आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुधा ताई अशा काही म्हटल्याच नाही तर स्वप्नरंजन करण्यात काय अर्थ आहे? >>> असं कसं???? त्याशिवाय ब्राह्मण नेहमीच दलितांना कमी लेखतात या निष्कर्षापर्यंत कसं पोहोचणार?

'सुधाताईनी असं बोलायला नको होतं', 'त्या असं बोलल्या नसत्या तर बरं झालं असतं' अशा सौम्य शब्दात नाराजीही व्यक्त करू शकत नाही ?

आंबेडकर शाळेत होते तेव्हा गुरुजी प्रश्न विचारत व बरोबर उत्तर देणार्‍या मुलाला ते उत्तर फळ्यावर लिहायची संधी मिळत असे, आंबेडकर सोडून, कारण फळ्यामागे मुलांचे खाऊचे डबे ठेवलेले असत, चुकून त्याअंचा स्पर्श डब्यांना झाला तर ? धर्म बुडेल ना !. इथले अनेक जण तिथे असते तर 'असू द्या, आपण मुलांच्या कलाने घ्यावे', 'शिक्षण मिळते आहे ना सर्वांना ? मग बस', ' कशाला पराचा कावळा करताय', असे तर्क देऊन status quo चे समर्थन करत असते. मी ब्राह्मण आहे, कर्नाटकी. पण मी दलित असतो तर सुधाताईंचे विधान मला किती ऑफेन्सिव्ह वाटले असते त्याची कल्पना करू शकतो.

ते पुलंनी लिहिलेलं आहे तसं वाटतंय हे- पोपटाचं बोलणं मालक मालकिणीने आपल्या मनात आधीच धरलेलं असतं.
तसं पुरोगामी स्वतःच ठरवतात इतरांना काय म्हणायचं आहे व देतात ठोकून. बघा कसा सत्यवदेवचनालानाथा म्हणतोय.
वास्तविक एखादी कट्टर शाकाहारी बाई असेल तर तिचा नवरा, सख्खा मुलगा किंवा लाडका (उच्चजातीय) जावई जरी म्हणाला की आज मी चिकन बनवतो तर ती अटी घालेलच की हे पॅन वापर, ते नको, तो spatula घ्यायचा नाही वगैरे. जातीभेद कुठून आला त्यात.
आता या रेटने इथे मणिपूरच्या घटनेचं मूर्तीबाई समर्थन करतात, खैरलांजीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी नव्हे तर इन्फोसिस जबाबदार होते असंही बोलतील हे पुरोगामी लोक.थापाच मारायच्या तर काहीच लिमिट नाही. वेड्यांचा बाजार!

घरात लावलेला व्हिड्यो. मी बघितलेला नाही, पण बघायला अतिशय ओंगळवाणा आहे असं मत ऐकलं. म्हातार्‍या माणसांची मतं बुरसटलेली असतात त्यामुळे ग्रेन ऑफ सॉल्ट घेऊन त्यांच्या फार नादी लागू नये.
बाकी सध्याचं वातावरण बघता भारतात रहात असतो तर देखल्यादेवा भिडे समोर आला तर मी पण दंडवत घालीन. काळ सोकावला तर सोकवुदे. उद्या भिडेचे बजरंगी माझ्या आणि घरच्यांच्या मागे आले तर काय घ्या! भारतात कायदा आणि पोलिस आपल्यामागे किती असतील आणि त्यात आपली किती उर्जा जाईल बघता समाजसुधारक कोणी असेल तर त्याला पाठिंबा इतपतच माझा पर्सनल हात असेल. बाकी परिस्थितीशरण.

आय आय टी मुंबईत परत जाऊया.
IITB.jpg
हा होस्टेल १० च्या मेसवाल्याला लावलेल्या दंडाचा तक्ता आहे , असं कळतं.

भारतीय शाकाहारी लोक आपला अजेंडा चालवतात.
भारतात शाकाहारी लोकांपेक्षा मांसाहारी लोक खूप जास्त आहेत बहुसंख्य लोक आहेत ही.
त्या मुळे ह्या शाकाहारी लोक फक्त बोंब मारतील बाकी काही करू शकणार नाहीत .
पण असता मांसाहारी लोकांना पण त्यांचा अजेंडा आक्रक
पने रेटण्याची गरज आहे .
शाकाहारी लोकांना प्रवेश बंदी असे सरळ धोरण हवं.
युरोपियन देश मांसाहारी आहेत,मुस्लिम देश मांसाहारी आहेत.
तिथे येथील ढोंगी शाकाहारी अनधिकृत पने पण घुसघोरी करतात .
चोरांसारखी
तिथे त्यांना मांसाहार च त्रास होत नाही.

आम्ही शुध्द शाकाहारी लोक आहोत.
आम्ही मांसाहारी लोकांच्या कंपनीत काम करणार नाही.
आम्ही काही उत्पादन करत असू तर मांसाहारी लोकांना विकणार नाही.
अजून कोणी असा बोर्ड बघितला आहे का?
हे शाकाहारी व्यक्ती च दुकान आहे इथे मांसाहारी लोकांना प्रवेश नाही.
ज्या ट्रेन,विमानात मांसाहारी लोक प्रवास करतात त्या ट्रेन ,विमानातून आम्ही प्रवास करणार नाही.कोणत्याच मांसाहारी देशात आम्ही जाणार नाही.
ह्या अशा घोषणा हे नाटकी शाकाहारी कधीच करत नाहीत.
मांसाहार करण्यात हेच आघाडीवर असतात .
पण चोरून.
चीर कुठले

एकदा विमानात शेजारी एक गुज्जू म्हातारे आई बाबा आपल्या मुलाला भेटून परत चाललेले. सुरुवातीचे तास दोन तास माझ्याशी प्रेमाने बोलणारे मी जेवणात सामिष पदार्थ घेतले समजल्यावर त्यांनी एकदम बोलणंच बंद करून टाकलेलं. Lol

जास्त भाव द्यायचा नाही ह्यांना.
हे दुसऱ्याच्या भावना समजत नाहीत
ह्यांच्या भावनांची पण दखल घेण्याची गरज नाही

किती तरी रोग प्रतिबंधक लसी ह्या नॉनव्हेज च असतात.
सूक्ष्म जीवांचे जीव घेवून च त्या बनलेल्या असतात
कित्येक औषध नॉनव्हेज च असतात.
ते सर्व ह्याना चालत तेव्हा ह्यांची तत्व शेण खायला गेलेली असतात
Covid लस घेतली ना ह्यांनी .
ती काय भाजी पाल्या पासून बनवलेली होती का?

पण मी दलित असतो तर सुधाताईंचे विधान मला किती ऑफेन्सिव्ह वाटले असते त्याची कल्पना करू शकतो.
खर तर सुधा मूर्ती वर atrocity act च लावायला पाहिजे.पण ह्यात दलीत कसकाय दुखावले जातील? माझ्या एका दलीत मित्राच्या घरचे शाकाहारी आहेत तो एकटा सोडून. आई तर माळकरी आहे. माझ्या आज्जीला पण भांड्यांची मिसळा मिसळ चालत नाही. कदाचित सुधा मूर्ती ब्राम्हण असल्यामुळे आणि आपण कसं जातीपाती अजिबात मानत नाही हे दाखण्यासाठी टीका केली जातेय.

सुधा मूर्ती यांचं खानेमे क्या है, मी आधीच बघितलं होतं. साधारण देवकी यांच्याप्रमाणे माझं मत आहे.

मी किंवा आमची पूर्ण फॅमिली शाकाहारी आहोत, कांदा लसूण खातो पण कधी कधी व्हेज नॉनव्हेज एकत्र असलेल्या हॉटेलातही जातो, अगदी आई बाबाही यायचे, तिथे जाऊन शाकाहारीच जेवतो, तेव्हा असा संशय मनात आला नाही कधीच कोणाच्या. तरी मला सुधा मूर्ती यांचं एवढं काही खटकलं नाही, ते त्यांचं मत, संशय त्या पब्लिकली बोलल्या, मनात ठेवलं नाही. हे इतकं उगाच बोलतायेत असं क्षणभर वाटलं, मी ओन्ली व्हेज हॉटेल असते तिथेच जाते, एवढं म्हटलं असतं तरी चाललं असतं पण गप्पांच्या ओघात त्यांनी ते सांगितलं असं वाटलं.

बाकी त्यांचं काही लिखाण, कथा मला आवडल्यात. मला त्यांच्या एकंदरीत कामाबद्दल आदर आहे. मला त्या रामतीर्थकर बाई वगैरे वाटत नाही.

जाहीर पने मत मांडले की ते वक्तव्य सार्वजनिक होते.
त्या वर प्रतिक्रिया येणार च.
Pure non veg वाल्याना.
पनीर किंवा भाज्या बघून उल्टी येते.
त्यांनी पण असे जाहीर बोलावे का?
पनीर साठी वापरलेल्या चमचा आमच्या साठी वापरू नका

सुधा मूर्ती ह्यांचा खाने में क्या है वाला व्हिडीओ पुन्हा एकदा पाहिला. ज्यात त्या म्हणाल्या आहेत की त्या प्युअर व्हेज आहेत. अंडंही खात नाहीत, लसूणही नाही. त्यामुळे ‘मुझे डर क्या लगता है व्हेज और नॉनव्हेज को एक ही स्पून यूज किया है‘ ह्यात सर्व्हिंग स्पूनही असू शकतो किंवा जेवताना वापरला जाणारा चमचा. मला त्यांना सर्व्हिंग स्पून म्हणायचा असावा असं वाटतं. त्यांना तशी भिती वाटत असेल तर नॉनव्हेज खाणार्‍या लोकांना राग यायचं कारणच काय? त्यांनी त्यावर फक्त व्हेज रेस्टॉरंट्समध्ये जाणं हा मार्ग शोधला तर ते योग्यच आहे. त्यामुळे इथली वाट्टेल तशी भरकटत जाणारी चर्चा वाचल्यावर साधना म्हणाली ते पटलं.

सायोने चार पाच पानी झालेल्या चर्चेवर अगदीच थंड पाणी टाकलं >>> Lol हो. बाय द वे अमेरिकेत सर्व्हिंग स्पूनही वेगळा असावा असा नियम आहे. तो एन्फोर्स करणे अवघड असते व अनेकदा पाळला जात नाही.

आता मला चिकन आणि बीफकरता वेगळा सर्व्हिंग स्पून त्यांनी वापरावा असे वाटते. पण मी एखादा सीईओ झाल्याशिवाय माझी मुलाखत कोण घेणार? त्यापेक्षा अशा ठिकाणी मी व्हेज खातो.

लोल अमित. मायबोलीवर भरपूर लोकं जर्नल मेंटेंन करत असावीत असं वाटतं. सोशल मिडीयावर जरा काही खुट्ट झालं की लगेच जर्नलमध्ये नोंद. त्या जर्नलमध्ये सुधा मूर्ती असा एक वेगळा भाग पाडलेला असावा. मागे त्या कोणाच्या पाया वगैरे पडल्या तेव्हाची नोंद केली गेली असणार त्यात आणि मग आता त्या असं व्हेज नॉन व्हेज बोलल्या म्हणजे त्या ह्या लोकांच्या विरोधातच असणार, त्या पलिकडच्या लोकांनाच सपोर्ट करत असणार अशी आपली निरिक्षणं त्यात नोंदवून ठेवायची म्हणजे मायबोलीवर लिहितानाही सोप्पं जातं.

मी आत्ताच तो व्हिडिओ पाहिला. त्यांनी स्पून म्हणताना हाताने जी अँक्शन केली आहे त्यावरून सुद्धा कळतंय की त्यांना सर्व्हिंग स्पून च म्हणायचं होतं.
या धाग्याची मागची दोन तीन पानं म्हणजे 'वादासाठी वाद घालत राहणे' याचं उत्तम उदाहरण आहे.

>>त्यापेक्षा अशा ठिकाणी मी व्हेज खातो.>>
हो. हापिस पार्टी वगैरे ठिकाणी ते चीजचे तुकडे, मीट स्लायसेस, क्रॅकर्सवर मीट आणि चीज, ऑलिव्हज किंवा आर्टीचोक, बेरीज, सलामी असलं काही बाही अस्ताव्यस्त असतं. आणि ते चीज कापायला उचलायला काय त्या सुर्‍या कात्र्या असतात. त्यातुन आपल्याला हवं ते जवळच्या हंडीत (हो. हे सगळं वेडिंग केक सारखं तीन उतरंडींच्या स्तरांत ठेवलेलं असतं) सापडणे, ते उचलायला उपकरण असणे ते उचलुन आपल्या हातातील सपाट म्हणजे पार सपाट प्लेट मध्ये घेणे. दुसर्‍या हातात ग्लास धरलेला असणे. यातील कशाला कोणाला धक्का लागू न देणे आणि त्यात कोण दिसेल त्याच्याशी कसनुसं हसुन काही तरी वरच्या भेळे सारखंच अस्ताव्यस्त बोलणे.

सवय नसलेलं मीट खाल्लं की पोट असहकार आंदोलन पुकारतं. बरं वस्तूचे नाव लिहायचा स्तुत्य प्रयत्न जरी केलेला असला तरी फॅशनेबल काळ्या बारक्या पट्टीवर पांढर्‍या रंगात लिहिलेलं अक्षर सुधारण्याची नितांत गरज असते. बरं ते लिहिलेलं वाचता आलं तरी त्याचा नक्की अर्थबोध होतोच असं नाही. म्हणजे आपण मोदक लिहुन मारे मोदक ठेवले तरी जोवर 'कोकोनट स्टफ्ड स्वीट डंपलिंग्ज्स' असं कोथळा काढून भाषांतर करीत नाही तोवर फिरंगी लोकांस जसं काही समजत नाही अगदी तीच आपली गत होते. मग आपलं चीज आणि फ्रुट खावं फारतर क्रॅकरवरचं मांस आणि चीज. तो वरचा ऐवज नाही आवडला तर मोडून क्रॅकर तरी पोटात जातो.

मूर्ती बाई ठणकावून सांगू शकतात की ज्या ताट/वाटी/चमच्याने इतर कुणी मांसाहार/बीफ /डुक्कर/भात /पाव /लसूण/ काळ्या वाटण्याची उसळ (किंवा कुठलेही खाद्यपदार्थ ) खाल्ले असतील किंवा इतकेच काय मी स्वतः काही खाल्ले असेल (आठवा इमेल्डा मार्कोस - त्या एकदा स्वतः घातलेली पादत्राणे पुन्हा घालत नसत असे म्हणतात) तर त्या भांड्यात मी जेवणार नाही. त्यांच्याकडे इतका पैसा आहे की त्या कुठल्याही देशात स्वतःच्या विमानाने पाहिजेत तशी खोलीभर भांडी, स्वतःचे अन्न, पोर्टेबल किचन, पोर्टेबल डायनिंग रूम घेऊन जाऊन त्यात जेवू शकतात. त्यांची मर्जी. जोवर त्या त्यांचे फूड चॉइसेस इतरांवर लादत नाहीत तोवर इतरांना त्यांच्या जेवणात नाक खुपसायची गरज नाही.
बरं त्या तसे करतात हे आम्हाला आवडत नाही, म्हणून त्या जातीयवादी आहेत असे म्हणण्याचे स्वातंत्र्य सुद्धा लोकांना आहे. ब्रायन लारा डाव्या हाताने फलंदाजी करायचा म्हणून तो तद्दन फालतू, पाताळयंत्री आहे असे म्हणायला कायद्याने बंदी नसावी. ते किती गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. (ह्यावर जर अब्रुनुकसानीचा दावा झाला तर मात्र त्या दाव्याच्या नियमाप्रमाणे जे होईल ते होईल)

मला वाटलं मूर्तींचं इंग्रजी माझ्या इंग्रजीपेक्षा नक्कीच चांगलं असेल. सर्व्हिंग स्पून हा शब्दसमूह मलासुद्धा माहीत आहे. आणि अगदी मूर्ती जात असतील अशा 'प्युअर' व्हेज रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आमटीच्याच डावाने भात वाढा , भाजीच्याच डावाने खीर वाढा असले प्रकार होत असतील का?
आमच्याकडे प्रत्येक पदार्थ शिजवताना ढवळायला, परतायला वेगवेगळा डाव , कालथे इ. घेतात आणि त्यानेच वाढतात. तरीही हा प्रकार कुठे होत असेल तर हा माझा faux pas.

प्रश्न इंग्लिश चांगलं आहे की नाही हा नाही. बोलताना प्रत्येक वेळी सर्व्हिंग स्पून, खायचा स्पून असं सगळे अगदी स्पष्ट करतील असं नाही किंवा करावं असंही नाही आणि त्यावरुन इतका सुतावरुन स्वर्ग गाठायची गरजही दिसत नाही.
सगळ्यांच्याच घरी भाजी, आमटी, भात, गोड ह्याकरता वेगळे डाव/चमचे घेतात. पण सगळं व्हेजिटेरियन असताना आमटी, भाजीचा चमचा मिक्स झाला तरी माझी हरकत नसेल पण तेच घरातही नॉनव्हेज, व्हेज मिक्स झालेलं नको असेल.

आमटीच्याच डावाने भात नसेल, पण आमटीच्या डावाने उसळ किंवा दुसरी पातळ भाजी वाढतात बऱ्याचदा. एका ठिकाणी मी व्हेज सँडविच ऑर्डर केल्यावर कुकने चुकून आत चिकन घातलं होतं. मी ते त्यांना सांगितल्यावर त्यांनी ते काढून बाकीचं सँडविच तसच दिलं. हे बाकीच्यांना चालेलच असं नाही.

प्रत्येकाच्या आवडी ,निवडी वेगळ्या असतात..
मांसाहारी व्यक्ती असला तरी त्याला सर्व च मांसाहारी पदार्थ आवडतात असे नाही.
आपण मराठी लोक मासे,चिकन, बकऱ्या चे मांस,अंडी ह्या पलीकडे जात नाही.
चीन सारखे कुत्र्या , मांजराचे, किंवा गायी, म्हैस चे मांस आपल्याला बिलकुल आवडत नाही..एक प्रकारची घृणा अस्ते आपल्या मनात .
मनात थोडी जरी शंका आली की कुत्र्या,मांजराचा मांसा च चमचा चिकन साठी वापरला आहे तर
आपण जेवू शकणार नाही
ह्या मध्ये पण अनेक उपप्रकार पण आहेत
तसे शाकाहार विषयी पण आहे
काही ना काही डाळी बिलकुल आवडत नाहीत, काहीना पनीर बिलकुल आवडात नाही,काहीना आंबड चव बिलकुल आवडत .
नाही.
काही राई चे तेल बिलकुल आवडत नाही.
घृणा असते काही गोष्टी न ची...
राई च्या तेलाची शंका जरी आली तरी काहीना जेवण जाणार नाही.
असे हजारो प्रकारची लोक आहेत
घरात हे नखरे सांभाळता येतात
पण सार्वजनिक ठिकाणी इतके आवडीचे वैविध्य सांभाळा त येणे शक्य च नाही.
मांसाहारी,शाकाहारी .
हे दोन मुख्य प्रकार झाले .
पण उपप्रकार हजारो आहेत पण ह्या उपप्रकार ल धार्मिक द्वेषाचा वास नाही.
पण शाकाहारी,मांसाहारी ह्या मुख्य प्रकाराला मात्र धार्मिक द्वेषाचा वास असतो.
त्या मुळे प्रसिद्ध व्यक्ती ची ह्या विषयावरील वक्तव्य लोक गंभीर पने घेतात.आणि react होतात

एक म्हणजे ही सर्व डिबेट मणीपूर मधील चिघळत्या परिस्थितीवरून लक्ष उडवण्याचा प्रकार आहे. ट्विटर वर लोक्स ह्यात अडकून राहतात. ह्या इशूचे सायकल ट्वि ट र वर दहा दिवसांपूर्वी संपले असावे.

ह्या काकू मी प्युअर व्हेजिटेरिअन आहे लसूण सुद्धा खात नाही असे डिक्लेअर करतात तेव्हा त्याचा अर्थ मांसाहारी लोक इंप्युअर आहेत असा ही होतो. ते कोण लोक्स तर इतर जातीचे. भारतात अशी परिस्थिती आहे की बिहार मध्ये जमि नीत असलेल्या गोगलगायी शोधून खाणारा एक मान व समूह आहे. आर्थिक सामाजिक बाबीत मागे ढकलले गेलेले प्रिविलेज नसलेले लोक समुह त्यांना सापडेल ते खातात म्हणून ते इम्प्युअर होतात का? ते जजमेंट देणार्‍या ह्या कोण? ह्यांच्या साधेपणाचे पी आर एजन्सी द्वारे कौतूक भारतात पुश केले जाते त्याचा वैताग येतो. मग तूप कसे चालते सिल्क साडी लेदर बॅग कशी चालते ते सर्व अ‍ॅनिमल ओरिजिन आहे ना? असा पण एक मत प्रवाह ट्विटर वर पाहिला.

आज पासून पी आर एजन्सीने त्यांचा मुलगा बघा रोहन कसा ग्रेट व साधा. वडिलांच्या कंपनीत बॉस व्हायचे सोडून स्वतःची कंपनी काढली!! असे कौतूक फेसबुक ट्विटर वर छापून येउ लागले आहे. परदेशस्थ भारतीयांना ही रोजची कटकट फेस करावी लागत नसेल. ग्राउंड रिअ‍ॅलिटी वेगळी आहे इथे.

>> ह्या काकू मी प्युअर व्हेजिटेरिअन आहे लसूण सुद्धा खात नाही असे डिक्लेअर करतात तेव्हा त्याचा अर्थ मांसाहारी लोक इंप्युअर आहेत असा ही होतो. >> अजिबात सहमत नाही. हे म्हणजे उगाच आपल्याला हवेत ते अर्थ काढून धोपटणं सुरु आहे. तेव्हा चालू देत.

हा धागा वाचल्यावर माझ्या insta वर ही मला सुधा मूर्ती अणि चमचे controversy चे reels दिसायला लागले Lol

त्या reels mainly so called liberal किंव्वा सुधा मूर्ती यांच्या कॉमेंट्स च्या विरोधात असणार्‍या लोकांनी बनवलेल्या. अणि त्यावर अर्थातच त्या कशा काय चूक आहेत (त्यांच्या दृष्टीने) हे लिहिलेले. त्यावर दुसर्‍या बाजूच्या काही कॉमेंट्स वाचून मी थक्क झाले. काय की, मी आता KFC, मॅकडॉनल्ड यांना ban करणार, फक्त veg restaurants ना सपोर्ट करणार, तुम्ही म्हणता ना हे चूक आहे मग मी अजून कर्मठ होणार अशा त्या कॉमेंट्स. त्यामुळे काही मध्यम मार्ग नाहीच का, कोण एका बाजूने extreme तर त्यामुळे दुसरा दुसर्‍या बाजूस extreme असेच चित्र दिसते.

अशा क्षुल्लक कारणावरून controversy करून ज्यांना वाटतय की आपण जनजागृती करतोय त्यांना हे समजले पाहिजे की आपण अजून दरी वाढवतोय. एरवी लोक ही कॉमेंट ऐकून विसरून ही गेले असते. जिकडे खरच गरजेचे आहे तिथे खरोखरी लढा.

<<ह्या काकू मी प्युअर व्हेजिटेरिअन आहे लसूण सुद्धा खात नाही असे डिक्लेअर करतात तेव्हा त्याचा अर्थ मांसाहारी लोक इंप्युअर आहेत असा ही होतो>> लसुण खाणारेही इम्प्युअर आहेत असा पण नाही होत का? Lol
"ये हमारा (लहसून खानेवालोंकां )नही लहसून उगाने वाले किसानों का अपमान है!" असे ही पुढे म्हणता येईल. Lol

Pages