Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थम्स अप मधे आंगठे नि गोल्ड
थम्स अप मधे आंगठे नि गोल्ड स्पॉट मधे सोने नसते
सेव्हन अपचा सिक्स अप वन डाऊन जोक आठवला
गोल्ड स्पॉट, गेले ते दिवस
गोल्ड स्पॉट, गेले ते दिवस उरलाय तो आठवणींचा सहवास.
ऑरेंज फ्लेवरमध्ये कडक सोडा असणारे ड्रिंक होते गोल्ड स्पॉट, आजकालच्या फँटा मिरिंडाला सर नाही त्याची.
कल्चरल शॉक बसलेला जेव्हा कळले की फँटा हे प्रॉडक्ट मुळात नाझी जर्मनीमध्ये तयार झालेले होते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जर्मनी अन मित्रदेशांवर युद्ध पुकारल्यावर कोकाकोला कंपनीला त्यांचे ट्रेडमार्क सिक्रेट कोला सिरप जर्मनीला पाठवता येईना सोड्यात मिसळून बॉटलींग करण्यास, तेव्हा कोकाकोला बेव्हरेजेस जर्मनीच्या एका प्लांट मॅनेजरने , संत्र्याचा लगदा वगैरे इतर फूड इंडस्ट्री वेस्ट (होय वेस्टच) वापरून फँटा बनवले, आणि नुसते स्वतःच वापरले नाही तर कोकाकोला कंपनी नेदरलँडला पण ते फॉर्म्युलेशन वापरायला दिले, अर्थात युद्ध संपल्यावर द कोकाकोला कंपनीने ते फॉर्म्युलेशन अन ब्रँड विकत घेतला अन आजतागायत चालवत आहेत.
काही वर्षांपूर्वी नवऱ्याच्या
काही वर्षांपूर्वी नवऱ्याच्या एका नॉर्थ इंडियन सहकाऱ्याच्या घरी गेलो होतो. निघताना सवयीने त्याच्या आईवडिलांच्या पाया पडले तर त्यांनी गडबडीत मागे सरून मला उठवले आणि म्हणाले-"हमारे यहाँ बहू- बेटियां पैर नहीं छुती"
पण नवऱ्याकडून पाया पडून घेतले.
मला फार मजा वाटली होती.
सिंधी लोकांच्यात आहे ही प्रथा
सिंधी लोकांच्यात आहे ही प्रथा
पुण्यात आमच्या शेजारी एक
पुण्यात आमच्या शेजारी एक गुजराती राहतात. त्या काकू सांगत होत्या की त्यांच्याकडे मुलीने माहेरी कुणाच्याच पाया पडायचं नाही. म्हणजे लग्नाच्या आधी घरच्या कुणाच्याच पाया पडायचं नाही आणि लग्न झाल्यावर फक्त सासरच्यांच्या पाया पडायचं म्हणे. (कारण मुलगी हे देवीचं रूप. मग सासरी गेल्यावर देवीचं काय? पण असो. असले विरोधाभास सगळीकडे असतात. )
प्राची, वावे, वाचून क.शॉ.
प्राची, वावे, वाचून क.शॉ. बसला खरा !!
गेल्या वर्षी माझ्या भाच्याचं
गेल्या वर्षी माझ्या भाच्याचं (भावाच्या मुलाचं) लग्न एका मूळच्या हरियाणा तल्या मुलीशी झालं.
मी एकुलती एक ‘बुवा’ आहे मुलाची. बरेच नवीन कल्चरल शॉक मिळाले. प्रत्येक ठिकाणी ‘बुवा’ लागत होती.
लग्नाच्या आदल्या दिवशी हॉटेलच्या त्या मंद प्रकाशात नवरीच्या ओढणीला लेस लावायला लागली.
सप्तपदी चालू असतांना माझ्या हातात स्टील च्या डझन भर थाळ्या आल्या. त्या होम चालू असतांना चौथ्या फेऱ्याला भिरकावायच्या होत्या. (कारण तिथे कुणालाच महित नव्हतं.. पण ‘ऐसाही होता है’ हे उत्तर आलं)
वरातीच्या आधी म्हणे ‘बुवा’ च्या नवऱ्याने नवऱ्यामुलीचा मेकअप करायचा असतो. (तो माझ्या नवऱ्याने साफ नाकारला.)
थाळ्या स्टील च्या?
थाळ्या स्टील च्या? भिरकवायच्या?
कोणाला लागल्या तर?
काही वर्षांपूर्वी नवऱ्याच्या
काही वर्षांपूर्वी नवऱ्याच्या एका नॉर्थ इंडियन सहकाऱ्याच्या घरी गेलो होतो. निघताना सवयीने त्याच्या आईवडिलांच्या पाया पडले तर त्यांनी गडबडीत मागे सरून मला उठवले आणि म्हणाले-"हमारे यहाँ बहू- बेटियां पैर नहीं छुती" >>>>>>हो, आमच्या शेजारी एक पंजाबी कुटुंब होतं ते पण मला असंच म्हणाले होते जेव्हा माझं लग्न झाल्यावर त्यांनी मला खासकरून जेवायला बोलावलं होतं तेव्हा. त्याआधी महीनाभर आम्ही दोन्ही कुटुंबे कंपौंड वॉलच्या दोन्ही बाजूला बसून गप्पा मारायचो.
‘बुवा’ च्या नवऱ्याने
‘बुवा’ च्या नवऱ्याने नवऱ्यामुलीचा मेकअप करायचा असतो. >>
बापरे.
पण कदाचित नावापुरता करत असतील आता. आपल्याकडे पण लग्नात तो सूनमुख बघण्याचा विधी असतो त्यात होणाऱ्या सासूने वधूची वेणी घालायची असते, पण प्रत्यक्षात नुसता कंगवा लावतात डोक्याला, तसं.
१०००
१००१
<< "हमारे यहाँ बहू- बेटियां
<< "हमारे यहाँ बहू- बेटियां पैर नहीं छुती" >>
----- वर्षातून कुठल्यातरी सणाच्या दिवशी ते (नॉर्थ चे - पण सरसकट सर्व नाही- त्यातले काही ) कुमारी मुलींची पूजा करतात. त्या दिवशी लहान मुलींचे पाय धुणे, त्यांना नमस्कार, मग छान जेवण, छोटी भेट/ पैसे. मराठी लोकांत लहान्यांच्या पाया पडणे हा प्रकार नसतो त्यामुळे मला थोडा धक्का बसला.
ओळखीतल्या लहान मुली जेवायला मिळणे कठिण म्हणून ८-१० दिवस आधीच त्यांचे बुकिंग केलेले असते. कधी चार चार घरांतून बोलावणे असते... भेट वस्तू (बहुतेक वेळा पैसे , पर्स, फेक ज्वेलरी, खेळ, थोडे महागडे पेन, पेन्सील सेट) मिळाल्याने मुलींची मज्जा असते.
मला पुढचे काही दिवस प्रसादाचा गोड शिरा मिळत रहातो... स्विट डिश म्हणून.
किती विरोधाभास आहे. एकी कडे मुलींना देवी मानणारा समाज आहे... आणि दुसरीकडे पायातली वहाण (तेरी जगह मेरी...
) अगदी विरुद्ध टोक. दोन्ही ठिकाणी शिक्षणाचा अभाव आहे.
थाळ्या स्टील च्या?
थाळ्या स्टील च्या? भिरकवायच्या?
कोणाला लागल्या तर?>> खाली जमिनीवर भिरकावायच्या होत्या.
‘बुवा’ च्या नवऱ्याने नवऱ्यामुलीचा मेकअप करायचा असतो. पण कदाचित नावापुरता करत असतील आता.>> हो तसाच करायचा होता. पण माझ्या नवऱ्याने त्यालाही नकार दिला.
कुमारी मुलींची पूजा करतात. त्या दिवशी लहान मुलींचे पाय धुणे, त्यांना नमस्कार, मग छान जेवण, छोटी भेट/ पैसे. मराठी लोकांत लहान्यांच्या पाया पडणे हा प्रकार नसतो त्यामुळे मला थोडा धक्का बसला.>> आमच्याकडे नवरात्रीत करतात. मी मराठी.
>>>>मी एकुलती एक ‘बुवा’ आहे
>>>>मी एकुलती एक ‘बुवा’ आहे मुलाची. बरेच नवीन कल्चरल शॉक मिळाले. प्रत्येक ठिकाणी ‘बुवा’ लागत होती.>>>
काश्मिरी समाजात ( ओळखीतल्या मुलगा जम्मू चा काश्मिरी ब्राह्मण आहे त्या पुढे अजून काही सेगमेन्टेशन असेल तर माहीत नाही) मुलाची आत्या नावाऱ्यामुलीला तयार करते, अगदी कपडे घालण्यापासून तयारी करते.
बहुदा, मुलीला काही डिफॉर्मिती / त्वचा रोग वगैरे नाहीयेत ना हे पाहण्यासाठी ही प्रथा असावी.
मराठी लोकांत लहान्यांच्या
मराठी लोकांत लहान्यांच्या पाया पडणे हा प्रकार नसतो त्यामुळे मला थोडा धक्का बसला. >>>>> असं काही नाही, मुंज झालेल्या मुलाचं चरणतीर्थ घेतातच की मराठी लोकांमध्ये. याच मुंजा मुलांना श्रावण शनिवारी खूप मोठा मान असतो, तेव्हाही त्यांना नमस्कार केला जातो. मराठी लोकांच्या घरी पौराहीत्य करण्यासाठी येणारे गुरुजी वयाने कितीही लहान असले तरी घरातल्या ज्येष्ठ नागरिकांपासून सर्वजण त्यांना नमस्कार करतातच.
हे सर्व माझ्या घरी होतं, त्यामुळे मी एवढ्या खात्रीने लिहीत आहे. माझ्या मते अशा वेळी त्या व्यक्तीचं वय बघत नाहीत तर त्याच्या रूपाने घरी आलेला अतिथी नामक परमेश्वराला केलेला नमस्कार असतो तो.
@ SharmilaR
@ SharmilaR
थाळ्या फेकणे नाही ऐकले-बघितले कधी
उत्तरेत आत्या (भूआ / फूफी) आणि तिच्या नवऱ्याला (फूफा) लग्नात खूप मान आणि डिमांड असते. आत्याच्या नवऱ्याला तर विशेष - 'हमारे मान्य के मान्य है वो' म्हणजे आमचा जावई मान्यवर आणि फूफा तर सासरघरचे 'सिनियर जावई' त्यामुळे अधिक मान्यवर असा प्रकार असतो. त्यांचे नखरे सहन केले जातात. तुमच्या अहोंचा चान्स गेला रुसण्याचा. 'शादी में फूफाजी रूठना' यावर तर असंख्य जोक आहेत तिकडे.
अर्थात आता हे बदलत आहे थोडे फार, व्हिच इज गुड.
पोहायला शिकवताना कसे आधी
पोहायला शिकवताना कसे आधी शिकलेला मुलगा नव्या मुलाला पाण्याकडे नेऊन हळूच ढकलतो , तसे आहे हे
आत्यादेखील त्याच घरात लहानाची मोठी होऊन मग तिच्या नवर्याकडे गेलेली असते,
म्हणून ती पुढच्या पिढीतील त्या घरातील मुलीला तयार करते , मेंटली प्रिपेर करते व भवसागरात ढकलून देते , जा आता , तूपण पोहायला शीक. म्हणून तो मान तिला आणि तिच्या नवऱ्याला दिलेला असावा. आत्याचा नवरा नवीन मुलीचा आत्मविश्वास वाढवेल की तुलाही तुझा नवरा व्यवस्थित सांभाळेल
पुरुषांना कोण ढकलणार ?
सासर दिल्लीत असल्याने, १९९५
सासर दिल्लीत असल्याने, १९९५ मधे लग्नानंतर लगेच तिकडे गेले होते.
गल्लीत सरदारजींची/ पंजाब्यांची घरे. सासुबाई कधी कधी त्यांच्या मैत्रीणींकडे घेउन जायच्या. तिथे गेले की तिथले ज्ये ना बाया खाटांवर बसलेल्याच असायच्या. साबा सुद्धा आधी गेल्या की नमस्कार चमत्कार झाल्यावर त्या ज्ये. ना. बायांचे पाय चेपुन द्यायच्या.. अन मलाही सांगायच्या. हा काय प्रकार आहे म्हटल? तर म्हणे इकडे अशी पद्धत आहे.
आठवड्यातुन एकदा सगळ्या बायका, आपल्या नवर्याच्या लांबसडक केसांना तेल लावुन मालिश करुन द्याय्च्या. हे ही नविनच होते मला.
आणि एक, नवर्याच्या मित्रमंडळीकडे गेलो की भल्यामोठ्या प्लेटस चिवडा, नानकटाई, बेकरी प्रोडक्टसची आणली जायची. सेपरेट प्लेट्सम्धे देत नाहीत.सोबत चहा वै नाहीच. पेप्सी वै कोल्ड्रीन्क च्या मोठ्या बॉटल्स कायम फ्रिजमधे भरलेल्या. आपल्या चहा, पोहे, उपमा संस्क्रुतीमधुन तिकडे गेलेल्या मला हे सगळे विचित्रच वाटायचे.
पंजाब्यांच्या लग्नात गेलेलो तर, वरात आली, नाचगाणे झाले, अन लग्न रात्री केव्हातरी उशीरा लागणार म्हणे. लग्न लागण्याआधी वर्हाड्यांनी जेवुनही घेतले. हा अजुन एक धक्का.
नोकरीला लागले. सर्वात पहिली नोकरी ती ,इन्टरनेशनल बुकसेलर्स कडे. मारवडी ओनर. पब्लिशर्सशी पत्रव्यवहार करण्याचे काम माझे होते. त्यावेळी ३० वर्षे जुनी ति पब्लिक लिमिटेड कंपनी होती. ऑफिसमधे पब्लिक मिक्स. टायपिंग वै ऑफिस असिस्टंटला केरळी मुली. बाकी मारवाडी, पंजाबी. सर्वांना डेजिग्नेशन एकच- ऑफीस असिस्टन्ट . या नावाखाली कपबश्या धुण्यापासुन, ते मॅनेजर येण्याआधी त्यान्च्या टेबलची साफसफाई वै सगळे या मुली करत. तेथे प्युन दोनच. ते ही मॅनेजर अन ओनर साठी. त्याम्चे काम फक्त या लोकांना चहा कॉफी आणुन द्यायचे... अन फायली इकडे तिकडे न्यायचे. त्यांना आम्ही कामे सांगाय्ची नाही. डायरेक्टर्स, मॅनेजर्सला सर / मॅडम म्हणायच नाही. दिदी, भैय्या.
(नुकतीच कॉम्प्युटर्स ची एन्ट्री झाली होती. या लोकांना मात्र विशेष मान होता.) हे असले ऑफीस कल्चर.
थाळ्या फेकणे नाही ऐकले-बघितले
थाळ्या फेकणे नाही ऐकले-बघितले कधी >> मी त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना विचारलं. कारण कुणालाच महित नव्हतं.
कदाचित खूप पूर्वी एखादी ‘बुवा’ साडीच्या ऐवजी भांडी दिली म्हणून रुसून थाळ्या फेकून गेली असेल..... मग ती प्रथाच पडली असेल.
नवराबायकोंनी एकमेकांच्या पाया
नवराबायकोंनी एकमेकांच्या पाया पडणे हे आमच्याकडेही होते. अर्थात पहिला मान बायकोचा. तिने नवर्याच्या पाया पडतात गिफ्टला रिटर्न गिफ्ट द्यावे तसे नवर्याने बायकोच्या पाया पडले जाते. याने प्रथाही शाबूर रहाते आणि दोघांचा सन्मानही.
थाळीफेक पहिल्यांदा ऐकतोय. कदाचित नवर्याच्या दिशेने भांडीकुंडी फेकून त्याला येणार्या भविष्याबद्दल सजग करत असावेत.
बाकी माझ्या लग्नात काही हलकट मित्र तांदूळही ईतक्या जोरात फेकून मारत होते की जणू छर्यांच्या बंदूकीने फायरींग चालू होती. नेमही अगदी तोंडावर धरत होते. कानात तांदूळ जाईल रे, म्हणून वळून एक दोन शिव्याही हासडल्या. पण त्याने काही फरक पडला नाही. तेव्हा हे नवीनच फॅड आलेले.
ख्रिस्चन लोकांच्या लग्नात
ख्रिस्चन लोकांच्या लग्नात थर्मकॉल चे छोटे साबुदाणा साईज गोल बॉल्स अक्षता म्हणुन फेकतात हे अनुभवुन मजा आली होती. ते बॉल्स गोळा करून डबीत ठेवले होते..सॉरी या धाग्या वर क. शॉक्स लिहायचेत पण तरी लिहिले..
आर्मी मध्ये तुमच्या घरी
आर्मी मध्ये तुमच्या घरी पाहुणे आले की काहीही सर्व्ह करताना बायकांना आधी देतात. मग पुरुषांना. जेवताना पण बायका आधी जेवून घेतात, मग पुरुष जेवायला घेतात.
बायकांना फार आदराने वागवले जाते. खोलीत सगळे बसले असतील आणि एखादी स्त्री आली तर सगळे पुरुष उठून उभे राहतात आणि ती बसेपर्यंत पुरुष बसत नाहीत. मग ती वयाने कितीही लहान असो.
अगदी कल्चरल शॉक नाही म्हणता येणार पण
सवय होईपर्यंत मी खूप गोंधळ घातले आहेत.
आर्मी >>>> इंडियन आर्मी कि
आर्मी >>>> इंडियन आर्मी कि BTS आर्मी
हे हे... इंडियन आर्मी
हे हे... इंडियन आर्मी
प्राची, तुम्हाला हसु आलं?
प्राची, तुम्हाला हसु आलं? मला तर अजनबीची कमेंट काहीतरीच वाटली. BTS आर्मी? मतलब कुछभी?
'कल्चरल' शॉकच्या धाग्याचे
'कल्चरल' शॉकच्या धाग्याचे विषय / टॅग 'आयुर्वेद' आणि 'बँकिंग' !!!!!
हा शॉक कुणालाच बसला नाही का अजून ?
माझ्या काही नॉर्थ इंडियन
माझ्या काही नॉर्थ इंडियन मैत्रिणी वटसावित्रीचा उपवास चक्क अमावस्येला करतात. वटपौर्णिमेच्या आधी येणारी जी अमावस्या असते तेव्हा.
आपल्या कडे अमावस्या झाल्यावर महिना बदलतो तर त्यांच्या कडे पौर्णिमा.
नॉर्थ चे कॅलेंडर आपल्या पंधरा
नॉर्थ चे कॅलेंडर आपल्या पंधरा दिवस आधी सुरु होते... आपला श्रावण सुरु होईपर्यंत त्यांचा सावन अर्धा झालेला असतो...
म्हणजे आपला श्रावण हा त्यांचे
म्हणजे आपला श्रावण हा त्यांचे दोन डोळे असतात.
कसं काय? ते म्हणजे, आपल्या श्रावणात त्यांचा अर्धा सावन आणि अर्धा भादो असतो. आणि कुणीसं म्हटलंय, मेरे नैना सावन भादो. म्हणजे आपला श्रावण=उनके नैना. हेन्स प्रुवड्.
मराठी लोकांत लहान्यांच्या
मराठी लोकांत लहान्यांच्या पाया पडणे हा प्रकार नसतो त्यामुळे मला थोडा धक्का बसला.
>>
कुमारिका पूजन सर्सास करतात आपल्यात.
आम्ही तर छोट्या छोटया मुलांचेही मारुतीराया म्हणून पूजन केले छोटया छोटया maiyyaan बरोबर..
Pages