खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे

Submitted by कुमार१ on 13 February, 2022 - 01:39

शब्दखेळ हे विरंगुळा विभागाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहूच.

पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :

प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्‍या कोणीही नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.

१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.

२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.

३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.

४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.

५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आणि एकाच शब्दात उत्तर असलेला नसावा.
नमुना म्हणून मी एक सुरुवात करतो.

खेळ क्रमांक १
तुम्हाला एका दोन खोल्यांच्या घरात नेले आहे. दोन्ही खोल्यांमध्ये भिंत आहे. एका खोलीत असताना दुसऱ्या खोलीतील काहीही दिसणार नाही हे लक्षात घ्यावे.
पहिल्या खोलीत एका भिंतीवर ओळीने तीन इलेक्ट्रिक स्विचेस आहेत. मात्र इथे एकही दिवा बसवलेला नाही. यातीन स्विचेसनी नियंत्रित केलेले तीन वेगवेगळे दिवे दुसऱ्या खोलीत आहेत. प्रत्येक दिव्याचा स्विच स्वतंत्र आहे. पहिल्या खोलीत फक्त एक खुर्ची ठेवली आहे. त्या खोलीत असताना तुम्ही 3 स्विचेसची उघडझाप कितीही वेळा करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार ते स्विचेस चालू /बंद स्थितीत ठेवू शकता.

असे करून झाले की तुम्ही पहिली खोली सोडणार आहात व दुसऱ्या खोलीत प्रवेश कराल. एकदा का तुम्ही इकडे आलात की तुम्हाला पहिल्या खोलीत पुन्हा जायला बंदी आहे.

आता दुसऱ्या खोलीतील दृश्य पाहू. इथे घरात असते तसे सर्व फर्निचर आहे. इथल्या तीन भिंतींवर प्रत्येकी एक याप्रमाणे बल्ब बसवलेला आहे. तुम्ही पहिल्या खोलीत स्विचेसची जी अवस्था ठेवली असेल, त्यानुसार तुम्हाला आता हे बल्ब चालू किंवा बंद अवस्थेत दिसतील. आता याच खोलीत थांबून तुम्हाला सांगायचे आहे की -

पहिल्या खोलीतील कुठला स्वीच( क्रमांक 1, 2 व 3 सर्व) इथल्या कुठल्या बल्बला नियंत्रित करतो ?

चला तर, खाजवा डोकं आणि द्या उत्तर !
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोनच स्विच चालू ठेवायचे , तिसरा आपसूक समजेलच ....

फर्निचर , खुर्ची इथे काही तरी आहे.....

सर, भारी आहे...

तिसरा आपसूक समजेलच ....
एवढेच बरोबर आहे पण स्विच क्रमांक १ व २ ची अचूक दिव्यांशी सांगड कशी घालणार ?
दोन स्विच चालू ठेवले तर दोन बल्ब पेटलेले असतील.
बल्ब वेगवेगळ्या भिंतीवर आहेत. ओळीने नाहीत

बहुतेकांना उत्तर माहीत आहे तर मग त्यात जरासा बदल करु या.

अगदी हेच कोडे फक्त फरक इतकाच की ते तिन्ही स्विचेस कॉल बेल सारखी स्विचेस आहेत. म्हणजे तुम्ही दाबले असताना स्विच ऑन असणार आणि सोडून दिले की बंद होणार.

आता सांगा कुठला स्विच कुठल्या दिव्याचा कसा ओळखाल.

मानव ठीक.
असे करायचे :
पहिला स्विच पाच मिनिटे दाबून धरायचा
दुसरा स्विच फक्त एक मिनिट दाबून धरायचा व तिसऱ्याला हातच लावायचा नाही

बरोबर!

तांत्रिकदृष्ट्या सर्व बरोबर करण्यास:
पहिला स्विच समजा ३ मिनिटे दाबून धरला, तो दाबून धरला असतानाच दुसरा स्विच सुद्धा १५-२० सेकंद दाबून धरायचा मग दोन्ही एकदम सोडून, लगेच दुसऱ्या खोलीत जाऊन .... पुढचे तुम्हाला माहित आहेच.

कोणाला मूळ प्रश्नाच्या उत्तराचे अजून स्पष्टीकरण हवे असेल तर तसे सांगावे.
नाहीतर एक तासाने पुढचे कोणीही देऊ शकता

कुमार सरांच्या कोड्यात चार बटणेही करता येतील.

उत्तरादाखल कुमार सरांच्या कोड्याचे उत्तर आणि मानवमामांच्या कोड्याचे उत्तर एकत्र करावे लागेल.
म्हणजे पहिले बटण १५ सेकंद. दुसरे बटण दोनेक मिनिट. तिसरे बटण मग चालूच ठेवावे आणि चौथे बंदच.

तांत्रिकदृष्ट्या ही सर्व उत्तरे अजून पर्रफेक्ट करायला हा बटण दाबायचा खेळ करण्याआधी थोडावेळ थांबावे लागेल. कारण सुरुवातीला बल्ब गरम आहे की नॉर्मल याची आपल्याला कल्पना नाही. ते आपण गृहीत धरलेय. त्यामुळे आधी तो नॉर्मल असेल याची शंभर टक्के खात्री करायला काही वेळ थांबणे गरजेचे.

ऋन्मेऽऽष
छान सूचना व सुधारणा.
एकमेकांच्या सहकार्याने खेळ असेच विकसित होत राहतात.
......
हा खेळ इंग्लिशमध्ये आहे त्यात तर मोजून दोन वाक्य दिलेली आहेत. मी काही कथानक मुद्दाम वाढवले. नाहीतर लोक अशी हरकत घेतात की, दिवे हे भिंतीवर खूप उंचावर बसवलेले असतात. तिथे हात लावून कसे बघणार, इत्यादी.
म्हणून तिथे फर्निचर आहे, म्हणजे खुर्ची वगैरे आहे. त्यावर उभे राहता येईल Happy

<<दिवे हे भिंतीवर खूप उंचावर बसवलेले असतात. तिथे हात लावून कसे बघणार, इत्यादी.>>
खरंय काही लोक अशी ऑर्ग्युमेंट्स करतात, पण त्याला अर्थ नसतो. जणु काही दिवा गरम होतो हे त्यांच्या लक्षात आले होते, फक्त वर हात कसा लावणार हे कळले नाही म्हणुन उत्तर दिले नाही.

एक सूचना
अजून चार तासांनी भारतीय प्रमाण वेळेनुसार नवीन दिनांक चालू होईल. त्यानंतर पुढचा खेळ कोणीही द्यावा.

शक्यतो दिवसाला एक खेळ ही मर्यादा ठेवूया. एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.

खेळ क्र २:

8,549,176,320
या रोमन अंकांमध्ये लिहिलेल्या संख्येची २ खास वैशिष्ट्ये ( unique features) सांगा.

मानव
एक वैशिष्ट्य अगदी बरोबर सांगितलेत !
आता दुसरे पण ओळखा Happy

यामधे रिपीट ना होता सगळे अंक आहेत म्हणजे 0 ते 9.
ही संख्या 2 ते 10 पैकी 7 सोडून सगळ्यांनी divisible आहे. पण या संख्येत 1 मिळवला म्हणजे या आकड्याच्या पुढचाच आकडा मात्र 2 ते 10 पैकी फक्त 7 ने divisible आहे.

नाबु
तुम्ही गणिताच्या दृष्टिकोनातून एक वेगळेच वैशिष्ट्य सांगितलेत. छान !
(असे वैशिष्ट्य असणारी कदाचित दुसरी संख्यासुद्धा निघू शकेल).

म्हणून अपेक्षित उत्तर वेगळे आहे. त्यात कुठलीही गणिती क्लिष्टता नसून एक रंजक भाग आहे.
बघा शोधायला जमतय का.
अपेक्षित उत्तर unique आहे.

इंटरेस्टिंग नाबुआबुनमा. मी चेक नाही केले पण तुम्ही व्हेरिफाय केल्या शिवाय लिहिले नसणार.

गणिताशी वाकडे नाही पण असे निरीक्षण मला हाती कॅल्क घेतल्या शिवाय नाही करता येणार. त्यामुळे उत्तर अशापैकी असेल तर माझा पास.

-----
कुमार तुमची पोस्ट नंतर वाचली. विचार करतो मग.

मानव
उत्तर अशापैकी बिलकुल नाही Happy
किंबहुना गणिती दृष्टिकोनातून विचार करूच नका.
ते रंजक आहे म्हणूनच हा प्रश्न घेतलेला आहे. इथे आपल्यापैकी कोणीही गणितज्ञ वगैरे नाही हे गृहीत धरूनच विचारले आहे Happy

प्रयत्न करणाऱ्यांना थोडी दिशा देतो.
पहिले वैशिष्ट्य सांगितले गेले आहे ते ठीक.
पण आता ही संख्या बघा
1234567890

या संख्येत सुद्धा ते पहिले वैशिष्ट्य आहे. मुद्दा असा आहे की, हे आणि अपेक्षित दुसरे वैशिष्ट्य असे दोन्हीही एकत्र असणारी प्रश्नातील संख्या आहे. त्या अर्थाने ती युनिक ठरते.

हा मुद्दा लक्षात घ्यावा

ऋन्मेऽऽष
तोडलेत !
अगदी बरोबर , छानच !!

किंबहुना गणिती दृष्टिकोनातून विचार करूच नका >>> असे जेव्हा येते तेव्हा दहा पैकी ८ वेळा हे असे स्पेलिंगचेच लफडे असते त्यामुळे लवकर क्लिक झाले Happy

आता ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र असणारी अन्य संख्या जर कोणी शोधून काढली, तर मग ती व्यक्ती थोरच म्हणावी लागेल !!

<<आता ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र असणारी अन्य संख्या जर कोणी शोधून काढली, तर>>
स्पेलिंग बदलणार नसल्याने सगळे अंक एकदा वापरून, स्पेलिंगचे केवळ पहिले अक्षर नव्हे तर पूर्ण स्पेलिंग सकट अल्फाबेटिक ऑर्डरने एकमेव उत्तरच येणार ना?

स्पेलिंगचे केवळ पहिले अक्षरच अल्फाबेटिक ऑर्डर करता धरले तर 54 हा 45 करून, 76 चे 67 करून, 32 चे 23 करून आणि या सगळ्यांचे विविध कॉम्बिनेशन करून वेगळी उत्तरे काढता येतील पण त्यात अर्थ नाही.

गुगल करून दुसरं उत्तर शोधलं होतं , लिहिलं नाही.
नाबुअबुनमा , भारी.

मानव , त्यासाठी कॅल्क्युलेटर लागणार नाही. डिव्हिजिबलिटी टेस्ट्स आठवा. फक्त सातने भागून पहावं लागतं.
तोंडी हिशोबाची सवय सुटली असेल तर कदाचित कठीण होईल.

Pages