Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीमा
सीमा
आपल्याकडे मॉक नॉनव्हेज निव्वळ
आपल्याकडे मॉक नॉनव्हेज निव्वळ भेसळीमुळे अनेकदा मिळत असेल
एकवेळ ते चालेल पण मटणाऐवजी तिसर्याच प्राण्याचे मांस वापरले वगैरे किस्से ऐकले आहेत.
इथले मॉक मीट बहुधा मीटची सवय असलेल्यांना सुटेबल आहे. तेथे व्हेज भाग हा रिप्लेसमेण्ट असतो. ते मला फेक मीट आणि फेक व्हेज वाटते. भारतात जसे मूळचे व्हेजी पदार्थ असतात तसे हे नाही. मला जर मुळात बीफच आवडत नसेल तर मॉक बीफ खायचा खटाटोप मी का करेन.
चहा/कॉफी सोबत बिस्कीटं खात
चहा/कॉफी सोबत बिस्कीटं खात वाढलेल्या मला अमेरीकेत आल्यावर ब्रेकफास्टला बिस्किट आणि ग्रेवी ऐकून शॉक बसला होता. मग नवर्याने हे बिस्किट वेगळे, आपले बिस्किट वेगळे. ग्रेवी म्हणजे देशात असते तसे नाही, ही सॉसेजवाली पांढरी ग्रेवी वगैरे ज्ञान दिले होते.
ही बिस्किट मला प्रचन्ड आवडतात
ही बिस्किट मला प्रचन्ड आवडतात पण ग्रेव्ही मात्र अपिल नाहि झाली, पॅनडिमिक मुले इथल सुप्रसिद्ध सुप्लाटेशन बन्द झाल पण तिथे अप्रतिम सॅलेड,सुप आणी ही बिस्किट मिळायची, इतकी फ्लेकी मी दुसरिकडे कुठही खाल्ली नाही.
ते मॉक नॉनव्हेज होते Rofl
ते मॉक नॉनव्हेज होते Rofl म्हणजे भाजीपाल्या पासून बनवलेले पण दिसायला मात्र नॉन-व्हेज जेवणासारखे. >>> हाहा
हॅम, बीफ नाही खायचं तर नका ना खाऊ. हे असलं काहीतरी धेडगुजरी प्रकार करुन खाणं, >>> हे तरी बरे. पण ते toilet restaurant मधे जे काही खातात ते बघून वाटते हौस किती लोकांना काय काय खायची!
सर, मॅडम, जी वगैरे आता झेपत
सर, मॅडम, जी वगैरे आता झेपत नाही पण family owned मारवाडी कंपनीतून इकडे आल्यावर टॉप बॉसचा पण पहिल्या नावाने उल्लेख करायचा हा कल्चरल शॉक होता. तसच बॉस आपल्या टेबलजवळ आला की उठून उभं न रहाणं पण! आता बऱ्यापैकी सवय झाली आहे पण मध्यंतरी Vice Chancellor माझ्या टेबलजवळ आले तेव्हा आपोआपच मी उभं राहून त्यांच्याशी बोलत होते. त्यांनी बसायला सांगितलं
आणि एक खुर्ची ओढून ते पण बसले.
( पूर्वीचे VC अधूनमधून अगदी ground level च्या लोकांना भेटायला यायचे)
office जवळ loving hut म्हणुन
office जवळ loving hut म्हणुन restaurant aahe, thyat shrimp chi dish khallelee, होती छान पण शेवटी तोच प्रश्ण पडला, why??
आणखी एक सांस्कृतिक धक्का:
आणखी एक सांस्कृतिक धक्का: गाझियाबाद (आणि पूर्ण उत्तर प्रदेश व दिल्लीत) गणेश चतुर्थी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) ची सुट्टी नसते, अगदी ऐच्छिक सुट्टी नसते. मी जेव्हा माझ्या कॉलेजच्या डीनला विचारले, तर ते माझ्याकडे बघतच राहिले. केवळ तुमच्या महाराष्ट्रातच सुट्टी असते म्हणाले. पण ते साफ चूक होते, मी बंगलोरला दोन वर्ष होतो, तिकडे अगदी सरकारी सुट्टी असायची. त्यामुळे उत्तर भारतात गणपत्तीबाप्पाला दुय्यम वागणूक देतात असा माझा समज झाला.
इंदूरला पण नसे. म्हणजे
इंदूरला पण नसे. म्हणजे मध्य प्रदेशात नसते. लोकल स्टाफ गणपती पुजून जेवून खावून ऑफिसला येत.
१ मे- ची सुटी महाराष्ट्र आणि गुजरात राज्य स्थापनेची असते. या दोन राज्यांतच असते. कामगार दिनाची सुटी नसते.
बंगलोरला होळीची सुट्टी नसते
बंगलोरला होळीची सुट्टी नसते. उत्तर भारतीय गणेश चतुर्थीला सुटी देत नाहीत ह्याचा ते वचपा काढत असावेत.
<<टॉप बॉसचा पण पहिल्या नावाने
<<टॉप बॉसचा पण पहिल्या नावाने उल्लेख करायचा हा<< वत्सला , माझा भाचा कॅनबेराला शाळेत होता. प्रि स्कुलच. पण टीचर्सला मिस वै न म्हणता डायरेक्ट पहिल्या नावाने हाक मारत . हा मला धक्काच होता.

प्रत्येक राज्यातल्या धार्मिक
प्रत्येक राज्यातल्या धार्मिक सणांचे महत्व वेगवेगळे आहे. पूर्वी महाराष्ट्रात रंगपंचमी सर्वत्र होळीनंतर पाचव्या दिवशी व्हायची. उत्तर भारतात ती दुसर्याच दिवशी धुळवडीला होते. गणेशोत्सव साठ वर्षापूर्वी पुण्यालगत (आता पुण्यात) येरवडा, मुंढवा, सिंहगड रस्ता अशा भागात होत नसे. आता महाराष्ट्रात सर्वत्र होतोच. शिवाय इतरही राज्यात होतो. गरबा पूर्वी महाराष्ट्रात होत नसे. एके काळी फक्त गुजरातेत, मग बंगाल्यांच्या इतर राज्यातल्या दूर्गापूजेत समाविष्ट होऊन सर्वत्र झाला.
रंगपंचमी आणि गरबा आपलेसे करण्यात तरूणाईचा जास्त इंटरेस्ट आहे.
कामगार दिनाची सुट्टी भारतात सर्वत्र देण्यात आली होती. ती नंतर बंद झाली. महाराष्ट्रात मात्र राज्य अस्तित्वात आल्याने (गुजरातही) त्या दिवशी सुटी असते. ती इतर राज्यात असण्याचा प्रश्नच येत नाही.
ओनम, पोंगल या दिवशी महाराष्ट्रात सुटी असण्याचा प्रश्न नाही.
उत्तर भारतात बैसाखी हा मोठा सण आहे. महाराष्ट्रात त्या दिवशी सुटी नसते.
दिवाळीला प बंगालमधे सर्वत्र सुटी नसते. दूर्गापूजेला ते दहा दिवस सलग सुटी घेतात. त्या दिवशी खासगी संस्था सुद्धा बंद असतात.
महाराष्ट्राच्या सुट्या इतर राज्यांवर किंवा इतर राज्यातल्या सुट्या महाराष्ट्रावर लादण्याचा प्रश्नच येत नाही.
पण ते toilet restaurant मधे
पण ते toilet restaurant मधे जे काही खातात ते बघून वाटते हौस किती लोकांना काय काय खायची! >>>>>> हे असं नाव आहे रेस्टॉरंटच कि ढाबा, हॉटेल, रेस्टॉरंट्स यासारखं काही टाईप आहे? बाकी जे काय असेल ते, हे वाचून मला मात्र धक्का बसला आहे. आता तो सांस्कृतिक आहे की अजून कुठला ते माबोकर ठरवोत.....
त्या टॉयलेट हॉटेल चे फोटो
त्या टॉयलेट हॉटेल चे फोटो बघून मला अनेक दिवस वाईट स्वप्ने पडत होती
नको ती आठवण.
नको ती आठवण. Happy>>>>+२२
नको ती आठवण. Happy>>>>+२२
इथे एक लेख होता टॉयलेट रेस्टॉ
इथे एक लेख होता टॉयलेट रेस्टॉ वर.
कायतरी विक्रृत करतात लोक.
ठरलं तर मग.. पुढचं मायबोली
ठरलं तर मग.. पुढचं मायबोली गटग टॉयलेट रेस्टोरंट मधेच.... इच्छुकांनी आपापले आवडते फ्लेवर्स कळवावेत म्हणजे ऑर्डर करायला सोपे जाईल ... वेस्टर्न न आवडणाऱ्यांसाठी इंडियन ऑर्डर करण्याची सोय पण ठेऊया
पाणी ग्लासमध्ये देणार की
पाणी ग्लासमध्ये देणार की तांब्या , टमरेल घरून घेऊन यायचे ?
पाणी ग्लासमध्ये देणार की
पाणी ग्लासमध्ये देणार की तांब्या , टमरेल घरून घेऊन यायचे >>> तिथे असते सगळे. https://indianexpress.com/photos/trending-gallery/loo-and-behold-6-toile...
पाणी ग्लास मध्ये? तुम्ही
पाणी ग्लास मध्ये? तुम्ही फोटोज बघितलेले दिसत नाहीयत
इथे फोटो नको म्हणून फक्त हे वर्णन..
plungers hang from the ceiling along with feces-shaped lights. The chairs are actual toilets (not operable), dishes are served on plastic miniature toilet bowls, and drinks are offered in miniature urinals.
यक्क
यक्क
विकृत आहेत लोकं.
विकृत आहेत लोकं.
कुठे जाणिजे यज्ञ कर्म!! आणि कुठे हे हिडीस डोहाळे.
मला तर ती रेस्टॉरंट्स जिथे
मला तर ती रेस्टॉरंट्स जिथे वेटर्स तुमचा अपमान करतात (विनोद म्हणून. थीम आहे), घालून पाडून बोलतात, तिथे जाणार्यांची पण कमाल वाटते.
विशिष्ट गावाहून आलेले लोक
विशिष्ट गावाहून आलेले लोक होमसिक झाले की जात असतील अशा ठिकाणी.
यावर्षी
यावर्षी
1 एप्रिल टेक्निकल ब्रेक
2 एप्रिल पाडवा सुट्टी
3 एप्रिल रविवार
म्हणून महाराष्ट्रात 4 एप्रिलला कंत्राट रिन्यू झाले व आमचा 3 दिवसाचा पगार स्वाहा झाला.
महाराष्ट्र वगळता इतर भारतात पाडवा ही संकल्पनाच नसल्याने की सुट्टी नसल्याने त्यांचे मात्र सगळे व्यवस्थित झाले
कल्चरल शॉक
सर/मॅडम/जी इत्यादीच्या कल्चरल
सर/मॅडम/जी इत्यादीच्या कल्चरल शॉक्सवर एक वेगळाच लेख लिहून होईल.
आयटीचा अगदी सुरवातीचा काळ मी बघितला आहे. तेंव्हा सर/मॅडम कल्चर नव्हते. ते अलीकडे म्हणजे मागच्या काही वर्षातच बोकाळले. मला स्वच्छ आठवते अगदी सुरवातीला एका छोट्या कंपनीत ट्रेनी म्हणून जॉईन झालो होतो. तेंव्हा एका सिनियर मुलीला मॅडम म्हणलो होतो. तेंव्हा तिने मला निक्षून सांगितले होते, "ऐक. पुन्हा मला मॅडम वगैरे म्हणू नकोस. ठीक आहे? मला नीट नावानीच हाक मारायची". हा याबाबतीतला पहिला कल्चरल झटका. त्यानंतर पुढची कित्येक वर्षे जिथे जिथे काम केले, अगदी मोठ्या एमएनसी मध्ये सुद्धा, नावानीच बोलवत असू. कधीच कुठे कुणाला सर म्हणून संबोधल्याचे आठवत नाही.
तेच आजच्या काळात मात्र सिनियर आपल्याला सर/मॅडम म्हणवून घेत आहेत. अनेक आयटी मध्ये हा ट्रेंड आहे. पण ते तसे कुणी आपल्याला बोलवणे कधी पटले नाही. काही व्यक्ती मनापासून आपल्याला सर म्हणणारे असतात त्याप्रती आदर आहेच. पण बरेचजण केवळ कल्चरचा भाग म्हणून जबरदस्ती सर म्हणतात. त्याला काय अर्थ आहे? अगदी अलीकडे अनुभव आलाय. ज्या कंपनीसाठी आमची कंपनी काम करते त्यांच्या टीम सोबत कॉल असतात. ती क्लायंट कंपनी असल्याने त्यांच्याकडचे कुणीही मला सर म्हणत नाहीत. अगदी ज्युनिअर इंजिनियर सुद्धा. पण त्याच कॉलमध्ये आमच्या कंपनीतले तुलनेने सिनियर इंजिनियरसुद्धा मला सर संबोधत असतात. कारण इकडे तसे वर्ककल्चर आहे. आता ते बदलणे माझ्या हाती नाही. पण कुणी सर म्हटले कि मनात विचार येतोच, "हा क्लायंटकडे असता तर मला सर म्हटला असता काय?"
त्यामुळे ते सर/मॅडम वगैरे बोगस कल्चर आहे. कोणत्या महाभागाने आयटी मध्ये हे कल्चर सुरु केले असे वाटते.
"जी" चा सुद्धा कल्चरल झटका अनुभवला आहे. योगायोगाने त्या वरच्या "मॉक नॉनव्हेज" किश्श्यातल्या मित्राबाबतच घडला होता. सिंगापोरमध्ये आमची नवीन ओळख झाली तेंव्हा मी त्याला थेट "संदीप" म्हणून बोलवायला सुरवात केली. आपली नेहमीची सवय
एकदोन वेळा हाक मारल्यानंतर जाणवले त्याचा चेहरा एकदम पडलेला दिसला. मला बोलवताना मात्र तो "अतुलजी" म्हणायचा. मग मीसुद्धा "संदीपजी" म्हणू लागलो. नंतर कळले तो इंदूरचा होता. इंदूरकडचे लोक एकमेकांना एकेरी संबोधत नाहीत (आणि हे मी अजून दोन तीन केसेसमध्ये अनुभवले आहे). एकेरी संबोधने अपमानास्पद समजतात. पण नंतर मात्र मला "जी" बोलवायची सवय लागून गेली.
तरीही, अहो/जाहो/अरे/अगं/सर/मॅडम/जी यातले कुणाला काय आवडते आणि कुणाला कसला शॉक बसेल हे आजही सांगणे कठीण आहे.
काही दिवसांपूर्वी एक नवीन मुलगी जॉईन झाली. तिला सवयीनुसार "अहो/जाहो" सुरु केले. काही दिवसांनी तिने स्पष्ट सांगितले "सर मला तुम्ही अहो जाहो करू नका. मला ते आवडत नाही"
वर्तुळ पूर्ण झाले. अनेक वर्षापूर्वी सिनियर मुलीने मॅडम म्हणू नको म्हणून सांगितले, आणि आता ज्युनियरने अहो जाहो करू नको म्हणून सांगितले. 
“ विशिष्ट गावाहून आलेले लोक
“ विशिष्ट गावाहून आलेले लोक होमसिक झाले की जात असतील अशा ठिकाणी.”
नाही. त्या ‘विशिष्ट’ अपमानाची एक विशिष्ट पद्धत आहे. पुष्कळ सटल असतं ते. नवख्या माणसाला जमण्यासारखी गोष्ट नाहीये ती.
ह्या रेस्टॉरंट्स मधून अश्लील भाषेत downright insult करतात.
अतुल सरजी
अतुल सरजी
हा हा अतुल, भारीच
हा हा अतुलजी, भारीच

उत्तरेकडील लोकांत जी जी र जी करायचं प्रमाण अधिक असत. स्वतःला संबोधतानाही ते लोक हमे , हमने ऐसे किया वगेरे आदर देऊनच बोलतात. बंबैया हिंदी आणि त्यांच्या हिंदीतील फरक लगेच दिसून येतो .
अतुलजी
अतुलजी
Pages