वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मर्डर इन अगोंडा बघतोय... श्रिया ( सचिन सुप्रिया मुलगी) आणि असिफ खान( पंचायत- गजब बेज्जती है यार) लीड पेयर(भाऊ बहीण) आहेत... मर्डर मिस्त्री आहे.. छान आहे....

माई चालू केली. सुरुवातीला व्हिक्टीम सिंपथी वाटून बंद करणार होतो पण रिव्हेंज मिस्ट्री दिसते आहे.
दुसरा एपी चालू केला आणि जिवंत माणसाचे नख सोलून काढताना चा सीन डिटेल वारी दाखवत होते बघून बंद केली. मर्डर दाखवा, गळे चिरताना दाखवा काही वाटतं नाही, हे ग्राफिक अती झालं मला. आता उद्या बघेन उरलेली. Wink

Netflix वर टर्मिनल नावाची सिरीज बघितली...मस्त आहे..मला तरी फार आवडली..कारण मी airport आणि तिथली vibrant चमक धमक याबाबतीत obsessed आहे....
एक माणूस काही राजकिय कारणांमुळे jfk airport वर अडकतो...म्हणजे त्याला अमेरिकेत पाउल ठेवता येणार नसतं आणि परत ही जाणं शक्य नसतं..त्याची धमाल दाखवली आहे..
फार सुंदर आणि realistic सेट्स, कलाकार कपडे....!!...

जिवंत माणसाचे नख सोलून काढताना चा सीन डिटेल वारी दाखवत होते बघून बंद केली>>> true हिडीस वाटलं एकदम.. मी forward करत पहिली मग अंदाज आल्यावर.. एकंदर स्टोरी म्हणून छान आहे.. अती visuals नको वाटतात फक्त आजकाल चे

मी पण तसले सीन पळवून पाहिली “माई”. एकदम सफाईदार नाहिये पण तरीही गुंतवुन ठेवते मालिका. दुसरा भाग येणार.

एवढ्यात 'सिटी ऑफ ड्रीम्स' चा दुसरा सिझन बघितला. खूप आवडला. एकदम चस्का लागल्यासारखा सलग बघितला मी हा सिझन Happy

बराच उशीर झाला आहे बघायला. पण माझ्यासारखं कोणी सिझन 1 बघून गप्प बसलं असेल तर सिझन 2 नक्की बघा हे सांगायला ही पोस्ट.

कोणत्या सर्व्हिस वर आहे सीझन २? मला आठवत नाही अमेरिकेत उपलब्ध झाल्याचे.

मी सिनेमा बद्दल च म्हणत होते.... >>> Happy मला वाटले तशीच सिरीज काढली की काय

सोनी लिव्ह वरती अनदेखी म्हणून एक सिरीज आहे
कोणी पहिली आहे का
त्याचे दोन सिजन दिसत आहेत
दोन्ही कनेक्शन आहे का पूर्ण वेगळे आहेत?

प्राची - हो. मी पहिला सीझन बहुधा हॉटस्टारवरच पाहिला होता. आता डिस्नेने हॉटस्टारवरच्या कंटेण्टची बरीच गडबड केली आहे. आवर्जून शोधावे लागतात हुलू व इतरत्र. चेक करतो.

माई बघितली सगळी. पण अगदीच ढिसाळ लिहिली आहे, काहीही कन्विनिअंटली होतं रहातं. फुकट वेळ दवडला फीलिंग आलं.

Gilded Age कोणी बघतेय का हॉटस्टार वर ?
The Gilded Age was a period of economic growth as the United States jumped to the lead in industrialization ahead of Britain.

२-३ एपिसोड बघून झाले . बरी वाटतेय . ब्रिजरटन आणि डाउनटन अ‍ॅबे च्या चालीवर आहे .

माई बघण्याचा प्रयत्न केला. खूपच बोअर वाटते आहे. कै च्या कै चालू होते. पूर्ण बघेन असे वाटत नाही.
क्वीन ऑफ साउथ चा हा आता आलेला लास्ट सीझन आहे. मजा आली बघायला. ही सीरीज खूपच इन्ट्रिगिंग आणि सुरुवातीपासूनच एकदम वेगवान आहे.

श्रिया पिळगावकर ची क्रिमिनल माइंड्स आहे प्राइम वर. काही स्टोरीज चांगल्या आहेत पण काही अगदीच ढिसाळ. श्रिया ची acting खरंच चांगली वाटते. सुप्रिया ची आताची acting आहे तशीच. सटल.

Pages