गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.
मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.
शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.
सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.
भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव
मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.
दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.
दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.
सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html
पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA
मेट्रो,{ पीएमटी} कार्पोरेशन
मेट्रो,{ पीएमटी} कार्पोरेशन बस, पसेंजर ट्रेन्स यांनी प्रवास करताना एक ठराविक मनोवृत्ती आणि सवड असावी लागते म्हणजे आनंददायक होते.
....तो रुट अस्तित्वात आहे का?
....तो रुट अस्तित्वात आहे का? असेल तर वापरली असती लोकांनी.>>
नाही आहे हे माहित आहे. पण मला म्हणायच होत कि मेट्रो आत्ता सुरु झाली आहे. हळु हळु expand होईल मेट्रो अशी आशा आहे. . सुरुवातीचे सगळे नीगेटिव्ह मेसेज वाचून वाटल कि लोक अगदी गृहित धरून चाललेत मेट्रो चालणारच नाही म्हणुन.
सुरुवातीचे सगळे नीगेटिव्ह
सुरुवातीचे सगळे नीगेटिव्ह मेसेज वाचून वाटल कि लोक अगदी गृहित धरून चाललेत मेट्रो चालणारच नाही म्हणुन.>>> हो निगेटिव्ह सुर वाचुन मला
मी_अनुच्या ललित लेखनातला तो सॉफ्टवेअर इन्जिनियर आठवतो काहीही नविन कल्पना मान्डली की " नाही वर्क होणार " म्हणणारा.
विषेश म्हणजे सोमिवर तर सध्या पुण्यात राहत नसलेले, कधिही राहायला जायचि शक्यताच नसलेल पब्लिक पण मेट्रोवर कशाला उगाच खर्च मत मान्डून मोकळे होतायत.
इंग्रजानी जी शहरे वसवली,
इंग्रजानी जी शहरे वसवली, एवढ्या जागा, मैदाने, उद्याने, मोठे रस्ते.... जेव्हा हे त्यांनी केले तेव्हापासून ते लगेच नफा देणारे प्रोजेक्ट्स होते का?
ब्रिटीशांच्या प्लानिंगची
ब्रिटीशांच्या प्लानिंगची तुलना नकोच.
त्यांनी बांधलेले (तेव्हांचे) व्हीटी स्टेशन पुढच्या शंभर वर्षांचे नियोजन करून बांधलेले होते. ते आजतागायत सेवा देतेय. बाहेरच्या कित्येक गाड्यांचा लोड घेतंय. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन सुद्धा. ससून हॉस्पिटल आजही पुणे जिल्हा आणि आजूबाजूच्या लाखो रूग्णांना सेवा देतंय. आपण स्वातंत्र्यानंतर असे प्लानिंग केलेले नाही. त्यांनी जेव्हढी हिल स्टेशन्स बांधली तेव्हढी आजही प्रसिद्ध आहेत. नवीन महाबळेश्वर काही अस्तित्वात आलं नाही. त्याचबरोबर त्यांचं प्लानिंग हे त्यांच्या मूव्हमेंटसाठी होतं. संपूर्ण देशाच्या विकासासाठी नाही.
पुणे मुंबई पट्ट्याचा त्यांनी विकास केला. आपण उत्तर प्रदेश, बिहार सोडाच विदर्भ, मराठवाडा इथेही विकास केलेला नाही. पानशेत धरण १९५० साली बांधलं. ते तेव्हांच्या पुण्याचा विचार करूनच. त्याचं प्लानिंग आणि डिझाईन ब्रिटीशांच्या काळात झालेलं आहे. ते आजही पुण्याला सेवा देतंय. त्या वेळच्या पुण्याच्या लोकसंख्येचा आणि भविष्यातल्या पन्नास वर्षांचा विचार त्यात केला आहे. आता कितीतरी वर्षे उलटून गेली आहेत.
रचनेपेक्षा जास्त भार पुण्याच्या लोकसंख्येन दिलेला आहे. इथे आता धरणासाठी जागा शिल्लक नाही. पुण्याची डेव्हलपमेंट या पेक्षा अधिकच्या लोकसंख्येसाठी होऊ शकत नाही हे राज्यकर्ते लक्षात घ्यायला तयार नाहीत.
माधव गोडबोले यांनी शरद पवार मुख्यमंत्री असताना हे स्पष्टच सांगितले होते. पण हट्टाने हिंजवडीचा प्रकल्प आला. त्या वेळी अनेक प्लानर्सनी वॉक टू वर्क कच्लरची सक्ती या प्रकल्पात असेल तर वाहतुकीवर ताण येणार नाही असे सांगितले होते. ही अट पूर्वीच्या प्रस्तावात नक्कीच होती. पण ती बिल्डर्सच्या दबावाखाली काढून टाकली. यातल्या कित्येक कंपन्या पवारांशी आणि राष्ट्रवादीशीच संबंधित आहेत. हिंजवडीमुळे येणा-या ताणाची आजची स्थिती बघता तिथेच क्वार्टर्सची सक्ती हा निर्णय दूरदर्शीपणाचा होता. मेट्रोची गरज पडली नसती.
चंदीगढ हे स्वतंत्र भारतातले पहिले सुनियोजित शहर आहे. स्वातंत्र्याच्या आधीचे जयपूर हे शहर आहे. शहराच्या यशाचे गमक त्याच्या प्लानिंगमधे असते. चंदीगढमधे कधीही ट्रॅफिक जॅम होत नाही. सहा लेनचे मुख्य रस्ते. त्याच्या पलिकडे एक लेन छोट्या वाहनांसाठी. त्या पलिकडे मोठे फूटपाथ. त्या पलिकडे त्या त्या सेक्टरमधल्या लोकांच्या वाहनांसाठी आणि सायकल्ससाठी रस्ते असे प्लानिंग असल्याने मुख्य रस्त्यावर त्या त्या सेक्टर्समधली वाहने येत नाहीत. पार्किंगला मुबलक जागा असते. सार्वजनिक वाहतूक म्हणजे बससेवा आहे. पुरेशा आहेत. बाहेरच्या लोकांची अजिबात गैरसोय होत नाही. सायकल रिक्षा आणि रिक्षाही आहेत. मेट्रोची गरजच पडत नाही.
थोड्या भागाचा विकास केला कि
थोड्या भागाचा विकास केला कि आजूबाजूच्या अविकसित भागातून लोंढे यायला लागतात. डेट्रॉईट हे शहर पूर्वी वाहन उद्योगाची पंढरी म्हणून ओळखले जायचे. पण त्याच्यावर आलेल्या ताणामुळे सर्व सेवा कोलमडल्या आणि डेट्रॉईट शहराचे स्टेटस हिरावून घेतले गेले.
मुंबईला डाईंग सिटी असे म्हटले जाते. पण या शहराची आश्चर्यकारक क्षमता आहे. ही एक जादूच आहे. कि रोज लाखो लोक येऊनही हे शहर अद्याप कोलमडलेले नाही.
याचे कारण मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आणि सहा धरण आणी तलावांची साखळी. मुंबईची लोकल ही एकरेषीय आहे. कारण मुंबईचा आकार हाताच्या बोटांसारखा आहे. त्यामुळे सेंट्रल लाईन, हार्बर लाईन आणि वेस्टर्न लाईन ही एकेका बोटाच्या मधून जाते. ती आजूबाजूच्या लोकांना पुरेशी आहे. लोकल स्टेशनापर्यंत चालत पोहोचणे सोयीचे आहे. प्रत्येक स्टेशनाबाहेर शेअर रिक्षा उभ्या करण्यासाठी, टॅक्सीज उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा आहे. शेअर रिक्षामुळे ज्यांना चालणे शक्य नाही त्यांची स्वस्तात सोय होते.
पुण्याचा आकार खोलगट बशीसारखा असल्याने हे मॉडेल इथे उपयोगी नाही हे केव्हांच सांगितले गेले होते. तसेच पुणे स्टेशन ते आकुर्डी पर्यंत आहे तो रेल्वे मार्ग का वापरता येणार नाही असे अनेक नागरिकांचे प्रश्न होते. सकाळी ११ पर्यंत दक्षिणेतून मुंबईला जाणार्या पाच ट्रेन्स येतात. त्यानंतर ताण कमी असतो. सकाळच्या वेळात सुद्धा लोकल्स साठी पुरेसा वेळ उपलब्ध आहे.
पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि खडकी इथे हब बनवून तिथून छोट्या गेजची ट्रेन सर्वत्र फिरवणे असा यावरचा उपाय होता. जे अस्तित्वात आलेले आहे त्याने दहा टक्के पुणेकरांनाही फायदा होणार नाही. जिथे मेट्रो प्रस्तावित नाही त्यांची वाहने रस्त्यावर येणारच आहेत. आहे त्या मेट्रोने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यावर वाहने उभी राहतात. मागे जॅम लागतो. पोलीस सुद्धा सकाळी नसतो.
याला नियोजन म्हणत असतील तर नियोजनाच्या व्याख्या बदलणे गरजेचे आहे.
मी पुण्यातच राहतो.
माझा प्रश्न वेगळा आहे.
माझा प्रश्न वेगळा आहे.
त्यात कुठल्याही सरकारचे, योजनेचे समर्थन करण्याचा हेतु नसून गुंतवणूक ताबडतोब रिटर्न्स देणारी असावीच का असा प्रश्न आहे.
आहे ती शहरे मोडीत काढून नवी बांधणे हा एक पर्याय आहेच.
ते पुढे केव्हातरी होईलही.
मेट्रो प्लॅनिंग मध्ये सुधारणा करण्यास वाव असेलच. त्या सर्व सुविधा देताना ताबडतोब नफा हाच क्रायटेरीया असावा का?
या प्रश्नाचे प्रयोजन ध्यानात
या प्रश्नाचे प्रयोजन ध्यानात नाही आले.
नफा तोटा आणि शहर नियोजन ,
नफा तोटा आणि शहर नियोजन , सार्वजनिक सुविधा यांचा कसा काय संबंध लावायचा ? जगातल्या अनेक वाहतूक सुविधा तोट्यात चालतात. तिथे सबसिडीच द्यावी लागते.
मेट्रो नफ्यात किंवा तोट्यात
मेट्रो नफ्यात किंवा तोट्यात चालणे आणि तिच्यामुळे वाहतुकीवरचा ताण कमी होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते.
मी दुसर्या दृष्टीकोणातून लिहीत आहे. नफा तोटा हा मुद्दा यात नाही येत.
नफ्यातोट्याचा इथं प्रश्नच येत
नफ्यातोट्याचा इथं प्रश्नच येत नाही याबद्दल शांत माणूस यांना अनुमोदन. शांत माणूस हे चांगली, मनापासून आणि पोटतिडकीने चर्चा करतायेत असं वाटतं.
---
शांत माणूस, (अशा नावाने एखाद्याला बोलावताना इतरांचा अपमान होईल की काय, याची भिती वाटते. पण आत्या नाव ठेवते तेव्हा आपल्याला काहीच कळत नसतं. त्यामुळे आता करणार तरी काय. असो.
); शहरांच्या क्षमता हा एक जबरदस्त अफाट विषय आहे. सतत बाहेरून येऊन राहणारे ती वाढवत राहतात, आणि खरा अंदाज कधीच येत नाही; असाही एक सिद्धांत आहे. पण हे जरा थोडे राजकारणात जाणारे असल्याने, आणि आपल्याला त्यात जायचे नसल्याने याबद्दल इथं काय बोलणार?
शहर पंजासारखं असो की ऑक्टोपससारखे. अमीबासारखे असो, की बुद्धीबळातल्या चौकटींसारखे. ते जंगलातल्या प्राण्यासारखे आपल्या सर्व भुका भागवण्याचा प्रयत्न, आणि तोही शक्य तितक्या 'लोकल' पद्धतीने करणार- हे अर्थातच आलं. यात नीती-अनीती, शिस्त-बेशिस्त, व्यवस्था-अराजकता हे सारं अजूनही अर्थातच येणार.
शहर लोकांसाठीच असतं, आणि ते तिथं येणारे + राहणारे लोकच घडवणार, त्यांच्या गरजा, राहणीमान आणि जगण्याच्या पद्धतीच घडवणार. (असं नसतं तर पुणे-मुंबई-पाटणा-रांची-कोची-कोलकाता-नोएडा-जयपूर-इंफाळ यासार्यांची व्यक्तिमत्त्वं सारखी दिसली असती. एकमेकाम्ची झेरॉक्स रोबोट शहरं म्हणून गणली गेली असती.)
---
पुण्यात 'पंजा'सारखी रचना नसून 'ऑक्टोपस'सारखी आहे. दोन्ही पद्धतींचे आपापले राडे आहेत; आणि प्लस पॉईंट्सही आहेत.
---
पुण्यातली प्रस्तावित मेट्रो जंक्शन्स -
१) शिवाजीनगर, स्वारगेट, स्टेशन, वनाझ, रामवाडी; एक्स्टेंडेड- कात्रज, निगडी (फेज १)
२) हडपसर, खडकवासला, चांदणीचौक, बाणेर, हिंजवडी, एक्स्प्रेसवे. (फेज २ (असं म्हणे))
३) याशिवाय पुणे मेट्रोला खुद्द पुण्यापेक्षा पिंपरीचिंचवड मध्ये एक्स्पांशन जास्त सोपे, व्यवहारी, आणि वेगवान होणार आहे. भविष्यातल्या पुण्याच्या वाढीलाही तिथेच जास्त स्कोप आहे, हे आताच दिसतंय. मात्र तिथली आताची परिस्थिती बघता 'हा काय अव्यवहार्य / मुर्खपणा सुरू केला तुम्ही? कोण बसणार तुमच्या मेट्रोत?' असे प्रश्न येतील.
आणि त्यानंतरच्या २५ वर्षांत मात्र त्याच ठिकाणी : 'कसली ही मेट्रो? धड जिने नाहीत. स्टेशनं ओळखू येत नाहीत अशी भिकारी. धड पार्किंग नाही. धड कनेक्टिविटी नाही. रिक्षांचा पत्ता नाही. टीसीने माझा फेस आयडी घेतलाच नाही. म्हणजे आम्ही काय दाढी वाढवायची नाही काय? आणि हो, पीएम्टी कुठाय?'
---
मुळात या सार्या टेक्निकल, भविष्यातल्या आणि आराखड्यातल्या गोष्टी आहेत- हे विसरता येणार नाही. मात्र, याआधी आपल्याच देशात हजारो ठिकाणी असंच काम झालेलं आहे- याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. बाकीचे सारे मुद्दे मला वाटतं माझ्या पहिल्याच पोस्टीत येऊन गेलेत..
नफा तोटा आणि शहर नियोजन ,
याशिवाय पुणे मेट्रोला खुद्द पुण्यापेक्षा पिंपरीचिंचवड मध्ये एक्स्पांशन जास्त सोपे, व्यवहारी, आणि वेगवान होणार आहे. भविष्यातल्या पुण्याच्या वाढीलाही तिथेच जास्त स्कोप आहे, हे आताच दिसतंय. . >>> याच्याशी सहमत. पण शहरं वाढत गेली तर आहे ही व्यवस्था लवकरच अपुरी पडेल. खेड शिवापूर, जेजुरी, सासवड इथपर्यंत पुण्याचा विकास होणार आहे. तिथे आताच मेट्रो असेल तर ठीक. पण डीपी मधे दिसत नाही.
(भलतंच कॉपी पेस्ट झालंय. याचा दोष मायबोलीला देता येत नाही.
हा कीबोर्डचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय).
मुळात एका शहरात किंवा जगभरात
मुळात एका शहरात किंवा जगभरात यशस्वी झाली म्हणून ती इथे होईल या फॅन्सी कल्पनेनेच सगळं वाटोळे झालं आहे
जंगली महाराज रस्त्यावर प्रचंड वाहतूक असताना रस्त्याच्या आकाराचे फुटपाथ बांधण्याचे काय प्रयोजन
पण ते कुठंतरी युरोपियन दौऱ्यावर जाऊन येतात आणि तिथले बघून आपल्या इथेही हवं म्हणून हट्ट धरतात
बरे तेही धड करतील तर तसेही नाही
हजारो कोटी खर्च करून 110 किमी चे सायकल ट्रॅक बांधले आणि कशात तर पेव्हर ब्लॉक मध्ये, यांच्या काकाने कधी असल्या रोड वरून सायकल चालवली होती
त्यात ड्रेनेज ची झाकणे, रस्ते मध्ये आडवे तिडवे
दोन तीनदा पडल्यावर मी गपगुमान सायकल ट्रॅक चा नाद सोडून देऊन रस्त्यावरून सायकल चालवू लागलो
ते ऑन पेपर सगळं प्लॅनिंग फार भारी वाटतं पण आजवर पुण्यातल्या योजनांचा इतिहास बघता धड चालणारी एकही योजना नाही
त्यामुळे मेट्रो चे कौतुक असले तर बाहेरच्या लोकांना
आम्हा पुणेकरांना त्याची धास्तीच जास्त आहे
इतक्या वर्षात लोकांना आपल्या वाहनाने प्रवास करायची सवय लागली आहे, ती मोडून त्यांना सार्वजनिक वाहनाने प्रवास करायची सवय लागायला वेळ लागणार
पण ते कोणी ध्यानी घेणार नाही वर बघा मेट्रो आली तरी हट्टी पुणेकर आपल्याच गाड्या घेऊन जातात गर्दी करायला असे नावे ठेवणार
इतक्या मरण्याच्या गर्दीत धूळ धूर ओकत जाणाऱ्या गाड्यातून वाट काढत जायला कुणाला हौस नाही पण पर्यायी सबळ व्यवस्था होत नाही ती काही वर्षे सुरळीत चालत नाही तोवर हे चित्र असेच राहणार
मग मेट्रो आणा किंवा मोनो रेल किंवा अजून काही
नियोजनाला दुर्दैवाने
आशुचँप +१
वाहन विकत घेणं ही सुरूवातीच्या काळात हौस किंवा स्टेटस सिंबॉल नव्हती. तर वेळेत पोहोचण्यासाठी नाईलाजाने हप्त्यांवर वाहने विकत घेतली गेली.
नियोजनाला दुर्दैवाने पुण्याच्या विकासात स्थान नाही. नवीन शहरं पुण्याला जोडून येणार, त्याचा ताण पुण्यावर येणार आहे. आंबेगाव, कात्रज, नर्हे, धायरी, किरकटवाडी, नांदेड सिटी याच्याही पलिकडे वस्ती चालली आहे. हा भाग पुणे महानगर प्राधिकरणात येतो. पुणे महानगर प्राधिकरणाच्या रीजनल प्लान मधे / डीपी मधे लोकल ट्रेन्ससाठी नियोजन नाही. रिंग रोडचे आहे. आहे तो रिंग रोड अजून अस्तित्वात आलेला नाही. या भागात दाट वस्ती होण्या अगोदरच चार पदरी रस्ते आणि भविष्यातल्या नियोजनासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुरेशी मोकळी जागा सोडणे गरजेचे आहे. हे केले नाही तर पुन्हा मलमपट्टीचीच वेळ येईल.
स्वतःशी सहमत होणं ही चांगली
स्वतःशी सहमत होणं ही चांगली गोष्ट आहे. त्याशिवाय पुढे कसे जाणार.
खेड शिवापूर, जेजुरी, सासवड >> हे खरं तर बाजारात तुरीच झालं, असं मला वाटत होतं. पण शिवापूरच्या टोलनाक्याजवळ एक हाऊसिंग सोसायटी उभारणारा आमचा एक मित्र 'कात्रज अॅनेक्स' अशी अॅड करतो आहे. आता त्याला चुकीचा तरी कसा ठरव्णार ?
व्यवस्था तिचा पिअर प्रेशर घेऊन पुढे चालत असते. तेव्हा ती शहराची 'कपॅसिटी' आहे की नाही असा विचार करत नाही. माणसं मात्र पाहिजे तेव्हा खेड-शिवापूर ला 'भयंकर रिमोट' म्हणतात, आणि पाहिजे तेव्हा 'अॅनेक्स' म्हणतात. असं तर सातारा महाबळेशवरअन लोणावळ्याला पन पुणे अॅनेक्स म्हणतील. ती ती ठिकाणं मात्र इतका विचार करताना दिसत नाहीत. आपल्यला झेपेल त्या स्पीडने आणि पद्धतीने विकास पावताना दिसतात.
काही काळापूर्वी कोथरूड किंवा
काही काळापूर्वी कोथरूड किंवा सिंहगड रस्ता बकाल होईल हे सांगूनही खरे वाटले नसते. पुण्यात लोक येत राहणार. आजूबाजूच्या उपनगरात येणारं पब्लिक हे सातारा, सांगली अशा सधन भागातून येत आहे.
पुणे फार फोफावलंय. पिंपरी
पुणे फार फोफावलंय. पिंपरी चिंचवडला पुणेकर पुण्यात धरत नसले तरी मी त्यास पुण्यातच धरतो.
जुन्या गावात गर्दी झाली की
जुन्या गावात गर्दी झाली की नवी वसाहत , हे पुरातन काळापासून आहे, उदा हस्तिनापूर इंद्रप्रस्थ.
नवीन वसाहत नेहमी दोन चार नव्या व्यवस्था घडवते.
काल एक व्हिडीओ पाहिला.
काल एक व्हिडीओ पाहिला. पब्लिक खूश वाटली. पण फक्त सहा किलोमिटर साठी जास्तच कोलाहल चालू आहे असे फीलिन्ग आले. आमची सेंट्रल लाइन बरी आणि घाटकोपर ते अंधेरी व पुढे मेट्रो बेस्ट आहे. इथे पन मोनोरेल किती वापरतात हा प्रश्नच आहे. हे कोथरूड ते डेक्कन अंतर मी एकेकाळी साध्या सायकल वरून भर पावसात वीस मिनिटात आलेली आहे. आता ते शक्यच नाही रोड खराब नी गर्दी फार. आता पूर्वीचे पुणे राहिलेले नाही. व्ह्याख्या विख्ही वुख्हू. पूर्ण झाले की एकदा वनाज ते जिमखाना व पुढे कार्पोरेशन जायचे आहे. बके ट लिस्ट आयटेम
ह्या मेट्रो मधून सायकल पण नेता येते. उतरल्यावर सायकल रेंट करता येते. व बोल्ट इ चार्जिन्ग ची सोय पण आहे. पब्लिक साधी होतकरू गरीब स्वभावाची व आनंदितच दिसली पायाभूत सुविधा हव्यात हो त्यांना. पन व्हिडीओ वाला उगीचच बडबड करतहोता. उगीचच साध्या इमारतींना काय हा व्ह्यू लै भारे वगिअरे बोलत होता. उगीच फुकट कौतूक.
ह्या मेट्रो मधून सायकल पण
ह्या मेट्रो मधून सायकल पण नेता येते. >> एका काकांनी नेली होती. त्यांना जागोजाही सुरक्षारक्षकांनी अडवले. त्यांनी वाद घातल्यावर सुरक्षापर्यवेक्षकांनी मेट्रो अधिकार्यांशी बोलून त्यांना सायकल नेऊ दिली. पण सायकल साठी वेगळी व्यवस्था नसल्याने लोकांना सायकल मुळे चढता उतरताना दुखापती होतात. मेट्रोतून सायकल नेता येईल हे विधान उत्साहात केलेलं असावं.
It was in the video! If
It was in the video! If everyone starts taking their cycle kaay hoil
नवी मुंबई सारखे शहर आपण वसवले
नवी मुंबई सारखे शहर आपण वसवले आहे .अगदी नियोजनबध्द आहे
खूप मोठी रेल्वे स्टेशन,मोठे रस्ते,सुनियोजित बिल्डिंग.
पण अतिक्रमण करणारी लोक आणि त्यांना साधं देणारे सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते ही कीड भारतात आहेच.
पण अतिशय उत्तम नवी मुंबई वसवली गेली आहे.
पुणे सासवड पर्यंत वाढणार च आहे .तिथे आताच कशी ही बांधकाम न होवू देता .
प्लॅनिंग नुसार बांधकाम झाली पाहिजेत.
मग त्या वाढलेल्या शहराचा बोजा पुण्यावर पडणार नाही.
उलट पुण्या वरील ताण कमी होईल.
12.5% भूखंड मूळ मालकाला विकसित करून देण्याचा नियम जो नवी मुंबई मध्ये वापरला तो पुण्याच्या परिसरात वापरला तर जमीन अधिग्रहण पण सहज होईल विरोध होणार नाहीं
फोल्डींगची साइकल बनवायला हवी
फोल्डींगची साइकल बनवायला हवी म्हणजे शहरात उपयोगी पडेल. कमीतकमी आडवे हँडल तरी काढता यायला हवे. सरकते जिने नसले तर मेट्रोची गर्दी आणखी कमी होईल.
भारतात सरकारी कारभार हा आंधळा
भारतात सरकारी कारभार हा आंधळा,कारभार आहे ते कोणत्या कायद्याने काम करतात .हे फक्त ते महान सरकारी यंत्रणा व्यक्तिरिक्त प्रतेक्ष विश्व निर्मात्याला पण सांगता येणार नाही.
https://www.amazon.in
https://www.amazon.in/Brompton-Bike-S6LU-RD-SP6/dp/B07R8SRY2Q
चर्चा बऱ्यापैकी चालली आहे.
चर्चा बऱ्यापैकी चालली आहे. शां मा ह्यांचे बहुतेक प्रतिसाद आवडले.
हेमंत ३३ यांचेही आवडले.
वर्धमान अशा शहरांत जुन्या भागात सोयीसुविधा निर्माण करण्यापेक्षा परिघावर भराभर वाढणाऱ्या वस्त्यांचे नियोजन करून तेथे रस्ते, रेल्वे, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, करमणुकीची साधने, इंडस्ट्रिअल झोन्स इत्यादि तातडीने उभारावे असे मला वाटते. जुन्या भागातल्या सोयीसुविधा जीर्ण झालेल्या असतात. तो भाग सोडून आधुनिक सुविधा असलेल्या भागात राहायला जाण्याचा सध्याचा कल आहे. जुन्या वस्तीतल्या जागांना व्यापारी उपयोगासाठी/मुळे चांगली किंमत येते.
शां मा ह्यांचे एक सोडुन सगळे
शां मा ह्यांचे एक सोडुन सगळे प्रतिसाद आवडले. फक्त पुणे - आकुर्डी लोकल लोकल ट्रेन बद्दल मात्र मी सहमत नाही. पुणे रेल्वे वर बराच ताण आहे. त्यात दुर पल्ल्याचा गाड्या, मालगाड्या , पुणे - दौड शटल आणि पुणे लोणावळा ट्रेन मुळे कोंडी होते. पुणे जंक्शन असल्याने तिन्ही बाजुने गाड्या येत असतात. ही कोंडी कमी करण्यासाठी दक्षिणेसाठी जाण्यारा काही गाड्या हडपसर वरुन सोडतात. दक्षिणेकडुन येणार्या गाड्या कितीतरी वेळा पुणे स्टेशन च्या बाहेर स्टेशन क्लियर होण्यासाठी उभ्या असतात.
पुणे हे मुंबई सारखे टर्मिनस नाही आणि पुण्यात मुंबई CST सारखे १७ प्लॅटफॉर्म नाहीत. Western railway सारखे वेगळे टर्मिनल नाही त्यामुळे पुणे आणि मुंबईची तुलना होउ नाही शकत.
बारामती - फलटण मार्ग झाल्यावर थोडा ताण हलका होईल . गोवा , कोल्हापुर कडुन मनमाड कडे जाण्यार्या गाड्या पुण्यात न जाता लोणंद - फलटण- बारामती - दौंड अश्या जातील. पण तो कमी झालेला लोड पुणे - दौड - बारामती साठी वापरात येणार आहे. पुणे- बारामती साठी आजुन एक लाईन टाकायचा रेल्वेचा प्लॅन आहे.
निगडी -कात्रज मेट्रो हा चांगला उपाय आहे. निगडी- पिंपरी - स्वारगेट -कात्रज मेट्रो झालयास त्याचा वापर बर्यापैकी वाढेल. ह्या मार्गावरील बसेस कायम भरुन जातात (जसे अंधेरी - घाटकोपर मध्ये ३४० बस भरुन जात होती ते ट्राफीक मेट्रो मध्ये जाउ लागले) . ही सगळी गर्दी मेट्रो मध्ये जाईल.
आमच्या साठी पण हा चांगला पर्याय होईल.
सायकलची लिंक पाहिली. एकूण
सायकलची लिंक पाहिली. एकूण किंमत पाहता आणि वजन ही जास्ती असावे. किंवा जमेलसं वाटत नाही.
पाच वर्षांत लोकांना सवय होईल. बाहेरून आत येणारे वाढतील. म्हणजे असं की मुंबई - चांदणी चौक - कात्रज बाह्य वळण मार्गे सातारा/कराड/कोल्हापूर (पुणे बाइपास) जाणाऱ्या बसने चांदणी चौकात उतरून मेट्रोने स्वारगेटला जाता येईल.
340 च्या रम्य आठवणी
340 च्या रम्य आठवणी

लांब लांब लांब लांब रांगा
मी तर त्यापेक्षा कांजूरमार्गवरून 396, 398 , 425 वगैरे पकडायचो
मरोळ , मरोशी , जरीमरी
काय नावे तरी एकेक !!!
ब्लॅककॅट +१. घाटकोपरला ३४०
ब्लॅककॅट +१. घाटकोपरला ३४० पकडण्यापेक्षा कांजुरला ३९६/४९६ इ. बर्या पडायच्या. ४९६ सीप्झ -मजासवाडी (एकेक नावात मजास हे आणखी एक टाका). वेस्टनएक्स्पेस जायची त्यामुळी साकिनाका वाचायचा आणि आणखी पटकन जायची.
#हापुण्याचाबीबीआहेइकडेबेस्टचीबडबडकशालाकरुनओरडूनये.
Pages