खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे

Submitted by कुमार१ on 13 February, 2022 - 01:39

शब्दखेळ हे विरंगुळा विभागाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहूच.

पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :

प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्‍या कोणीही नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.

१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.

२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.

३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.

४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.

५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आणि एकाच शब्दात उत्तर असलेला नसावा.
नमुना म्हणून मी एक सुरुवात करतो.

खेळ क्रमांक १
तुम्हाला एका दोन खोल्यांच्या घरात नेले आहे. दोन्ही खोल्यांमध्ये भिंत आहे. एका खोलीत असताना दुसऱ्या खोलीतील काहीही दिसणार नाही हे लक्षात घ्यावे.
पहिल्या खोलीत एका भिंतीवर ओळीने तीन इलेक्ट्रिक स्विचेस आहेत. मात्र इथे एकही दिवा बसवलेला नाही. यातीन स्विचेसनी नियंत्रित केलेले तीन वेगवेगळे दिवे दुसऱ्या खोलीत आहेत. प्रत्येक दिव्याचा स्विच स्वतंत्र आहे. पहिल्या खोलीत फक्त एक खुर्ची ठेवली आहे. त्या खोलीत असताना तुम्ही 3 स्विचेसची उघडझाप कितीही वेळा करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार ते स्विचेस चालू /बंद स्थितीत ठेवू शकता.

असे करून झाले की तुम्ही पहिली खोली सोडणार आहात व दुसऱ्या खोलीत प्रवेश कराल. एकदा का तुम्ही इकडे आलात की तुम्हाला पहिल्या खोलीत पुन्हा जायला बंदी आहे.

आता दुसऱ्या खोलीतील दृश्य पाहू. इथे घरात असते तसे सर्व फर्निचर आहे. इथल्या तीन भिंतींवर प्रत्येकी एक याप्रमाणे बल्ब बसवलेला आहे. तुम्ही पहिल्या खोलीत स्विचेसची जी अवस्था ठेवली असेल, त्यानुसार तुम्हाला आता हे बल्ब चालू किंवा बंद अवस्थेत दिसतील. आता याच खोलीत थांबून तुम्हाला सांगायचे आहे की -

पहिल्या खोलीतील कुठला स्वीच( क्रमांक 1, 2 व 3 सर्व) इथल्या कुठल्या बल्बला नियंत्रित करतो ?

चला तर, खाजवा डोकं आणि द्या उत्तर !
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व सहभागी आणि यशस्वी मंडळींचे अभिनंदन व आभार !
हा खेळ तयार करतानाचे आणि उत्तरांमधून जे काही समजले त्याचे अनुभव जरा वेळाने लिहितो.

छान आणि नवीन प्रकार.

उच्चरक्तदाब आणि उच्चरक्तचाप यातील कोणता शब्द बरोबर आहे? आणि भाषेच्या दृष्टीने दोन्ही बरोबर असतील तर यातील वैद्यकीय भाषेत प्रचलीत शब्द कोणता?

यावेळेस ठरवले होते कि जालावरील कुठलीही मदत न घेता स्वतः खेळ तयार करायचा. म्हणून आरोग्यसंबंधी एक सामान्य परिस्थिती उभी केली.

सुरुवातीला फक्त तीन निकष घेतले होते - वरचा रक्तदाब, नाडीचे ठोके आणि श्वसनगती. खालचा रक्तदाब आणि नाडीचे ठोके या दोघांचे अंक जवळपास असतात. त्यामुळे वाचकांचा गोंधळ होऊ शकतो असे वाटले होते. पण नंतर विचार केला की, उलट असा एखादा निकष मुद्दाम ठेवला पाहिजे. म्हणून मग चौथा निकष ठेवून अंकांमध्ये पुरेसा फरक ठेवला.

खेळ तयार झाला तेव्हा मला वाटले आता सगळे परिपूर्ण आहे. पण तेवढ्यात लक्षात आले की, कुटुंबवैद्याकडे थर्मोमीटरने ताप पाहणे ही साधी तपासणी देखील केली जाते. तेव्हा तापमान हे उत्तर नको असेल तर तो मुद्दा आधी माहिती देऊनच वगळून टाकला पाहिजे. तसेच तापमान हा निकष मुद्दाम घेतला नाही कारण ती मोजण्याची सेल्सियस व फारनहिट ही दोन परिमाणे असतात आणि त्यांचे अंक पूर्ण वेगळे आहेत. यातून सोडवणार्याचा प्रचंड गोंधळ झाला असता. ठीक आहे. इथपर्यंत झाल्यावर वाटले आता नक्की परिपूर्ण आहे. म्हणून ते सादर केले.

पण अर्ध्या तासाने डोक्यात विचार आला की सर्व अंक हे कुठलीही परिमाणे न देता आपण लिहिलेले आहेत. तेव्हा त्यातील काही अंकांचा वजन व उंची या निकषांशी गोंधळ होऊ शकतो.
पण आता तो मुद्दा विशेष मनावर घ्यायचे कारण नव्हते. कारण, एकूण संपूर्ण रोगनिदान कथेमध्ये वजन आणि उंची हे पुढे बसणारे नव्हते आणि तसेही उंचीची मोजणी सामान्य दवाखान्यात केली जात नाही.

अनिल व विजय यांना माहितीमध्ये मुद्दामच समवयस्क ठेवले होते म्हणजे त्यानुसार वाचकाला कुठलाही भेद करता येता कामा नये.
….

खेळावर जो अगदी पहिला प्रतिसाद आला होता त्यात कोलेस्टेरॉल, ड जीवनसत्त्वाची पातळी इत्यादी गोष्टी लिहिल्या होत्या. वास्तविक माहितीमध्ये सामान्य तपासणी हे ठळकपणे नमूद केले होते. तरीसुद्धा असा प्रतिसाद वाचल्यानंतर मला एक समाधान वाटले ते अशासाठी, की या मोजणी जर आता सामान्य लोकांमध्ये 'सामान्यज्ञान' म्हणून स्वीकारल्या गेल्या असतील तर ते आरोग्य जागरुकतेचे चांगलेच लक्षण आहे !

उच्चरक्तचाप -- हिंदीत आहे.

खेळ संपला आहे मी येईपर्यंत, पण आलीच आहे तर अजून एक शक्यता वाटतेय ती लिहीते.
निकष अ, ड -- रक्तदाब
निकष ब -- वजन किलोत
निकष क -- BMI

अनिल -- ९८/१६८, ९२ किलो, BMI ४३
विजय -- ७८/११७, ५६ किलो, BMI १६

अनिलचे निदान -- उच्च रक्तदाब + अति लठ्ठपणा

यात १२ अक्षरे होतात.
पण १२ पैकी फक्त एक स्वर, तीन जोडाक्षरे, बाकी व्यंजने ही अट जमली नाही. २ स्वर झाले;

कारवी यांच्या उत्तरावरून एक योगायोग.
वजन आणि BMI वरून विजयची उंची येते जवळपास सहा फूट. आणि वरून विजय हे नाव म्हटले तरीही आठवतो अमिताभ.

अनिलची उंची येते 4'9". मुकरीची उंचीही एवढीच.

मुकरी आणि अमिताभही एकाच वयाचे.

अतिरोड झालेला अमिताभ आणि अतिलठ्ठ झालेला मुकरी डॉक्टरांकडे आलेत.

कारवी,
प्रयत्न छान. पण....
१. कुटुंबवैद्याने शरीर तपासणीच्या ज्या मूलभूत गोष्टी करायच्या असतात त्या म्हणजे : नाडीचे मापन, रक्तदाब, तापमान आणि श्वसनगती. (वैद्यकातील व नर्सिंगमधील प्राथमिक शिकवण)

२. वजन, उंची , बी एम आय हा एक स्वतंत्र गट बनतो, जो वरील ४ पुढे दुय्यम ठरतो.

३. सामान्य दवाखान्यात बीएमआय काढणे ही प्रक्रिया होत नाही Happy ते उद्योग तज्ञ विभाग किंवा आधुनिक व्यायामशाळामध्ये होतात. उंची न मोजता फक्त बी एम आय देणे बरोबर वाटत नाही.
..
खेळातील संपूर्ण वातावरण/माहितीचा साकल्याने विचार व्हावा.

काढली होती उंची Happy
एक ५ फूटपेक्षा कमी, एक ६-२
...... काही गुज्जु असतात की छोटे, गोलमटोल
पुन्हा तो BMI १६ म्हणजे निरोगी नव्हेच... पोषणाची कमतरता असेल.
६-२ मध्ये हाडांचेच वजन कितीतरी जास्त भरेल

*******
कुटुंबवैद्य आस्थेने वजन कमी कर (नजरेच्या अंदाजाने) बाबा बाकीचे त्रास वाढतील,; रक्तदाब आकडा तसे सुचवतोच आहे --- म्हणेलच की.
कुटुंबवैद्य वजन मोजतो. उंची आपली आपल्याला माहिती असते की आणि त्यावरून BMI.
नित्य प्रक्रिया नसली तरी काढता येईल तिथे दवाखान्यात. घरगुती सल्ल्याला शास्त्रीय आधार.

श्वसनगती निकष मला आजच कळला. माझी नाही कधी मोजली गेली आजवर.

आधी तर ३४, १६ हे आकडे ---- न्याहरी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यातील बाहेर किती होतात महिनाभरात
असाही प्रश्न सुचला होता. पण त्यावरून आजारपण काय लिहीणार म्हणून BMI घेतला.

एकदा उत्तरे दिसू लागल्यवर काय करणार.....पुढचे कोडे येईपर्यंत दिलेल्या माहितीशी चाळा....... दुसरे काही नाही Happy

खेळावर जो अगदी पहिला प्रतिसाद आला होता त्यात कोलेस्टेरॉल, ड जीवनसत्त्वाची पातळी इत्यादी गोष्टी लिहिल्या होत्या. वास्तविक माहितीमध्ये सामान्य तपासणी हे ठळकपणे नमूद केले होते. तरीसुद्धा असा प्रतिसाद वाचल्यानंतर मला एक समाधान वाटले ते अशासाठी, की या मोजणी जर आता सामान्य लोकांमध्ये 'सामान्यज्ञान' म्हणून स्वीकारल्या गेल्या असतील तर ते आरोग्य जागरुकतेचे चांगलेच लक्षण आहे !>>

हे माझ्या पहिल्या प्रतिसादामधे लिहिले होते पण नंतर नीट वाचल्यावर लक्षात आले की प्रयोगशाळेतील तपासणी नाही Happy
उंची, वजन, ब्लड प्रेशर यांचा विचार आला पण नंतर व्यग्रतेत इथे यायचे राहून गेले.

छान कोडं.

...
अतिरोड झालेला अमिताभ आणि अतिलठ्ठ झालेला मुकरी डॉक्टरांकडे आलेत. >>> Lol

चीकू ,
हरकत नाही. मजा आली.

सध्या मभा दिन सप्ताह चालू असल्यामुळे एक छोटीशी सूचना करतो.
व्यस्ततेत >>
हे एवढं व्यग्र करावे.
त्या चलभाष्यवाल्या कंपन्यांनी "व्यस्त" चा फार चुकीचा पायंडा पाडून ठेवला आहे.....

हे एवढं व्यग्र करावे.
त्या चलभाष्यवाल्या कंपन्यांनी "व्यस्त" चा फार चुकीचा पायंडा पाडून ठेवला आहे.....>>

बरोबर! बदल केला आहे Happy

अजून एक कोडे आहे माझ्याकडे पण मागचे कोडे मीच दिले असल्याने आता इतरांना संधी देईन. ते पुढे नंतर कधीतरी देईन इथे.

बदल केला आहे>>> धन्य.
जरुर द्या २-३ दिवसांनी !
......
उद्याचा नवा गडी कोण ? Happy

मभा दि उपक्रम चालू झालेले आहेत.
म्हणून या धाग्यावर तीन दिवस स्थगिती द्यायची का, यासंबंधी आपले मत सांगावे

तुम्ही देणार होतात ना? राजकन्यावरून काही नवीन सुचलेले...
चीकूंकडे पण एक आहे; पण ते सलग नको म्हणून थांबलेत.
स्थगितीही चालेल... २-३ दिवस तिकडे कार्यक्रम असतील. घातले कोणी तर सोडवूच

मी बनवत होतो ते अडकलंय जरा. एका कंडिशनमुळे.
अजून विचार करावा लागेल. आणि जमलं तरी ते सुद्धा तसेच लॉजिक कोडे असणार म्हणुन एवढ्यातच देण्याचा विचार नव्हता.
बघतो दुसरं कुठलं आठवलं तर देतो.

ठीक.
तर तो पर्यँत सहजच:

चीकू यांचेच कोडे घ्या. ज्यांना त्याचे उत्तर नीट कळले नाही त्यांच्या करता, (किंवा ज्यांना कळले आहे त्यांच्या करता सुद्धा, वेगळा तर्क लावून.):
त्यातील असलेले नियम तेच नियम:
१. प्रश्न असा असावा ज्याचे उत्तर "हो" किंवा "नाही" या पैकी कुठलाही एक शब्द वापरून देता आले पाहिजे.
२. निरुत्तर करणारा प्रश्न चालणार नाही.
३. प्रत्येक प्रश्न कुठल्याही एकीलाच उद्देशून केला पाहिजे आणि जिला उद्देशून केला तीच उत्तर देईल.

फरक:

  1. एका ऐवजी आता दोन प्रश्न विचारण्याची मुभा आहे.
  2. दोन्ही प्रश्न एकीलाच विचारले तरी हरकत नाही, वेगवेगळ्या बहिणीला एक एक विचारला तरी हरकत नाही.
  3. एका प्रश्नात अनेक उपप्रश्न असू शकतात, उत्तर मात्र एका शब्दात "हो" किंवा "नाही" देता आले की झाले.

उद्देश तोच, मधली नको, थोरली किंवा धाकटी पैकी एक निवडायची.

जर दोन प्रश्नात होत नसेल तर तीन विचारा, चार विचारा...

या कोड्याचाच भाग २ आहे तो अशाप्रकारे:

गुराख्याला काही करून थोरल्या सत्यवचनी राजकुमारीशीच लग्न करायचे आहे त्यामुळे तो राजाला विनवणी करून तीन प्रश्न विचारण्याची मुभा मागतो. याचे नियम आधीप्रमाणेच. हे तिन्ही प्रश्न तो एकीला विचारू शकतो किंवा एकीला दोन प्रश्न, एकीला एक प्रश्न किंवा प्रत्येकीला एक प्रश्न. पण आता राजा म्हणतो, तुझ्या विनंतीला मान देऊन मी तीन प्रश्न विचारायची परवानगी देतो आहे पण त्यातही एक अट आहे, कुठल्याही प्रश्नात उपप्रश्न नकोत.
आता गुराखी कशा प्रकारे थोरल्या राजकुमारीशी विवाह करेल?

पुढचे नवीन कोडे येईपर्यंत हे थोडे विचारांना खाद्य Happy वरती मानव पृथ्वीकर यांनी विचारलेल्या प्रश्नांचाच पुढील भाग Happy

चीकू, तीन प्रश्न असतील तर मग फारच सोपे झाले.
मी दोन प्रश्नात कोण मधली, कोण थोरली, कोण धाकटी हे ओळखता येईल का असा विचार करून ते शक्य असल्यास तेच पुढले कोडे देणार होतो (पण ते शक्य वाटत नाही) आणि शक्य नसल्यास दोन प्रश्नात फक्त थोरली कशी ओळखायची ते.
तीन प्रश्न असतील तर:
आधी आपण एका प्रश्नात कुठल्या घरात मधली नक्कीच नाही ते, पाहिलेच आहे. समजा त्यातून दुसऱ्या घरात मधली नक्कीच नाही असे आले.
तर दुसऱ्या घरात थोरली किंवा मधली आहे.
तिला कुठलाही एक प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला आधीच माहीत आहे तो विचारायचा. उदाहरणार्थ: मला दोन डोळे आहेत का/ तू जिवंत आहेस का / आज (त्या दिवशी जो वार असेल तो) आहे का काहीपण. उत्तर हो आले तर तीच थोरली. तिसऱ्या प्रश्नाची गरज नाही.
उत्तर नाही आले तर ती धाकटी.
मग इतर कुणाहीकडे बोट दाखवून विचारायचं, समजा पहिल्या घरातली कडे बोट दाखवून विचारलं: "ही थोरली आहे का?" नाही म्हणाली तर तीच थोरली, हो म्हणाली तर तिसऱ्या घरातील थोरली.

मानव तुमचे बरोबर आहे. मीही खूप विचार केला की दोन प्रश्न विचारून थोरली ओळखता येईल का पण ते शक्य वाटत नाही.
माझा दुसरा प्रश्न असेल 'तू मधली आहेस का" ज्याचे उत्तर गुराख्याला नक्की माहिती आहे कारण ती थोरली अथवा धाकटी यापैकीच आहे. तेव्हा जर ती नाही म्हणाली तर ती थोरली. तिथे मग दोन प्रश्नातच काम होते. इथे अर्थात दुसरा कोणताही प्रश्न विचारता येतो ज्याचे नक्की उत्तर गुराख्याला माहिती आहे. पण हा प्रश्न थोड्या आधीच्या प्रश्नाच्या उत्तरातील सामग्रीवरूनच आलेला Happy
ती हो म्हणाली तर ती धाकटी. आणि मग तिसरा प्रश्न तुम्ही सांगितला तोच!

धन्यवाद चीकू.
आता मी जे वर सहज म्हणुन त्याच कोड्यात दोन किंवा अधिक प्रश्न विचारण्याची मुभा आहे सांगितले त्याबद्दल:

या कोड्यावर अधिक विचार करता असं लक्षात आलं, याचे उत्तर फक्त एकच प्रश्न विचारुन सांगता येते.
पहिल्या प्रश्नात काहीतरी माहिती मिळाली पाहिजे ज्याचा वापर करून पुढचा प्रश्न विचारता येईल. जर पहिल्या प्रश्नातून अशी काहीच माहिती मिळत नसेल तर दुसऱ्यातून काय मिळणार? किंवा तिसऱ्या, चौथ्यातून काय मिळणार?मिळालीच तर मग तोच प्रश्न सगळ्यात आधी विचारायचा, इतर आधी विचारलेल्या प्रश्नांची काय गरज?

आणि एका प्रश्नात आपण कमीतकमी काय माहिती मिळवू शकतो? की यापैकी अमुक एक नक्कीच अमुक आहे ही?
नाही ही जरा जास्तीची माहिती झाली. यापैकी अमुक एक नक्कीच अमुक नाही ही त्यापेक्षा कमी माहिती झाली. कारण पहिल्या मध्ये अमुक नक्कीच अमुक यात ती व्यक्ती पूर्णपणे आयडेंटीफाय झाली. तर दुसऱ्यामध्ये ती नक्कीच अमुक नाही म्हणजे अजून उरलेल्या दोन पैकी कोण हे कळलेले नाही. ही झाली शक्य तेवढी कमीत कमी माहिती. आणि एवढी माहिती मिळाली की कोडेही सुटते, दुसरा प्रश्न विचारायची गरज नाही. थोडक्यात कोडे एकतर एका प्रश्नात सुटते अन्यथा वाटेल तेवढे विचारा सुटणार नाही.
(मी चुकत असेन तर कोणी निदर्शनास आणुन द्यावे.)
ही गमंत संगण्याचा उद्देश होता.

मूळ कोड्याचे उत्तर समजून घेणे जरा ट्रिकी आहे खरे.
आता उद्या पर्यँत वेळ आहे तर मग तेच कोडे थोडे सोपे करून बघुयात, जर कुणाला रस असेल यात तर. हे सुटले किंवा समजले तर मूळ कोड्याचे उत्तर समजायला कठीण जाणार नाही. उद्या सकाळी हे कसेही करून आटपून घेऊ म्हणजे पुढच्या कोड्यासाठी मैदान मोकळे.

सोपे करून:
तीन पैकी दोघी: थोरली आणि धाकटी नेहमी खरे बोलतात.
आणि मधली सत्य/असत्य पैकी काहीपण एक, त्यावेळी जे मनाला वाटेल तसे उत्तर देते.
खोटी बोलणारी यात नाही आता.

बाकी नियम मी आधी सहज म्हणून दिलेले त्यासारखेच. एका प्रश्नात सोडवले तर उत्तम, नाही तर दोन, तीन, चार कीतीही विचारा.
आणि खरे बोलणारी पैकी कुणीही एक गुराख्यासाठी निवडा.

खेळ क्रमांक ११ : संकुलातील सभागृह

एक आकर्षक संकुल आहे. त्याची दोन सभागृहे आहेत- एक वरचे आणि दुसरे खालचे. वरच्या सभागृहात 60 जण आहेत. त्यांची दोन्ही बाजूस प्रत्येकी ३० अशी समान विभागणी झालेली आहे. एका बाजूचे ३० जण प्रगतिशील आहेत तर दुसर्‍या बाजूचे ३० तात्विकतेत अडकलेले आहेत.
....
आता खालचे सभागृह पाहू. इथेसुद्धा ६० जण आणि वरच्या प्रमाणेच दोन विरुद्ध गटांमध्ये विभागलेले आहेत ( ३०/३०). त्यांच्या प्रवृत्तीही साधारण वरंच्यांप्रमाणेच. फक्त इथंले सभासद वरच्या सभागृहातील सभासदांपेक्षा धटिंगण आहेत.
पण या संकुलातील कुठल्याच सभागृहात अजिबात भांडण होत नाही – ही काय संसद थोडीच आहे ! दोन्ही सभागृहातील दोन्हीकडचे पक्ष कायम समतोल वागतात आणि सर्व इच्छित कार्ये पार पाडतात.

.... कुठले बरे संकुल हे ? अन कुठली त्यातली सभागृहे आणि कसले ते सभासद ?
सांगा बरं ....... !

Pages