Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपल्याकडे जन्मदात्याच्या
आपल्याकडे जन्मदात्याच्या मृत्यूनंतर मुलाने केस कापून घ्यायची पद्धत आहे. आजकाल एकाच मुलाने केलं तरी चालतं. हिंदी भाषिकांत घरातलेच काय , नात्यातले सुद्धा सगळे पुरुष ,मुलगेसुद्धा चमनगोटा करून घेतात.
तसंच पितृपक्षातही चमनगोटा करतात.
तीन दिवसांच्या बाळाला घेऊन
तीन दिवसांच्या बाळाला घेऊन शॉपिंग म्हणजे जरा अवघड आहे.
आपल्याकडे शक्यतो 40 दिवस सगळे ज्ये ना घरीच राहायला लावतात.40 व्या दिवशी देवाला आणि मग अगदी जवळच्या नातेवाईका घरी बाळ नेऊन नंतर रुटीन बाहेर निघणे चालू.
अर्थात जिथे मदतीला इतर लोक आहेत तिथेच हे शक्य.
मला वाटते सात किंवा बारा
मला वाटते सात किंवा बारा पिढ्या असाव्यात. माझा घोळ होतोय.
कारण हे सर्व नामशेष होऊन दशके लोटली आहेत.
पूर्वी आयुर्मान अपेक्षा कमी होती आणि लग्नवयही कमी होते. त्यामुळे पिढीमधले अंतरही कमी होते. त्यामुळे खापर पणजोबा ते खापर पणतू इतक्या पिढ्या हयात असल्याचे क्वचित् कधी आढळून येतही असे. पण अर्थात इथे ते हयात असण्याचा संबंध नाही.
सुतक मध्येच तोडण्याचाही एक विधी असे. म्हणजे सात पिढ्यांआधीच शाखा वेगळी करायची. त्या विधीचे नाव मात्र आठवत नाही. कदाचित गूगल बाबा मदत करू शकतील. पण आपल्या देशात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे शास्त्रनियम आहेत. त्यामुळे नेटसुद्धा विश्वासार्ह ठरत नाही कधी कधी
आमच्या कडे.
आमच्या कडे.
आई ,वडील मेले की फक्त मुलगाच केस काढतो.
सुतक फक्त आपल्या भावकित च पाळले जाते .म्हणजे स्त्री नी कुंकू लावत नाहीत,चहा मध्ये दूध नसते,पाहुण्यांना बसायला टाकायचे नाही.
जेवण घरात बनवत नाहीत. ज्या घरात मयत झाले आहे..बाजू ची लोक जेवण आणून देतात.
पण आता एक समस्या उभी राहिली आहे.
लोकांचे एक मेकांशी घट्ट संबंध नाहीत.
गावी कधी तरी जाणार म्हणजे गावातील एक तर कोणी ओळखत नाही.आणि जिव्हाळा पण नसतो,मित्र पण नसतात.
आई वडील गावी असतात.जास्त करून..त्यांचा मृत्यू झाला तर कोण येणार मदतीला .
त्या मुळे बरेच शॉर्ट कट आले आहेत
आता तीन दिवसात च दिवस घालून सर्व कार्यक्रम तीन दिवसात च संपवले जातात.
काही दिवसांनी खंदेकरी पण मिळणे अवघड होईल.कोणी मेले तर चार माणसं पण जमा होणार नाहीत .
व्हॉट्स ॲप वर मात्र खूप दुःख व्यक्त होईल.
अंत विधी च कॉन्ट्रॅक्ट दिले जाईल.
हा दिवस लांब नाही.
लग्नात जेवण वाढण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्या पर्यंत संस्कृती बदलली आहे ना.
तीन दिवसाच्या बाळाला घेवून
तीन दिवसाच्या बाळाला घेवून shopping हे इथे सुद्धा Common नाही. You get hospital discharge after regular delivery after 1 and 1/2 days and 3 days after c section. २ वीक्स नंतर बाळ घेवुन फिरणे़ शक्य आहे .
हेमंत ३३, खरे आहे. मोकळ्या
हेमंत ३३, , खरे आहे.तुम्ही लिहिलेय तशीच पद्धत एके काळी होती. दहा दिवस असेच शास्त्र नियम पाळले जात.
भेटायला आलेले लोक मोकळ्या जमिनीवरच बसतात. म्हणूनच इतर वेळी नुसत्या जमिनीवर बसणे चांगले मानले जात नाही. बसकरामध्ये जर सुती धागा असेल तर ते सुतकात वापरल्याने ओवळे होते. नंतर धुवून काढायला लागते.
त्या दिवसांत कुणाकडेच लग्नादि
त्या दिवसांत कुणाकडेच लग्नादि शुभ कार्ये होऊ शकत नसत. मग हळू हळू तीन पिढ्यांपर्यंतच सुतक राखण्यास सुरुवात झाली.>>> हे अजुनहि आहे महाराश्ट्रात सगळिकडे, मी मुबैची नाही तिथे होत नसेल कदाचित.
बाराव्या दिवशी उदकशांति, गोमूत्रसिंचन, प्राशन आणि पंचगव्यसेवन असेच.>> उदकशान्ती १४व्या दिवशी असते.
काही दिवसांनी खंदेकरी पण मिळणे अवघड होईल.कोणी मेले तर चार माणसं पण जमा होणार नाहीत .>>>> हे चित्र कुठलय ते माहिती नाही बहुधा पुण्यामुबैला होत असेल, बाकी सगळीकडे लोक( कोविड पिरियड सोडून) सगळ रितिप्रमाणे करत आहेत लोक हेच आता पर्यत तरी माझ्या माहितीतल चित्र आहे.
----काही दिवसांनी खंदेकरी पण
----काही दिवसांनी खंदेकरी पण मिळणे अवघड होईल.कोणी मेले तर चार माणसं पण जमा होणार नाहीत---

कित्ती कित्ती वाईट्ट आहे नवी पिढी
नवीन पिढी वाईट आहे असे नाही.
नवीन पिढी वाईट आहे असे नाही. ते योग्य वेळी पोचू शकत नाहीत.
आमच्या शेजारच्या इमारतीत एक बाई एकट्या राहात होत्या. त्या गेल्या हे लगेच कोणाला कळले नाही. कळले तेव्हा पोलिसांना बोलावून त्यांच्या समक्ष घराचा दरवाजा उघडला अथवा फोडला गेला.त्यांच्या कॅनडात रहाणाऱ्या मुलीला कळवले गेले. ती म्हणाली की मला लगेच पोचता येणे शक्य नाही, प्लीज तुम्हीच सर्व उरकून घ्या.
ह्यात काहींना तिची बेफिकिरी, पैशाचा माज, आईची हेळसांड वगैरे दिसली. पण त्या पंच्याहत्तर अधिक वर्षांच्या बाई धडधाकट होत्या, रोज सकाळी चालायला जाताना दिसायच्या, अचानक गेल्या, शिवाय मुलगी महिन्याभरापूर्वीच आईकडे येऊन राहून गेली होती. आता ताबडतोब निघणे तिला शक्य नव्हते. ती काय करणार? नंतर जेव्हा आली तेव्हा शेजाऱ्यांनी असहकार पुकारला होता.
झोडपायला निमित्त हवे असते
झोडपायला निमित्त हवे असते लोकांना
दिल्लीचं एक लग्न पाहून धक्का
दिल्लीचं एक लग्न पाहून धक्का बसला होता.
लग्न प्रचंड मोठ्या लाॅनवर होतं. आत मोठे मोठे शामियाने आणि दुकानांसारखे स्टाॅल्स होते.
पाणीपुरी, चाट, डोसे उतप्पे,पाव भाजी, चायनिच, पिझ्झा, ccd चं एक दुकान, पिझारिया, एका टेबलवर अनेक अनेक लोणची, एका टेबलवर फळं, साॅफ्टड्रींक्स, आईसक्रीमचं एक दुकान, एक मिठाईचं दुकान.. एक ट्रक आणि दोन तीन खाटा टाकून धाबा बनवला होता ज्यात लाईव्ह मक्कई की रोटी आणि सरसोंका साग होतं. हलवा काऊंटर होता. साजूक तुपावर मलई बर्फी, दुधी, गाजर असे हलवे परत एकदा परतून वरून आईसक्यीम घालून देत होते,
काही तोकड्या कपड्यातल्या मुली ट्रे मधून स्टार्टर्स सर्व करत होत्या
लाॅनच्या बाहेर एक I 20 लाल रिबिनीत गुंडाळून सज्ज होती.
हे सगळं पाहून भोवळ यायची राहिली होती.
टोटल 450 पदार्थांचं मेनूकार्ड होतं.
धन्यवाद हीरा!
धन्यवाद हीरा!
काल एका मुलाच्या बाईकच्या
काल एका मुलाच्या बाईकच्या मडगार्डवर मोठ्या अक्षरात
F**K लिहिलेलं पाहून मला क शॉ बसला.
चित्र कुठलय ते माहिती नाही
चित्र कुठलय ते माहिती नाही बहुधा पुण्यामुबैला होत असेल..... नाही प्राजक्ता! माणसे पटकन मदतीला धावून येतात.अगदी कुठल्याही गावात/शहरात.
गावात आता तरणी कर्ती माणसं
गावात आता तरणी कर्ती माणसं कमी होऊ लागली आहेत हे खरं आहे. लोकांमधली माणुसकी कमी झालीय असे नव्हे तर लोकच कमी झाले आहेत.
> झोडपायला निमित्त हवे असते
> झोडपायला निमित्त हवे असते लोकांना
शिवाय परदेशात स्थाईक झालेल्यांबद्दलची असूयाही असते. पूर्वी सर्व मुले मुली पंचक्रोशीतच असत तेव्हा घरचे सारे आल्याशिवाय अंत्यविधी करायचा नाही या संकेताला काहीतरी अर्थ होता. आजकाल एक मुलगा अमेरिकेत, मुलगी कॅनडात असे सर्रास असते. मग ते येइ पर्यंत बर्फात देह ठेवणे वगैरे करतात. गतानुगतिकः लोकः !
शिवाय परदेशात स्थाईक
शिवाय परदेशात स्थाईक झालेल्यांबद्दलची असूयाही असते
>>>>
+७८६
शिवाय नाही. हे पहिले कारण. हुमायुन नेचर.
त्या ताई कुठल्या कारणाने
त्या ताई कुठल्या कारणाने बातमीत आल्या तर मीडियावाले त्यांच्या इमारतीत जाऊन त्यांच्या शेजारी पाजारी चौकशी करतील आणि मग ओरडून सांगतील पहा कशी बाई आहे, आई गेली तरी नाही आली. या आधी आई म्हणजे काय यावर चार काव्यपंक्ती गातील, आई साठी कोणी काय नाही केले याच्या दोन गोष्टी सांगतील.
वरच्या काही पोस्टींत "पूर्वी
वरच्या काही पोस्टींत "पूर्वी काय सुतक पाळत बॉस!" असा टोन वाटला
लग्नाच्या जेवणाच्या बाबतीत - पुण्यातील मराठी लोकांकडच्या लग्नाच्या जेवणाचे प्रकार (ब्राह्मणी व इतरही) इतकाच बहुतांश अनुभव एका काळापर्यंत होता. तेव्हा नंतर पहिल्यांदा एका लग्नात तो वरती लिहीला आहे तसा दुनियाभरचा मेनू व एकूणच भपक्याचे प्रदर्शन पाहिले तेव्हा असाच कल्चरल शॉक बसला होता. मह्राराष्ट्रात हे प्रकार निदान सुरूवातीला व्हाइट मनी मधून आले नाहीत असे मला वाटते. मग एकदा तो पॅटर्न झाल्यावर इतर लोक ते करू लागले व ते मेनस्ट्रीम झाले.
मला अजूनही टीपिकल पुणेरी लग्नेच आवडतात (जायला व खायला
). आदल्या दिवशी संध्याकाळपासून कार्यालयात, ते लग्नाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत. सकाळी अगदी साधा ब्रेफा व चहा/कॉफी. जरा लौकरचा मुहूर्त, त्यामुळे जेवणे आटपून दुपारी खुर्च्या व कोठे वर/वधू पक्षात गाद्याबिद्या असतील तर तेथे आपले कौतुक असलेल्या ज्येष्ठ लोकांच्यात लवंडून गप्पा/ डुलक्या. मग एकदा चहा आणि पॅक अप.
फारेंड यांच्याशी सहमत! बाकी
फारेंड यांच्याशी सहमत! बाकी ते गाद्या वगैरे प्रकार पाहिला नाही.
मला तर सांगली मिरजेतल्या
फा +१
मला तर सांगली मिरजेतल्या कार्यलयातील लग्ने आवडतात. पण मी इथून पुढे कधीही तिथे शक्यतो जाणार नाही. ब्राह्मणपुरीतील कार्यालयातील जेवणात पनीर, छोले, रबडी वगैरे बघण्याआधीच मला बोलाव रे परमेश्वरा !
अगदी खरे कोणी ही मान्य करेल.
अगदी खरे कोणी ही मान्य करेल.
इतके १७६० अन्न पदार्थ कोण खाते का?जे पदार्थ असतात त्या मधील मोजकेच दोन तीन जेवण म्हणून खाउ शकतो,बाकी सर्व उगाच पोटाला त्रास.
मी तर लग्न समारंभात जेवण करणे सोडून दिले आहे.
घरी येवून जेवतो .
कोणताही केटरर्स असू किंवा किती ही महाग जेवण असू सोड्या पासून रंगा पर्यंत सर्व प्रकार वापरले जातात.
हरियाणा सारखे दारू चा बंदोबस्त सकाळ पासून च लग्नात असेल तर तो व्यक्ती फक्त नॉन वेज च खाणार.आइस क्रीम किंवा बाकी गोड पदार्थ ना तोंड तरी लावेल का?
मग ते ठेवून फायदा काय.
सर्व करतात म्हणून आपण पण करा अशी मानवी उर्मी असते.
त्या मुळे ही लाट पसरते.
रोज दिसणारे उदाहरण.
एकाने सिग्नल तोडला की सर्व च सिग्नल तोडतात.
ही नैसर्गिक उर्मी असावी.
“ वरच्या काही पोस्टींत
“ वरच्या काही पोस्टींत "पूर्वी काय सुतक पाळत बॉस!" असा टोन वाटला” -
पुढची पोस्ट न वाचताच हे तू लिहिलंयस अशी कल्पना आली फा. 
फारेंड खूप सहमत.
फारेंड खूप सहमत.
तसंच हल्ली लाडूचिवडा पण बनवत नाहीत लग्नात. काय दैवी लागतो तो परातीत काढलेला लाडूचिवडा...आमच्याकडे तर आचारी बोलवून करून घेतला होता. बिल्डींगच्या मधल्या चौकात बुंदीचे लाडू केले होते. मीच नवरी होते तरी न लाजता गरम गरम लाडू चार खाल्ले होते.
दिल्लीतल्या लग्नांना आपल्या कढीभाताच्या जेवणाची, सकाळच्या डिशमधे स्लाईड करणा-या गोडगोड चवीच्या मऊमऊ उपम्याची आणि जिलबी मसालेभाताच्या जेवणाची सर नाही हो.
फारेंड खूप सहमत.>>>>> मी पण
फारेंड खूप सहमत.>>>>> मी पण
नवीन Submitted by मेधावि on
नवीन Submitted by मेधावि on 22 May, 2022 - 09:54>>> ह्या पोस्टला आणी फाच्या पोस्टला शेकडो मोदक, मराठि लग्न अशिच हवित.
महाराष्ट्री सात्विक अन्न नष्ट
महाराष्ट्री सात्विक अन्न नष्ट होत आहे
डोंबिवलीत काही लग्न, मुंजीत
डोंबिवलीत काही लग्न, मुंजीत टिपिकल जेवण असतं अगदी पंक्ती वगैरे असतात. ते एका शेजारी रहात असणाऱ्या मुलाच्या लग्नात होतं, तेव्हा सर्वच जातीतल्या मराठी आणि अगदी साउथ इंडियन लोकांना आवडलं होतं, काहीजण गोडा मसाला कसा असतो वगैरे विचारत होते, कारण मसालेभात गोडा मसाला घालून केलेला, तो खूप आवडला होता सर्वांना.
अगदी सुरवातीला.
अगदी सुरवातीला.
लग्नात वऱ्हाड बैल गाडी मधून जात असे.
लग्न दारात च होतो.
तेव्हा
घेवड्या ची आमटी,तिळाची चटणी आणि भाकरी असे जेवण असे .
नंतर शिरा भात आमटी आली.
त्या नंतर वांगा बटाटा भाजी add झाली..
त्या नंतर.
रव्याची बर्फी दिसू लागली,शिरा भात,आमटी बरोबर.
त्या नंतर .
मसाले भात, कळ्या,किंवा बुंदी चे लाडू आले आमटी गायब झाली वरण आले.
आणि आता सर्व .
चायनीज ,पासून पाणी पुरी पर्यंत सर्व काही.
इतके १७६० अन्न पदार्थ कोण
इतके १७६० अन्न पदार्थ कोण खाते का?जे पदार्थ असतात त्या मधील मोजकेच दोन तीन जेवण म्हणून खाउ शकतो>>होय अगदी खरं,इतके प्रकार का ठेवले जातात हा खरंच प्रश्न आहे,मला सुद्धा क शॉ बसला होता जेव्हा मी पहिल्यांदा एका लग्नात जेवणासोबत पाणीपुरी आणि चायनीज चे स्टॉल पाहिले होते,
Pages