मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."
इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्यांच्या वस्तीत मांसाहार्यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)
मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.
धन्यवादच.
"हे तर शाकाहारी पदार्थांबद्दल
"हे तर शाकाहारी पदार्थांबद्दल हि होते की. जास्त तीखट, जास्त मसाला, जळजळीत पदार्थ यात देखील अभिमान बाळगणारे आणी दुसर्याला कमी लेखणारे असतातच की."
याबद्दलही सहमत. तेही चुकीचेच आहे. (हे कमी तिखट खाणार्या घरातून 'झणझणीत' घरात आलेल्या सुनांबद्दल हमखास होतेच.)>>>+1
अवांतर:
एकदा आमच्या लेकाने उद्योग केले, डेटॉलची बाटली त्याच्या हाथून वेस्टर्न टॉयलेट मध्ये पडली.सुदैवाने त्या आधी कोणी टॉयलेटला गेले नव्हते त्यामुळे टॉयलेट तसे स्वच्छ होते आणि त्याने ती बाटली काढण्याच्या नादात फ्लश केले त्या बरोबर ती बाटली टॉयलेट च्या भोकात आतल्या बाजूला जाऊन इतकी विचित्र अडकली की त्यानंतर फ्लश करता येत होते आणि पाणी येत जात होते पण नीटसे होत नव्हते.त्यामुळे पुढे तिथे टॉयलेटला जाण्याची पंचाईत. त्याच्या कडून हे झाले (तेंव्हा 7 वीत होता) तर त्याला मी सहज म्हंटले की मग हाथ घालून काढ ती.तसे त्याचे 'ई मी नाही हाथ घालणार तिथे, घाण वाटते' हा सूर होता.मी म्हंटलं- 'नंतर स्वच्छ हाथ धू म्हणजे झालं किंवा प्लास्टिकची पिशवी हातात घालून कर' पण त्याला त्याची किळस वाटत होती.मला तो बाऊ करतो आहे असे वाटत होते.मग मी हाथ घातला ती बाटली शेवटी अर्धी फोडली दोन तिनदा आणखी फ्लश केले आणि बाटली जोर्यात खेचली तशी ती तिथून सुटून आत निघून गेली.नंतर आम्ही मुलाला 'अरे टॉयलेट साफ करणारे किंवा टॉयलेटची टाकी साफ करणारे टाकीत उतरतात की (काळजी घेउन) पण त्यांनी जर म्हंटलं 'ई वगैरे' तर मग काय होईल? ह्याचा तू विचार कर' वगैरे सांगून झाले.मग त्याला ह्या गोष्टी जे स्वच्छ करतात त्यांच्या काही बातम्या दाखवल्या.एकदा टीव्ही वर एका कार्यक्रमात अश्या लोकांची मुले समाजात वडील काय करतात विचारले असता हे त्यांचे प्रोफेशन नाईलाजाने लपवतात म्हणूनच एकदा अश्या एका पालकाचा बोलवून सत्कार केल्या गेला आणिक ते जरी पैश्यासाठी हे कार्य करत असले तरी हे इतर कामांसारखेच आहे आणि त्याच्याशी चिकटलेली जी लाज वाटणे/stigma आहे तो जावा म्हणून हा सत्कार केल्या गेला, त्या वेळेस त्यांच्या मुलाच्या डोळ्यातून आपल्या आई-वडिलांचा सत्कार झालेला पाहून आनंदाने डोळ्यातुन पाणी आले' हा किस्सा त्याला (मुलाला) सांगितला.
छान कंफर्टेबल कोंदणात राहिल्या मुळे हल्ली हे मुलांना पटकन जाणवत नाही.असो.
विमु,
विमु,
>>>> शासकीय धोरण मुलांना अंडी द्यायचे असेल आणि हे मंत्रीमहोदय असे म्हणत असतील तर ते चूकच आहे. शासकीय धोरणाप्रमाणे मुलांना अंडी देण्यात यावीत. >>>>
सरकारच्या महिला आणि बाळ कल्याण विभागाने , आदिवासीबहुल 3 जिल्ह्यात जिकडे मांसाहारी समुहाचे प्रमाण जास्त आहे, अंगणवाडीत अंडी देण्यात यावीत अशी शिफारस केली होती.
हा निर्णय घेतला जाऊ नये म्हणून जैन समुदाय (जो या जिल्ह्यात राहत नाही) यांनी दबाव आणला.
अंडी न देण्याचा निर्णय घेतल्या बद्दल जैन मुनींनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायचा मनोदय जाहीर केला,
उदाहरण दुसरे, दक्षिणेतील एक राज्य
2007 पहिल्या पार्टी चे सरकार, विशिष्ट समुदायांच्या दबावाखाली अंडी न देण्याचा निर्णय
2015 दुसऱ्या पार्टी चे सरकार , परत एकदा 2007 रिपीट
2017 अजून दुसऱ्याच पार्टी चे सरकार, बजेट मध्ये अंगणवाडी मध्ये अंडी देण्यासाठी तरतूद ठेवली म्हणून सरकार वर दबाव आणण्यासाठी निदर्शने, आणि इन्फ्लुएंसिल धर्मगुरूंची मुखमंत्र्यांविरुद्ध स्टेटमेंट्स.
हे सगळे काय दर्शवते? याला सध्या भाषेत शाकाहारी लोकांनी केलेली दादागिरी म्हणतात,
छान कंफर्टेबल कोंदणात
छान कंफर्टेबल कोंदणात राहिल्या मुळे हल्ली हे मुलांना पटकन जाणवत नाही.असो.>>>
फारच अवांतर, पण चांगला किस्सा, मुलांना हल्ली मुद्दामहून ग्राउंड रिऍलिटी दाखवावी लागते
हो हो सिम्बा 'फारच अवांतर' -
हो हो सिम्बा 'फारच अवांतर' - अगदीच मान्य...आपल्या कडे 'सोशल स्टीग्मा आणि त्याच्याशी जोडलेले किस्से' असा काही धागा मायबोलीवर आहे का जिथे प्रत्येकाला त्याच्याशी जोडलेले काही किस्से (फारच गंभीर स्वरूपाचे असे नाही) सांगता येतील?काही गोष्टींचा नाहक बाऊ कसा केल्या जातो हे सांगता येईल. किस्स्यातून सांगितल्या गेले तर कधी कधी पटकन पटते.
आठवत नाही, काढा धागा
आठवत नाही, काढा धागा
https://www.dailyo.in/variety
https://www.dailyo.in/variety/non-veg-food-iit-bombay-vegetarianism-cast...
हे वाचाच
To all the meat-eaters out there: THIS IS SPARTA!
There is “food” and there is “vegetarian food”.
दुहेरी. कोंबडीबोकडासाठी
दुहेरी. कोंबडीबोकडासाठी कळवळणारे वेजीटेरेरीस्ट्स वनस्पतीजन्य अन्नपदार्थांसाठी किती जीवहत्या होते हे मात्र साफ सोयिस्करपणे बगल मारुन बाजूला सारतात. जेव्हा एक बोकड मरतो तेव्हा किमान वीस पंचवीस लोक खातात. पण जेव्हा एक वेजीटेरेरीस्ट एक वेळ जेवतो त्यासाठी किमान शेकडो जीव गेलेले असतात. पिकांवर फवारली जाणारी औषधे कशाकशा पद्धतीने किटकांचे जीव घेतात हे बघितले तर कोंबडीबकरावर सुरा चालवणे जादा माणुसकीपूर्ण वाटेल.
हे वेजीटेरेरीस्ट केवळ पवित्रेच्या भावनेतून मांसाहरींना अमानुष ठरवण्यासाठी मोठी चळवळ उभारुन आहेत. त्याला प्रचार आणि प्रसारचे गोंडस नाव देऊन हा दहशतवाद एक्सेप्टेबेल होत नाही.
आपण शाकाहारी आहोत म्हणजे
आपण शाकाहारी आहोत म्हणजे काहीतरी उच्च आणि दुसरा मासांहार करतो तो अगदीच तुच्छ अशी भावना असतेच.
माझी कलीग. शाकाहारी. बरेचदा विषय निघाला की कस्काय खाता तुम्ही ईई करायची.
तिच्या सासरी सगळे खातात. पण माहेरी माळकरी की काय असल्याने खात नाहीत आणि त्यामुळे ती ही खात नाही. तर ते असो.
मग ती रोज 'सासु माझ्या मुलाला अंड देते. स्वतः खा आणि स्वतःच्या मुलाला काय ते घाला खायला. माझ्या मुलाला उगीच नै त्या सवयी लावतात.
कधी कधी तर काय घाण खातात. असंही बोलायची. मी बरेचदा टोकलं तिला.
ऑफिसात ती आणि एक गुजराती सोडुन आम्ही सगळे खाणारे असुनही तिला बोलायचं तारतम्य नसायचं. तर मी नेहमीच मुर्खांच्या नादी कशाला लागा म्हणुन सोडुन द्यायचे. (नोट : मुर्ख असं एखाद्याच्या अन्नाबद्दल म्हणते म्हणुन. शाकाहारी आहे म्हणुन नाही.)
तर मागे ठाणा का कळव्यात एका मुस्लिम माणसाने त्याच्याच फॅमिलीतल्या १२ की १४ जणांना ठार केलेली बातमी आली.
ऑफिसात विषय निघाला तर ही म्हणे 'हे लोक असेच असतात.
नाय नाय ती घाण खातात. नॉनवेज खातात त्यांची मेंटलिटी तशीच होते.
मी सांगितल्म्य माझ्या मुलाला की बघ नॉनवेज खाणारे असे असतात."
मी अवाक.
अंडं खाण्याबद्दल विरोध पूर्ण
अंडं खाण्याबद्दल विरोध पूर्ण चूक आहे.मागे एका व्हेगन ग्रुप वर पण यावरूनच बराच वाद झाला.
सध्या व्हेगनिझम बराच पॉप्युलर आहे.हॉलिवूड स्टार पण करत आहेत.बर्याच लोकांनी 'नॉन व्हेज/दूध म्हणजे अत्याचार, यावर कायदे आले पाहिजेत वाली भूमिका घेतली.त्यांना साधा प्रश्न विचारला की ज्याची रोजची कमाई 50 रुपये आहे असा माणूस तुमचं काजूचं दही आणि बदामाचं दूध कसं पिणार?किंवा रोजची प्रोटीन गरज दुधाचे पदार्थ मायनस करून स्वस्त पदार्थात मिळवायला लागणारे डायट नॉलेज कसे मिळवणार?
(मागे इथे व्हेगन धाग्यावर मी बरीच सपोर्टिंग भूमिका घेतली होती. वेट लॉस साठी मला व्हेगनिझम आकर्षित करतो.पण दुधाचा चहा ही बेसिक गोष्ट सोडण्याची तयारी अजून झालेली नाही.त्यामुळे इथली आणि त्या धाग्यावरची या दोन्ही भूमिका माझ्याच आहेत.रोलिंग स्टोन स्ट्रॅटेजी नाही.)
दोन वेळच्या खाण्याची ज्याला उणीव आहे, 6 रुपयांचे अंडे ज्याचे कुपोषण आणि मृत्यू टाळू शकेल अश्या गरिबा बाबत शाकाहार मांसाहार कल्पना ठेवून अंडे न देणे पाप आहे.(राईट एक्सपेक्टेड बिहेव्हीयर: पालकांचे समुपदेशन करणे.पॉवरफुल जैन/व्हेज लॉबी ने यात लोकप्रियता मिळवायला मुद्दाम कट्टर निर्णय न घेणे. अंडे इन्फेक्शन/शाळेत चुकीचे स्टोअरिंग, त्यातून मुलांना शिळी अंडी खाऊ घालून इन्फेक्शन/फूड पोयझनिंग हे टाळण्यासाठी अंडे नको असे निर्णय घेतल्यास तितकी प्रोटिन्स देणारे योग्य फूड(मसूर डाळ/तेलबिया/दूध /मल्टीग्रेन पीठ हे मुलांना मिळावे).
भारतातल्या भ्रष्टाचार, कम्युनिकेशन अनागोंदी, राजकीय अजेंडे यात हे थोडे विशफुल थिंकिंग वाटतेय.
पण ज्याला दोन वेळच्या
पण ज्याला दोन वेळच्या खाण्याची उणीव आहे, 6 रुपयांचे अंडे ज्याचे कुपोषण आणि मृत्यू टाळू शकेल अश्या गरिबा बाबत शाकाहार मांसाहार कल्पना ठेवून अंडे न देणे पाप आहे.>>>+1
Submitted by मेघपाल on 20
Submitted by मेघपाल on 20 January, 2018 - 10:17>>>तुम्ही जे मांडले आहे ते ज्याने ज्या आर्टिकल मध्ये मांडले होते त्यामध्ये बरेच लूप होल्स आहेत त्यावर बऱ्याच तज्ञ लोकांची परत भाष्य आहेत की हे असे नाहीये.
ह्या कोंबड्या, फ्याक्ट्री फेड फार्म animls ग्रेन खातात ते ही पेस्टीसाईड वगैरे वापरून उगवल्याच जाते की. शिवाय, हे नुसतच कोण किती मरतं वगैरे नाहीये...पण असो.
दुहेरी तुम का लिखा हमका कुच
दुहेरी तुम का लिखा हमका कुच समज नही आया. विस्तारसे बताइयो
मी_अनु, तुमचा हाही प्रतिसाद
मी_अनु, तुमचा हाही प्रतिसाद रुचला. खाणारा कुणी एक (कुपोषित आदिवासी मुलं, जी कट्टर शाकाहारी असतील याची शक्यता ०.००१% असेल. ) देणारं सरकार. आणि विरोध करणारे कुणी तिसरेच.
बरं विरोध करून पर्याय देण्याची आणि तो राबवण्याची गोष्ट दिसली नाही.
उद्या कोणी मांसाहारी मंत्रीने
उद्या कोणी मांसाहारी मंत्रीने येऊन सगळ्यांना अंड खायलाच पाहिजे असा आदेश काढला तर खपवून घेणार का?
मग मी शाकाहारी आहे मी मंत्री असे पर्यंत शाकाहारीच राहिले पाहिजे अश्या आदेशाला विरोध झाला पाहिजे..
अरे धागा थंड पडला! सगळी मजाच
अरे धागा थंड पडला! सगळी मजाच गेली मायबोलीवर यायची.
सगळे मांसाहारी लोक शाकाहारी झाले की काय???
पकोडा मॅन ने पकोडा खायला
पकोडा मॅन ने पकोडा खायला सांगितलं आहे.. रोजगार वाढवायचा आहे त्यातच देशहित राष्ट्रप्रेम आहे.
पकोडे खा आणि देशाचा जीडीपी वाढवा
शाकाहारी लोक , शाकाहाराची
शाकाहारी लोक , शाकाहाराची जबरदस्ती करतात, हे पटले बहुदा सर्वांना.
विक्षिप्त, सस्मित यांच्या
विक्षिप्त, सस्मित यांच्या प्रतिसादात वर्णन केलेले लोक जागोजागी भेटतात. अशांबद्दल आपलं काय मत?
प्रदीपके, विषयाला धरून असेल
प्रदीपके, विषयाला धरून असेल तरच प्रतिसाद द्याल का? धन्यवाद.
शाकाहारी pure आणि शाकाहारी
शाकाहारी pure आणि शाकाहारी नसलेले impure किंवा त्यांचे स्वभाव अमुक ढमुक हे देखील असे नाही.किती तरी नॉन शाकाहारी लोकांचे स्वभाव प्रेमळ आणि दुसऱ्याचा विचार करणारे आहेत.तसेच शाकाहारी लोकांमध्येही ही प्रेमळ आणि दुसऱ्याचा विचार करणारे लोक आढळतात त्यामुळे ह्या गोष्टीचा आहाराशी काही संबंध नाही.
सगळेच शाकाहारी लोक नॉन शाकाहारी लोकांवर जबरदस्ती करतात असे नाही.काही तसे असतील. पण तसे असले तरी नॉन शाकाहारी लोकांनी अश्या लोकांबद्दल वैमनस्य/द्वेष/ कटुता मनात ठेऊ नये आणि अश्या लोकांना समजवायचा प्रयत्न करावा, कधी तरी उमजेल त्यांनाही. Let's be positive.
शिवाय, संपूर्ण व्हेज लोक असेच असतात असा विचार करू नये.बरेच लोक तसे नसतात.
शाकाहारी लोक नॉन शाकाहारी
शाकाहारी लोक नॉन शाकाहारी लोकांवर जबरदस्ती करतात असे नाही.काही तसे असतील. पण तसे असले तरी नॉन शाकाहारी लोकांनी अश्या लोकांबद्दल वैमनस्य/द्वेष/ कटुता मनात ठेऊ नये आणि अश्या लोकांना समजवायचा प्रयत्न करावा, कधी तरी उमजेल त्यांनाही>>>>>
अरेच्च्या म्हणजे परत जबाबदारी नॉन वेज लोकांवरच???
अहो, नॉनव्हेज लोकांची अपेक्षा फार साधी आह
- आमच्या आहार सवयी वरून आम्हाला डिस्क्रिमिनेट केले जाऊ नये,
- आमचा आहार दुय्यम प्रतीचा असा प्रचार होऊन आम्हाला आमच्या आहार बद्दल ओशालवाने वाटू नये,
- पावित्र्य, शुचिता यांच्या कल्पना डोक्यात ठेऊन आमच्या आहारसवयी बदलायचा प्रयत्न होऊ नये.
TOO मच to ask फॉर??
यातही तुम्ही नॉनव्हेज लोकांनाच समजून घेण्याचा सल्ला देत आहात?
तेवढं कळतं हो सगळ्यांना. जे
तेवढं कळतं हो सगळ्यांना. जे असे नाहीत, त्यांच्याबद्दल आपण नाही बोलत आहोत. पण असं कोणी नाहीच, असंही नाही ना? उलट त्यांचं प्रमाण किंवा त्यांचा आवाज वाढला आहे, याचंच ही घटना द्योतक आहे.
जसं माझं अन्न हे पूर्णब्रह्म आहे, तसंच इतर प्रत्येकाचंही आहे हे प्रत्येकानेच लक्षात ठेवायला.
सिम्बा,
सिम्बा,
यातही तुम्ही नॉनव्हेज लोकांनाच समजून घेण्याचा सल्ला देत आहात?>>>
नाही दोघांनी समजून घ्यावे.इथे प्रॉब्लेम त्या काही शाकाहारी लोकांचा आहे जे डिस्क्रिमीनेशन करतात.माझ्या बोलण्यात हे उघड आहेच की त्यांचे ह्या बाबतीतले समज चुकीचे आहेत आणि त्यांनी ते बदलावेत.पण तसे होत नसेल तर त्यांना समजून सांगावे त्यांच्या मित्र वर्गातल्या इतर लोकांनी पण ह्या पलीकडे जाऊन कटुता ठेऊ नये, विरोध आणि स्टॅन्ड कायम ठेवावा.कारण कटुता ठेऊन फक्त परस्परांमध्ये वैमनस्य वाढेल आणि समजूत काढण्याची आणि अपेक्षित बदल आणण्याची संधी/शक्यता कमी होईल.
भरत,
भरत,
जसं माझं अन्न हे पूर्णब्रह्म आहे, तसंच इतर प्रत्येकाचंही आहे हे प्रत्येकानेच लक्षात ठेवायला.>>बरोबर
आणि हे ही बरोबर की काही ठिकाणी ही जबरदस्ती होत आहे जसे जैन लोकांचे हे म्हणणे की त्यांच्या पर्युशन काळामध्ये मटण बंद ठेवावे आणि वेगवेगळ्या पक्षांनी त्यांचा हा हट्ट मान्य करावा हे चुकीचे आहे आणि त्याचा विरोध झाला पाहिजे.
पण IIT Bombay च्या ह्या घटनेच्या बाबतीत अजून नीट खोलात शिरायला हवं की नक्की काय झाले कारण मी काही ठिकानी IIT Bombay मध्ये शिकणाऱ्या लोकांचीच ह्यावर जरा वेगळी प्रतीक्रिया वाचली.
दुहेरी, सस्मित यांचा प्रतिसाद
दुहेरी, सस्मित यांचा प्रतिसाद वाचा. दुसर्याला त्याची आहारपद्धती बदलायला सांगणं दूर. आधी त्याच्या आहाराला नावं ठेवणं, तुच्छ लेखणं बंद व्हायल हवं.
आता यात घासफुस म्हणणारे मांसाहारी येतील हे माहीत आहे. त्यांनीही हे लक्षात ठेवायला हवं.
दुसर्याला त्याची आहारपद्धती
दुसर्याला त्याची आहारपद्धती बदलायला सांगणं दूर. आधी त्याच्या आहाराला नावं ठेवणं, तुच्छ लेखणं बंद व्हायल हवं.>>
भरत,
मी दोन्ही बद्दल बोलते आहे.तुच्छ लेखणं आणि जबरदस्ती करणं ( जैन लोकाचे उदाहरण जबरदस्ती ह्या कॅटेगरीत येते).
ह्या बाबत मी परत सांगत नाही, नाहीतर तेच तेच परत सांगते आहे असे होईल.
IIT Bombay नी किंवा IIT Bombay च्या सगळ्याच हॉस्टेल मध्ये हे झालेले नाही त्यामुळे ते सगळे vegetarians असे नाहीत. हे 16 हॉस्टेल पैकी हॉस्टेल नंबर 11 मध्ये झाले,पोस्ट ग्रॅजुएट गर्ल्स हॉस्टेल.बऱ्याच IIT Bombayवाल्यांचे म्हणणे आहे की ही गोष्ट मेसच्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये मांडता आली असती आणि चर्चेने सोर्ट झाली असती.ती तशी झाली नसती तर मग पुढली स्टेप हवी होती.पण कुणीतरी मध्येच ते फेसबुक वर टाकले आणि पसरले, politicise झाले.
आता ही बातमी इतकी ट्विस्ट झाली आहे की IIT Bombay चे सगळ्या हॉस्टेल्स मधले व्हेजिटेरियन लोक असे करत आहे किंवा असेच असतात असा समज झाला आहे तसे होता कामा नये.
तुम्ही (भरत) सगळेच व्हेज लोक असे आहेत असे म्हणत नाही अहात हे मला ठाऊक आहे.
सर्वच व्हेगन लोक इतरांच्या
सर्वच व्हेगन लोक इतरांच्या आहाराला तुच्छ लेखत नाहीत.मी स्वतः व्हेगन नाही कारण दूध दही वगैरे ला पर्याय मुबलक आणि easily उपलब्ध असे पर्यंत व्हेगन पाळणे जड जाते.मी थोडं कमी करण्याचा प्रयत्न करते एवढंच.ते ही मला बऱ्याचदा जमत नाही.
पण तरीही मला पर्सनली त्यांचे म्हणणे पटते. besides, They are free to ponder and choose their life choices.
पण म्हणजे नॉन व्हेज वाले जे खातात ते तुच्छ असे अजिबात होत नाही.असे होत असेल तर ते चुकीचे आहे.
व्हेगन लोक नॉन व्हेगन लोकांना
व्हेगन लोक नॉन व्हेगन लोकांना महत्व पटवून कनविन्स करत असतील तर ते चुकीचे नाही जबरदस्ती करत असतील किंवा तुच्छ लेखत असतील तर ते चुकीचे.
जसे religious conversion हे महत्व पटवून देऊन समोरच्याला कनविन्स करून केल्या जात असेल तर त्यात काही हरकत नसावी.
दुहेरी. सर्वच असे नाहीत,
दुहेरी. सर्वच असे नाहीत, सर्वच तसे नाहीत वाले अर्गुमेन्त पोकल आहेत
व्हेगन लोक नॉन व्हेगन लोकांना
व्हेगन लोक नॉन व्हेगन लोकांना महत्व पटवून कनविन्स करत असतील
-> व्हेगन लोकांना का ही उठाठेव?
Pages