Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुणे मुंबई येथे मुस्लिम
पुणे मुंबई येथे मुस्लिम मोहोल्यात लागणाऱ्या इफ्तार स्टॉल्स वर जाऊन स्ट्रीट फूड खाणे हा नवीन कल्चरल टुरिसम झाला आहे.
>>>>>
हो ॲक्चुअली.
आणि असे लोकं भेटतात तेव्हा गंमतही वाटते. कारण त्याच स्टॉलसमोरून जाणारे रस्ते रोजचे येण्याजाण्याचे होते एकेकाळी
हे वाचुन ऋन्मेष आता कविता
हे वाचुन ऋन्मेष आता कविता करायला लागणार वाटलं. ते झालं तर तो एक शॉकच असेल.
ॲक्चुअली. एकेकाळी. यात यमक
ॲक्चुअली. एकेकाळी. यात यमक दिसले का..
पण खरेच धन्यवाद, काहीतरी वेगळे करायचे होते. जरूर प्रयत्न करेन. अवांतराबद्दल क्षमस्व.
नातेवाईकांत कोणीही गेलं तरी
नातेवाईकांत कोणीही गेलं तरी दहा दिवस सुतकात सर्वच बायका कुंकु, टिकली लावत नाहीत..... शॉक नाही लागला.असेल बाई त्यांची रीत असं वाटले.माझी बाई अशी बिन कुंकवाची आली तेव्हा तिने वरची रीत सांगितली.
इफ्तार! सिम्बा धन्यवाद. नाव
इफ्तार! सिम्बा धन्यवाद. नाव आठवत नव्हते. मी पुण्यात कॅम्पात लाल देवळापाशी कोठेतरी गेलो होतो.
एरव्ही आमच्या समोरच्या फॅमिलीत हुकमी शीर कुर्मा वगैरे. चाळीत सर्वांना बोलावत. त्यातील मुलगा इथे अनेकांना कल्चलर शॉक बसेल इतका अस्खलित मराठी बोलतो व मराठी नाट्यसंगीतातील एका महत्त्वाच्या ठेव्याचे जतन करण्यासंबंधीच्या कामात आहे.
आयपील मे विराट मार रहा है...
आयपील मे विराट मार रहा है... शॉकच बसला मला आज हे बघून...
कोकणी मुसलमानांच्या घरातही
कोकणी मुसलमानांच्या घरातही मराठीच बोलणे खूप कॉमन आहे.
हो : रत्नागिरीतील काही आडनावे
हो. रत्नागिरीतील काही आडनावे ऐकून मला तेथे कल्चरल शॉक बसला होता
पण हिंदू पाहुण्यांसाठी वेगळे
पण हिंदू पाहुण्यांसाठी वेगळे जेवण होते ,
>>>>
आमच्या ऑफिसला दरवर्षी ईफ्तार पार्टी होते. काँट्रीब्युशन मुस्लिम कर्मचारी काढतात. अर्थात नॉनवेजमध्ये चिकन मटणच असते. बीफ वगैरे नसते. पण नॉनवेज आणि वेजचे स्टॉलच नाही तर कॅटरर्सही वेगळे असतात. नॉनवेज कॅटरर्स मुसलमान असतात. वेज कॅटरर्स बरेचदा ऑफिस कॅंटीनचेच असतात.
पण शीरखुर्मा आणि हलवा मात्र मुस्लिम कॅटरर्सचाच. त्याला तोड नसते.
हो. रत्नागिरीतील काही आडनावे
हो. रत्नागिरीतील काही आडनावे ऐकून >>> हो बरेचदा नाव मुसलमान आडनाव हिंदू असतात. बरेच लोकांचे शेख वा खान अशीही आडनावे असतात. आणि त्यातही मराठीत घरी बोलणारे असतात. बाटवण्याच्या प्रकारातून झालेले मुसलमान. बहुधा कुठल्या वस्ती मोहल्यात राहतात आणि काय वारसा पोरांना पुढे देतात यावरून ठरत असेल त्यांची बोलीभाषा..
सरसकट कोकणी लोकांत नसते. >>>
सरसकट कोकणी लोकांत नसते. >>> बरोबर. आमच्याकडे नसतो हा प्रकार, काही जणांकडे असतो, हळदीचं जेवण वगैरे नसतं आमच्याकडे. शास्त्र म्हणून हळद लावली जाते.
मला नालासोपारा इथे रहात असताना, आमच्या मारवाडी दुकानदाराने विचारलं होतं की मराठी लग्नात दारु कंपलसरी असते का, मी म्हणाले नाही हो . फार कमी ठीकाणी असते, आमच्याकडे नसते.
कोकणातल्या मुस्लिम समाजात त्यांनी धर्मांतरापुर्वीची आडनावं ठेवली आहेत, त्यामुळे पाटणकर वगैरे पण आडनाव आढळून येतं.
हो कर्रेक्ट. जेवणही नसते.
हो कर्रेक्ट. जेवणही नसते. घरगुती समारंभ असतो. लग्नाला आलेले जवळचे नातेवाईक हळद लावतात.
मित्रांमध्ये मात्र बरेच जणांकडे हळदीचे जेवण किंबहुना दारू प्यायला सगळे झुंडीने जायचो. लांबलांबच्या ओळखी काढून जायचो. मी प्यायचो नाही पण नॉनवेज आवडीचे असल्याने पोटभर जेवून घ्यायचो.
पण माझ्या लग्नाला असे काही नाही हे समजले तेव्हा सारे मित्र शिव्या घालत होते
पेण, पनवेल, उरण, अलिबाग या
पेण, पनवेल, उरण, अलिबाग या भागात आगरी आणि कोळी समाजातील हळदी मध्ये रात्रीच्या जेवणात मटण असते.
रात्री लोकांना नाचताना तळलेल्या घाऱ्या आणि तांदळाच्या फेण्या खायला वाटतात.
विरार ,पालघर साईड ला पण
विरार ,पालघर साईड ला पण
तो एक चायनीज इन्डियन सिंगर
तो एक चायनीज इन्डियन सिंगर मस्त हिन्दी मधे गातो. चॅन्ग, इन्डियन आयडोल मधे होता
.सोसायटीच्या लॉनवर कोळी
.सोसायटीच्या लॉनवर कोळी समाजातील एकाने हळदीनिमित्त जेवण ठेवले होते.आम्हाला बोलावले होते.म्हटले हा घरगुती समारंभ आहे,आपण कशाला जा म्हणून गेले नाही.मुलाला पाठवले.तो सामिष जेवण जेऊन आला.दुसऱ्या दिवशी लग्न होते.चला आता घरी स्वयंपाक करायला नको म्हणून आनंदात गेले आणि आईस्क्रीम खाऊन आले.घरी मुकाट्याने वरणभाताचा कुकर लावला.
नंतर कळले की त्यांच्यात हळदीचे जेवण म्हणजेच लग्नाचे जेवण असते.
पण माझ्या लग्नाला असे काही
पण माझ्या लग्नाला असे काही नाही हे समजले तेव्हा सारे मित्र शिव्या घालत होते
अशा वेळेस मित्रांच्या शिव्या फार शेलक्या असतात.सर्व च एका बाजूला आणि आपण एकटेच एका बाजूला असा सामना असतो.
शांत ऐकून घेणे हाच एकमेव पर्याय हातात शिल्लक राहतो.
अख्या मुंबईत किंवा एम एम आर
अख्या मुंबईत किंवा एम एम आर रिजनमध्ये एकही ठिकाणी धड अन शिस्तीत बनवलेला तांबडा पांढरा रस्सा न मिळणे हा माझ्यासाठी एक मोठाच कल्चरल शॉक होता, मालवणी/ आगरी पद्धतीचे नॉनव्हेज मुंबई-एमएमआर मध्ये उत्तम मिळतेच, पण भुरकण्यालायक रस्सा असा नसतो त्याला.
जवळ जवळ पूर्ण भारतात कोणाची
जवळ जवळ पूर्ण भारतात कोणाची घरी गेलो की पादत्रान घराबाहेर काढण्याची रीत आहे.पण आता मुंबई मध्ये अती उच्च गटात चप्पल,बुट तसाच पायात ठेवून घरात प्रवेश करतात असे बघण्यात आले तेव्हा धक्का बसला.
तो एक चायनीज इन्डियन सिंगर
तो एक चायनीज इन्डियन सिंगर मस्त हिन्दी मधे गातो. चॅन्ग, इन्डियन आयडोल मधे होता >>> चँग भारतीय आहे हो
अरबी लोक underpant वापरत
अरबी लोक underpant वापरत नाहीत असे ऐकून आहे .हे ऐकून धक्का बसला होता.
अरबी स्त्री आणि पुरुष एक च विशिष्ट प्रकारचं कपडा वापरतात underwear म्हणून.
हे खरे आहे का.
अस्मिता - खूप छान ,सुखद क.शॉ.
अस्मिता - खूप छान ,सुखद क.शॉ.
गुजराथमध्ये राहत होतो तेव्हा सोसायटीतल्या एकीला तिच्या मुलासाठी गणिताची ट्यूशन लावायची होती. तिनं मला एखादा चांगला क्लास माहिती आहे का विचारलं. मी म्हटलं - काही कल्पना नाही, माझ्या मुलाला काही अडलं तर मीच शिकवते.

तिला ते ऐकून टोटल क.शॉ. बसला. मला म्हणाली- "आप को आता है मॅथ्स?"
तिचा प्रश्न ऐकून मला क.शॉ. बसला
पण एकूणच तेव्हा तिथे अगदी पहिली-दुसरीतली मुलंही ट्यूशनला जायची ते पाहून मला धक्का बसला होता.
तो एक चायनीज इन्डियन सिंगर
तो एक चायनीज इन्डियन सिंगर मस्त हिन्दी मधे गातो. चॅन्ग, इन्डियन आयडोल मधे होता
>> खोडसाळ कमेंट...
मला तिथे काही प्रकार shocking
मला तिथे काही प्रकार shocking होते त्यातला एक म्हणजे, नातेवाईकांत कोणीही गेलं तरी दहा दिवस सुतकात सर्वच बायका कुंकु, टिकली लावत नाहीत>>>>> अग सोलापुरात पण आहे अशी पध्दत, म्हणजे आता आहे की नाही माहीत नाही पण साबा सांगतात. आमच्या एका फॅमिली फ्रेंड आहेत. त्या काकुंच्या माहेरी, सुतकात अख्खं घरदार मासिक पाळी आलेल्या बाईसारखं बाजुला असतं. शेजारीपाजारी रोजचा स्वयंपाक आणून देतात. मला हे समजलं कारण एकदा त्या काकुंबरोबर मी त्यांच्या माहेरी गेले होते तेव्हा आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला होता. दुसऱ्या दिवशी त्यांचं सुतक संपल्यावर आधी दहा दिवसांचा धोबीघाट काढला त्यांनी धुवायला मग घरात वावरायला सुरुवात केली.
आता मुंबई मध्ये अती उच्च गटात
आता मुंबई मध्ये अती उच्च गटात चप्पल,बुट तसाच पायात ठेवून घरात प्रवेश करतात असे बघण्यात आले तेव्हा धक्का बसला. >>> हो मी ही एकदा अनुभवला आहे.
तिथे अगदी पहिली-दुसरीतली
तिथे अगदी पहिली-दुसरीतली मुलंही ट्यूशनला जायची ते पाहून मला धक्का बसला होता. Uhoh
>>
असाच धक्का नवऱ्याच्या माहेरी आणि तेथील शेजाऱ्यांना बसला होता. मुलगा पहिलीत होता. शेजारी पाचवी आणि पहिलीतल्या भावा बहिणीला घरी tution होती. याचा मला धक्का होता. आम्हाला लगेच विचारणा झाली की, यालापण काय काय tutions आहेत. म्हटलं काहीच नाही. लगेच सासरहून, आता लक्ष दिले पाहिजे अभ्यासाकडे ई ई. म्हटलं काही लागलं तर मीच सांगते. तेव्हा तिकडे धक्का बसला.
हल्ली बरेच आईवडीलांना वेळही
हल्ली बरेच आईवडीलांना वेळही नसतो मुलांना शिकवायला. कारण दोघे नोकरीधंद्याला असतात. त्यात मुलांचा अभ्यासही ईतका असतो की वेळ देऊन करून घ्यावा लागतो. त्यामुळे बरेच जण ट्युशन प्रीफर करतात असे निरीक्षण आहे. आणखी एक म्हणजे मुले घरी शिकायला मागत नाहीत हल्ली. त्यांचे मित्र ट्युशनला जाणारे असतील तर घरी आई वा वडील वेळ काढून शिकवणारे असतील तरी त्यांना ट्युशनलाच जायचे असते.
कल्चरल शॉकपेक्षा हा काळ बदलला आहे. शाळेची भरमसाठ फीज भरणार्या लोकांना ट्युशनला आणखी चार पैसे खर्च करण्यात विशेष वाटत नाही असे मला वाटते. अन्यथा हल्लीची पोरं डान्स, म्युजिक, चित्रकला, हस्तकला, मार्शल आर्ट, स्विमिंग, बॅडमिंटन अश्या विविध क्लासला जाता हा देखील एक शॉकच आहे. कल्चरल नसून जनरेशनल शॉक म्हणू शकतो याला..
पहिल्यांदा महाराष्ट्रात आलो.
पहिल्यांदा महाराष्ट्रात आलो. वरणगावला. तिथं फिरायला गेलो गावाबाहेर स्टेट हाय वे होता. तिथं एका खड्ड्याजवळ एक बाईक ऑटोला धडकली. तर बाईकवाला स्वारी बोलला, ऑटोवाला म्हणला डोळे उघडे ठेवुन चालवत जा. बस. काही भांडण नाही काही नाही. दोघंही निघुन गेले.
हा शॉक होता. आमच्याकडं असं झालं असतं तर अर्धा तास तरी मनोरंजन झालंं असतं.
तो एक चायनीज इन्डियन सिंगर
तो एक चायनीज इन्डियन सिंगर मस्त हिन्दी मधे गातो. चॅन्ग, इन्डियन आयडोल मधे होता >>> चँग भारतीय आहे हो << हो हो भरतीयच आहे पण चायनीज ओरीजीन चा आहे ना? म्हणुन चायनीज इन्डियन....
त्याला मी फक्त indian idol मधे बघितल आहे. तेव्हा त्याच गाणं/हि न्दी शॉकींग वाटलेल.
>> खोडसाळ कमेंट... << what?
>> खोडसाळ कमेंट... << what?
Pages