वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मसाबा मस्त आहे एकदम. टोटल बिंज वर्दी. नीना गुप्ता तर आवडतेच पण मसाबाला पाहीले नव्हते. सगळे भाग खुप संतुलित आणि मॅच्योर वाटले कुठेही मेलोड्रामा नाही. गुप्ता मायलेकी rockss.

अगदीच.. मी तर तीच्या बोलण्या वागण्यावर फार फिदा झालेय.. निना गुप्ताचा शेवटचा तो You don’t just need hardwork to survive, you need courage to survive वाला डायलॅागही फार आवडला.. अख्खी सिरिज बघितल्यावर त्याचा इंपॅक्ट मस्तच येतो

मला पण आवडला मसाबाचा नवा सीझन. धैर्य चे काम केलेला कोण अ‍ॅक्टर आहे तो काम छान करतो. नीना गुप्ता नॅचरल एकदम. माय लेकींचे एक मस्त बाँडिंग अगदी दिसते प्रत्येक एकत्र सीन्स मधे.
मात्र मसाबाने डिझाइन केलेले कपडे मोस्टली नाही आवडत मला पण ते जाऊ देत Happy अ‍ॅक्चुअली तिचे स्वतःचे बिझिनेस वेअर कपडे बरेच बेटर असतात.

Dhairya Rana = Neil Bhoopalam

खऱ्या लाईफ मध्ये मसाबाचा धैर्य राणा हाच असेल तर किती क्यूट <3

गुगल वर संदिग्ध लिहिलंय खरंच तिच्या आयुष्यात हे character आहे का याविषयी.

या धाग्यावर आले की कॉंप्लेक्सच येतो.... लोक सतत इतके काही काही दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण बघत असतात!!
आपल्याच टाईम मॅनेजमेन्टचा काहीतरी लोच्या दिसतोय Wink

कोणी The sandman पाहत आहेत का? सात भाग झालेत बघुन. काही भाग फारच छान रचले आहेत . विशेष म्हणजे 24/7 आणि sound of her wings .>>> हो मी बघते आहे. २४/७ वाला भाग चालू आहे. मालिका छान आहे, आवडली. स्पेशल इफेक्ट्स, साऊंड इफेक्टस् भारी आहेत.

The Sandman संपूर्णम. पहिला सिझन आवडला.

आताच paecemaker पहिली (ऍमेझॉन) . Suicide squad पासून पुढे peacemaker वर स्वतंत्रपणे मालिका काढली आहे. मस्त आहे . जेम्स गन दिग्दर्शक आहे. हा पार वेडा माणूस आहे. त्यात सोबत जॉन सिना म्हणजे फुल्ल टाईमपास . काहीपण गोंधळ घालत बसतात. यातील गाणीही सुंदर आहेत.

Ms Marple च्या काही कथा सोनी लिव वर आल्यात.
त्या ms Marple सीरीजमध्ये बघितल्या होत्या आता इथे 4-5 episodes चची एक एक गोष्ट आहे.
मी मूळ पुस्तकं वाचली नाहीत त्यामुळे किती फारकत आहे माहिती नाही पण मुख्य फरक म्हणजे ms Marple नाहीये. सिरीजमधल्या कथेपेक्षा नक्कीच थोड्या वेगळ्या आहेत.
innocence by ordeal आणि why didn't they ask evans या दोन पाहिल्या.
आणखी काही येतायेत का वाट बघतेय.

Decoupled बघितली.

पैसे असले की सगळं किती सोपं होतं असं वाटलं बघताना.

मासुम - hotstar (बोमन इराणी आणि दीपक तिजोरीची मुलगी समारा तिजोरी) Limited episodes -6

Suspense story आहे. प्रथेप्रमाणे गे कपल, ड्रग्स ई आहे, पण अगदी थोडक्यात. अभिनय छान, कथा ठीक आणि एकुणात एकदा पहायला ठीक वाटली.

House of dragon चा पहिला एपिसोड बघितला. भव्यता जीओटीच्या तोडीची वाटत आहे सध्या तरी.

House of dragon बघायला आवडेल खरं. GOT ने पण सुरूवात छान केली होती पण शेवटी कंटाळा आणला. नुसते अति बोल्ड सीन्स आणि कापाकापीच्या पलीकडे गेलं पाहिजे यात तरी.

या वीकेंडला प्राईमवर "क्रॅश कोर्स" चा पहीला सीझन बघितला.... गेल्या काही वर्षात IIT च्या कोचींग क्लासेसचे हब बनलेल्या कोटा शहरातल्या क्लासेसमधल्या कुरघोडीच्या राजकारणावर आहे!!
कोचिंग क्लासेसच्या साम्राज्याच्या मदतीने आक्ख्या कोटा शहरावर राज्य करण्याचे स्वप्न बघणारा कावेबाज संस्थाचालक अन्नू कपूरने चांगला रंगवलाय. बाकीच्या पात्रांचे कामही चांगले आहे. विशेषतः विधी गुप्ताचे काम करणारी कलाकार
स्कॉलर मुलांची पळवापळवी, शिक्षकांची पळवापळवी, एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांवर केलेले औषधांचे प्रयोग, internal exams, rankings च्या rat race मुळे मुलांचे झालेले प्रेशर कुकर, त्यांचे आपापसातील नातेसंबंध आणि या सगळ्यात राजकारण, ड्र्ग्स, अफेअर्स वगैरेचा मसाला आणि शेवटाला पुढच्या सीझनची अचूक केलेली पायाभरणी असे सगळे मिश्रण आहे.
लूपहोल्स आहेत पण त्याकडे दुर्लक्ष करुनही बऱ्यापैकी पकड जमवते ही सिरीज.
ज्यांनी IIT entrance किंवा इतर काही निमित्ताने हे वातावरण अनुभवलेय त्यांना अजुन जास्त अपील होऊ शकते. इतरांनाही आपापल्या गावातील, शहरातील प्रतिस्पर्धी क्लासेसच्या टशनची आठवण येऊ शकते Happy

या धाग्यावर आले की कॉंप्लेक्सच येतो.... लोक सतत इतके काही काही दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण बघत असतात!!
आपल्याच टाईम मॅनेजमेन्टचा काहीतरी लोच्या दिसतोय >>> अगदी अगदी.

इथे वाचून हे बघायला हवं वगैरे ठरवते आणि विसरुन जाते.

होम शांती बघायला घेतली, कधी पुर्ण होणार काय माहीती.

हॉटस्टार वरची Hidden कुणी पाहिलेय का? २० episodes आहेत. शेवट मला incomplete वाटतोय. की मी काही miss करतेय?

प्राईमवर "क्रॅश कोर्स" >>>

कोटा फॅक्टरी पाहिलेली होती. त्यामुळे ही बघाविशी वाटली नाही.
अर्थात को.फॅ.मध्ये rat race मुळे मुलांचे झालेले प्रेशर कुकर, त्यांचे आपापसातील नातेसंबंध - याच्यावरच अधिक भर आहे.
ही बघावी काय?

>>ही बघावी काय?

एखादी वेबसिरीज मी एखाद्या वीकेंडला सलग बघून संपवत असेन तर याचा अर्थ मला ती आवडलीय Wink
नाहीतर अश्या दोन तीन एपिसोड्स नंतर सोडून दिलेल्या वेबसिरीज कितीतरी आहेत..... सलग वेळ काढू शकत नसेन आणि परत वेळ मिळेल तेंव्हा जाऊन पुढचे एपिसोडस बघण्याची तीव्र इच्छा होत नसेल तर Its not my kind of series म्हणून सरळ सोडून देतो!

कितीदा तरी सलग खिळवून ठेवलेली एखादी सिरीज शेवटाला जाऊन भ्रमनिरास करते मग वीकेंड वाया गेल्याचे वगैरे तात्पुरते फिलींग येते

क्रॅश कोर्स मी सलग एका वीकेंडला बघून संपवली आणि वीकेंड वगैरे वाया गेल्यासारखा वाटला नाही

आता तू ठरव बघायची की नाही ते (कोटा फॅक्टरी बघितली असशील तर हे या सिरीजमधले वातावरण बऱ्यापैकी मिळतेजुळते आहे)

House of dragon चा पहिला भाग आवडला. काही पात्र आवडत आहेत . या वेळेस भरपूर ड्रॅगन आहेत असं ऐकलंय . बघू के होतंय पुढे ( Hotstar वर आहे)

नुकतीच Netflix वर ट्रू स्टोरी बघून झाली.
सात एपिसोड आहेत .
स्टँड अप कॉमेडियन च्या जीवनात घडणाऱ्या अनपेक्षित घटना , खून आणि त्यात त्याचे करिअर पणाला लागलेले .
मस्त दाखवलंय !

नेफी वर the chestnut man बघितली सहा ऐपिसोड ची सिरीज आहे. शेवट पर्यंत खिळवून ठेवते. स्सपेन्स असल्याने जास्त काही लिहीत नाही....आवर्जून बघा

नेफी वर the chestnut man बघितली सहा ऐपिसोड ची सिरीज आहे. शेवट पर्यंत खिळवून ठेवते >>> +१

काल झी5 वर दुरंगा बघायला सुरवात केली. गुलशन Devaiah, दृष्टी धामी, अभिजित खांडकेकर कास्टिंग असलेली सस्पेन्स थिलर वेबसिरिज आहे. सुरवात आवडली त्यामुळे 9 भागातील 5 एपिसोड काल तर उरलेले आज बघून संपवले. प्रत्येक भागात उत्कंठा वाढत होती. आपल्याला दाखवतात तो सस्पेक्ट नसणार हे गृहीत होतेच पण शेवट काय झाला हे मला काही कळलेच नाही. माझा बाबुदोष. दुसरा सिझन येईल बहुतेक पण या सिझनच्या शेवटी काहीतरी गूढ उकलले असेल ना?
कोणी बघितली असेल तर स्पॉयलर अलर्ट देऊन मला स्टोरी explain करा प्लीज
.

Arrested development पुन्हा एकदा बघायला घेतलीये. वेड्यासारखं हसताना बघून माझा रूममेट बावचळला. Happy

काल झी5 वर दुरंगा बघायला सुरवात केली. >>>>>>> निल्सन, फ्लॉवर ऑफ ईव्हिल ह्या कोरियन सिरीजचे हिन्दी व्हर्जन आहे हे.

https://en.wikipedia.org/wiki/Flower_of_Evil_(South_Korean_TV_series)

नेफी वर आहे ही सिरिज.

दुरंगा >> निल्सन मी पन गुलशन दे. ला पाहून बघायला घेतली. खूप उत्कंठावर्धक वाटली. पण शेवट अगदीच उघडा ठेवलाय. फक्त पटेल लोकांची थोडी करणी समजली Wink भाग २ मधे अजून उकल होईल.
छोटी मुलगी खूप च गोड घेतली आहे.
हिरोईन चा रोल केलेल्या स्त्री ला कधी पाहिल्याचे आठवत नाही..मस्त आहे ती. एकदम फीट आणि डोळ्यांतून अभिनय वगैरे!

दुरंगा >> निल्सन मी पन गुलशन दे. ला पाहून बघायला घेतली. खूप उत्कंठावर्धक वाटली. पण शेवट अगदीच उघडा ठेवलाय. फक्त पटेल लोकांची थोडी करणी समजली Wink भाग २ मधे अजून उकल होईल.
छोटी मुलगी खूप च गोड घेतली आहे.
हिरोईन चा रोल केलेल्या स्त्री ला कधी पाहिल्याचे आठवत नाही..मस्त आहे ती. एकदम फीट आणि डोळ्यांतून अभिनय वगैरे!

नवीन Submitted by aashu29 on 30 August, 2022 - 01:48 >>>>>> Drashti Dhami. आहे ती पूर्वी हिंदी सिरिअल्स मध्ये असायची .

नेफी वर the chestnut man बघितली सहा ऐपिसोड ची सिरीज आहे. शेवट पर्यंत खिळवून ठेवते. स्सपेन्स असल्याने जास्त काही लिहीत नाही....आवर्जून बघा >>>>>>> सिरीयल किलर च्या सिरीज बघाव्यात तर फक्त परदेशी .
आणि उत्कंठावर्धक सिरीज असेल तर एका दमात पाहण्याची वाईट खोड मला लागली , त्यातील ही एक .
कधी कधी मी १.२५ च्या स्पीड ने पळवून बघतो .
नेफ वर अनबीलीवेबल पण मस्त आहे .
फुल्ल सस्पेन्स .....
नेफिवरील दिल्ली क्राईम सीजन २ सुद्धा छान जमून आली आहे .
सिरीयल किलरचा च विषय.....

Pages