खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे

Submitted by कुमार१ on 13 February, 2022 - 01:39

शब्दखेळ हे विरंगुळा विभागाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहूच.

पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :

प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्‍या कोणीही नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.

१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.

२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.

३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.

४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.

५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आणि एकाच शब्दात उत्तर असलेला नसावा.
नमुना म्हणून मी एक सुरुवात करतो.

खेळ क्रमांक १
तुम्हाला एका दोन खोल्यांच्या घरात नेले आहे. दोन्ही खोल्यांमध्ये भिंत आहे. एका खोलीत असताना दुसऱ्या खोलीतील काहीही दिसणार नाही हे लक्षात घ्यावे.
पहिल्या खोलीत एका भिंतीवर ओळीने तीन इलेक्ट्रिक स्विचेस आहेत. मात्र इथे एकही दिवा बसवलेला नाही. यातीन स्विचेसनी नियंत्रित केलेले तीन वेगवेगळे दिवे दुसऱ्या खोलीत आहेत. प्रत्येक दिव्याचा स्विच स्वतंत्र आहे. पहिल्या खोलीत फक्त एक खुर्ची ठेवली आहे. त्या खोलीत असताना तुम्ही 3 स्विचेसची उघडझाप कितीही वेळा करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार ते स्विचेस चालू /बंद स्थितीत ठेवू शकता.

असे करून झाले की तुम्ही पहिली खोली सोडणार आहात व दुसऱ्या खोलीत प्रवेश कराल. एकदा का तुम्ही इकडे आलात की तुम्हाला पहिल्या खोलीत पुन्हा जायला बंदी आहे.

आता दुसऱ्या खोलीतील दृश्य पाहू. इथे घरात असते तसे सर्व फर्निचर आहे. इथल्या तीन भिंतींवर प्रत्येकी एक याप्रमाणे बल्ब बसवलेला आहे. तुम्ही पहिल्या खोलीत स्विचेसची जी अवस्था ठेवली असेल, त्यानुसार तुम्हाला आता हे बल्ब चालू किंवा बंद अवस्थेत दिसतील. आता याच खोलीत थांबून तुम्हाला सांगायचे आहे की -

पहिल्या खोलीतील कुठला स्वीच( क्रमांक 1, 2 व 3 सर्व) इथल्या कुठल्या बल्बला नियंत्रित करतो ?

चला तर, खाजवा डोकं आणि द्या उत्तर !
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे उगाच काहीतरी:
दिलेल्या अंकातून ABCD पैकी अल्फाबेट त्या क्रमाने घ्यायचे, शून्य असेल तर ओ घ्यायचे.
१. HAO ( Hao fountain syndrome )
२. OCD (Obsessive Compulsive Disorder)

३. HG ( Hyperemesis Gravidarum Sickness )

४. G ( G Syndrome )

सगळी रोग / आजारांची संक्षिप्त नावे.

पत्त्यांचे खेळ

१०८ - हा मला माहित नाही.
३०४, ७-८ आणि बदाम सत्ती हे खेळ माहित आहेत.

१०८
UNO पत्त्यांचा खेळ नेहमीच्या पत्त्यांमध्ये रुपांतरीत केला आहे.

एक जण सुटतो. बाकीच्यांच्या कडे उरलेल्या पानांचे गुण चढतात. अनेक डाव खेळत ज्याचे प्रथम १०८ होतात तो हरतो.

धन्यवाद
आधी मी अजून एक गट 2, 5, 3 हा पण ठेवणार होतो.
पण हा खेळ अगदी सर्वांनाच माहीत असतो. ( ५, ३ ,२ )
म्हणून मग तो काढून टाकला

१०८ >>> हा खेळ मी 1970 पासून खेळतो आहे.
परंतु ज्या UNO पत्त्यांवर तो आधारित आहे तो खेळ मला तीन वर्षांपूर्वी समजला !
uno.jpg

अष्टककुटुंब : सदस्य ओळखा

आठ जणांचे एक कुटुंब आहे. त्यातल्या प्रत्येकाच्या तऱ्हा पाहूया.

प, ब आणि ही दिवाणखान्यातली मंडळी.
प आणि ब तसे समानधर्मी आहेत. त्यामुळे त्यांची युती सहज होते. त्यापासून फ वेगळा पडतो. पण फ ला स्वतःच्या महत्त्वाची जाणीव असल्याने त्याचा तोरा वेगळाच असतो.

फ स्वतःला फार मोठा समजत असेल, पण चा माज अजूनच वेगळा. तो तर कायम मस्तीत असतो आणि रुबाबात सिंहासनावर बसतो !

हा महत्वाचा असला तरी पडला किरकोळ अंगकाठीचा. त्याची अवस्था लिफ्टमध्ये अडकून बसल्यासारखी झाली आहे.

माजघरामध्ये य, र आणि यांचे राज्य आहे. इथे र चे प्रस्थ चांगलेच आहे. आपणच तारणहार असल्यासारखा त्याचा रुबाब !
य आणि ल त्याच्या तोडीस येण्यासाठी युती करतात. ती पाहून र फक्त मंदस्मित करतो.

आठ जणांच्या कुटुंबात प्रत्येकाला एका गोष्टीची जाणीव आहे की, सर्वांच्या सहकार्यानेच कुटुंब टिकत असते. तरीसुद्धा प्रत्येकाला मनातून वाटते, मीच खरा महत्वाचा ! माझ्याशिवाय पान हलत नाही !!
……..

प ब - जबडे (वर ,खाली)
फ -जीभ
क -मेंदू
ख- स्वरयंत्र
य' ल- फुफ्फुसे
र- हृदय

मस्त!

जयू, छान प्रयत्न.
अपेक्षित उत्तरापेक्षा काहीसा वेगळा तर्क तुम्ही लढवला आहे ; हरकत नाही.

क >> अगदी बरोबर

य' ल- फुफ्फुसे
र- हृदय >>> हे प, ब आणि फ होते.
...
आता
य र ल काय असतील ?
ख >>> तिथेच वेगळे काय असेल ?

मेंदू हृदय फुप्फुसे यांच्या तोडीचे अन्य अवयव अपेक्षित आहेत.
म्हणून जबडा व जीभ नको

"प्रत्येकाला मनातून वाटते, मीच खरा महत्वाचा ! माझ्याशिवाय पान हलत नाही !!"
हे लक्षात घ्यावे.

यकृत बरोबर.
.....
थायरॉईड अपेक्षित होते.
कंठग्रंथी >>> अगदी योग्य शब्द मानव.

(पर्यायी) मणक्यातील मज्जारज्जूही चालेल.

दिलेले सर्व आठ अवयव हे जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत.
त्यातील कुठल्याही यंत्रणेने काम थांबवले तर बाकीच्यावरही त्याचा परिणाम होऊन जीवन संपते.
..
छान. समाप्त.

एका विशिष्ट यंत्रणेबद्दलची विविध माहिती खाली अंकरूपात दिलेली आहे.
गरज वाटल्यास अंकांचा क्रम बदलू शकता.
यंत्रणा आणि सर्व वैशिष्ट्ये ओळखा.

* ३, १, २
* ६
* ०, २, ०
* २, २

क्रिकेट
६ -- चेंडूंचे षटक
३, १, २ -- ३ यष्टी, १ चेंडू, २ बेल्स
२, २ -- २ पंच, २ फलंदाज

०, २, ० --- २०० -- चेंडूचे वजन / परीघ किंवा मैदानाचा व्यास ( ही फेकूमलगिरी आहे )

३ गट बरोबर.

६ -- चेंडूंचे षटक / षटकार ( एका फटक्यात न पळता मिळणाऱ्या सर्वाधिक धावा)

३, १, २ -- ३ यष्टी, १ चेंडू, २ बेल्स/ ( पळून काढायच्या धावा)

२, २ -- २ पंच, २ फलंदाज / २ संघांचे मिळून एकूण खेळाडू.
...
फक्त ३ रे राहिले

०, २, ० --- २०० -- चेंडूचे वजन / परीघ किंवा मैदानाचा व्यास ( ही फेकूमलगिरी आहे >>>
व ती फसली आहे ! चूक

शेवटची फेकूमलगिरी ---
०, २, ० --- २-०-० --- गोलंदाजीचे पृथक्करण -- २ षटके, शून्य धावा, शून्य बळी

दुसरे कोणी प्रयत्न करतेय का बघा नाहीतर तुमच्या वेळेला उत्तर जाहीर करा.... मी नंतर पाहीन.

पळून काढण्याच्या धावांना मर्यादा नाही. सहसा तीनच्या वर होत नाहीत, पण नियमानुसार मर्यादा नाही.

तिसरे : २० षटक सामना सुरू झाल्यापासून मी पाहिलेले सामने 0 Wink

Pages