Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिराजने कमाल बॉलिंग केली.
सिराजने कमाल बॉलिंग केली. सगळ्याच बॉलर्सनी जबरदस्त बॉलिंग केली. पण भारताचा बॅटिंग अॅप्रोच अनाकलनीय वाटतो. दमदार बॅटिंग करून मोठा लीड घेण्यापेक्षा टी-२०/वनडे सारखी बॅटिंग करताना दिसतायत. काय स्ट्रॅटेजी आहे ते कळत नाहीये.
from 153/4 to 153/10
from 153/4 to 153/10
ते सुद्धा ११ चेंडूत
मला भारताचा टेस्टमधला हा
मला भारताचा टेस्टमधला हा बॅटिंग अॅप्रोच अजिबातच आवडला नाहीये. मागच्या मॅचमध्ये सुद्धा अशीच बॅटिंग केली होती. Nobody is batting for time!! कदाचित सनातनी मत वाटू शकेल, पण this is not test cricket.
<<<पण this is not test
<<<पण this is not test cricket.>>>
अनुमोदन. पण सगळे खेळाडू, दोन्ही बाजूचे, आता खेळून खेळून कंटाळले आहेत. आता उगीचच मैदानावर उतरायचे, मॅचचे पैसे घ्यायचे नि गप बसायचे. जसे बरेचदा मला कंपनीत काही काम नसे, पण मी आपला हजेरी लाऊन पगार घेत असे तसे.
एका दिवसात २३ विकेट्स
एका दिवसात २३ विकेट्स
पण पेसर ना आहेत, स्पिनर ना नाही
त्यामुळे कुणाला प्रॉब्लेम असायची शक्यता 0
उलट असतं तर मात्र जगातले सगळे आजी माजी एक्स्पर्ट ढुंगणाला साप चावल्या सारखे कोकलायला लागले असते
खेल खेल ना रहा, तंत्र मंत्र
खेल खेल ना रहा, तंत्र मंत्र ना रहा
क्रिकेट हमें तेरा ऐतबार ना रहा II.
मूर्खा, तुझ्या सेंच्युरीच्या हांवेमुळे मॅच आतां तिसऱ्या दिवसापर्यंत लांबली ना !!!
खेळपट्टी अशी आहे की जरा
खेळपट्टी अशी आहे की जरा attacking पण proper cricketing shot खेलाल तरच स्कोअर कराल..
७९ टारगेट
दोन ते तीन विकेट मध्ये मारा..
चौथी गेली तर आफ्रिका आशेवर...
*७९ टारगेट..दोन ते तीन विकेट
*७९ टारगेट..दोन ते तीन विकेट मध्ये मारा..चौथी गेली तर आफ्रिका आशेवर...* - हो, हे कसोटी सामन्याबद्दलच आहे, शप्पथ !
मार्करामचा झेल सुटला नसता तर
मार्करामचा झेल सुटला नसता तर दुसऱ्या दिवशी लंच आधी सामना संपला असता.
जिंकली मॅच!! वेल-प्लेड इंडीया
जिंकली मॅच!! वेल-प्लेड इंडीया!!
आज सकाळी ७०-८० टारगेट राहावे
आज सकाळी ७०-८० टारगेट राहावे अशी इच्छा व्यक्त केली होती. ७९ मिळाले.
त्यानंतर २-३ विकेट मध्ये जिंकावे आणि चौथी पडू नये अशी इच्छा व्यक्त केली होती तर तीन वर थांबलो.
दोन्ही इच्छा पूर्ण, कप्तान नाबाद, सिराज बुमारा हे दोन्ही गोलंदाज सामनावीर आणि मालिकावीर.. आणि सामना केवळ १०७ ओवर मध्ये संपणे.. छान दिवस होता आज.
parody of test cricket.
parody of test cricket. प्रेक्षकांनी विकेट्स जाळून त्याची राख एका कुयरीत भरून रक्षा मालिका सुरु करायला पाहिजे.
शर्मा नी आयसीसी च्या डबल
शर्मा नी आयसीसी च्या डबल ढोलकी वर ताशेरे ओढले आहेत:
https://www.espncricinfo.com/story/rohit-calls-out-icc-for-double-standa...
आजचा सामना पाहिला का लोकहो..
आजचा सामना पाहिला का लोकहो.. द हिट मॅन शो!
22-4 वरून शर्माचे जबरदस्त शतकं.
पहिल्या सुपर ओवरला दोन सिक्स.
दुसऱ्याला सुद्धा त्याचेच फोर सिक्स आणि त्याचेच सारे रन.
दुसऱ्या सुपर ओवरला अखेरीस सामना जिंकलो..
Runs in Both Superovers
Rohit - 25 (7)
Others - 2 (4)
द हिट मॅन शो! >> बंगलोर नि
द हिट मॅन शो! >> बंगलोर नि त्याचे काही नाते आहे नक्की.
गेले वर्षभर नवीन खेळाडूंना संधी देऊन फायनल होते असे वाटले असताना परत रोहित नि कोहली ला आत आणलय. आता मधे एकही टी-२० नाहीये त्यामूळे सेटल्ड लाईनप कसा बनवणार आहेत देव जाणे. हार्दिक नि सूर्या फिट झाले कि रिंकुला बाहेरचा रस्ता दाखवावा लागणार दुर्दैवाने. किपर म्हणून इशान कि संजू कि जितेश हेच तेव्हढे कुतूहल आहे.
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=688603426470572&id=100063939...
धमाल माणूस आहे हा..
पहिल्याच ओवरला याची बॅट लागली असून लेग बाईजचा फोर दिला तेव्हा अंपायरला बोलला की ऑल रेडी मेरा दो झिरो हो गया है
इंग्लंड कसोती सुरू होईल आता.
इंग्लंड कसोती सुरू होईल आता. धमाल यावी अशी इच्छा आहे. इंग्लंड कंट्रोल अॅग्रेशन मधे असेल असे वाटते. आपण सरळ टर्नर घेऊन खेळावे. बघू तरी किती अॅग्रेशन दाखवतात मग ते, नुसता वात आणलाय. बाझबॉल चे कंबरडे मोडलेले बघायला आवडेल.
कोहलीच्या जागी पतिदार ला आणाणे मस्त मूव्ह आहे (सरफाराज बद्दल वाईट वाटले तरी). पण आपण तीन स्पिनर घेऊन खेळूच असे वाटते आहे. त्यामूळे रजतची वर्णी लागण्याचे चान्सेस दिसत नाहीत. भरत बुवा चांगली बॅटींग करतील अशी आशा ठेवूया नाहितर छानच बोंबलू.
इंग्लंडकडे स्पिनर चांगले
इंग्लंडकडे स्पिनर चांगले नाहीत. त्याचा फायदा उचलायला हवा. अगदीच आखाडे नको जिथे सामान्य गोलंदाज सुद्धा धुमाकूळ घालतात. बॉल पहिल्या सेशनपासून वळू दे. आणि वळतच राहू दे. नाहीतर बाझबॉलचे एखाद दुसरे सेशन भारी पडेल. मोठी सिरीज आहे. मजा येईल बदलते डावपेच बघायला. शर्माचा फलंदाजीतील कॉन्फिडन्स असाच राहू दे. अय्यरचा फॉर्म राहू दे. तीन दिवसांच्या सामन्यात यांची खेळी महत्त्वाची ठरेल. जेणेकरून चुम्माची कमीत कमी आठवण येऊ दे.
टॉस हरलो
टॉस हरलो
इंग्लंड फलंदाजी
2022 पासून इंग्लंड एकही सिरीज हरली नाहीये.. ना घरी ना बाहेर.. Bazball सक्सेसफुल आहे.. पण आता खरी कसोटी आहे.
*2022 पासून इंग्लंड एकही
*2022 पासून इंग्लंड एकही सिरीज हरली नाहीये..* - जणू 15-20 वर्षं अजिंक्य आहेत; फक्त दोन वर्षच तर झालीत ना हरलेल्या !!
बाहेर सुद्धा हरले नाहीत ना..
हे Bazball सुरू झाल्यापासून आहे.
बाहेर सुद्धा हरले नाहीत ना.. पाकिस्तान न्यूझेलांड वगैरे..
आणि ऑस्ट्रेलिया सोबत सुद्धा कमबॅक केले आहे..
सांगायचा मुद्दा हा की हे बहुचर्चित Bazball अजून सिरीज हरावी असे फेल गेले नाहीये.. भारतात जाईल
*भारतात जाईल * - तथास्तु !
*भारतात जाईल * - तथास्तु ! आमेन ! होय म्हाssराजा !!!
आज आपण त्यांना भारतात बाझबॉल
आज आपण त्यांना भारतात बाझबॉल कसा खेळतात हे दाखवत होतो वाटते. शर्माने विकेट फेकली त्या नादात. पण ठिक आहे. एक धक्का दिला आपण आज ईंग्लंडला. आता मोठा स्कोअर टाकावा. डावाने किंवा दहा विकेटने हरवावे... की इंग्लंड त्यातून सावरलीच नाही पाहिजे.
आता ते रडतील. आमच्या
आता ते रडतील. आमच्या स्पिनरल व्हिसा नाही दिला! नाहीतर आम्ही भारताला इतके रन्स करूच दिले नसते!!!!
बाहेर सुद्धा हरले नाहीत ना..
बाहेर सुद्धा हरले नाहीत ना.. पाकिस्तान न्यूझेलांड वगैरे..
आणि ऑस्ट्रेलिया सोबत सुद्धा कमबॅक केले आहे.. हे बहुचर्चित Bazball अजून सिरीज हरावी असे फेल गेले नाहीये >> तो कमबॅक लॉयन बाहेर गेल्यावर नॉट सो इंग्लिश पिचेस वर आला आहे हे बघितल्यावर मला तरी फारसा इंप्रेसिव्ह वाटत नाही. पाकिस्तान चे स्पिनर्स नवशिके नि पिचेस पाटा होते. किवीज ट्रांझिशन मधे होते. थोडक्यात मुद्दा असा कि Bazball कौतुकास्पद असले तरी थोडा अतिरेकी प्रकार आहे नि ते चालायला बोला-फुलाची गाठ पडावी लागते असे मला वाटते.
हो, Bazball सक्सेस बाबत हे
हो, Bazball सक्सेस बाबत हे मुद्दे मान्य. पण तरी ते ऑन पेपर आहे.
Bazball बद्दल मला वाटते की तो काही दांडपट्टा नाही. कारण तो कधी कसोटीत सक्सेसफुल नाही होणार.
या मध्ये फक्त एप्रोच बदलला आहे त्यानी. स्कोरिंग opportunity Miss नाही करायची. पण धावा जमवताना शॉट प्रोपरच खेळायचे.
आता प्रश्न आहे की बॉल वळू लागल्यावर स्पिनर ना प्रॉपर शॉट खेळायची टेकानिक त्यांच्याकडे आहे का...
तर त्याचे उत्तर आपल्या सर्वाँना माहीत आहे. तेच या मालिकेत सिद्ध होणार आहे.
या मध्ये फक्त एप्रोच बदलला
या मध्ये फक्त एप्रोच बदलला आहे त्यानी. स्कोरिंग opportunity Miss नाही करायची >> मान्य ! फक्त ते कितपत कंट्रोल्ड ठेवले जाते ह्यावर अवलंबून आहे. सेहवाग चा मूळचा पिंड अॅग्रेसिव्ह होता तेंव्हा तो तसाच टेस्ट मधे पण खेळत असे. इंग्लंड अचे सरवच खेळाडू तसे वआटत नाही पण बाझबॉल आल्यापासून आक्रमक (अॅग्रेसीव्हनाही ) बॅटींग करत आहेत असे वाटते. चांगले बॉलर्स आणी/ किंवा पाटा नसलेल्या पिचेस वर हे अंगाशी येणार. स्पिन बद्दल चा मुद्दा स्विंग ला नि बाउन्स लाही तेव्हढाच लागू होईल. म्हणून मला आपण खेळलो तशा आफ्रिकेच्या पिचेस वर किंवा डाऊन अंडर काय होईल ह्याचे कुतूहल आहे. तिथेही होम टीम्स कडे इंग्लंड पेक्षा सरस बॉलर्स आहेत.
स्पिन बद्दल चा मुद्दा स्विंग
स्पिन बद्दल चा मुद्दा स्विंग ला नि बाउन्स लाही तेव्हढाच लागू होईल
>>>>
नाही ना.. स्विंग आणि बाऊन्स खेळायचे तंत्र त्यांच्याकडे चांगले असेल ना. त्यावरचे शॉट सुद्धा जास्त असतील. फक्त ते positively execute करायचे असतील. स्पिन खेळण्याबाबत जर एखादा फलंदाज मुळातच कच्चा असेल तर आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असे होईल.
बाकी आक्रमक खेळण्याबाबत त्यांना नक्की काय instructions असतील त्यांनाच माहीत. पण एखाद्या खेळाडूला त्याच्या नैसर्गिक खेळाविपरीत अतिरिक्त मारायला सांगत असतील तर ते चूक ठरेल. कदाचित ज्याला जितके जमते तितकीच अपेक्षा असेल. बरेचदा स्टोक्सला स्वतालाच संथ खेळताना पाहिले आहे.
स्विंग आणि बाऊन्स खेळायचे
स्विंग आणि बाऊन्स खेळायचे तंत्र त्यांच्याकडे चांगले असेल ना. >> तू ईंग्लंड च्या मॅचेस बघत नाहीस का ? वासरात लंगडी गाय शहाणी प्रकार म्हणता येईल फार तर. एक रूट नि थोडाफार पोप वगळता सगळा आनंद आहे.
ती तर आपलीही रड आहेच असामी की
ती तर आपलीही रड आहेच असामी की भारतीय फलंदाजांना पहिल्यासारखे स्पिन खेळता येत नाही वगैरे
20-20 हिट झाल्यापासून क्रिकेटच बदलले आहे. तरीही तुलनेत जो तो आपल्या होम कंडीशनला सरावलेला असतोच. आणि त्या किंवा सिमिलर condition मध्ये डिफेन्स कच्चा झाला तरी अटॅक कसा करायचा याची कल्पना असतेच.
Pages