Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीमा: असं असेल मग. तिच्या
सीमा: असं असेल मग. तिच्या क्लासमध्ये कोणी ना कोणी नट ऍलर्जीवाल असतंच.
अमितव: सोन्याच्या राज्याबद्दल काय बोलावे
एकूणच फूड ऍलर्जी/ फूड प्रेफरेन्स (veg/ vegan/ kosher etc) याबद्दल लोक खूपच जागरूक आणि मान ठेवतात, असा माझा तरी अनुभव आहे. हा माझ्यासाठी फार सुखद cultural शॉक होता.
आपल्याकडे दहावी झालं की बारावी. बारावी नंतर लगेच कॉलेज आणि मग पीजी किंवा नोकरी. मुलीच्या नोकरीला ४-५ वर्षं झाले की लग्न, ५ वर्षांच्या आत मुलं. हे इतकं काटेकोरपणे पाळतात आणि न पाळणाऱ्यांना प्रश्न विचारून हैराण करतात. जॉब मध्ये पण २-४ महिन्याचा गॅप असला की लगेच HR ला सॅलरी negotiate करायला कारण मिळतं. इथे मी तीनदा जॉब change केला. कोणीच विचारलं नाही माझ्या जवळजवळ १ वर्षाच्या गॅपला. ना कोणी माझे सर्टिफिकेट्स/ मार्कशीट्स मागितले. हे माझ्यासाठी फार मोठे शॉक होते. ऑफिस कल्चर मध्ये तर जमीन अस्मानचा फरक पडतो.
अमेरिकेत नवीन एम्प्लॉयर
अमेरिकेत नवीन एम्प्लॉयर तुम्हाला तुमची सध्याची सॅलरी विचारू शकत नाही... स्टेट लॉ असतात... हे फार महत्वाचे आहे जॉब चेंज करताना...
अमेरिकेत नवीन एम्प्लॉयर
अमेरिकेत नवीन एम्प्लॉयर तुम्हाला तुमची सध्याची सॅलरी विचारू शकत नाही >> सगळीकडे नाहीये. काही ठिकाणी तुमची सॅलरी हिस्ट्री मागून घेतात
हीरा विचार करायला प्रवृत्त
हीरा विचार करायला प्रवृत्त करणारी पोस्ट. आपण (स्त्रिया) बर्याच पुढे आलेलो आहोत मग त्या मानाने. तेव्हाची परिस्थिती पाहून वाईट वाटते.
'पण लक्षात कोण घेतो ' आणि इतर
'पण लक्षात कोण घेतो ' आणि इतर काही पुस्तकांतून तत्कालीन विधवा स्त्रियांच्या परिस्थितीची ओळख शाळकरी वयापासून होती. परंतु ममो, हीरा यांनी तर नात्यातील अनुभव कथन केले आहेत.ते सारे भीषण आहेतच.नंतरच्या काळात मुंडन नसेल तरी विधवा स्त्रीला कमी दर्जाची वागणूक मिळते,नकळत तीही स्वतःला कमी लेखत जाते.अर्थात सर्वजणी नाहीत.
सकाळी अशा भावजयीचा चेहरा दृष्टीस पडू नये म्हणून दोन घरांच्या मध्ये पडदा उभारणारा मैत्रिणीचा काका ऐकून माहीत आहे.
लग्नाचा बस्ता,शुभ हस्ते उलगडा म्हणून माझ्या आईला खास बोलावून नेले होते.3-४ वर्षांनी पपा गेल्यानंतर तेच शुभ हात,अशुभ झाले.नंतर बोलावणारीच्या घरात दुसरे लग्न होते,तेव्हा बोलावले गेले नाही.आईला फारसा फरक पडला नाही.वय वर्षे 78 होते तिचे त्यावेळी.
इथे ओट्यावर पोळ्या लाटण्या
इथे ओट्यावर पोळ्या लाटण्या बद्दल:
आमच्या मावशी बॉर्डर वरच्या आहेत.त्या ओटा स्वच्छ धुवून ओट्यावर थेट पोळी भाकरी करायच्या.मी अर्थात ऑफिस ला गेलेली असल्याने मला हे माहितीच नव्हतं.मग एकदा प्रत्यक्ष पाहिलं तर धक्का बसला.मग त्यांना नीट समजावून सांगितलं की ओट्यावर रात्री मुंग्या झुरळांसाठी हिट मारलेलं असतं, ओटा धुवुनही जाईल असं नाही.
आता समोर तरी पोळपाट वापरतात, मी नसेन तेव्हा माहीत नाही
veg/ vegan/ kosher etc) >>>>
veg/ vegan/ kosher etc) >>>>> पहिले दोन प्रकार माहीत होते तिसरा कल्चरल शॉक ....
Kosher काय प्रकार आहे?
Kosher काय प्रकार आहे?>> ज्यु
Kosher काय प्रकार आहे?>> ज्यु धर्माच्या अनुसार काही अन्न खायचे नियम आहेत त्या अनुसार बनवलेले पदार्थ किंवा अन्न पदार्थ जे ज्यु बंधू भगिनी घरी नेउ न बनवू शकतात. हलाल सारखेचे ही एक नियमावली आहे. ज्यु लोकांचे सोवळ्यातले अन्न म्हणा. काही काँबिनेशन बँन्ड आहेत. काही शुभ समजतात. ह्या सणाला हे अन्न असे असते.
गुगलनुसार आलू बुखार म्हणजेच
गुगलनुसार आलू बुखार म्हणजेच प्लम
उत्तर भारतात डाळ तडका मागितला
उत्तर भारतात डाळ तडका मागितला की चणा डाळीचे वरण तडका मारून देतात, हा एक मोठाच कल्चरल शॉक होता, डाळ तडका हवा तुरीच्या डाळीचा(च) सरतेशेवटी आम्ही लोक धाब्यावर गेलो की अरहर की डाळ मे तडका मार के दो सांगत असू
तसेच,
दिल्लीत खूप नाव ऐकून पराठेवाली गली चांदणी चौकात गेलो. कल्चरल शॉक हा की नुसती सारणांची जंत्री होती, एकाही पराठ्यात सारण जाणवले नाही, पापड पराठा, आलू पराठा वगैरे नुसती नावे, थबथब तेलात/ तुपात कुरकुरीत तळलेले तळव्या इतके पराठे ३ टाईपच्या भाजीसोबत, गाजराच्या लोणच्यासोबत वाढतात तिच्यायला, नुसता मैदा लागतो तोंडात तळलेला. बाकी त्या अडचणीच्या दुकानात फक्त नेहरू, शास्त्री, इंदिरा, अन न जाणे कोण कोण पराठे खातानाचे फोटोज बघून घ्यावेत एक से एक, चव बेकार, हा लैच मोठा कल्चरल शॉक.
ओहह हे असे पराठे हल्ली झाले
ओहह हे असे पराठे हल्ली झाले आहेत का, आम्ही वीस बावीस वर्षांपूर्वी गेलेलो तेव्हा छान होते पराठे. आलू पराठा आणि अजून मिक्स सर्व घेतलेला, दोन्ही मस्त होते, भरपूर सारण घातलेले. टेस्टी होते, आवडले होते आम्हा दोघांना.
@ किराणा दुकानात कांदे बटाटे
@ किराणा दुकानात कांदे बटाटे - कदाचित त्या विशिष्ट दुकानात नसतील मिळत.
लहानपणी आमच्या बिल्डिंग मध्ये
लहानपणी आमच्या बिल्डिंग मध्ये एक गुजराती कुटुंब राहायचे. अर्थातच कट्टर शाकाहारी.
एकदा भोंडल्याला कोणीतरी वेगवेगळ्या आकारांची बिस्किटे आणली. घंटा, बदक, बाहुली, मासा, किल्ली, फुलपाखरू वगैरे. त्या मुलींनी निवडून निवडून बदक, मासा अश्या आकारांची बिस्किटं काढून टाकली.
त्यांचं शाकाहारी असणं आम्हाला ओक्के होतं पण सजीवांच्या आकाराची बिस्किटे पण न खाणं हा आमच्यासाठी मोठ्ठाच कल्चरल शॉक होता.
करेना काळात ओळखीतल्या अट्टल
करेना काळात ओळखीतल्या अट्टल शाकाहारी मंडळींनी चिकन-मटन रश्श्यावर ताव मारायला सुरुवात केलेली पाहुन फार मोठा धक्का बसला होता.
जेम्स वांड >>>>> अगदी अगदी
जेम्स वांड >>>>> अगदी अगदी
जुलै ते सप्टेंबर 2021 दरम्यान गाझियाबादच्या नोकरीनिमित्ताने दिल्लीत राहणे झाले, सर्वांचे ऐकून एकदा चाँदनी चौकातील पराठा गल्लीत जाणे झाले, आणि सगळ्याच दुकांनात पराठे तळतांना बघून धक्काच पोहोचला. उत्तर भारतीय लोक पराठे उत्तम बनवतात असा समज पराठा गल्लीत गेल्यावर गळून पडला, तळलेले पराठे, नावापुरते सारण आणि सोबतीला अनावश्यक कसल्या कसल्या भाज्या आणि चटण्या होत्या. कुठून अवदसा आठवली आणि इकडे आलो असे झाले होते. त्यापेक्षा उत्तम पराठे सीबीडी-बेलापुर स्टेशन समोर असलेल्या बिमल पराठा सेंटर ला भेटायची. अत्यंत लुसलुशीत आवरण व भरभक्कम सारण असायचे. मुंबईला परत आल्यावर (कारण जवळपास मधले दीड वर्ष नागपूरला होतो) सतत लोकांचा गराडा असलेले सेंटर कायमचे बंद झाल्याचे समजलयावर आणखी धक्का पोहोचला. सध्या नवी मुंबईत राहत असल्याने कदाचित आता उघडले असेल ह्या भाबड्या आशेने मी अजूनही कधीतरी सीबीडी-बेलापुरला त्या रस्त्यावर जातो.
सिंगापोर मध्ये असताना माझा एक
सिंगापोर मध्ये असताना माझा एक मित्र जो कट्टर शाकाहारी होता आम्ही दोघे एक शाकाहारी हॉटेल बघून गेलो. पण आत पाहतोय तर तिथे मांसाहरी पदार्थ सुद्धा लिहिले होते. अगदी पदार्थाचे तोंपासू फोटो काढून दाखवलेले. माझ्या तोंडाला पाणी सुटले. मित्राला सुद्धा आश्चर्य वाटले इथे हे केंव्हापासून मिळू लागले? पण फार विचार न करता मी म्हणालो मी आज फिश किंवा चिकन मागवतो. त्याच्यासोबत असल्याने आम्ही नेहमी शुद्ध शाकाहारी हॉटेलात जायचो. त्यामुळे बऱ्याच दिवसात नॉनव्हेज खाल्ले नव्हते. म्हणून म्हटले आज योगायोगाने संधी आलीच आहे तर ताव मारून घेऊ. मग काय मागवले कि चिकन मटन वगैरे. आणि वाट बघत बसलो.
थोड्या वेळाने डिश आली. "चिकन" खायला गेलो तर भाजी सारखे. मटन सुद्धा तसेच. चक्क वांगे का काय होते आत. वर दिसायला मात्र नॉनव्हेज. मग "अधिक चौकशी" केल्यावर कळले ते मॉक नॉनव्हेज होते
म्हणजे भाजीपाल्या पासून बनवलेले पण दिसायला मात्र नॉन-व्हेज जेवणासारखे. पण आता काय पर्याय नव्हता. आहे ते अन्न मॉक मॉक करत खाऊन टाकले.
आपल्या इकडे पण काही हॉटेलात मिळते असे ऐकले. पण कधीच नव्हते अनुभवले. असा हा मॉक कल्चरल झटका.
सुंदर अनुभव अतुलजी.
सुंदर अनुभव अतुलजी.
शाकाहारी मांसाहार बघून मला पण
शाकाहारी मांसाहार बघून मला पण असाच धक्का बसला होता.
आई ग्ग, म्हणजे ते सुरणाला मटण
आई ग्ग, म्हणजे ते सुरणाला मटण समजून खाल्यासारखे
भारी अनुभव अतुल!
भारी अनुभव अतुल!
किंवा फणस बिर्याणी ला मटण
किंवा फणस बिर्याणी ला मटण बिर्याणी समजून खाल्ल्यासारखे

असंच पी-प्रोटिन, सोया प्रोटिन
असंच पी-प्रोटिन, सोया प्रोटिन यांना एकत्र करुन बर्गर पॅटी करायची. त्याला बीफ सारखं टेक्स्चर, चव, वास द्यायचा प्रयत्न करायचा प्रकार बियाँड आणि इमपॉसिबल आहे.
हॅम, बीफ नाही खायचं तर नका ना खाऊ. हे असलं काहीतरी धेडगुजरी प्रकार करुन खाणं, म्हणजे आपल्याकडची उपवासाची मिसळ, उपवासाची भेळ, चायनिज भेळ लायकीचं काही तरी दिव्य पानात पडतं.
बियॉंड बर्गर एक्झॅक्टली बीफ
बियॉंड बर्गर एक्झॅक्टली बीफ सारखा लागतो. आय हॅव नो कम्प्लेंट्स.
पनीर ला चिकन समजून खाण्यापेक्षा हे बरं.
इथले काही शॉक वाचून मला शॉक
इथले काही शॉक वाचून मला शॉक बसत आहेत.
बियाँडइ बर्गर चांगले आहे. काहीही वाईट नाही. मुलांचे व्हेजीटेरिअन/व्हेगन व्हायचे अचानक ठरते. तेव्हा कळेल. 
सॅलरी हिस्टरी विचारता येते. फेडरल लॉ नुसार. काही स्टेट्स मध्ये बॅन आहे. तिथे नाही विचारता येत. टेक्सास मध्ये सॅलरी हिस्टरी विचारता येते.
वाईट काही नाही. चव बरी आहे,
वाईट काही नाही. चव बरी आहे, बीफच्या जवळपासही जातं. पण.... असो!
बियॉंड बर्गर एक्झॅक्टली बीफ
बियॉंड बर्गर एक्झॅक्टली बीफ सारखा लागतो. आय हॅव नो कम्प्लेंट्स. >> +१ अगदी वासासकट.
अगदी कल्चरल शॉक म्हणाता येणार
अगदी कल्चरल शॉक म्हणाता येणार नाही पण माझ्या आधीच्या ऑर्गायझेशनमध्ये सर , Ma'am वगैरेची सवय होती. आताच्या टिपिकल मारवाडी कंपनीत प्रत्येक नावापुढे जी जी र जी लावताना बघून जरा अवघल्यासारखं झालेलं.
मॉक नॉनव्हेज
मॉक नॉनव्हेज
GoodDot च्या जाहिराती
GoodDot च्या जाहिराती बघितल्या का? त्यात असले पदार्थ आहेत विकायला.
आताच्या टिपिकल मारवाडी कंपनीत
आताच्या टिपिकल मारवाडी कंपनीत प्रत्येक नावापुढे जी जी र जी लावताना बघून जरा अवघल्यासारखं झालेलं. Biggrin>>
जाई मी वरती लिहिलय त्या 'जी' प्रकरणाविषयी. वैताग आहे ते खरच. I feel your pain.
Pages