आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन तेंडुलकर सत्य साईबाबांचा भक्त होता.
त्यांचा फोटो त्याने आपल्या चित्रपटात देखील दाखवला.
याची आठवण झाली वरील चर्चा वाचून..

सुधा मूर्तीना जर व्हेज डाएट फॉलो करायचं असेल आणि त्या आपले utensils कॅरी करत असतील तर त्यात ridicule करण्यासारखं खरोखर काय आहे?
आणि late रामतीर्थकर बाईंचा काय संबंध आहे? भाकरी करता आलीच पाहिजे, मुलींनी अंगभर कपडे घालावेत, अरेंज मॅरेजच करावं असं काही मूर्ती म्हणाल्या आहेत का?

तुम्हाला बीफ करीच्या पातेल्यातला चमचा काढून तोच चमचा प्रसादाच्या शिऱ्यात घालून तो शिरा देवासमोर नैवेद्य ठेवायचा आणि मग स्वतः खायचा असंही स्वतःच्या घरात करता येईल. इतरांना त्यांचे प्रोसेस फॉलो करू देत की.

अमेरिकेत अनेक गोरे लोकही विगन किंवा शाकाहारी होत आहेत. त्यामुळे किती वर्षे शाकाहार म्हणजे casteism असं equate करणार व त्यावरून द्वेष करत बसणार तुम्ही?
बीफ हौसेने खाणाऱ्या अमेरिकेत डॉग मीटवर मात्र कायदेशीर बंदी आहे. चायना कोरिया मध्ये तेही खातात. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रेफरन्स असतात आणि देशोदेशीचे वेगवेगळे कायदे असतात. उद्या इथल्या किती जणांना डॉग मीट बनवलेलं पातेलं व डाव विसळून त्यात चिकन किंवा आमटी बनवून दिली तर लगेच जेवायला बसणार आहेत?

Fair point. त्या सध्या अजूनतरी जे बोलत आहेत त्याबद्दल त्यांना रिडिक्यूल करण्यासारखे काही नाही - मला गंमत वाटली ती "प्युअर व्हेज" ची समाजात खूप बदलणारी व्याख्या पाहून. इव्हन भिड्यांच्या पाया पडण्यावरूनही सुधा मुर्तींना मी जज करणार नाही. तो त्यांचा चॉईस आहे. भिडे जे काय कर्मठ बोलतात त्याचा दोष भिड्यांचा आहे. सुधा मुर्तींचा नाही.

<< Fair point. त्या सध्या अजूनतरी जे बोलत आहेत त्याबद्दल त्यांना रिडिक्यूल करण्यासारखे काही नाही - मला गंमत वाटली ती "प्युअर व्हेज" ची समाजात खूप बदलणारी व्याख्या पाहून. इव्हन भिड्यांच्या पाया पडण्यावरूनही सुधा मुर्तींना मी जज करणार नाही. तो त्यांचा चॉईस आहे. भिडे जे काय कर्मठ बोलतात त्याचा दोष भिड्यांचा आहे. सुधा मुर्तींचा नाही.
Submitted by फारएण्ड on 29 July, 2023 - 18:55. >>

------ सार्वजनिक ठिकाणी कुणी कुणाच्या पाया पडायचे हा प्रत्येकाचा चॉईस आहे. त्याबद्दल वाद नाही.

तसेच एखाद्या महिला पत्रकाराने कुंकू लावले काय आणि नाही लावले काय हा त्या महिलेला चॉईस असायला हवा. सार्वजनिक स्थळी " आधी कुंकू लाव, मग बोलतो..." या व अशा बेताल विधानाला केवळ कर्मठपणा म्हणता येणार नाही.
https://www.youtube.com/watch?v=sZIWr-_nE2M

एखाद्या मुलीने कुंकू लावले नाही तर काय फरक पडत आहे, तिचा चॉईस आहे. तिच्या कुंकू न लावण्याचा आणि भारत माता विधवा असण्याचा संबंध काय ?

हो पण तो भिड्यांचा दोष आहे. त्यांच्यावरची टीका रास्त आहे. पण त्यांच्या पाया पडल्या म्हणून सुधा मुर्तींना कॅन्सल करणे मला पटत नाही. असे लोक सार्वजनिक जीवनात हजारो लोकांना भेटत असतात. प्रत्येकाच्या वक्तव्यांची शहानिशा करणे त्यांना नेहमी शक्य असतेच असे नाही.

पन्नास वर्षांपूर्वी स्त्री हक्कासाठी JRD ना पत्र लिहीणार्‍या सुधारक मुर्ती आज २०२३ मधे महिलांच्या मुलभूत हक्कांची ( साधे कुंकू न लावण्याचा अधिकार पण देणार नाही ? :राग:) पायमल्ली करणार्‍या भिडे यांच्या पाया पडत असतील.... तर तो केवळ एका वयस्कर व्यक्तीबद्दलचा आदर आहे असे समजावे. भिडे यांचे समाज विघातक कार्य, त्यांचे विखारी विचार या बद्दल सुधा मुर्ती यांना नमस्कार करते वेळी काहीही कल्पना नव्व्हती. असे बेधडक खोटे बोलण्याची काही गरज नव्हती.

धादांत खोटे बोलण्याचा आणि शाकाहारी आहाराचा संबंध नाही आहे.... तो केवळ योगायोग समजायचा.

<< हो पण तो भिड्यांचा दोष आहे. त्यांच्यावरची टीका रास्त आहे. पण त्यांच्या पाया पडल्या म्हणून सुधा मुर्तींना कॅन्सल करणे मला पटत नाही. असे लोक सार्वजनिक जीवनात हजारो लोकांना भेटत असतात. प्रत्येकाच्या वक्तव्यांची शहानिशा करणे त्यांना नेहमी शक्य असतेच असे नाही.
नवीन Submitted by फारएण्ड on 29 July, 2023 - 19:35. >>

-----
१९७३ मधे पत्र रुपांत समानतेच्या गप्पा करणारी स्त्री आज पन्नास वर्षानंतर ( अगदी कुठलाही विचार न करता ) दिसला वृद्ध पड पाया असे करत नाही. त्यांचा सार्वजनिक वावर फार मोठा आहे. पण गुगलल्यावर पाया पडणे फक्त भिडे यांच्या वाटेला आलेले आहे.

भिडे यांचे " प्रत्येक स्त्री माता - कुंकू लाव मग बोलतो" याबद्दलचे विधान आल्यानंतर तर त्यांना मळमळल्यासारखे वाटले असेल. किती सुधा विदारक दृश्य आहे.

माणसाला जसं मागच्या जन्मातलं कर्म चिकटतं (असं मानलं जातं) तसंच चमच्यालाही आधीच्या वापरातलं अन्न जन्मभर चिकटून राहतं का?
चमचा घासल्याने, धुतल्याने ते जात नाही का? चमचा स्वच्छ असल्याशी कारण. मला प्रवासात स्वच्छ चमचा मिळाला नाही तर म्हणून मी माझा चमचा घेऊन फिरते म्हणालात तर कोणी काही बोलणार नाही. पण बापरे! या चमच्याने कधीतरी कोणी सामिष अन्न खाल्लं असलं तर! (नक्की काय होईल? धर्म भ्रष्ट होतो? मग तसं म्हणा. ) म्हणून मला तो चमचा नको हे लॉजिक कसं काय चालतं?

हे फक्त शाकाहाराबद्दल नाही. मांसाहाराला आणि ते करणार्‍यांना लेबलिंगही आहे. शिवाय वेगळी भांडी वापरण्यामागे आपल्याकडे जी एक कारणपरंपरा, व्यवस्था आहे, त्याची सावलीही या प्रकरणावर पडते.

भिडेंच्या पाया पडल्याने मूर्तींचं नाव खराब होतंय म्हणून भिडे त्यांना भेटण्यासाठी दबाव आणत होते अशी स्टोरी पुढे आली. पण व्हिडियो बघून तरी तसं काही वाटत नाही.

> पण गुगलल्यावर पाया पडणे फक्त भिडे यांच्या वाटेला आलेले आहे.
नाही. इतरही अनेक लोकांच्या त्या पाया पडल्या आहेत. भिड्यांबाबत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण खरे आहे. मी बरीच वर्षे मिरजेत राहिलो आहे. Trust me, I know. 'भिडेंच्या पाया पडणे' हा विषय सोडूयात आता.

पण त्यांनी प्यूयर व्हेज वगैरे गोष्टी करायला नको होत्या. मुळात त्यांनी जगभर फिरून इडली सांबारच खाल्ला असेल तर विजयकर ने मुलाखत तरी का घेतली ? भारतात अजूनही आमचे शेजारी रमजान ला खीर व ख्रिस्मस ला केक आणून देतात. आम्हाला किळस बिळस येत नाही. हे learned behaviorआहे. आमची आई आता बरीच वयस्क आहे पण ओपन माईंडेड. शेजारी एक दलित कुटुंब नव्यानेच राहायला अले. त्यांनी आईच्या वाढदिवसाला हौसेने केक आणला व आईला ते पुन्हा पुन्हा सांगत होते की आम्ही हा विकत आणला विकत आणला. नंतर खुलासा झाला की तो 'आमच्या किचन' मधे बनवलेला नाही असे ते सांगत होते.

मूर्तींचे विधान कर्नाटक च्या कोंटेक्स्ट मध्ये पाहिले पाहिजे. अमेरिकेतील डॉग मीट वगैरे तुलना अस्थानी आहेत.

तिथे शाळेत मध्यान्ह भोजन बनवायला एक दलित महिला नेमली म्हणून उच्चवर्णीय मुलांनी (म्हणजे त्यांच्या पेरेंट्स नी) खायला नकार दिला. मूर्ती एका अर्थाने या वर्तनाचे समर्थनच करत नाहीत का? गावातल्या पाण्याचा टाकीला दलिताचा स्पर्श झाला म्हणून तो गोमुत्राने धूवून घेतला व खर्च त्या दलिता कडूनच घेतला अशा घटना तिथे २०२३ मध्ये ही घडतात. उत्तर कर्नाटक मध्ये लहान मुलांमध्ये कुपोषण आहे म्हणून रोज एक उकडलेले अंडे द्यायचा प्लॅन तिथे ब्राह्मण लोक नेहेमी हाणून पाडतात. इतरांना केळी व चिक्की असे पर्याय असतानाही. कारण काय तर अंडी उकडताना त्यातला चमचा जर आमच्या अन्नात गेला तर ? आमच्या आहार विषयक सवयी श्रेष्ठ आहेत व इतरांनीच काय ते अ‍ॅड्जस्ट करावे हा हट्ट का? याचीच पुढची पायरी म्हणजे मंगळवारी मांस विकू नका, कावड यात्रेच्या वेळी विकू नका असे फतवे. थोडे पुढे गेले की मग मॉब लिंचिंग.

माझे काही मित्र मुळात मांसाहारी असूनही आज व्हेगन झाले आहेत. पण त्यांच्या मध्ये ही श्रेष्ट्त्वाची भावना नसते. चुकून एखादा चिकन चा तुकडा तोंडात गेला म्हणून ते शुद्धीकरण करत नाहीत. आणी ते सिल्कही वापरत नाहीत, दूधही नाही. एखाद्याने विचारपूर्वक स्वीकारलेला शाकाहार व एखाद्याला केवळ कुटुंब परंपरेतून मिळालेला शाकाहार यात फरक आहे. योगायोगाने मूर्ती जर मांसाहारी घरत जन्मल्या असत्या तर ?

Please check at the end of that interview she says you can get to know everything about a person including his/her character once you know their food choices. This is more judgemental.

भिडेच्या पायापडण्यावर दिलेले स्पष्टीकरण खोटे की खरे माहीत नाही. व्हिडिओवरून ते खोटे आहे हे स्पष्ट होतेय असे मला वाटले नाही.

<<धादांत खोटे बोलण्याचा आणि शाकाहारी आहाराचा संबंध नाही आहे.... तो केवळ योगायोग समजायचा.>> ही कॉमेंट खोचक वाटली; जसे एखाद्या राजकीय घटनेवर समांतर रूपक लिहून याचा सध्याच्या राजकीय घटनेशी संबंध नाही मुद्दाम लिहीतात तसे.

आता मूळ विषयावर: आपली मुलाखत प्रसिद्ध होणार लोक बघणार हे स्पष्ट आहे.त्यात आवर्जून चमच्याबद्दल तसा उल्लेख करणे खटकले. जगभरातील समाजात ही एक समस्या आहे असे त्यातून सूचित होते.
मला काय आवडते काय नाही एवढ्यावर ते रहात नाही.
याच कारणावरून वसतीगृहात, शाळेत वाद झाले आहेत, वर विकुंनी याबद्दल लिहिले आहेच.

तिथे शाळेत मध्यान्ह भोजन बनवायला एक दलित महिला नेमली म्हणून उच्चवर्णीय मुलांनी (म्हणजे त्यांच्या पेरेंट्स नी) खायला नकार दिला. मूर्ती एका अर्थाने या वर्तनाचे समर्थनच करत नाहीत का? >>> मुर्तींने याचे समर्थन केले? कसे काय?

बाप रे! रेल्वेचा आख्खा डबा बुक करतात???-by हरचंद पालव
हाहा हा.
एका चानेलवर इझ्राएल मधले कुकिंग दाखवत होते ती बाई म्हणाली आमची मांसाचे पदार्थ करायची भांडी वेगळीच ठेवतो.

माणसाला जसं मागच्या जन्मातलं कर्म चिकटतं (असं मानलं जातं) तसंच चमच्यालाही आधीच्या वापरातलं अन्न जन्मभर चिकटून राहतं का?
चमचा घासल्याने, धुतल्याने ते जात नाही का? चमचा स्वच्छ असल्याशी कारण. मला प्रवासात स्वच्छ चमचा मिळाला नाही तर म्हणून मी माझा चमचा घेऊन फिरते म्हणालात तर कोणी काही बोलणार नाही. पण बापरे! या चमच्याने कधीतरी कोणी सामिष अन्न खाल्लं असलं तर! (नक्की काय होईल? धर्म भ्रष्ट होतो? मग तसं म्हणा. ) म्हणून मला तो चमचा नको हे लॉजिक कसं काय चालतं?//

चमचे भांडी तुमच्या घरी जितक्या नीटपणे धुतले जातील तितके बाहेर जातील असं नाही. त्यामुळे यात इतका काय इश्यू आहे कळलं नाही.
आणि तुम्ही मायबोलीवर पण सर्व्हे करून बघा. ज्यांच्या घरी नॉन व्हेज बनवतात- त्यांच्याकडेही दूध तापवण्याचे, चहा करण्याचे, तूप कढवण्याचे, कढवलेले तूप काढून ठेवण्याचे utensils हे designated असतील. ते भांडी स्वतः धूत असले तरीही.

आमच्या घरी नॉन व्हेज बनत नाही. तरीसुद्धा दूध, चहा, तूप इ.साठी भांडी ठरलेली आहेत. त्यामुळे हे उदाहरण चूक आहे.

त्यांची भीती चमचा नीट धुतलेला नसेल ही नाही. त्यांनी "मी शुद्ध शाकाहारी आहे. या चमच्याने आधी कोणी सामिष पदार्थ खाल्ला असेल तर? याची मला भीती वाटते" असं स्पष्ट म्हटलंय. यात चमचा नीट धुतलेला असला तरी हे स्पष्ट नाही का?

अवांतर- विकुंनी कर्नाटकात घडलेल्या ज्या गोष्टींबद्दल लिहिलंय त्याबद्दल कोणी सुधा मूर्तींना मत विचारलं असतं, तर मी एक सामान्य नागरिक आहे , मला याबाबत काही माहीत नाही, असं उत्तर येण्याची शक्यता आहे.

अवघडे तुमचं कुलकर्णी. मध्यान्ह भोजनाच्या इश्यूचं समर्थन मूर्ती करतात हे अगदीच लॉजिकला रानोमाळ भटकायला लावणारं बिनडोक विधान आहे. मतलब कुछ भी?

अहो तेच तर. चहाच्या भांड्यात तूप टाकलं, तुपाच्या भांड्यात चमचमीत भरली वांगी करून मग त्यातच बासुंदी केली- हे तुम्ही पण करत नाही. जरी भांडी स्वच्छ धुता येतात, कर्म चिकटावं तसा आधीचा पदार्थ चिकटून रहात नाही हे तुम्हाला अगदी छान माहित आहे तरीही.
आता हे तुम्ही करता तसं त्या बाईंना चमचा वेगळा न्यावासा वाटला तर काय झालं त्यात. असतात एकेकाच्या पद्धती किंवा सवयी.

ऑ? पुन्हा एकदा माझ्या प्रतिसादातलं एकच वाक्य उचलून तेच दळण पुन्हा? त्यांचे नेमके शब्द दिले तरी त्याकडे दुर्लक्ष?

पदार्थ शिजवायला लागणारं भांडं यांत स्पेसिफिकेशन असलं तरी तो वाढायला घेतलेलं ताट, खायचा चमचा यात नसतं. जेव्हा आमच्याकडे सामिष आहार व्हायचा तेव्हा आम्ही त्यादिवशी वेगळी ताटं वापरत नव्हतो. खीर खायला वेगळा चमचा आणि चिकन सूप साठी वेगळा असंही करत नाही.

काही मांसाहारी मटण, चिकन खातील पण अंड्याच्या वासानं नॉशिया येतो त्यांना. काही मांसाहारी मटण, चिकन, बीफ, पोर्क, सर्व प्रकारचे मासे खातील पण सापाचे सूप, तळलेले टोळ इ खाणं त्यांना नकोसं होईल.

काही शाकाहारी मांसाहारी घरात, मांसाहार करणार्‍याच्या मांडीला मांडी लावून आमटीभात चापून खातील आणि जेवताना कोणता चमचा , वाटी, ताट वापरलंय याचा विचार करणार नाहीत. तर काही शाकाहारी त्याबाबतीत अतिविचार करून स्वतःला त्रास करून घेतील.

To each their own.

माझ्यामते सुधा मुर्तींचे विधान हे त्यांचा पर्सनल चॉईस इतपतच समजले जावे. काहीजण त्यांच्या विधानाशी सहमत असतील, काहीजण असहमत असतील, काहीजणांना काहीच फरक पडणार नाही.

त्यांच्या या विधानातून फार गहन अर्थ काढून त्यामागची मानसिकता काय असेल यावर आपला मेंदू शिणवून पुढे ते विधान राजकारण, समाजकारण, दलित-ब्राह्मण वगैरेपर्यंत ओढून नेणे हे बळंच केलं जातंय असं मला वाटतं.

त्यांच्या या विधानातून फार गहन अर्थ काढून त्यामागची मानसिकता काय असेल यावर आपला मेंदू शिणवून पुढे ते विधान राजकारण, समाजकारण, दलित-ब्राह्मण वगैरेपर्यंत ओढून नेणे हे बळंच केलं जातंय असं मला वाटतं.,>>>बरोबर आहे पण लोकांचा वेळ तरी कसा जाणार Happy

आय आय टी तल्या त्या विद्यार्थ्यांचा आणि सुधा मूर्तींचा प्रॉब्लेम आपण वापरत असलेल्या ताट वाटी चमच्यात आधी कोणी मांसाहार केला असेल हा होता. लोकांनी उगाच त्याला स्वच्छतेची पुटं देऊन फाटे फोडले आणि गरज नसताना सारवासारव केली. उलट मूर्ती स्पष्टपणे आपला प्रॉब्लेम आणि चॉइस काय आहे ते सांगताहेत , हे उत्तमच आहे.

मी मूळ लेखात या विद्यार्थ्यांना पुढे परदेशातही अशा समस्येला तोंड द्यावं लागू शकतं असा मुद्दा मांडला होता. मूर्तींनी त्यावरही उपाय दिला आहे. त्या स्वतःचा शिधा घेऊन जातात आणि जिथे जातील तिथे रांधून खातात.

एखाद्या स्टील च्या चमच्याने कुणी नॉन व्हेज खाल्लं असेल तर तो कितिदाही धुतला तरी तो 'शुद्ध' होत नाही असे जर मान्य केले तर मग एखाद्या महिलेने नॉन्व्हेज बनवून खाल्ले तर मग तिने कितिदाही आंघोळ केली तरी ती 'शुद्ध' होत नाही हे मान्य करावे लागेल. आणी मग अशा महिलेने केलेला स्वयंपाक आम्हाला नको हेही मान्य करावे लागेल.

'हॉटेल्स मध्ये जेवण बनवताना हायजिन पाळले जातेच असे नाही, आणी म्हणून मी शक्यतो हॉटेल्स मध्ये खाणे टाळते' असं या म्हणाल्या असत्या तर कुणालाच काही प्रॉब्लेम नव्हता. 'लोक आपल्या घरातील भांडी नीट विसळतात की नाही याची मला खात्री नाही, म्हणून मी नेहेमी आपली ताट व चमचे नेते' हेही विधान आक्षेपार्ह नाही.

आपण सारे कदाचित फारच जास्त विश्लेषण करत आहोत पण त्यांनी असे विधान करायला नको होते. शिवाय 'You can know about a person by knowing about his food habits' असं त्या खरेच म्हणाल्या असतील तर ते मात्र नक्कीच निषेधार्ह आहे.

ट्विटरवर यावर बरंच काही बोललं जातंय. एरवी पुरोगामी म्हणून शिव्या खाणार्‍यां काहींनाही मूर्तींचं हे वक्तव्य वावगं वाटत नाहीए.

तिथे आलेला एक मुद्दा मला पटाला म्हणून इथे देतोय.

If one wants to convey that they are strictly vegetarian, they can say "only vegetarian" or "strictly vegetarian"

If you call yourself a "pure vegetarian" it's a value judgement on those who are not vegetarian.

मला यात काही फार जजमेंट वाटलं नाहीये खरं तर.(बहुतेक म्हणणारा कोणत्या परिस्थितीत, कोणत्या टोन मध्य म्हणाला यावर ते जजमेंट वाटणं न वाटणं अवलंबून असावं.).'शुद्ध गाढवपणा आहे' असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यातून 'गाढव शुद्ध, बाकी सगळे अशुद्ध' असा अर्थ न निघता '100% पूर्ण पणे गाढवपणा' असा अर्थ प्रतीत असतो(हा नुसता भाषा काथ्याकूट. मी स्वतः 'शुद्ध व्हेज' हे शब्द गेल्या 10-15 वर्षात वापरल्याचे आठवत नाहीये.)
काही म्हणा, न म्हणा, स्वतः खाता ते आंनदाने खा, समोर बसलेल्या दुसऱ्याला तो खातो हे आनंदाने खाऊ द्या हा मूळ मुद्दा. तिथे 'ए तुम्ही नॉन व्हेज वाले पलीकडे बसा रे' यात अर्थ आणि शहाणपण दोन्ही नाही.

> तुम्हाला बीफ करीच्या पातेल्यातला चमचा काढून तोच चमचा प्रसादाच्या शिऱ्यात घालून तो शिरा देवासमोर नैवेद्य ठेवायचा आणि मग स्वतः खायचा असंही स्वतःच्या घरात करता येईल
कैच्याकै उदाहरण . आणी हो, देव जर खराच वैदिक असेल तर नक्कीच प्रसन्न होईल. डी एन झा यांचे पुस्तक वाचा. Happy

सुधा मूर्तींच्या विधानांशी, त्यामागच्या विचारांशी अर्थातच पूर्णपणे असहमत आहे.
मांसाहारी लोकांनी उच्छ्वास सोडलेली हवा शाकाहार्‍यांना श्वास घ्यायला चालते ना अजून? Proud

यात थोडा व्यक्तीपूजेचा आणि दुसर्‍या बाजूने डोक्यात हवा जाण्याचा भाग वाटतो का कोणाला? म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करते आणि लोकांना नाव माहिती होतं. अशा व्यक्तीची तिच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरची मतं मननीय का असतील? सेलेब्रिटीज काय सर्वज्ञ असतात का? सुधा मूर्ती किंवा अन्य कोणी सेलेब्रिटी 'मला माझ्या कार्यक्षेत्राबाहेरचे प्रश्न विचारू नका, मला त्या विषयांतलं काही कळत नाही', किंवा 'माझा आहारविहार कसा आहे ही माझी व्यक्तिगत बाब आहे आणि मला माझ्यापुरती ठेवायची आहे, इट्स नन ऑफ युवर बिझनेस' असं स्वच्छ का सांगत नसतील? सुधा मूर्तींचे चमचे (काय भारी pun जुळला! वा! Proud ) त्यांनी त्यांच्या बॅगेत ठेवावेत!

Pages