खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे

Submitted by हेमंतकुमार on 13 February, 2022 - 01:39

शब्दखेळ हे विरंगुळा विभागाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहूच.

पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :

प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्‍या कोणीही नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.

१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.

२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.

३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.

४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.

५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आणि एकाच शब्दात उत्तर असलेला नसावा.
नमुना म्हणून मी एक सुरुवात करतो.

खेळ क्रमांक १
तुम्हाला एका दोन खोल्यांच्या घरात नेले आहे. दोन्ही खोल्यांमध्ये भिंत आहे. एका खोलीत असताना दुसऱ्या खोलीतील काहीही दिसणार नाही हे लक्षात घ्यावे.
पहिल्या खोलीत एका भिंतीवर ओळीने तीन इलेक्ट्रिक स्विचेस आहेत. मात्र इथे एकही दिवा बसवलेला नाही. यातीन स्विचेसनी नियंत्रित केलेले तीन वेगवेगळे दिवे दुसऱ्या खोलीत आहेत. प्रत्येक दिव्याचा स्विच स्वतंत्र आहे. पहिल्या खोलीत फक्त एक खुर्ची ठेवली आहे. त्या खोलीत असताना तुम्ही 3 स्विचेसची उघडझाप कितीही वेळा करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार ते स्विचेस चालू /बंद स्थितीत ठेवू शकता.

असे करून झाले की तुम्ही पहिली खोली सोडणार आहात व दुसऱ्या खोलीत प्रवेश कराल. एकदा का तुम्ही इकडे आलात की तुम्हाला पहिल्या खोलीत पुन्हा जायला बंदी आहे.

आता दुसऱ्या खोलीतील दृश्य पाहू. इथे घरात असते तसे सर्व फर्निचर आहे. इथल्या तीन भिंतींवर प्रत्येकी एक याप्रमाणे बल्ब बसवलेला आहे. तुम्ही पहिल्या खोलीत स्विचेसची जी अवस्था ठेवली असेल, त्यानुसार तुम्हाला आता हे बल्ब चालू किंवा बंद अवस्थेत दिसतील. आता याच खोलीत थांबून तुम्हाला सांगायचे आहे की -

पहिल्या खोलीतील कुठला स्वीच( क्रमांक 1, 2 व 3 सर्व) इथल्या कुठल्या बल्बला नियंत्रित करतो ?

चला तर, खाजवा डोकं आणि द्या उत्तर !
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संकुल मानवी - शरीर बरोबर. योग्य दिशा
पण
सभागृह हृदय चूक.
त्या सर्व अंकांचे स्पष्टीकरण जुळले पाहिजे

हात व पाय (यांना एकत्रित काय म्हणायचं)

हात वरचे सभागृह आणि पाय खालचे
उजवीकडेचे आणि डावी कडचे असे मिळुन चार विभाग. सभासद म्हणजे हाडे.
पण यांची संख्या तंतोतंत जुळत नाही.
६० / ६० ऐवजी ६४ / ६२ असे गुगलवर दिसते.
कदाचित यातील काही तांत्रिकदृष्ट्या हाडे नसावीत असे काही असेल का असे वाटल्याने विचारावे असे वाटले.

खालचे अधिक धटिंगण. पण त्यात तात्विक हा मुद्दा काही बसत नाही बहुतेक.

मानव छान!
अगदी बरोबर. अंकामधला फरक आहे त्याची शंका येऊ शकते याची कल्पना होती. आता स्पष्टीकरण देतो.

१. वरचा बाहू जिथून सुरु होतो (म्हणजे खांद्याची हाडे नव्हेत) तिथून तळहाताच्या बोटांपर्यंत एका बाजूस 30 हाडे असतात.
२. तसेच संपूर्ण तंगडीबाबत : जिथून मांडीचे हाड सुरू होते तिथून तळपायाच्या टोकापर्यंत एका बाजूस ३० हा डे असतात.

३. उजवीकडची म्हणजे प्रगतिशील; डावीकडची म्हणजे तात्विकतेत अडकलेली ( अर्थात लाक्षणिक अर्थाने).

ओके.
आणि डावे-उजवे अशा लाक्षणिक अर्थाने आहे तर Happy

उत्तर बरोबर की नाही माहीत नव्हते म्हणुन हे लिहीले नव्हते: आपण बहुसंख डावखुरे नसतो आणि उजवा हात जास्त वापरतो.
पायाच्या बाबतीत दोन्ही वापरावे लागतात. तेव्हा एकच वापरायचा असेल तर? म्हणुन मी लंगडी घालुन पाहिले. डावा दुमडून उजव्यावर लंगडलो प्रत्येकवेळी. पुढे फूटबॉल आहे अशी कल्पाना करुन त्याला लाथ मारावी म्हटले तर पर्याय असेल तेव्हा प्रत्येकवेळी उज्व्या पायाने मारेन असे लक्षात आले. म्हणुन उजवीकडचे प्रगतीशील असा अर्थ काढला होता.

हात व पाय यासंबंधी या खेळाच्या निमित्ताने परिपूर्ण मराठी शब्द शोधण्यासाठी आवाहन.
वर मानव यांनी असे विचारले आहे,
हात व पाय (यांना एकत्रित काय म्हणायचं)
याना इंग्लिशमध्ये limbs/extremities हे दोन पर्याय चांगले आहेत. मराठीत मात्र पटकन तसं सुचत नाही.

किंबहुना हे पहा :
१. वरचा संपूर्ण बाहू = arm + forearm + hand
इथे arm आणि forearm यांना स्वतंत्र मराठी शब्द पटकन सुचत नाहीत.

२. संपूर्ण तंगडी = thigh + leg + foot.
तसेच इथेही leg साठी नक्की काय म्हणायचे ?

(तळहात, मांडी व पाउल आहेतच.)

कृष्णा धन्यवाद
पण शब्दकोशामध्येच बऱ्यापैकी गोंधळ आहे. हे पहा :
बाहु
बाहु bāhu m (S) The whole arm. 2 The upper arm. 3 See भुज Sig. V. The sine of the arc &c. 4 A side of a polygon. 5 The base of a right-angled triangle.
मोल्सवर्थ शब्दकोश

१ सबंध हात; भुज. २ वरचा हात; दंड.

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81
.....
शब्दरत्नाकर :
बाहू = भुज , दंड

आज नवीन कोणी दिलेले नसल्याने कालच्याच खेळाचा एक उपखेळ देतो.
काल ज्यांनी सोडवले नसेल त्यांना विचार करता येईल..
...........................................
एक यंत्रणा ओळखायची आहे. तसेच त्यातील अंकांचे स्पष्टीकरण द्यावे.
तिचे वर्णन असे :

यंत्रणेचे दोन मोठे भाग आहेत. प्रत्येक भागाचे २ उपविभाग आहेत. प्रत्येक उपविभागात काही महत्त्वाच्या गोष्टी क्रमाने रचलेल्या आहेत.

त्या गोष्टींची संख्या खालील प्रमाणे आहे :
• वरचा उपविभाग : 1, 2, 8, 5, 14.
• खालचा उपविभाग : 1, 3, 7, 5, 14

ही यंत्रणा ओळखण्यासाठी तुम्हाला कुठेही गावभर शोधत बसायची गरज नाही. पहा जरा जवळच डोकावून !

कदाचित सापडूनही जाईल लगेच...

उत्तर
दिलेले अंक म्हणजे एका बाजूची क्रमाने हाडांची संख्या आहे :
१.वरचा उपविभाग : 1, 2, 8, 5, 14.
(दंड, मधला भाग, मनगट, तळहात व बोटे या क्रमाने )
...
२. खालचा उपविभाग : 1, 3, 7, 5, 14
(मांडी, पाय, घोटा, पाउल, आणि बोटे).
....
समाप्त.

ठिक आहे मी देईन. बहुतेकांच्या माहितीचे असण्याची शक्यता आहे, पण कोणी देत नाहीय आणि दुसरे चांगले आठवत नाहीय तर ते देईन थोड्यावेळात.

तुम्ही विमानाने जात असता विमान उत्तर कोरीया वरुन जात असताना विमानाला आग लागते आणि तुम्ही पॅराशूट घेउन उडी मारता. पॅराशूट उघडता आणि किम जॉंग समोर सैन्याची परेड सुरु असते नेमके त्यात जाउन उतरता.

किमला भयंकर राग येतो. तो तुम्हाला ठार करायचा आदेश देतो, तुम्ही गयावया करता.

तेव्हा तो तुम्हाला एक सवलत देतो. तुम्ही तुमच्या भवितव्याबद्दल एक विधान करायचं. त्यावर तो ते चूक किंवा बरोबर असे सांगेल.
बरोबर असेल तर तुम्हाला तोफ़ डागुन मारले जाईल. चूक असेल तर तलवारीने मुंडके उडवण्यात येइल.
आणि चूक की बरोबर हे तो सांगू शकला नाही तर तुम्हाला सोडून देईल.

तर तुम्ही कुठले विधान कराल?

विधान शेवटी बरोबर ठरतं की चूक याच्याशी काही देणे घेणे नाही. किमला चूक की बरोबर ठामपणे सांगता आलं नाही पाहिजे. तसं तो सांगु नाही शकला की खेळ संपतो, तुमची सुटका.

असे विधान असेल का..तुम्ही माझे तलवारीने मुंडके उडवणार आहात
हे बरोबर म्हणलं तर तोफेच्या तोंडी द्यावे लागेल, म्हणजे हे चूक होईल.
चूक म्हणाले तर मुंडके उडवले जाईल पण ते contradict असेल. त्यामुळे काहीच सांगता येणार नाही

अचूक उत्तर punekarp .
या विधानावार किमने चूक किंवा बरोबर उठलेही उत्तर दिले तर ते विरोधाभास होइल.
त्यामुळे तो उत्तर देऊ शकणार नाही.

नवा कूटप्रश्न
खाली काही अंक प्रत्येकी एका गटामध्ये लिहिलेले आहेत. प्रत्येक गटात ठराविकच २ अंक का निवडले असावेत हे ओळखायचे आहे.

गट अ : ९, ८

गट ब : ५, ६

गट क : ९, २

गट ड : ७, ४

ऊठ
चहा
ऊन
तर

असे शब्द तयार होतात प्रत्येक अंकाचे शेवटले अक्षर घेऊन.

मानव छान !
बरोबर
(ऊठ/ उठमध्ये दीर्घ क्षमस्व)

सुटलं पण... सगळी छान आहेत.
४ मार्चच्या कोड्यात बोटांचे १४ सांधे दिसले / सुचले पण बाकी काहीच माहितीचे नाही

मी वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठी कूट प्रश्नांचं पुस्तक पाहिलं. त्यातलं एक . मी उत्तर वाचलेलं नाही. पुस्तक घेतलेली नाही.
दोन दिवसांपूर्वी नेहाचे वय आठ वर्षे होते. पुढल्या वर्षी ते अकरा वर्षे होईल.
कसे?

दोन दिवसांपूर्वी नेहाचे वय आठ वर्षे होते. पुढल्या वर्षी ते अकरा वर्षे होईल.---
हे विधान 1 जानेवारीला केले आहे. नेहा 30 डिसेंबर ला 8 पूर्ण 9 चालू , 31 ला 9 पूर्ण , यावर्षं 31 ला 10 पूर्ण पुढच्या 31 ला 11 पूर्ण

नवा कूटप्रश्न

खाली काही अंक प्रत्येकी एका गटामध्ये लिहिलेले आहेत. प्रत्येक गटात ठराविकच अंक का निवडले असावेत हे ओळखायचे आहे.

गट अ : ८, १, ०

गट ब : ०, ३, ४

गट क : ८, ७

गट ड : ७.

टीप : गणिती सूत्रांचा संबंध नाही. चारही गटांचे अन्य सूत्र समान आहे.

Pages