तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुलजी
जुनियर मुलीला तुमच्या सारखा अनुभवी अहो जाहो म्हणणार म्हणजे तिला वय वाढल्यासारखे नाही का वाटणार...

मी तामिळनाडूत आले तेव्हा नव्या ओळखी झाल्या.. एका आजीला सगळे तेनम्मा म्हणायचे..नंतर मला कळले कि ते त्यांचे नाव नव्हते.. इकडे मुलांच्या नावापुढे आम्मा लावून बोलतात..त्यांच्या यंग मुलीचे नाव जुन्या वळणाचे तेनमौली आणि त्यांचे नाव मल्लिका हे ऐकून मला छोटासा धक्का बसला होता.

मॉडर्न टॉयलेट रेस्टॉरेंट
https://www.maayboli.com/node/40120
>>>>

ईथे आहे हा धागा. संमिश्र प्रतिसाद आहेत. काही लोकांना आवडलाय हा प्रकार.
पण जर यांचा धंदा होत असेल तर बिजनेस माईंडबद्दल दाद द्यायला हरकत नाही. Happy

पूर्वी महाराष्ट्रात रंगपंचमी सर्वत्र होळीनंतर पाचव्या दिवशी व्हायची.>>> आमच्या नाशिकला अजुनही पाचव्या दिवशीच होते

अमेरिकेत ख्रिसमस ला एकच दिवस सुट्टी असते हे ऐकून धक्का बसू शकतो... लोकांना वाटते महिने महिने बंद असेल हाफिस...

आमच्या नाशिकला अजुनही पाचव्या दिवशीच होते >>> आम्ही वालचंद सांगलीला असतानाही तेव्हाच खेळली गेली. आधी आम्ही होळीला मुंबईत येऊन खेळलो. मग महालक्ष्मी पकडून तिकडे खेळायला गेलो.

डोंबिवलीत आम्ही लहान असल्यापासून धुळवडच असते (कर्माने मुंबईकर ना आम्ही, पोटापाण्यासाठी जाणारे) आणि शाळेला सुट्टीही त्याच दिवशी असायची. रंगपंचमी बाकी ठिकाणी होते ऐकून होते, टीव्हीवर बघायचे, प्रत्यक्ष श्रीरामपुरमध्ये राहिल्यावर अनुभवली. धुळवड आम्ही सकाळपासून दुपारपर्यन्त खेळायचो, तिथे रंगपंचमी दुपारी तीन नंतर संध्याकाळपर्यन्त असायची.

एखादी घटना घडल्याबरोबर लगेच धागे काढणाऱ्या 'धाग्यावेताळाने' कालपासून घडणाऱ्या राजकीय घडामोडीवर अद्याप धागा काढला नाही, हे पाहून मला मायबोलीचा कल्चरल शॉक बसला!!!

काय राजकीय घडामोड घडलीय?
मी न्यूज बघत नाही. राजकारण रोजच्या रोज फॉलो करत नाही. काही ईंटरेस्टींग घडल्याशिवाय रस घेत नाही. सध्या व्हॉटपग्रूप बरेच म्यूट केलेत जिथे जात नाही. फेसबूकवर चक्कर टाकली तर मित्रांच्या वॉलवर दिसेल तेच.. असो काय झालेय पण, मजेशीर असेल तर काढूया की धागा..

आम्ही वालचंद सांगलीला असतानाही तेव्हाच खेळली गेली >> ऋन्मेऽऽष वालचंदला होता हे वाचून मला मोठा शॉक बसला आहे Happy Light 1

ऋन्मेऽऽष वालचंदला होता हे वाचून मला मोठा शॉक बसला आहे >>> Lol अगदी अगदी

तो कधी तरी मुंबईच्या बाहेर पण पडला आहे हेच खरे वाटत नाही Proud

बस काय.
गडचिरोलीला इरिगेशन मध्ये काम केलय पठ्ठ्याने!

असामी, मी आधी डिप्लोमाला विजेटीआयला होतो.
मग डिग्रीचे एक वर्ष वालचंदला होतो.
तिथून पुन्हा ट्रान्सफर मिळवून पुढची दोन वर्षे पुन्हा विजेटीआयला आलो. त्यामुळे फायनल डिग्री सर्टीफीकेट मुंबई युनिवर्सिटीचे.

त्या आधी मी सचिन तेंडुकरच्या किर्ती कॉलेजलाही होतो. सचिन आणि माझ्यातील अजून एक साम्य Happy
तसेच काही काळ एसपी कॉलेजात पार्ट टाईम डिग्रीचाही अनुभव घेतलाय.
ज्ञान जिथे मिळेल तिथून घ्यायचे. मिळेल त्या कॉलेजात अ‍ॅडमिशन घ्यायचे. भले दहातल्या फक्त दोन लेक्चरला जायचे.

आणि हो, गडचिरोलीला मी ईरीगेशन डिपार्टमेंटला नसून पीडब्ल्यूडीला होतो.
पण धनि, तुमचेही बरोबर आहे. कायमस्वरुपी मला मुंबईतच बरे वाटते. सरकारने नोकरी मुंबईत दिली असती तर आवडीने केली असती.

ब्लॅककॅट, विलिंग्डन कॉलेजला यायचो पोरी बघायला. मी नाही, मित्र बघायचे. तिथे कुठेतरी ऑमलेट पावसुद्धा खायचो.

ऋन्मेऽऽष वालचंदला होता हे वाचून मला मोठा शॉक बसला आहे >>> Lol अगदी अगदी
>>>>>>
ही सत्यकथा वालचंदचीच होती. आणि हे त्यात सुरुवातीलाच स्पष्ट लिहिले आहे.
चॉकलेट डे .. खळ्ळं फट्ट्याक !
https://www.maayboli.com/node/49063

पीडब्ल्यूडी ला अभियंता या अनुभवावर कुणीतरी एक भय अनुभूती कथा लिहिली आहे माबोवर. एकाकी गेस्टहाऊस, रात्र, पाऊस इत्यादी. सहज आठवले.
https://www.maayboli.com/node/50247
( शोध सुविधा दिव्य आहे :अंगठ्यास तर्जनी तीन बोटे उभी मुद्रा: )

इंग्लंड मध्ये मुलखाचे प्रॅक्टिकल लोक बघून धक्का बसला होता.. नवरा बायको मध्ये पण ttmm.. कितीही वर्षाचा का संसार असेना..

नवरा बायको मध्ये पण ttmm.. कितीही वर्षाचा का संसार असेना..
>>>>

हे खरे असेल तर ॲक्चुअली खूप भारी आहे. यावरून तिथे स्त्री पुरुष ईक्वली स्ट्राँग आहेत हे समजते.
आपल्याकडची व्यवस्था न कमावत्या स्त्रियांवर आणि जास्त कमाऊ न शकणाऱ्या पुरुषांवरदेखील अन्यायकारक आहे. कमवायची जबाबदारी पहिली पुरुषावरच असते.

असंच पहिल्यांदा प्रिनप बद्द्ल समजले तेव्हा बारिकसा धक्काच बसला होता. नात सुरू करतानाच तोडायचे नियम ठरवायचे विचार करुन गंमत वाटली होती. पण प्रॅक्टिकल प्रकार वाटतो आता.

थम्स अप मधे आंगठे नि गोल्ड स्पॉट मधे सोने नसते >> Lol

थम्स अप मधे आंगठे सापडायला लागले तर तो सी आय डी चा एपिसोड होईल Proud

Pages