर कसोटी सामने पूर्ण 5 दिवस होण्याचे दिवस पुन्हा येतील का ? >> ड्रॉ चालतील का पण भाऊ ? Wink

एकंदर इंग्लिश संघाला बाझबॉल ची गरज सिरीज त्यांच्या अपुर्‍या गोलंदाजीमूळे वाटात राहिली हे समजू शकलो तरी बॅटींग मधला अ‍ॅप्रोच बॉलिंग मधे दिसला नाही. पूर्ण सिरीज फक्त ४ मेन बॉलर्स घेऊन खेळले आहेत. अँडरसन ला अंडर युटीलाईज केले. बेअरस्ट्रो नि डकेट ची एकंदर सिरीज बघता गाजराची पुंगी अ‍ॅप्रोच अधिक वाटला. बाझबॉल नि नक्की काय अपेक्षा आहेत ह्याबद्दल एकूण इंग्लिश संघाच्या मनातच क्लॅरीटी नाही असे वाटतेय.

रणजी फायनल टोटल वन सायडेड चालू आहे.
मुंबईला खराब सुरवाती नंतर लॉर्ड शार्दुल च्या 75 धावांमुळे 224 पर्यंत पोचता आलं.
नंतर शार्दुल नी पहिली विकेट काढून बोहनी करून दिल्यावर धवल, शम्स अन् कोटियन नी 3-3 विकेट्स काढून विदर्भचा 105मधे खुर्दा उडवला.
दुसऱ्या डावात परत एकदा दोन्ही ओपनर लवकर गेल्यावर रहाणे अन् मुशीर नी 50 करून लीड 250+ नेला आहे. अजून 3दिवस बाकी आहेत, त्यात किमान एक दिवस पूर्ण खेळून काढून 450-500 चं टार्गेट ठेवलं पाहिजे. पहिल्या डावात विदर्भ वाले गडगडले म्हणजे परत तसंच होईल असं काही नाही (पूर्ण टूर्नामेंट फॉर्म साठी झगडलेल्या रहाणे नी ही 50 केली आहे)

Pages