वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Inventing Anna बघायला सुरुवात केली आहे नेफ्लि वर. ३ भाग पाहिले, इन्टरेस्टिंग वाटते आहे
ज्युलिआ गार्नर मला आवडते ओझार्क पासून. यात पण तिचे काम मस्त आहे. खर्‍या घटना, कॅरेक्टर्स वर बेस्ड आहे. शिवाय अजून बरेच ड्रामॅटिक मटेरियल अ‍ॅड केले असावे.
Inventing Anna tells the incredible true story of Sorokin, a twenty-something socialite who successfully posed as a rich German heiress under the name Anna Delvey in New York City.
She successfully conned friends and big banks out of hundreds of thousands of dollars before she was convicted of fraud and grand larceny.

होमटाऊन चा चा चा दुसऱ्या वेळा बघायला घेतली.एकदम डोक्याला ताप नाही सिरीयल आहे.दोन्ही खळ्या वाली पात्रं आणि गामरी आजी गोड आहे.

बेस्टसेलर पाहिली. कायपण झालं.
ताहिरने नावं बदलुन स्टोरी लिहिली तरी लोक जयसिंग दांपत्याला कसेकाय त्रास देत होते?
सायबर सेलवाले एका ट्वीट अकांउटचा शोध लाऊ शकत नाहीत?
पार्थला काही केस चौकशी न होता सोडलं कसं?
अटोप्सी मधे बॉडी आधीच मेलेली आहे की नुकतीच जळउन मेलेली आहे हे कळत नाही?
१०मिनिटात बॉडीचा कोळसा होतो?

मिथुनला का घेतलं असेल?
श्रृती हसनचा अभिनय धन्यवाद आहे.

ये काली काली आंखे कुणी पाहत आहे का?
>>> मी संपवली... मला आवडली... टायटल फक्त नाही आवडले... फुल्ल एंटरटेनमेंटaआहे मात्र सिरीज...

कॉमिकिस्तान बघतोय प्राईम वर.
स्टॅंडअप कमेडिअनची स्पर्धा असं ढोबळ स्वरुप असलं तरी नेहमी सारखी नाही. सात मेंटॉर कॉमेडीच्या वेगवेगळ्या प्रकारात जसं प्रासंगिक, सद्य परिस्थिती पासून आयत्यावेळची कॉमेडी, स्किट इ. एकएक एपिसोड स्पर्धकांना तयार करतात आणि मग १० स्पर्धक सादर करतात. मेटॉर्स मध्ये बिस्वा कल्याण रथ, कनन गिल, तन्मय भट, कनिझ सुरका हे मला माहित असलेले आणि केनी सबॅश्चिअन, सपन वर्मा आणि नवीन रिचर्ड हे नवे होते. सुमुखी सुरेश आणि अभिश मॅथ्यू संचलन करतात.
जजेस मधले एक्स्चेंजेश आणि एकुणच वातावरण फारच मस्त आहे. एक कुटुंब असल्यासारखे सगळे वागतात, एकमेकांशी व्यक्त होतात. खूप ओपन आणि रिअ‍ॅलिटी शो मध्ये जसं विचित्र वाटत रहातं असं वातावरण असतं... नेमकं शब्दांत पकडता नाही येते मला... तसं नाही. हृद्य वगैरे वाटतं. मजा येतेय बघायला. बिंज करतोय, कारण थांबवतच नाही आहे. स्पर्धकांत एक कोणी भारी.. असं काही नाही आहे. कधी कोणी क्लिक होतं, कधी कुणाचे आयत्यावेळी मूळस्वभाव डोकावतात. एकुण मिश्रण आनंददायी आहे बघायला.

ताहिरने नावं बदलुन स्टोरी लिहिली तरी लोक जयसिंग दांपत्याला कसेकाय त्रास देत होते?
>>>
डिट्टो. हाच प्रश्न पडला मला.
ती पब्लिशर आधी आलेली पत्रं त्याला देत नाही. त्याला फॅन मेलमध्ये इंटरेस्ट नसला तरीही कोणतं पत्र किती महत्त्वाचे हे तिला कळत नाही का? का तेव्हा पैसा मिळत असतो म्हणून गप्प बसते? आणि नंतर ताहिरलाच दोष देते
बायको त्याला मीतूवरून वाटेल तशी बोलते. पण स्वतः पण तेच केलेलं असतं ना? का ते त्याला माहीत नाही म्हणून तो गुन्हा ठरत नाही?

अटोप्सी मधे बॉडी आधीच मेलेली आहे की नुकतीच जळउन मेलेली आहे हे कळत नाही?
१०मिनिटात बॉडीचा कोळसा होतो?>>
आधी मेलेली होती हे कळते की.
पण डीएनए टेस्ट वगैरे काहीच करत नाहीत हे.

पार्थला बेल मिळते म्हणून सोडतात.

द रायकर केस पाहिली वूटवर फ्री पास होता म्हणून.

कुणी बघितलीये का ही सिरिज?

स्पॉयलर अ‍ॅलर्ट:

शेवट कैच्याकै केलाय. साक्षी तृप्तीला मारल अस खोट का सान्गते? ती तर एकलव्यकडे कैदेत असते ना?

रायकर नाईक फॅमिलीमध्ये कुणीही धुतल्या तान्दळाचे नसतात. मला तरुणबद्दल सहानुभुती वाटत होती, तोही 'तसलाच' निघाला.

ललित प्रभाकरच काम छान झालय. त्याच्या डिसेण्ट पर्सनॅलिटीकडे बघून वाटत नव्हत की तो 'क्रुर व्हिलन' चा अभिनय इतका चान्गला करु शकेल.

ह्याचा दुसरा भाग येणारेय का?

प्राची, तसं नव्हे. आधीच मेलेली म्हणजे मीतु एक मेलेली बॉडी मिळवते ना. ती पण आधीच काळई ठिक्कर पडलेली.

रायकर केस बघुन खुप महिने झाले. ठीक होती.
असं कुणाला ओलिस ठेऊन, तेही बांधुन, तेही एक का दीड वर्ष (शिवाय एका अगदीच आडजागेच्या एकांड्या बंगल्यात) त्या व्यक्तीचं खाणंपिणं, ह-मु, अंघोळ कपडे हे सगळं कोण करत असेल?

ठिक होती तशी सिरीज. पण प्रत्येक भागात एकाच सीनच्या वेगवेगळ्या शक्यता बघून डोकं भंजाळलं होतं शेवटी.

असं कुणाला ओलिस ठेऊन, तेही बांधुन, तेही एक का दीड वर्ष (शिवाय एका अगदीच आडजागेच्या एकांड्या बंगल्यात) त्या व्यक्तीचं खाणंपिणं, ह-मु, अंघोळ कपडे हे सगळं कोण करत असेल?>>> तीला ड्रग्ज देऊन ठेवत असेल, बाकीच्या गोष्टी सारख्या करायची गरजच नसेल पडत. एखादा माणूस ठेवला असेल त्यासाठी. पण मुळात हे असं करायची गरजच काय होती हा प्रश्र्न आहे. जिवंतच कशाला ठेवलं? दुसरा सिझन तर नाहीये आलेला बहुतेक.

नाही आला.
शेवट आवडला / पटला नव्हता

शेवट तर मला फेम गेम चा पण नाही आवडला. आणि काय तर शेवटी तिची मुलगी तिलाच डिच करते. पहीले काही भाग आवडले फक्त.

असं कुणाला ओलिस ठेऊन, तेही बांधुन, तेही एक का दीड वर्ष (शिवाय एका अगदीच आडजागेच्या एकांड्या बंगल्यात) त्या व्यक्तीचं खाणंपिणं, ह-मु, अंघोळ कपडे हे सगळं कोण करत असेल? >>>>>>>> तिला ड्र्ग्ज देत असतात. दाखवलय शेवटी.

तृप्तीच्या वडिलान्च काय झाल?

ठिक होती तशी सिरीज. >>>>>>> +++++++++ १११११११

आत्ताच अजय देवगनची रूद्रा बघायला सुरूवात केली.. पहिला एपिसोड बघितला.. बेसिक इंस्टिंक्टसारखी वाटतेय..बघूया पुढे काय होतंय ते

फेम गेम चे संवाद नीट ऐकू येत नाहीत म्हणून बंद केली. रुद्र सुरू केली आहे. दोन तीन एपिसोड्स पाहिले. मुख्य कहाणी तिथेच घोटाळते आणि प्रत्येक एपिसोडमधे नवीन काहीतरी साहस दाखवले जातेय.

प्राईम वर ची बेस्ट सेलर खूप आवडली. मुळ थीम जरा अविश्वसनीय आहे पण ओव्हरऑल मस्त खिळऊन ठेवले सिरीज ने.
श्रुती हसन पेक्षा नैसर्गिक अभिनय मला गोहर खान चा वाटला.

Inventing Anna पाहिली.उध्दट,बेफिकीर असलेल्या गुन्हेगार ऍनाबद्दल माहिती गोळा करताना तिच्या मैत्रिणींची,व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांची,तिच्या सोबत राहणाऱ्यांची मुलाखत घेता घेता एक एक पैलू उलगडत जातात.मालिकेच्या शेवटी विवियनला (तिची पूर्ण स्टोरी कव्हर करणारी पत्रकार) तिच्याबद्दल चक्क सहानुभूती वाटू लागते.हा प्रवास खूप छान घेतलाय. चांगलं वाईट असं कोणीच नाहीये.प्रत्येकाचा स्वार्थ आहे. म्हणूनच ऍना स्वप्न दाखवून तिला हवं ते काढून घेऊ शकली. घोटाळा केलाच आहे तिने.पण मानवी स्वभाव,पैसे,प्रसिद्धीची हाव, मोजक्या लोकांना त्यासाठी मिळणारी संधी,त्यातही पुरुषांचं असलेलं वर्चस्व,निर्वासितांना दिली जाणारी दुय्यम वागणूक,उच्चभ्रू लोकांच्या राहणीमानाबद्दल असलेलं आकर्षण,असूया,ऍनाची बाजू लढवण्यात वकिलाचा असलेला स्वार्थ,त्याची गुंतवणूक,विवियनचा देखील असलेला स्वार्थ असे बरेच मुद्दे दाखवले आहेत.मुख्य म्हणजे तिने घोटाळा केलाय म्हणजे केवळ तीच चुकली नाहीये हे अधोरेखित केलेलं आहे.

Best seller OK आहे. लोकांना बहुतेक गावाच्या नावावरून लक्षात येतं जयसिंग कुटुंबाबद्दल. अभिनय सगळ्यांचे बरे आहेत ..पण ते हॅकिंग च काहीच्या काही घेतला आहे, स्पेशली ते palace मधला.

रुद्र सुरू केली पण खूप संथ आहे ..अजय देवगण बसल्या बसल्या direct conclusions काढतो ते फार funny आहे.. ३ एपिसोड नंतर नाही पहिली मग ..
Fame Game जास्त आवडली, बरेच प्रसंग छान घेतले आहेत and अभिनय ही सगळ्यांनी छान केलाय . फक्त तीच्यआ मुलीचा आणि त्या fan मुलाचा प्लॉट काही पटला नाही फारसा. इतकी famous घरातली मुलगी अश्याच एका random फॅन बरोबर इतकी जवळीक कशी करेल.. असा वाटत.

काली काली आंखे पण पहिली Netflix वर. Typical राजकारणी प्लॉट आहे पण चांगली आहे, खिळवून ठेवते.

Tinder swindler पण आवडली खरंच प्रेमासाठी काही लोक इतके काय काय करतात..त्या मुलींना बरेच रेड flags दिसत असतात पण तरी बिचाऱ्या फसतात त्याच्या जाळ्यात..

प्राईम वर ची बेस्ट सेलर खूप आवडली.>>हो मलाही आवडली. पण लोकांचे नेगेटिव्ह रिव्ह्यू वाचले, मग कमेंट नाही केली

बेस्ट सेलर पाहिली - दिसपॉईंटेड ... प्रेडिक्टेबल आणि शेवटी खूप ताणली आहे... अर्जन ने ताहीर चांगला कॅरी केला आहे... श्रुती चा कच्चा अभिनय खटकत राहतो... गौहर ने जबरी अभिनय करून बॅलन्स केले आहे मात्र... गौहर ला अजून चांगले रोल मिळत रहावेत...

च्र्प्स +१
श्रुती हसनला अजिबात म्हणजे अजिबात अभिनय येत नाही.
गौहर खान छान आहे.

गेल्या long weekend ला , मिथ्या आणि Bloody Brothers पाहिल्या झी ५ वर .
संपल्यावर वाटलं , का पाहिल्या ?
Bloody Brothers - मध्ये मध्ये खुदकन हसवणार्या जागा आहेत , पण एकंदरीत प्रभाव काहीच नाही .
श्रुती सेठ अजूनहि मला शरारत मधली आठवते .
जयदीप चा रोल एक्दम वेगळा आहे , या अगोदरच्या रोल्सपेक्शा .

मिथ्या - थोडी अ आणि अ वाटली. हुमा कुरेशी च्या साड्या/ड्रेसेस , भाग्यश्रीची मुलगी आणि उटीचा सेटअप - या व्यतिरिक्त काही आवडलं नाही .
हुमा कुरेशीचा बाबा म्हणून ब्योमकेश बक्शी ???? समीर सोनी एके काळी आवडायचा , आता काय च्या काय झालाय .
भाग्यश्रीची मुलगी दिसते छान पण बाकी अ‍ॅक्टीन्ग ठीक वाटली.

ब्लडी ब्रदर्स सुरु केलीय... तीन एपिसोड... अजून तरी चांगली वाटत आहे... संथ होत आहे ... जितेंद्र जोशी चा रोल आवडला...

नेटफिक्सवर ‘इगर फॉर लव‘ नावाची कंटाळवाणी मालिका २ भागांनंतर पहायची सोडुन दिली. उगीच बोर विषय. निखळ मालिका बनवायला हल्ली कष्ट पडतात बहुतेक. फरान अख्तरची आहे.
त्यापेक्षा कोरिअन ‘मिस्टी’ मालिका पहात आहे. फार वेगवान नाही पण आवडली आहे. त्या हिरॉईनचे फॉर्मल कपडे फार मस्त आहेत.

असुर व्हूट वर फ्री ( फ्रि पास - मर्यादित कालावधीसाठी) बघायला मिळेल. इच्छुकान्नी लाभ घ्यावा. बहुधा दुसरा सीझन येतोय ह्याचा.

Pages