तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भांडखोर, असाच शॉक मुम्बईत टॅक्सी आणी टेम्पो च्या अअ‍ॅक्सीडेंट मधे लागलेला. दोघं ही मस्त भांडले वैगरे पण ईन्श्यूरन्स्/नंबर एक्स्चेंज काहीही झालं नाही. शॉकींग वाटलेला.

त्याचं नाव मि्यांग चांग आहे का. मॉडर्न लव्ह मुंबई च्या तिसऱ्या गोष्टीत आहे तो जर तो तोच असेल तर. त्यातही गायकच दाखवलाय. खऱ्या आयुष्यात तो दातांचा डॉ आहे आणि त्यातही दातांचा डॉ असतो पण गाणं हे त्याचं पॅशन असतं. त्याची गुज्जू गर्लफ्रेंड त्याला सपोर्ट करते. नसिरउद्दीन पंजाबी दाखवलाय, त्याला चायनीज भाषा चांगली येते पण या मुलाला चायनीज समजत नाही कारण तो इथेच लहानचा मोठा झालेला असतो. चायनीज आई शेवटी त्याच्या नात्याला मान्यता देते.

घरातल कुणीही गेल तरी सगल्या बायका कुन्कु टिकली लावत नाहित >>> हो अशी प्रथा आहे काहि जातित, त्या १० दिवसात केसही विचरायचे नाही, पुरषानी डोक झाकायच नाहि.
१०-१२ व्याची पत्रिका छापतात त्यात "गन्धमुक्ति"आणी तारिख दिलेली असते, मोस्टली १०व्याची तारिख असते ती.
उत्तरेकडचे एक ओळखतिले आहेत त्याच्याकडे बाळाच बारस नसत तर ४ किव्या ६व्या महिन्यात 'काजल' सेरेमनी असते, ती फक्त आत्यानेच करायचि असते तेव्हाच ठेवलेले नाव सगल्याना सान्गायच.
उत्तरेकडच्या लग्नात घोड्यावर बसायच मुहुर्त म्हणजे वरात निघण्याचा मुहुर्त आणी वरमाला मुह्रर्त मेन असतात बाकी विधी रात्री कधितरी बाकी वर्हाडी झोपेत असताना होतात, त्या घोड्यावर बस्ण्याला "घुडचढ्ढी" म्हणतात, आमचयाकडे कडे एक पत्रिका आली तर कुणितरी ते "घुडचड्डी " वाचल मग काय पिजेचे रतिब पडले नुसते!!
मल्याळी लोक दिवाळी करत नाही हे ए़कून मला शॉक बसला होता.

जेत्या राजा महाराजानी वंशावळी सांभाळल्या आहेत

समजा तसेच , नरकासुर , हिरण्यकश्यपू यांचे वंशज असतील , तर ते लोक , ते सण साजरे करतील का ?

यावरून आठवलं.. श्रीलंकेचे लोक रामायण वगैरे काही झालं होतं किंवा त्यांच्या भूमीवर झालं होतं हेच नाकारतात असं तिथे जाऊन आलेले पर्यटक सांगतात. तर तसं काही आहे का? जेते नसल्यामुळे किंवा आपण रावणाचे / राक्षसांचे वंशज आहोत हे नाकारण्याच्या इच्छेतून ते रामायण आणि श्रीलंका म्हणजेच रावणाची लंका हे नाकारत असावेत का?

इथे कोणी श्रीलंकेत राहणारे मायबोलीकर आहेत का? तुमचा काय अनुभव?

भारतातल्या लोकांनी रामायण काव्य आहे, ते काही झालं वगैरे न्हवतं सांगितलं की त्यांना आता पाकिस्तान ऐवजी धाडायला दुसरा देश मिळाला म्हणजे! Wink

रावण वाईट होता म्हणजे सगळे राक्षसकूल नाकारायचे असे थोडेच असते,

जरासंध , शिशुपाल सगळे असुरकुळीं होते व श्रीकृष्णाचे नातेवाईक होते

रावण देखील आईकडून असूर व बापाकडून ब्राह्मण होता

जेते नसल्यामुळे किंवा आपण रावणाचे / राक्षसांचे वंशज आहोत हे नाकारण्याच्या इच्छेतून ते रामायण आणि श्रीलंका म्हणजेच रावणाची लंका हे नाकारत असावेत का?
>>>>

१० तोंडे असलेला रावण, महिने महिने झोपणारा कुंभकर्ण, हरणाच्या रुपात येणारा मायावी मारीच असे कॅरेक्टर रंगवून त्यांना सांगाल तर कोण विश्वास ठेवणार त्यावर.. मी श्रीलंकन असतो तर मी सुद्धा हसून नाकारले असते.

मला वाटायचं लग्न फक्त वेगवेगळ्या आडनावाच्या लोकांमध्ये होतात. पण जेव्हा पत्रिकेत पाटील-पाटील, म्हात्रे-म्हात्रे अशी लग्न लागलेली पाहिली तेव्हा जरा शॉक बसला होता.

पाटील पदवी आहे म्हणून असू शकतं असं. बाकी एक आडनाव फार पूर्वी शॉक बसलेला.

अस्मिताचे अनुभव एकेक वाचून शॉक फक्त मावसनणंद प्रकरणात बसला, अजून काही दिवसांनी हे ही shocking राहणार नाही. बाकी मी लहान असतानाच आमच्याकडे एक चीनी वहिनी आलेली आहे, त्यामुळे ते परदेशीय नवीन नाही मला. आता त्या दादा वहीनीचा जावईही डेन्मार्कचा आहे.

ते लोक भारतीयांसमोर नाकारतात. प्रत्यक्षात त्यांची समजूत वेगळी आहे. युट्यूब वर रावणावर एक सिंहली भाषेत सिरीज आहे ती पाहा. त्यात ते राक्षसांना यख्ख म्हणतात. ते लोक तिथले आदिम रहिवासी. भारतातून आलेल्या लोकांनी तिकडे येऊन रहिवाश्यांना त्रास दिला. रावण मुळात सीतेला पळवून आणणारा नव्हताच. त्याने तिला चांगलेच वागवले. उलट राम आणि सेनेने तिकडे जाऊन नासधूस केली आणि लोकांना मारले. अशी कथा तिकडे दाखवली आहे.

आता भारतीय लोकांशी उगाच वाद नको म्हणून ते उघड काही बोलत नाहीत. माझ्या काही श्रीलंकन मित्रांनी सुरुवातीला ओळख झाली होती तेव्हा ते रामायण वगैरे काही आम्हाला माहीत नाही म्हणून सांगितलं होतं. पण नंतर गप्पांतून कळलं की त्यांना बरच काय काय माहिती आहे. आपल्या रामायणात लिहिलं आहे तेच खरं कशावरून असा प्रश्न ते विचारत होते (तोच प्रश्न त्यांना विचारल्यावर काही समाधानकारक उत्तर नव्हतं).

अमेरिकेत आल्यावर पहिला शॉक बसलेला तो म्हणजे सगळे लोक सकाळी आंघोळ करून कामावर येतीलच याची काही गॅरंटी नसते.

श्रीलंका आणि रामायण ही नवीन माहिती मिळाली. वाचायला पाहिजे या विषयावर. एकाचा देव दुसऱ्याचा दानव असू शकतो हेच खरं.

भारतात सुद्धा स्वतःला रावण आणि महिषासुराचे वंशज मानणार्‍या जमाती आहेत. दसर्‍या आधीचे दहा दिवस ते सुतक पाळतात.
महिषासुराचे वंशज.

रावणासाठी सुतक

---लोक सकाळी आंघोळ करून कामावर येतीलच याची काही गॅरंटी नसते. ---
मग कुठ जातात सकाळी अंघोळ करून? चर्च मध्ये कीर्तन ऐकायला?

भांडखोर Lol
त्यांची 'च' ची जागा चुकली.

स्मशान भूमी जवळ ऑफिस होत.तेव्हा ((मुंबई मध्ये)बघण्यात आले.कोणत्या समाजाची अंत यात्रा होती माहीत नाही.
पण खांदेकरी,आणि बाकी लोक पण दारू पिवून टाइट होती.स्मशान चे प्रवेश द्वर सोडून दुसऱ्याच दिशेला चालले होते.त्या मध्ये काही थोडे शुद्धीत होते त्यांच्या लक्षात आले आणि वरात परत योग्य मार्गाला लागली
.

मी सुद्धा संध्याकाळी आंघोळ करतो हल्ली. काम करून झाल्यावर वा या उन्हाळ्याच्या दिवसात घाम अंगावर सुकल्यावर नंतरच खरे तर आंघोळीची गरज असते.

अमेरिकन हेल्थकेअरचा मोठा शॉक.
किती बिल होईल ते तुम्हाला कळणार नाही.
आणि कळलं तरी ते बरोबर असणार नाही.
She Was Told Surgery Would Cost About $1,300. Then the Bill Came: $229,000

इथे सुरुवातीला costco मध्ये भटकत होतो. पुढे एका बाईकडे कार्टवर car seat होता, सहज लक्ष गेलं, त्यात इतकुसं बाळ, अगदी 2- 3 दिवसाचं. माझ्या मागच्या बाईने awwww करत विचारलं तर कळलं तीन दिवसाच्या बाळाला घेऊन ती शॉपिंग करत होती. माझ्यासाठी धक्काच होता. नंतर कळलं हे खूप कॉमन आहे.

2 -3 दिवस नसेल हो...दहा पंधरा दिवस वगैरे असेल...
आणि दोन तीन दिवस बाळाला घेऊन शॉपिंग बिलकुल कॉमन नाहीय...

एकीकडे लहान मुलीच्या बारशाला, दारूही ठेवलेली ते बघून शॉक बसलेला. अर्थात जेवणाची व्यवस्था होती, तिथून थोडा लांब होता तो भाग.

तीन दिवसांची बाळंतीण जाते शॉपिंगला.. मला तर हे सुद्धा शॉकिंग वाटतेय Happy

आणि दारू तर पिण्याचे बहाणे हवे असतात लोकांना. दुखातही आणि आनंदातही. सगळीकडे चालते Happy

2 -3 दिवस नसेल हो...दहा पंधरा दिवस वगैरे असेल...>> त्या बाळाच्या आईने तरी 3 दिवसांचं म्हणुन सांगितलं. आणि नंतर असे बर्‍याच जणांना पाहिलं. कॉमन म्हणजे अगदी दररोज नाही, तरी बर्‍यापैकी दिसतात.

मी रुरकीला असताना 4 5 हरयाणा पंजाबी मित्रांच्या लग्नाला गेलेलो. दारू जेवण दुपार पासूनच चालू. मंगल कार्यालयाच्या दोन्ही बाजूस 300 300 मीटर लांब कार्स लावायची, डिकी उघडून खंबा व ग्लास काढायचे आणि सत्संग चालू, मग तो अगदी रात्री 1 2 वाजेपर्यंत. सगळा खुल्लम खुल्ला मामला.

आणि सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे वरमाला, तो कधीही रात्री 2 च्या आधी झाला नाही.

कार्यालय म्हणजे lawn प्रशस्त असते, 1 2 एकराचे, नवरा एका गेटमधून संध्याकाळी 7 च्या सुमारास बाहेर पडला की 300 फुटवरील दुसऱ्या गेटमधून पुन्हा आत 5 6 तासांनी म्हणजे माध्यरात्रीच येतो, तो पर्यंत सर्व जण talli, कधीकधी नवरा सुद्धा. अन पिस्तुल शूटिंग इज मस्ट. हे सगळे पाहून सॉलिड शॉक बसलेला. 1 2 लग्ने अटेंड केल्यावर बायको पुन्हा आलीच नाही माझ्याबरोबर.

हा पण haryanwi माणसांचे आदरातिथ्य, कल्पनेपलीकडे.

खूप पूर्वी, सुतकात दहा दिवस ओंवळ्याने राहायचे असे . देवाची पूजा होत नसे. चुलीकडे जात नसत. फार पूर्वी हे सपिंडी लोकांपर्यंत लागू होते. मग शंभर वर्षांपूर्वीपर्यंत सात पिढ्यांपर्यंत आले. त्या दिवसांत कुणाकडेच लग्नादि शुभ कार्ये होऊ शकत नसत. मग हळू हळू तीन पिढ्यांपर्यंतच सुतक राखण्यास सुरुवात झाली. हे सुतक तोडण्याचासुद्धा एक विधी असे. पंचगव्य प्यायचे, घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडून उदकशांती करायची वगैरे.
पण, कदाचित सोय म्हणून घराबाहेर किंवा स्वयंपाकघराबाहेर एका कोनाड्यात छोटी चूल मांडून काम निभावून नेले जाई. सगोत्री लोक कुणी असतील तर ते जेवण पुरवीत.
ह्या अशा प्रथा तोडण्यामध्ये शहरीकरणाचा विशेषत: मुंबईचा फार मोठा हातभार लागलेला आहे. तिथे हे नियम पाळणे अवघड असे. शिवाय अठरापगड वस्तीमध्ये तशी इतर कुणास फिकीरही नसे.
गुजराती लोक ह्या बाबतीत अगदी लवचिक वृत्तीचे असत. गळ्यात एक रेशमी रुमाल बांधून ते कुठेही ' सोवळ्याने ' हिंडू शकत. रस्त्यावर शेजारून कुणीही गेला किंवा त्याचा स्पर्श झाला तरी त्यांचे सोवळे मोडत नसे. ते तसेच जाऊन खाऊ पिऊ शकत असत.
सोयराचे नियम असेच पण कमी कडक असत. बाराव्या दिवशी उदकशांति, गोमूत्रसिंचन, प्राशन आणि पंचगव्यसेवन असेच.

Culture किती कमी काळात बदलत ते बघून शॉक बसेल.
साधं उदाहरण.
आमच्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा भागात.
वर्षातून एकदा गाव देवतीची यात्रा असते.
रूपरेषा पहिली.
१) बगाड
२) छबिना म्हणजे विविध गावातून लोक ढोल घेवून येतात आणि ते वाजवतात
३), तमाशा हा आमच्या कडे दिवसा असतो.
४) रात्री गावातील लोकांनीच बसवलेले नाटक.त्या मध्ये कलाकार गावातील च.
दोन दिवसाची यात्रा असते.
दुसऱ्या दिवशी छबिणा,असतो त्या नंतर कुस्त्यांचा फड .
प्रतेक घरात बकरा कापला जातो म्हणजे मटन हे जेवण.
पहिली लोक यात्रेला जात दुसऱ्या गावात मित्र,नातेवाईक ह्यांच्या कडे.
देवाचे दर्शन घेत मंदिरात जावून,त्या नंतर तमाशा बघत.नंतर कुस्त्यांच्या फडला जाणे हे गरजेचे.
संध्याकाळी हे सर्व कार्यक्रम संपत मग मित्र किंवा नातेवाईक कडे जेवत.देवाचा प्रसाद म्हणजे पेढे,कुरमुरे वैगेरे घेत आणि घरी जात .

आता हे पूर्ण बदलेले आहे अगदी तीस चाळीस वर्षात..वेग बघा किती प्रचंड आहे.
कार्यक्रम आहे तेच आहेत.
बघत नाटक ची जागा orchestra नी घेतली आहे..
आता लोक यात्रेला रात्री नव लं येतात.
मंदिरात जाणे आणि प्रसाद घेणे गायब.
मटन आणि त्या बरोबर दारू हा महत्वाचा कार्यक्रम बनला आहे.
रात्री बारा पर्यंत हे चालू असते..
यात्रा म्हणजे पवित्र धर्म कार्य होते.कुस्त्या म्हणजे लोकांची आवड होती
आता यात्रा म्हणजे मटन आणि दारू हे सूत्र झाले आहे

फार पूर्वी हे सपिंडी लोकांपर्यंत लागू होते. >> हीरा, सपिंडी लोक म्हणजे काय? म्हणजे किती पिढ्या?

Pages