Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी असं ऐकलंय / वाचलंय - खरं
मी असं ऐकलंय / वाचलंय - खरं खोटं ठाऊक नाही - प्लीज कन्फर्म.
अमेरिकेत अजूनही काही लोक व्हीसीआर वर व्हिडीओज् पाहतात. कॅसेट टेप्स अजूनही विकल्या जातात फक्त त्यांना व्हिडीओ कॅसेट न म्हणता व्हीएचएस म्हणतात. शिवाय सीआरटी टीवी देखील वापरात आहेत. कारमध्ये देखील कॅसेट टेप प्लेयर असतो.
हे जर खरे असेल तर मोठाच इलेक्ट्रॉनिक शॉक म्हणायला हवा. ज्यांना चंगळवादी म्हंटले जाते ते अजूनही जुन्या वस्तू वापरतात हा कल्चरल शॉकच.
एफ विथ ब्रेन आहे हपा तुमची
एफ विथ ब्रेन आहे हपा तुमची कमेंट! ब्रेनची सायकलच्या सायकल अर्धा श्रावण, पाव भाद्रपद, पाउण डोळे.. .. मरुदे.
सावन भादो डेंजर आहे
सावन भादो डेंजर आहे
हर्पा,
हर्पा,
पंधरा दिवस म्हणजे अर्धा महिना म्हणजे एकच डोळा होईल नं....
"मराठी लोकांत लहान्यांच्या
"मराठी लोकांत लहान्यांच्या पाया पडणे हा प्रकार नसतो त्यामुळे मला थोडा धक्का बसला." - मराठी लग्नात मुलीचे आइ-वडील नवरा मुलगा - मुलीच्या पाया पडतात (लक्ष्मी-नारायणाचा जोडा म्हणून). ज्येष्ठ जावयाची आणि नंतर नवर्यामुलाची पाद्यपूजा असते.
हपाचे लॉजिक भारी आहे
हपाचे लॉजिक भारी आहे
सर्वच नॉर्थ इण्डियन प्रथांबद्दलच्या या नवीन पोस्टी इम्टरेस्टिंग. बरेचसे माहीत नव्हते.
कुमारिकांना जेवायला बोलावून त्यांचे पूजन करणे वगैरे बघितले आहे. नक्की केव्हा ते माहीत नाही. मुंज झालेल्याला ब्राह्मण म्हणून बोलावल्यावर यजमान कुटुंबातील सर्वांनी वयाचा विचार न करता पाया पडणे हे कॉमन आहे. तसेच "मेहुण" म्हणून बोलावलेल्या जोडप्यालाही. वरती कोणीतरी म्हंटले आहे तसे त्या "रोल" चा मान असतो तो, त्या व्यक्तीचा नव्हे.
मेहुण शब्द मी पुण्यात कायम ऐकला आहे. इतरत्र काय म्हणतात माहीत नाही. पूजेच्या दिवशी किंवा बहुधा श्रावणात बोलावतात तेव्हा.
आपल्या महारष्ट्र मध्येच असे
आपल्या महारष्ट्र मध्येच असे शॉक बसतात.
१) सातारा भागात कोणत्याच शुभ कार्यात लग्न,बारसे,पूजा, वास्तू शांती,अशा.
गोड च जेवण असते.मांसाहारी जेवण बिलकुल नसते.
पण कोकणी लोकात आणि मुंबई मध्ये पण लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी चा कार्यक्रम असतो .आणि त्यामध्ये दारू आणि मटन असते. हा प्रकार पहिल्यांदा बघितला तेव्हा cultural शॉक बसला होता.
मेहुण शब्द मी पुण्यात कायम
मेहुण शब्द मी पुण्यात कायम ऐकला आहे. इतरत्र काय म्हणतात माहीत नाही. >>>मराठवाड्यातही म्हणतात, त्यावरून (हक्काची सवाष्ण, मेहुण,मुंजा, ब्राह्मण हातासरशी ठेवायचे तेव्हा ) ,मेहुण(मैहुंना) असे पिजे केलेत. आम्ही गडंग्ङरही (गडंग्नर) म्हणायचो, आता केळवणच अधिक ऐकलंय.
गडंग्ङर कसं लिहायचं , सांगा कुणी .
गडंग्नर हा कन्नड शब्द आहे ना
गडंग्नर हा कन्नड शब्द आहे ना ?
कुमारिकांना जेवायला बोलावून
कुमारिकांना जेवायला बोलावून त्यांचे पूजन करणे वगैरे बघितले आहे. नक्की केव्हा ते माहीत नाही.>>>
नवरात्रात करतात अष्टमी/ नवमीला कुमारिका पूजन.
विदर्भातील्/मराठवाड्यातील
विदर्भातील्/मराठवाड्यातील असेल तर तेलुगू असायची शक्यता आहे
किंवा पुलं म्हणतात तसे- " फ्रेण्डीन्नीड इजे फ्रेण्डीण्डीड - हे इंग्रजी आहे. पण मराठीत लिहीले की कानडी वाटते"
प्राची - हो तसेच वाटत होते.
हातासरशी शब्द खूप दिवसांनी
हातासरशी शब्द खूप दिवसांनी ऐकला.
'हातासरशी कर' करत अर्धी कामं करायची नसताना करुन घेत घरी. 
बरं , आता मी माझे छोटे
बरं , आता मी माझे छोटे धक्केबुक्के सांगते.
माझं लग्न ठरलं तेव्हा मी आज्जे सासूला भेटायला गेले तर, त्या मला वेगस मधले कुठले कसिनो बघण्यासारखे आहे हे सांगू लागल्या, त्यांनी सगळी अमेरिका/मेक्सिको बघितलेली होती, हॉलिवूड, डिस्नी, नायगारा सगळं व्यवस्थित लक्षात होतं. सासवा, आया जातात हे ऐकलेलं होतं पण इतकी कूल आज्जीसासू बघून टडोपाच आले.
पाच वर्षापूर्वी सख्ख्या मावसनंदेचे लग्न ठरले म्हणून सासूबाई सांगू लागल्या तर मी विचारले 'कुठलाय मुलगा?, तर त्या 'मुलगा नाही मुलगी आहे' म्हणाल्या. आम्हाला कुटुंबातील पहिल्या भारतीय गे लग्नाचे रितसर आमंत्रण आले होते, काही तरी काम आल्याने जाऊ शकलो नाही. प्रेझेंट पाठवून दिले. आता त्या दोघींना एक गोड मुलगाही आहे. माझ्या मावसनंदेच्या बायकोचे जी अमेरिकन आहे, आधी हेटरो लग्न होऊन डिवोर्स झालेला होता व दोन मोठी मुलंही होती. छान संसार चाललाय दोघींचा, आधीही मी ओपनच होते पण तेव्हापासून मी मनातल्या मनातही कुणाचीच sexuality गृहीत धरत नाही, माझ्या मुलांचीही ! पूर्ण स्विकार करता यायला लागलेय. माझ्या तीन जावा एक अमेरिकन, एक आयरिश एक कनेडियन आहे, शिवाय धर्म, जात याबाबतही माझ्या सासरी इतकी विविधता आहे की धक्के बसणं जवळजवळ बंद झालंय.
पण कोकणी लोकात आणि मुंबई
पण कोकणी लोकात आणि मुंबई मध्ये पण लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी चा कार्यक्रम असतो .आणि त्यामध्ये दारू आणि मटन असते. हा प्रकार पहिल्यांदा बघितला तेव्हा cultural शॉक बसला होता.>>
कोल्हापुरात बारशाला बरेचदा मांसाहारच असतो. मटन मोस्टली. लग्नानंतर गोंधळ असतो तेव्हाही आणि गौरीला जेवण पण बरेचदा मांसाहारीच असते.
अस्मिता, मस्त वाटलं ऐकून.
अस्मिता, मस्त वाटलं ऐकून.
पण कोकणी लोकात आणि मुंबई
पण कोकणी लोकात आणि मुंबई मध्ये पण लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी चा कार्यक्रम असतो .आणि त्यामध्ये दारू आणि मटन असते.
>>>>
सरसकट कोकणी लोकांत नसते. म्हणजे आम्हीही पक्के मांसाहारी. पण हळदीला वा लग्नाच्या जेवणार मांसाहार नाही ठेवत. ते दिवस धार्मिक कार्याअंतर्गत मोडतात. मांसाहार करायचे झाल्यास रिसेप्शन पार्टी लग्नाच्या दिवशी न ठेवता वेगळ्या दिवशी ठेवावी लागते. किंवा मग आपली पाचपर्तावन म्हणून एक प्रथा आहे ज्यात नवर्याकडची लोकं मुलीकडे मांसाहार हादडायला जातात. ज्यात सहसा कोंबडीवडे हा पारंपारीक मेनू असतो. नवर्याचे बूट लपवायचा जूते दे दो पैसे ले लो कार्यक्रम सुद्धा याच दिवशी असतो.
पण कोकणी लोकात आणि मुंबई
पण कोकणी लोकात आणि मुंबई मध्ये पण लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी चा कार्यक्रम असतो .आणि त्यामध्ये दारू आणि मटन असते. ....... नाही हो, सरसकट कोकणी लोकांत असे नसते.
आम्हाला कुटुंबातील पहिल्या
आम्हाला कुटुंबातील पहिल्या भारतीय गे लग्नाचे रितसर आमंत्रण आले होते >>> हे भारी आहे
एका मुस्लिम मित्राच्या
एका मुस्लिम मित्राच्या लग्नाला जाण्याचा योग आला.मुस्लिम आहे म्हणजे beef च असणार असा समज होता .पण हिंदू पाहुण्यांसाठी वेगळे जेवण होते ,मटन ,चिकन वैगेरे.सर्वात धक्का दायक बाब म्हणजे कोणाचा उपवास असेल म्हणून शाबुदाना खिचडी पण होती.अगदी वेगळी .हा शॉक च होता.
गडंग्नर>>> गडगनेर हा मराठी
गडंग्नर>>> गडगनेर हा मराठी शब्द आहे. केळवण यासाठी हा शब्द जनरली सीकेपी लोकांमधे वापरला जातो.
@अस्मिता आम्ही गडगनेर
@अस्मिता आम्ही गडगनेर म्हणायचो, म्हणजे उच्चार तरी तसाच ऐकलाय
अस्मिता, भारी अनुभव : ) खरच
अस्मिता, भारी अनुभव : ) खरच असा ओपननेस यायला हवा आता
थम्स अप मधे आंगठे सापडायला
थम्स अप मधे आंगठे सापडायला लागले तर तो सी आय डी चा एपिसोड होईल >>>
सावन भादोचे लॉजिक
गौरीला जेवण पण बरेचदा
गौरीला जेवण पण बरेचदा मांसाहारीच असते. >>> असा शॉक एकदा नवरात्रात एका रजपूत मैत्रीणीकडे गेले होते तेव्हा बसला होता. त्यांच्याकडे नवरात्रात मटणाचंच जेवण असतं म्हणे. तिच्या घरी पहिल्यांदाच गेले होते. गेल्या गेल्या दारातच हाय हॅलो नमस्कार ऐवजी तिच्या आईने 'आओ बेटा' म्हणून मिठीच मारली हा दुसरा कशॉ होता तेव्हा.
खानदेशात आमरसात पुरणपोळी
खानदेशात आमरसात पुरणपोळी बुडवून खाण्याची पद्धत आहे हे आम्हाला आधी माहिती नव्हतं. आमच्या इथे (कोकणात) तिकडचे एक शिक्षक होते. त्यांच्या घरी काही कार्यक्रम/पूजा वगैरे होती उन्हाळ्याच्या दिवसात. तेव्हा त्यांनी माझ्या आईबाबांना जेवायला बोलावलं होतं. (कोकणातल्या घरीच) तेव्हा त्यांना आमरसात पुपो बुडवून खाताना बघून माझ्या आईबाबांना जबरदस्त धक्का बसला होता!
माझ्या नवऱ्याचे नातेवाईक खानदेशात आहेत त्यामुळे लग्नानंतर मला कळलं की तिकडे असं सर्रास खातात.
rmd - my favorite series has
rmd - my favorite series has it already covered
https://www.youtube.com/watch?v=jeB3B4IT92o&t=205s
.पण हिंदू पाहुण्यांसाठी वेगळे जेवण होते ,मटन ,चिकन वैगेरे. >>> रोजे सुरू असतात तेव्हा संध्याकाळी पुण्यात काही ठिकाणी जे सर्वांसाठी (पैसे देउन) ओपन असलेले खाणे असते - त्याचे नाव विसरलो. माबोकरांबरोबरच एकदा गेलो होतो. तेथेही हिंदू लोकांना सांगत होते बीफ कशात आहे, चिकन कोणत्या स्टॉलवर आहे ई. दुधी हलवा व इतर स्वीट्स भन्नाट होते तेथे. पब्लिक मधे सगळा मिक्स ग्रूप होता. बहुधा आमचे कपडे नेहमीचे होते - धार्मिक नव्हते - त्यावरून कळत असेल विक्रेत्यांना. किंवा आमच्या चौकस नजरांवरून / प्रश्नांवरून.
आमच्याकडे नवऱ्याला बायको
आमच्याकडे नवऱ्याला बायको नमस्कार करत नाही हे ऐकून इतरांना शॉक बसतो.
मी नवऱ्याला नावाने हाक मारते हे श्रीरामपूरला आम्ही रहात होतो, तिथल्याना shocking होतं.
नवरा कामात मदत करतो हेही shocking आणि मम्मी पप्पा आमच्या मुलाला समजत नाही आम्ही आई बाबा शिकवलं हेही shocking होतं, आम्हीच किती कल्चरल शॉक दिले त्यांना.
मला तिथे काही प्रकार shocking होते त्यातला एक म्हणजे, नातेवाईकांत कोणीही गेलं तरी दहा दिवस सुतकात सर्वच बायका कुंकु, टिकली लावत नाहीत.
पुणे मुंबई येथे मुस्लिम
पुणे मुंबई येथे मुस्लिम मोहोल्यात लागणाऱ्या इफ्तार स्टॉल्स वर जाऊन स्ट्रीट फूड खाणे हा नवीन कल्चरल टुरिसम झाला आहे.
त्यामुळे तिकडच्या विक्रेत्यांना सवय असते.
अनि तसेही इकडे बीफ म्हणून म्हशीचे मांस असते.
नवीन कल्चरल टुरिसम झाला आहे.>
नवीन कल्चरल टुरिसम झाला आहे.>> आमचा बातम्या समजायचा एकमेव सोर्स व्हॉअॅ असल्याने याबाबत काहीच कल्पना नाही. (कसले व्हॉअॅ ग्रुप आहेत! करुन जज करू नये. हुकमावरुन! )
>>> आमचा बातम्या समजायचा
>>> आमचा बातम्या समजायचा एकमेव सोर्स व्हॉअॅ असल्याने याबाबत काहीच कल्पना नाही. >>>>
अय्या, तुम्ही तमाम भिडे, दामले, साने वगैरे लोकांची WA स्टेटस आणि इंस्टा स्टोरी बघत नाही का?
Pages