आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा भाचा सध्या आय आय टी मुंबई इथे आहे. त्याच्याकडून कळलं की ज्या कँटीनमध्ये हा मांसाहारासाठीच्या आचारसंहितेचा प्रकार घडला तिथे भांडी धुण्याचा कार्यक्रम सगळ्यांना दिसत असे. बहुतेक रस्त्याकडेचे खाद्यपदार्थ विक्रेते जसे प्लेट्स पिंपातल्या पाण्यात बुचकळवून पुन्हा वापरतात, तसा प्रकार होत होता. आता ही भांडी धुण्याची जागा कँटीनच्या आत , भिंतीआड आणि लोकांच्या नजरेआड होतो. त्यामुळे प्रश्न मिटला असावा Lol

सध्या आजूबाजूला जे चाललंय ते पाहून शाकाहार्‍यांना इतरांच्या (इतर माणसांच्या) भावनांची किती कदर असते ते पाहून डोळे भरून येताहेत.

प्राणी खाऊ नकोस असे ओरडून समोरच्याचे डोके फोडून टाकणे , ही शाकाहाराची एक नवीन कॅटेगरी निर्माण झाली आहे

विजयाराजे सिंदियांचा नातू, माधवराव सिंदियांचा मुलगा, वसुंधराराजे आणि यशोधरा राजेंचा भाचा , दुष्यंत सिंगचा मामेभाऊ आणि अवघ्या २६व्या वर्षी ग्वाल्हेर क्रिकेट असोसिएशनचे व्हीपी झालेले महानार्यमन सिंदिया यांचे वडील ज्योतिरादित्य सिंदिया पाहत असलेल्या हवाई वाहतूक मंत्रालयाला एक पत्र आलंय . देशांतर्गत विमानप्रवासादरम्यान मांस इ. युक्त पदार्थांवर पूर्ण बंदी घाला.

<< देशांतर्गत विमानप्रवासादरम्यान मांस इ. युक्त पदार्थांवर पूर्ण बंदी घाला. >>
------ आधी बिफ आता पुर्ण मांसाहारावर बंदी... यांना भारत अजूनही समजलेला नाही. देशाचे मस्त वाटोळे लावत आहेत.

आय आय टी तल्या विद्यार्थ्यांसकट हे आपल्या कोणा च्याही लक्षात आलं नाही. आपण शाकाहारी, मांसाहारींसाठी ताटं तर वेगळी ठेवू. पण चमच्यांचं काय?
साध्यासुध्या सुधाताईंना हीच भीती सतावत असते की या चमच्याने आधी कोणी सामिष काही खाल्लं असलं म्हणजे. ?

यापेक्षा आपली सनातनी भारतीय पद्धत पुन्हा अंगिकारत सरळ हातानेच खावं की नाही?

Happy unintentionally मजेदार आहे ते आर्टिकल. सुधा मुर्तींची ओळख - यांची बायको, त्यांची आई अशी करून दिली आहे Happy लेखिका, चॅरिटी वगैरे बद्दल काहीच नाही Happy त्यांची तशी ओळखही कदाचित इन्फोसिसमुळेच झाली असेल पण तरीही का होईना पण किमान एक लेखिका व इन्फोसिस च्या चॅरीटी प्रोजेक्ट्स चालवणार्‍या असे काहीतरी तरी द्यायचे Happy

बाकी हातानेच का नाही खात शी सहमत. या प्युअर व्हेज वाल्यांची "काय चालते" ची एक मोठी रेंज आहे. काहींना जाणूनबुजून खायला नको आहे पण न कळत पोटात गेले तरी काही प्रॉब्लेम नाही, काहींना "या चमच्याची हिस्टरी" वाले प्रश्न पडतात. काहींना अगदी आपण जेवतो त्या टेबलावरही कोणी खाल्लेले चालत नाही. ते वैयक्तिक आहे. ज्याला "पिकिनेस" आहे त्याने स्वतःपुरते काहीही करावे. अगदी कडीपत्ता डिशवॉशरमधे फिरवून ओव्हन मधे ४५० डिग्रीत तापवून घ्यावा. जे लोक विशेषतः फक्त व्हेज खाणार्‍या घरात वाढले त्यांना मेण्टल ब्लॉक असतो. मी इतकी वर्षे अमेरिकेत राहून अजूनही बीफ, पोर्क खाऊ शकत नाही. टोटल मेंटल ब्लॉक आहे (बीफच्या बाबतीत अगदी माझा छुपा हिंदुत्त्ववाद उफाळून येतो म्हंटले तरी पोर्कच्या बाबतीत ते ही नाही Happy ). पण यातले अनेक लोक स्वतःपुरते करून थांबत नाहीत. प्युअर व्हेज कसे श्रेष्ठ वगैरे वेळीअवेळी व अस्थानी सांगून लोकांना पकवतात.

सुधा मूर्तींनी स्वतःबरोबर स्वैपाकाच्या सामानाबरोबरच स्वतःच्या डिस्पोजेबल प्लेट्स, बोल्स, ग्लास, चमचे, काटे, सुरी न्यावं. म्हणजे तो ही प्रश्न मिटेलच.
मी पण फ्लेक्सिबल व्हेजिटेरियन आहे. बाहेर मला ग्रिल्ड शिक कबाब खायला आवडतात पण मी बाकी काही नॉनव्हेज खात नाही. गेल्यावर्षीच चिकन करायला लागले आहे पण स्वतः खावं अशी इच्छा होत नाही.
मिसो सूपमधली फिश पेस्ट खटकत नाही पण हल्ली अंड्याचा वासही नको होतो. असं काहीतरी विचित्र प्रकरण आहे.
मला पक्क्या नॉनव्हेज खाणार्‍या लोकांची एक मजा वाटते. व्हेजिटेरियन्सना सहज अरे खाऊन बघा ना, छान लागतं वगैरे अगदी सहज सांगतात प्ण स्वतः मात्र बिफ क्वचित पोर्क वगैरेही खाणार नाहीत. त्यांना नॉनव्हेज खात असून मेंटल ब्लॉक आहे तर व्हेजिटेरियन्सना कोणत्या जोरावर मीट खा म्हणून सांगता?

मला पक्क्या नॉनव्हेज खाणार्‍या लोकांची एक मजा वाटते. व्हेजिटेरियन्सना सहज अरे खाऊन बघा ना, छान लागतं वगैरे अगदी सहज सांगतात प्ण स्वतः मात्र बिफ क्वचित पोर्क वगैरेही खाणार नाहीत.

>>>>>>>>

इथे "काही" असा शब्द हवा. अन्यथा फारच सरसकटीकरण झाले.

मी मांसाहार प्रेमी आहे. आमच्या घरी आणि मित्रपरिवारात बहुतांश असेच आहेत. तरी मी असे म्हणताना कोणाला पाहिले नाही.
(दारूबाबत हा आग्रह मात्र पाहिला आणि खूप अनुभवला आहे)

माझी बायको शुद्ध शाकाहारी होती. आता तिला चटक लागली तर स्वताहून नॉनव्हेज खाऊ लागली. पण कच्चे मासमटण किंवा मासे हाताळायला आवडतं नसल्याने स्वतः बनवत मात्र नाही. तिला खातेस तर बनवायला सुद्धा शिक असेही आजवर आमच्याकडे कोणी बोलले नाही.

काही मांसाहार करणारे लोक मात्र स्वताला फार मोठे तीसमारखान समजतात. आणि शाकाहारी लोकांना घासफूस खाणारे म्हणून हिनवतात. ते एक पटत नाही.

तर काही शाकाहारी लोक मांसाहारी लोकांना रानटी समजतात. ते ही एक पटत नाही.

अर्थात दोन्हीकडे सगळेच असे नसतात..

हा कपिल शर्मातला एपिसोड मी बघितला आहे , सुधा मूर्तींनी इतरांना फार बोलूच दिले नाही. मी त्यांची पुस्तकं फारशी वाचलेली नाहीत, त्यांच्या मुलाखती व छोटेमोठे लेख वाचलेत. मला अजून त्यांच्याबद्दल नीट मत बनवता आलं नाहीये, कधीकधी ह्या रामतीर्थकर बाईंचे रोबस्ट , पॉलिश्ड , आंतरराष्ट्रीय व्हर्जन तर नसावे अशी शंका येते. ही शंका चुकीची ठरली तर आनंदच आहे. मला 'साध्या' लोकांची भीती वाटते.

> कधीकधी ह्या रामतीर्थकर बाईंचे रोबस्ट , पॉलिश्ड , आंतरराष्ट्रीय व्हर्जन तर नसावे अशी शंका येते.
अगदी अगदी, हेच माझ्याही मनात आले होते.

मला त्यांच्याबद्दल फार माहिती नाही. पण त्यांची पुस्तके वाचायला फार इंटरेस्टिंग नाहीत हे एक दोन पुस्तकांवरून जाणवले.

अस्मिता, ही बातमी कुणाल विजयकरच्या "खाने में क्या है ?" वर आधारित आहे. फोटो कपिल शर्मा शो मधून घेतला आहे.

डॉलर बहु वाचलं होतं.आवडलं होतं.त्या पारंपरिक(रामतीर्थ
कर 1.1.0) असाव्यात असं वाटतं.अर्थात वय हाही फॅक्टर असावा.

हो भरत, मी दोन्ही शो बघितले होते आणि हे तिकडचं आहे हे लक्षात आलं होतं . आजकाल सगळीकडेच दिसतात त्या. तिथंही त्यांनी कुणालला बोलू दिलं नाही, शिवाय ह्यांच्या बडबडीने त्याला सुधरणं गेलं व खायचं सोडून खरकटा हात तसाच ठेवून बसला होता. त्यांनी मात्र एवढं बोलतबोलत सुद्धा केळीचं पान लख्ख केलं.

त्या तिकडे नेहमीच्या खाणार्‍या आहेत आणि फुडी आहेत म्हटल्यावर त्यांना काय येणार आहे समोर वगैरे माहित असणार आणि मुलाखतींची सवय असल्याने काय प्रश्न असतील ह्याचाही अंदाज असावा. हा मुलाखतकार असल्यामुळे खाणं आणि प्रश्न ह्यात मागे पडला असावा.

खायचं सोडून खरकटा हात तसाच ठेवून बसला होता. त्यांनी मात्र एवढं बोलतबोलत सुद्धा केळीचं पान लख्ख केलं. >>> Lol बोलू पण देत नाहीत आणि खाऊ पण देत नाहीत Happy

अगदी रामतीर्थकर नसाव्यात. स्वतःपुरत्या पारंपारिक असतील आणि त्यांच्या स्थानामुळे "मोठ्यांच्या छोट्या गोष्टी" (क्रेडिट पुलं) सारखे त्याला महत्त्व येत असेल. पण अशा वक्तव्यांना महत्त्व मिळत गेले की मग त्याच विचारसरणीचे लोक अवतीभवती जमा होतात आणि आपण थॉट लीडर वगैरे आहोत असा समज होतो आणि मग तेच विचार आणखी अ‍ॅम्प्लिफाय केले जातात. फेबुवर खूप फॉलोइंग असलेले लोकही बहुतांश असेच असतात.

भरत, ह्या धाग्यावर सुधा मुर्ती यांच्यावरची बातमी आणण्याचे कारण कळू शकेल का?

त्या त्यांच्या पदाचा / प्रभावशाली असण्याचा वापर करून इतरांना त्यांच्याप्रमाणे वागण्यास भाग पाडत नसतील तर हरकतच काय आहे. त्यांची जी काही तत्वे आहेत ती त्या कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतात (आणि हे करताना इतरांना त्रास देत नाहीयेत) ही बाब मला तरी (सध्याच्या तत्व विहीन वागणारे बहु झाले काळात) स्तुत्यच वाटते. हे मला फारतर ज्याप्रमाणे विशिष्ट संप्रदायाचे लोक विशिष्ट प्रकारचेच मांस खातात किंवा डुक्कराचे खातच नाहीत त्याच जातकुळीचे वाटते.

त्या हाताने खातील नाहीतर घरून नेलेल्या चमच्याने!
हा ही ज्याचा त्याचा (च) प्रश्न आहे.

<< सुधा मुर्ती बॅशिंग का? त्या व्हेज आहेत म्हणुन की भाजप कडे झुकलेल्या आहेत थोड्याफार म्हणुन? Happy
नवीन Submitted by mandard on 27 July, 2023 - 01:11 >>

-------- सुधा मुर्ती यांच्याबद्दलचे प्रेम आहे का ? त्या संभाजी भिडे यांच्या पायावर नतमस्तक होतात म्हणून? Happy
https://www.hindustantimes.com/india-news/why-did-sudha-murthy-touch-rig...

महिला पत्रकाराने कुंकू लावले नाही म्हणून तिच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळणारा, " आधी कुंकू लाव मग बोलतो " असे उर्मटासारखे बोलणारा संभाजी भिडे. सार्वजनिक स्थळी दिसला वृद्ध , पड पाया असे सुजाण लोक करत नाही.

असते एकेकाची पसंती.

त्या संभाजी भिडे यांच्या पायावर नतमस्तक होतात म्हणून? >> हे चुकीचे आहे. मला ही संभाजी भिडे आवडत नाहीत. त्यांच्या पाया पडणार नाही. Happy

<<<या प्युअर व्हेज वाल्यांची "काय चालते" ची एक मोठी रेंज आहे. काहींना जाणूनबुजून खायला नको आहे पण न कळत पोटात गेले तरी काही प्रॉब्लेम नाही, काहींना "या चमच्याची हिस्टरी" वाले प्रश्न पडतात. काहींना अगदी आपण जेवतो त्या टेबलावरही कोणी खाल्लेले चालत नाही. ते वैयक्तिक आहे.>>>>

हे निरीक्षण एकदम इंटरेस्टिंग आहे. म्हणजे खरे आहे अर्थातच पण एका श्लोकात रामायण किंवा महाभारत टाइप्स एवढी मोठी रेंज एका वाक्यात कव्हर केली हे इंटरेस्टिंग वाटले :).

<<<<त्या त्यांच्या पदाचा / प्रभावशाली असण्याचा वापर करून इतरांना त्यांच्याप्रमाणे वागण्यास भाग पाडत नसतील तर हरकतच काय आहे. त्यांची जी काही तत्वे आहेत ती त्या कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतात (आणि हे करताना इतरांना त्रास देत नाहीयेत) ही बाब मला तरी (सध्याच्या तत्व विहीन वागणारे बहु झाले काळात) स्तुत्यच वाटते. हे मला फारतर ज्याप्रमाणे विशिष्ट संप्रदायाचे लोक विशिष्ट प्रकारचेच मांस खातात किंवा डुक्कराचे खातच नाहीत त्याच जातकुळीचे वाटते.>>>

हर्पेन तुमचा हा मुद्दा १००% पटला. आजकाल सार्वजनिक पटलावर जेन्युइन व्यक्ती फार दुर्मिळ झाल्या आहेत. सगळे एकत्र पोलिटिकली करेक्ट वाटतात किंवा कुठलातरी हिडन अजेंडा जाणवतो. सुधा मुर्तींचे सगळे विचार पटले नाहीत तरी त्यांचं सामाजिक कार्य आणि ज्येन्युइननेस वादातीत वाटतो मला. भिडे गुरुजी प्रकरणात त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला हवा. भिडे गुरुजी आणि त्यांचे उपद्रवमुल्य त्यांना माहिती असण्याची शक्यता कमीच. एक वयस्क माणूस अचानक पहिल्यांदा भेटला त्याला मी आदर देण्यासाठी नमस्कार केला हे त्यांचे स्पष्टीकरण मला पटले होते.

अस्मिता जस्ट कुतुहल म्हणून रामतीर्थकर बाईंशी साम्य जाणवणारे विचार म्हणजे नक्की कुठले? शक्य असल्यास लिंक देणार का? मी त्यांना फॉलो करत नाही, 'वाईज अदरवाईज' वगळता त्यांच कुठली पुस्तकंही वाचली नाहीत म्हणून विचारले. कुतुहल ह्यासाठी की वैयक्तिक आयुष्यात त्या बर्याच बंडखोर वाटतात, मुलींना प्रवेश नाकारला म्हणून डायरेक्ट जेआरडींना पत्र वगैरे लिहिणारी बाई इतरांना परंपरा पाळा म्हणून सांगते (सरळ असो वा आडवळणाने) हे विसंगत वाटले.

हर्पेन, एवढंही कठीण नसावं कळायला.
आय आय टी वादावर bring your own plate हे सोल्युशन बहुतेकांना पसंत पडलं होतं. पण नुसतं प्लेट आपली असणं पुरेसं नाही, चमचाही आपला असायला हवा, हे सुधा मूर्तींमुळे लक्षात आलं.

काय खावं , काय खाऊ नये हे एक. पण या ताटलीत, या चमच्याने आधी काय खाल्लं असेल म्हणून तो नको, हे दुसरं. ते चमचा ताटली स्वच्छ घासून धुवून पुसून घेतल्यानेही त्याला लागलेलं अमंगळ दूर होत नाही ; हे तत्त्व म्हणून कसं वाटतं?

भिडे गुरुजी प्रकरणात त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला हवा. भिडे गुरुजी आणि त्यांचे उपद्रवमुल्य त्यांना माहिती असण्याची शक्यता कमीच. >> हे पटत नाही. भिडे गुरुजी काही रँडम म्हातारा माणुस नाही. She must be well aware about him.

त्याबद्दल नंतर स्टोरी पसरवली गेली की भिडेंच्या समर्थकांनी ती भेट घडवून आणण्यासाठी दबाव आणला होता.

भिडेंना उपद्रवी म्हटलेलंही कोणाला आवडायचं नाही. काय सांगा!

वृद्ध व्यक्तीबद्दल आदर दाखविण्याची कृती नैसर्गिक आणि आपल्या उच्च भारतीय संस्कारांचा भाग असेल तर दिसणार्‍या प्रत्येक वृद्धाला वाकून नमस्कार करायला हवा. निदान पहिल्या भेटी मधे तरी. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात मुर्ती यांनी हजेरी लावली आहे. संभाजी भिडे हे पहिले वृद्ध होते का ज्यांना हा असा दुर्मिक सन्मान मिळाला. गुगलल्यावर केवळ भिडेंचेच चित्र आहे.

पाच दशके आधी (१९७२ - १९७४), मुलींना समान वागणूक मिळावी यासाठी JRD यांना खरमरित पत्र लिहीणारी सुधा मुर्ती.
आज पन्नास वर्षानंतर एका महिला पत्रकाराला, सार्वजनिक स्थळी " आधी कुंकू लाव मग बोलतो" असा घोर अपमान करणार्‍याच्या पाया पडते हे विचित्र आहे.

पाया पडते वेळी सुधा मुर्ती यांना भिडे यांची पार्श्वभुमी माहित नव्हती, ठिक आहे, समजतो. पण वरिल प्रकारचे भिडे यांचे वक्तव्य "समानतेच्या" विरोधांत आहे असे बोलण्याचे धाडस तर करु शकतात ना.

Pages