तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी केरळला होते तेंव्हा तिकडे लाल पाणी प्यायला मिळायचे हॉटेलात.

मला आधी वाटलेलं की ती दारुच आहे आणि अशी हॉटेलात सर्सास सगळ्यांना प्यायला देतायेत ... भयंकर कल्चरल शॉक बसलेला Proud

मी अमेरिकेत आलो तेंव्हा मला हे बघून शॉक बसलेला की पादचारी राजा आहे. रस्त्याच्या कडेला माणूस दिसला, कार थांबलीच म्हणून समजा, त्याला क्रॉस करू देईल आणि मगच जाईल.

मला पुण्यात पोह्यांवर सांबार ओतून/बाजूला देतात हे बघून जाम कल्चरल शॉक बसला होता.
तसाच शॉक घरी 1 चमचा तेलावर परतलेलं थालीपीठ खायची सवय आणि विरंगुळा मध्ये थालीपीठ ऑर्डर केल्यावर त्यांनी तव्यात तळणीइतकं तेल टाकून त्यात जवळजवळ तळून ते दिलं तेव्हा बसला होता.

ब्रेकफास्ट मध्ये उकडलेले अंडे मागितले कि सिंगापोरमध्ये कढत पाण्याच्या मगमध्ये एक कच्चे अंडे टाकून देतात. दहा मिनिटे थांबून मग फोडायचे असते (तोपर्यंत बाकीचा ब्रेकफास्ट खायचा). पहिल्या दिवशी माहित नव्हते. मला वाटले उकडलेलेच असेल. घेतले आणि आपटले टेबलवर Lol

तसेच युरोपात (आणि अमेरिकेत सुद्धा) हॉटेलात गेल्या गेल्या टेबलावर पाणी आणून देत नाहीत हा खूप मोठ्ठा कल्चरल शॉक असतो Biggrin

>> रस्त्याच्या कडेला माणूस दिसला, कार थांबलीच म्हणून समजा, त्याला क्रॉस करू देईल आणि मगच जाईल.
हो. पण झेब्रा क्रोसिंग असेल तर. शिवाय अगदी अदबीने जायला सांगतात आपल्याला. इतक्या रिस्पेक्टची सवय नसते. डोळ्यातून पाणी येतं अगदी Biggrin आपल्याकडे कसे खच्चून ब्रेक दाबून ड्रायवर रागाने बघतो आणि चेहऱ्यावर `हाड` असे भाव आणून मानेला झटका देत आपल्याला जायला सांगतो.

अमेरिकेत फुटपाथवर एटीएम मशिन बघून पहिल्या वेळी शॉक बसला होता. आता मुंबईत काही ठिकाणी बँकेच्या बाहेर अशी एटीएम मशिन्स बघितली आहेत.

बालीला एका मंदिरात जायला लागलो तर अगदी मंदिराच्या परिसरातच (मंदिराच्या प्रवेशव्दाराला खेटुनच) बिअर टेस्टींगला होती. मंदिर परिसरात जवळजवळ सगळी दुकाने नॉनव्हेज खाद्यपदार्थांची होती.

हो. पण झेब्रा क्रोसिंग असेल तर. >> नाही. मी सुरूवातीला सवयीने झेब्रा क्रॉसिंग नसेल तिथेही फूटपाथवरून रस्ता ओलांडण्यासाठी पाय टाकला होता तर दोन तीन कार्स करकच्चून ब्रेक्स मारून थांबल्या. नंतर मग मलाच लाज वाटू लागली आणि झेक्रॉ वरून रस्ता ओलांडला. तरी पण आमच्या हॉटेलपासून झेक्रॉ जवळ नसल्याने तिथे रस्ता ओलांडताना व्हीआयपी असल्याचा अनुभव यायचा. हे विचित्रच वाटलं. पुण्यात पादचारी झेक्रॉ वरून जरी रस्ता ओलांडत असेल तर त्याला वळसा घालून जोरात पुढे जातात.

कॅनडात नवीन असताना पार्लमेंट पहिल्यांदा बघितलं तेव्हा कुठलीही डोळ्याला दिसेल अशी सुरक्षा व्यवस्था नसलेली बघून फार आश्चर्य वाटलेलं. कुठे स्कॅन नाही, वेळ काळ नाही की दोऱ्या बॅरिकेड घालून लॉन बंद केलेलं नाही. दिवसा रात्री कधीही जा.
हेच आश्चर्य पार्लमेंटच्या मागच्या रस्त्याला असलेली अमेरिकन एम्बसी आणि त्या भोवती असलेल्या उंच भिंती, समोर भले मोठे लोखंडी गोल जेणेकरून कोणी वाहन इमारतीवर आणणार नाही इ. बघून वेगळ्या अर्थी वाटलेलं.

तसं नवल इथे अमेरिकेत आल्यावर रस्त्यात अनोळखी लोक समोर आल्यावर मारक्य म्हशी / बैलासारखे न पाहता हसून हाय हेलो करतात हे बघून वाटले होते! Happy

अमेरिकेत येऊन २-३ महिने झाले होते. एकदा काही तरी कारणासाठी फेडेक्स नी काही कागदपत्रे द्यायची होती आणि त्यांची पिकअप ची वेळ चुकवायची नव्हती म्हणून ऑफीसच्या स्वागत कक्षात आलो. पण जी रिसेप्शनीस्ट हे काम करायची, ती दिसली नाही म्हणून रेंगाळलो. तिथे माझ्या माहितीतला एक जण कुणाची तरी वाट पहात होता. त्याच्याकडे पाहून ओळखीचे हसलो. फेडेक्स वाला अजून आला नव्हता . पण युपीएस वाला आधी आला. त्याने काही पॅकेजेस दिली त्यावर माझ्या माहितीतल्या सहकार्‍याने ती स्वीकारण्याचे सोपस्कार केले. ती बाजूला ठेवली. परदेशात हजारो ऑफीसात दररोज घडणारा प्रसंग.

अचानक माझा सहकारी आणि तो यूपीएस वाला यांनी घट्ट मिठी मारली आणि ते दोघेही डोळे मिटून कचकचून फ्रेंचकीसमधे रममाण झाले.

या अगोदर इतक्या जवळून मी चुंबन पाहिले ते स्त्री पुरुषांचे. ते ही फक्त सिनेमातले. प्रत्यक्षात विमानतळावर स्त्री पुरुष प्रेमी युगुलांनी पटकन घेतलेली चुंबने नजरेला पडली होती. पण ती बर्‍याच लांबून.
आणि आता इथे दोन पुरूषांमधला प्रणय रंगात आला होता आणि त्यातल्या एकाला मी ओळखत होतो. फेडेक्स ने त्याच दिवशी कागदपत्रे पाठवणे गरजेचे असल्यामुळे, फेडेक्सवाला येईपर्यंत मला तिथून जाणेही शक्य नव्हते.
इतकंच नाही थोड्याच वेळात माझ्या सहकार्‍याने त्या युपीएस वाल्याशी माझा बॉयफ्रेंड (तो त्याचा बॉयफ्रेंड ! ) अशी ओळखही करून दिली.
त्या दिवशी बसलेला शॉक मला अजूनही आठवतो.
There are some things, which once you see, can't be unseen !

मला पुण्यात पोह्यांवर सांबार ओतून/बाजूला देतात हे बघून जाम कल्चरल शॉक बसला होता. >>>>
अगदी अगदी.
वडा-सांबार मागितलं होतं तर एके ठिकाणी दोन छोटे बटाटेवडे आणि सोबत सांबर आलेले बघून मी फक्त रडायचे बाकी होते .
त्यानंतर नेहमी मेदूवडा असं आवर्जून सांगायचे.

कोल्हापुरात अनेक वर्षे राहायची सवय झाल्यानंतर पुण्यात प्रथम आलो होतो तेंव्हा इथला बटाटावडा घशाखाली उतरत नव्हता. हा बटाटेवडा म्हणता? हा? म्हणजे बटाट्याच्या भाजीच्या छोटुश्या गोळ्याभोवती इच्छा नसताना पात्तळ मिठी मारून बसलेले पीठ. आणि ते तळायचे. कन्सेप्ट झेपलीच नव्हती. "अरे बटाटावडा असावा तर कोल्हापूरतल्या सारखा. गरगरीत, मोठ्ठा, भरगच्च. तळलेले खरपूस जाडजूड पीठ कसे भाजीत गच्च रंगून गेलेले" वगैरे वगैरे विचार मनात यायचे. पण आताशा इतक्या वर्षांनी पुण्यातला बटाटावडा पण आवडू लागलाय. टेस्ट डेवलप झाली Happy

11 वीत असताना पहिल्यांदा पुण्याला आले असताना एका मुलीला बिनधास्त सिगारेट ओढताना बघितले. तो माझ्यासाठी कल्चरल शॉक होता

मला एका मैत्रीणीनं (जात सांगत नाही पण कळेलच आपोआप) कॉलेजनंतर आवर्जून स्वतःच्या घरी (ते ही आधी ४ दिवस ठरवून ) दुपारी नेलं. मी तिच्या घरी साधारण ११-११.३० ते दुपारी ३.३०-४.०० पर्यंत होते. आणि तिनं (तिची आईदेखिल घरात होती आणि माझ्याशी मिठ्ठास बोलत बसलेली) मला " काय घेणार चिवडा की लाडू?" असा प्रश्न विचारला तेव्हा मला एक मोठ्ठा कल्चरल शॉक बसला होता.

दुपारी जेवणाच्या वेळी मुद्दाम घरी बोलावलेल्या पाहुण्यांना जेवण न देता चिवडा-लाडू देणे आणि त्याहून कहर म्हणजे चिवडा की लाडू असा ऑप्शन देणे कल्पनेपलिकडचे होते.

त्या आधी आणि नंतरही ही मुलगी आमच्या घरी येऊन दरवेळी व्यवस्थित जेऊन गेली. माझ्या आईनं तिला कधीच न जेवता पाठवलं नाही.

Thailand la Emerald Buddha chya gabharyat ani Bali madhe kontyahi devlat non-thai/non-balinese lokanna pravesh nahiye.

Tanah lot la je holy spring aahe tyacha pani dakshina deun pyayla detat Balinese badve- ekdam vithoba aathavla mala tithe Happy Holy spring chya samor jo snake stone /rock /mountain ahe, tithalya guhet ek garudi (nagpanchmi special) nagala gheun cigarettes funkat basala hota. Paise gheun to tya nagala hat lavu det hota.
Thailand madhe airport hun Hotel la jatana Rama navacha highway baghun ekdam ye kahan aa Gaye hum asa jhala mala. Bharatat kadhich kuthech mi Rama chya navachya road varun geleli nahiye.
Tithe mhane shalet ramayan- mahabharat abhyaskramacha bhag mhanun shikavtat. Tyanchi swatachi ayodhya aahech. Raja la Ram mhantat 7va /8va / 9va etc. ( French lok kase louie mhantat tasach)
Bali madhe sanskrut bhasha shalet abhyaskramacha bhag aahe, prathamik shikshan!

हंगेरीत माझी ओळख बायकोने हा माझा नवरा किंवा मी तिची ओळख ही माझी बायको अशी करून दिली की लोकं विचारायचे मग बाळ कुठे आहे. अजून मूल नाही असे म्हटल्यावर गंमतशीर चेहरा करायचे. अगदी म्हातारी माणसे सुद्धा. सुरुवातील एक दोनदा समजले नाही. मग एकाशी बोलताना आणि एकदोनदा चर्चच्या बाहेर लग्नाचे फोटोशूट चाललेले पाहिल्यावर उमगले की तिथे बहुतेकदा बाईला दिवस रहिले की मग लग्न करतात. आधी कशाला उगाच करायचे असा साधा सरळ विचार.
लग्नात नवरी किमान पाच -सहा महिन्याची प्रेग्नंट असली पाहिजे असा दंडक असावा तिथे. एकदा तर फोटो काढत होते ती बाई बहुतेक उठून संध्याकाळी थेट ड्लिवरीला हॉस्पिटलला जाईल अशी परिस्थिती दिसत होती.

वडा-सांबार मागितलं होतं तर एके ठिकाणी दोन छोटे बटाटेवडे आणि सोबत सांबर आलेले बघून मी फक्त रडायचे बाकी होते .
त्यानंतर नेहमी मेदूवडा असं आवर्जून सांगायचे. +११११

यावरून माझ्या नवर्याने सांगितलेला एक किस्सा आठवला. त्याचा एक फ्रेंच मित्र आहे. नवरा तेव्हा जिथे काम करत होता तिथे तो वर्षभरासाठी आलेला होता. काहीतरी एक्स्चेंज प्रोग्राम असावा. त्यांची मैत्री झाल्यावर त्याला नवर्याने एकदा घरी जेवायला बोलावलं. नंतर तो गप्पा मारत बसला. त्याच्या म्हणे बहिणीचं लग्न ठरलेलं होतं आणि त्याची तयारी घरी चालू होती. तो म्हणाला की लग्नाची तारीख एकदा बदलली, त्यामुळे तिच्या कपड्यांच्या मापांचा खूप गोंधळ उडाला . ह्यांनी विचारलं की का बरं? तर म्हणाला ती प्रेग्नंट आहे ना! इथे सासूबाईंच्या आणि ( आजीला मराठी भाषांतर करून सांगितल्यामुळे तिच्या) भुवया ज्या काही वर गेल्या म्हणता! Lol

अनू, अतुल पाटील व मामी...!! Biggrin
तुमचे कल्चरल शॉक्स भारी आहेत.
मामी...तिने आधी सांगितले नाही का......की जेवायला नाही फक्त चिवडा 'ऑर' लाडू खायला बोलाविले आहे ते?
लोक पण असे वागतात !!!!!! म्हणजे....एस्पेशिअली तिची आई..... आपल्या मुली सारखीच तिची मैत्रिण.....दोघींनाही भूक लागली असणार असं समजायला फार काय मोठं असं आईचं हृदय वगैरे लागत नाही....

पुण्यात पाणीपुरीमध्ये रगडा टाकला जातो हे पण धक्कादायक सत्य होतं ! पाणीपुरी आणि वरण एकत्र ही संकल्पना पचायला मला बरेच महिने लागलेत Lol

मामी रुढ महती नुसार तुला 'त्या' घरात तसा प्रश्न विचारल्यावर शॉक बसला हाच एक मोठा कल्चरल शॉक आहे. Wink

टवणे सर हा तर तुम्ही त्यांना दिलेला शॉक आहे Proud

ही बरेच वर्षांपुर्वीची गोष्ट आहे पण असाच शॉक माझ्या एका अमराठी सहकार्‍याच्या बायकोला त्यांची घरंदाज घरमालकीण (गणपती उत्सवाच्या वेळच्या) 'नाटकात' काम करते असे कळल्यावर बसला होता. मग महाराष्ट्राचे नाटकवेड ह्या विषयावर शाळा घ्यावी लागली होती.

अमेरिकेच्या रस्त्यात (माहवाह - न्यु जर्सी स्टेट ) फिरत असतांना,जितक्या वेळा अमेरिकन पुरुष वा स्त्री भेटली असेल्,त्याने किंवा तीने फक्त हाय् केले वा नुसतेच स्मित हास्य केले.मात्र चुकनही एखादा शब्द निघाला नाही. भारतात तर बसमध्ये/रेल्वेत वा अन्य ठिकाणी,कितीही अनोळखी व्यक्ती असली तरी आम्ही सहज गप्पा सुरु करतो.

मुंबईला कॉलेजात आल्यावर बसलेला पहिला शॉक म्हणजे कॉलेजच्या मुली टाईट टीशर्ट आणि टाईट पॅण्ट्स घालून दिसणे. गावाकडे सगळी झाकपाक ओढणी ढगळ पेहराव आणि इथे हे असं सगळं छान छान. नाही म्हटलं तरी तरण्या वयातल्या तारुण्यसुलभ भावनांना शॉकच होते ते....

एका मित्राकडून ऐकले आहे अलीकडेच. तिकडे पोर्ट ब्लेअरला म्हणे रस्त्यावर कार पार्क करताना लॉक करत नाहीत. गाडी गिअरमध्ये टाकून दरवाजे लॉक न करता फक्त किल्ली काढून घेऊन जायची. चोरी वगैरे होत नाही. रस्ते अरुंद आहेत. कुणाला अडचण आलीच तर कार ढकलून बाजूला करता यावी असा उद्देश. चुकून जर तुम्ही लॉक करून गेलात तर खूप संतापतात लोक.

मामी रुढ महती नुसार तुला 'त्या' घरात तसा प्रश्न विचारल्यावर शॉक बसला हाच एक मोठा कल्चरल शॉक आहे. >> Lol

मामी...तिने आधी सआंगितले नाही का......की जेवायला नाही फक्त चिवडा 'ऑर' लाडू खायला बोलाविले आहे ते? >>>टु बी फेअर, ती जेवायला ये असं काही बोलली नव्हती. पण सकाळी ६ ची ट्रेन पकडून डोंबिवलीहून माटुंग्याला कॉलेजात येणार्‍या व्यक्तीला "कॉलेजातून आपण माझ्या घरी (दादरला ) जाऊ" अशा प्रकारे बोलवल्यावर जेवायला देण्याचा मानस नसेल हे मला लक्षात आलं नाही हा माबुदोस. मी मग तो धक्का पचवून चिवड्यानं त्यातल्या त्यात पोट जास्त भरेल असा विचार करून चिवडा दे सांगितलं होतं. Lol तो एकदाच वाटीभर मिळाला. गप्पा मारत बसण्याचा जोरदार आग्रह होता म्हणून बसले होते. घरातली मंडळी माझ्या समोर जेवली नाहीत हे तुका म्हणे त्यातल्या त्यात. कारण माझ्या बहिणीच्या एका मैत्रीणीनं सेम सिच्युएशनमधे ते ही करून दाखवलंय.

मामी Lol
सगळे किस्से भारी आहेत एकदम. Lol

Pages