शब्दखेळ हे विरंगुळा विभागाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहूच.
पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :
प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्या कोणीही नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.
१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.
२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.
३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.
४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.
५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आणि एकाच शब्दात उत्तर असलेला नसावा.
नमुना म्हणून मी एक सुरुवात करतो.
खेळ क्रमांक १
तुम्हाला एका दोन खोल्यांच्या घरात नेले आहे. दोन्ही खोल्यांमध्ये भिंत आहे. एका खोलीत असताना दुसऱ्या खोलीतील काहीही दिसणार नाही हे लक्षात घ्यावे.
पहिल्या खोलीत एका भिंतीवर ओळीने तीन इलेक्ट्रिक स्विचेस आहेत. मात्र इथे एकही दिवा बसवलेला नाही. यातीन स्विचेसनी नियंत्रित केलेले तीन वेगवेगळे दिवे दुसऱ्या खोलीत आहेत. प्रत्येक दिव्याचा स्विच स्वतंत्र आहे. पहिल्या खोलीत फक्त एक खुर्ची ठेवली आहे. त्या खोलीत असताना तुम्ही 3 स्विचेसची उघडझाप कितीही वेळा करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार ते स्विचेस चालू /बंद स्थितीत ठेवू शकता.
असे करून झाले की तुम्ही पहिली खोली सोडणार आहात व दुसऱ्या खोलीत प्रवेश कराल. एकदा का तुम्ही इकडे आलात की तुम्हाला पहिल्या खोलीत पुन्हा जायला बंदी आहे.
आता दुसऱ्या खोलीतील दृश्य पाहू. इथे घरात असते तसे सर्व फर्निचर आहे. इथल्या तीन भिंतींवर प्रत्येकी एक याप्रमाणे बल्ब बसवलेला आहे. तुम्ही पहिल्या खोलीत स्विचेसची जी अवस्था ठेवली असेल, त्यानुसार तुम्हाला आता हे बल्ब चालू किंवा बंद अवस्थेत दिसतील. आता याच खोलीत थांबून तुम्हाला सांगायचे आहे की -
पहिल्या खोलीतील कुठला स्वीच( क्रमांक 1, 2 व 3 सर्व) इथल्या कुठल्या बल्बला नियंत्रित करतो ?
चला तर, खाजवा डोकं आणि द्या उत्तर !
खरंच या कोड्याच्या उकलीच्या
खरंच या कोड्याच्या उकलीच्या निमित्ताने झालेली चर्चा वाचायला मजा आली.
मानव, चीकू ..... धन्यवाद.
धन्यवाद मामी.
धन्यवाद मामी.
एक अजून मजा म्हणजे एव्हाना लक्षात आलं असेल की गुराखी ज्या राजकुमारीला प्रश्न विचारतो ती सोडून तो पत्नी म्हणून बाकीच्या दोघींपैकी एकीची निवड करतो (जी वयाने लहान आहे असे त्याला उत्तरकर्तीच्या बोलण्यावरून समजेल ती). त्यामुळे समजा त्याच्यासमोर माधुरी, ऐश्वर्या आणि मधुबालासारख्या दिसणार्या तीन सुंदर राजकुमारी आहेत आणि समजा गुराख्याला निळे/हिरवे डोळे अजिबात आवडत नसतील तर तो प्रश्न विचारायला ऐश्वर्यासारख्या राजकुमारीची निवड करेल जेणेकरून पत्नी म्हणून काळ्या डोळ्यांच्या माधुरी वा मधुबाला मिळतील
म्हणजे कोणत्या राजकुमारीची प्रश्न विचारायला निवड करायची यात त्याला थोडा का होईना पण चॉइस मिळतो 
खेळ क्र. १० :आरोग्य
खेळ क्र. १० :आरोग्य सामान्यज्ञान
भाग १:
अनिल व विजय हे दोघे समवयस्क आहेत. दोघेही कुटुंबवैद्यांकडे तब्येत दाखवायला जातात. हे डॉक्टर त्यांच्या काही प्राथमिक तपासण्या करतात - म्हणजे सामान्य दवाखान्यात करतात तशा.( कुठल्याही प्रयोगशाळा चाचण्या वगैरे नव्हे). डॉक्टरांनी त्या दोघांनाही ताप नसल्याची खात्री केली आणि त्यानंतर दोघांच्या तब्येतीसंबंधी अन्य समान तपासणी- निकष विविध अंकांमध्ये लिहिले.
त्या अंकांचा क्रम तुम्हाला गरज लागल्यास जुळवून घ्यायचा आहे. ( उदा. ३,२,१ = १२३/३२१/२१३/२३१ इ. काहीही असू शकेल). एखाद्या निकषातील प्रत्येक अंक वापरायचा आणि एकदाच वापरायचा आहे.
डॉक्टरांनी लिहिलेले निकष खालील अंकांत होते:
अनिल
निकष अ : 6, 8, 1
निकष ब : 2, 9
निकष क : 3, 4
निकष ड : 9, 8
विजय
अ : 1, 7, 1
ब : 5, 6
क : 1, 6
ड : 7, 8
(फक्त एक निकष तीन अंकी आहे; बाकी सर्व दोन अंकी).
वरील माहितीवरून तुम्हाला सर्व निकष व त्यांची संबंधित योग्य संख्या ओळखायच्या आहेत. नंतर त्यांचा एकत्रित विचार करून त्या दोघांपैकी निरोगी/रोगी कोण आहे हेही सांगायचे आहे.
…..
डॉक्टरांनी ज्याला रोगी ठरवले त्याच्या रोगनिदानासंबंधी डॉक्टरांनी जे सांकेतिक भाषेत सांगितले तेही तुम्हाला ओळखायचे आहे. पण भाग १ चे बरोबर उत्तर आल्यानंतरच भाग 2 चा प्रश्न विचारेन.
अनिल
संपादित
चिकू, नाही
चिकू, नाही
हे नीट वाचा
डॉक्टर त्यांच्या काही प्राथमिक तपासण्या करतात - म्हणजे सामान्य दवाखान्यात करतात तशा.( कुठल्याही प्रयोगशाळा चाचण्या वगैरे नव्हे)
... फक्त शरीर तपासणी !
हा चाचण्या वगैरे पातळीवरील
हा चाचण्या वगैरे पातळीवरील सखोल अभ्यास नाही.
सामान्यज्ञान
माझे अंदाज
माझे अंदाज
निकष अ : उंची सेंटिमीटरमध्ये - १८६ व १७१
निकष ब: वजन किलोग्रॅममध्ये - ९२ व ६५
निकष क: फॅट पर्सेंट - ३४% व १६%
निकष ड: पल्स रेट - ९८ व ७८
अनिलमध्ये हायपरटेन्शन किंवा हार्ट ट्रबलची सुरुवातीची लक्षणे असावीत.
चीकू यांच्या कोड्याचं उत्तर
चीकू यांच्या कोड्याचं उत्तर शोधायला आणि आलेली उत्तर समजून घ्यायला पुरेसे रिकामपण सध्या नाही. कायम सत्यवचनी आणि कायम असत्यवचनी मुलीच्या उत्तराचा फंडा चटकन समजला. पण तळ्यात मळ्यात वालीच्या उत्तराचं कळलेलं नाही.
फक्त इतकंच समाधान की एका मुलीला दुसर्या मुलीबद्दल प्रश्न विचारायचा ही माझी दिशा बरोबर होती. (हे उगाच)
पायस,
पायस,
नाही. नाडीचे ठोके हा एक निकष तपासणीत आहे. बाकीचे नाहीत.
एक लक्षात घ्या.
कुटुंब वैद्याच्या सामान्य दवाखान्यात उंची मोजणे आणि मेदाचे प्रमाण काढणे असे प्रकार होत नसतात ! फार तर वजन मोजले जाऊ शकते. तेव्हा अन्य निकषांचा विचार करावा.
( वजन व उंची हे निकष घेऊन शेवटपर्यंत कथा पूर्ण करता येणार नाही. ते पर्यायी उत्तर म्हणून येऊ शकतील याचा अंदाज होता).
सर्वांना एक विनंती
सर्वांना एक विनंती
आता खेळ क्रमांक १० सुरू झालेला असल्याने जुन्या खेळांच्या चर्चा मध्येच होऊ नयेत असे वाटते.
त्या करायचा झाल्यास व्यक्तिगत पातळीवर केल्यास अधिक बरे होईल किंवा हा खेळ संपल्यानंतर जो रिकामा वेळ असेल त्या वेळात करता येतील.
आभार !
ब्लड प्रेशर - याचे दोन आकडे,
ब्लड प्रेशर - याचे दोन आकडे, हार्ट बीट /पल्स रेट , वय हे चार निकष.
भरत
भरत
३ बरोबर पण वय नाही !
अनिल व विजय हे दोघे समवयस्क आहेत
'वय' हा "तपासणी-निकष" नाही.
निकष ओळखल्यावर योग्य संख्या व पुढचा निष्कर्षही लिहावा. (रोगी/निरोगी)
चौथे : SpO2?
चौथे : SpO2?
ओके. चौथा श्वसनाचा वेग. ( हे
ओके. चौथा श्वसनाचा वेग. ( हे शोधलं ) बाकीचे तीन आणि वय डॉक्टर नेहमी लिहितात, तपासतात म्हणून माहीत होते.
अनिल - रक्तदाब १८६ -९८ , रेस्पिरे टरी रेट - श्वसन वेग -३४ पल्स रेट - नाडीची गती ८२
विजय अ रक्तदाब ११७ : ७८ नाडी ५६ श्वसन वेग १६
अनिलला उच्च रक्तदाब आहे. हे हायपरटेन्शन असं लिहितात बहुतेक
भरत बरोबर
भरत बरोबर
फक्त
अनिल - नाडीची गती ९२
विजय नाडी ६५
हे सुयोग्य
दुसराभाग जरा वेळाने...
दुसराभाग जरा वेळाने...
भाग १ : उत्तर.
भाग १ : उत्तर.
अनिल : रक्तदाब-186/98, नाडी -92, श्वसनगती -34
विजय : 117/78, 65, 16
अनिल रोगी.
…..
भाग २
डॉक्टरांनी अनिलचे रोगनिदान दोन स्वतंत्र शब्दांमध्ये लिहिले. ते दोन्ही शब्द एकत्र धरल्यास एकूण १२ अक्षरे होतात. त्या १२ पैकी फक्त एक स्वर असून तीन जोडाक्षरे आहेत आणि उरलेली अक्षरे ही विविध व्यंजने आहेत. या माहितीवरून रोगनिदानाचे दोन शब्द ओळखा.
हे मराठी शब्द सामान्य माणसाला परिचित असलेले आहेत. एका शब्दाचे बाबतीत तो सलग किंवा शब्दामध्ये आडवी रेघ मारून, अशा दोन्ही प्रकारे लिहिण्याची पद्धत आहे.
उत्तर फक्त मराठीतच लिहा.
अक्षर मोजताना जोडाक्षरातील
अक्षर मोजताना जोडाक्षरातील स्वल्प उच्चार असलेले व्यंजन अर्धे धरायचे का?उदा: शब्द = अडीच अक्षरे. स्वतंत्र= ४ अक्षरे?
--------
सॉरी, असे नसणार: अन्यथा तीन जोडाक्षरे आहेत, संख्या अपूर्णांकात आली असती.
: फुफ्फुसांमधील उच्चरक्तचाप/ उच्च-रक्तचाप?
सहा अक्षरे - उच्च रक्तदाब.
सहा अक्षरे - उच्च रक्तदाब. याचा प्रकार किंवा तीव्रता , गांभीर्य यासाठी आणखी एक शब्द असेल.
आडवी रेघवाला शब्द
आडवी रेघवाला शब्द
को-ऑर्डीनेशन
मानव यांचं बरोबर वाटतंय.
मानव यांचं बरोबर वाटतंय. पहिला शब्द अधिक परिष्कृत असावा.
आणखी शोधल्यावर असं वाटत नाही. कारण हे निदान करायला नुसती प्राथमिक तपासणी पुरेशी नाही.
डेव्हलपमेंटल को-ऑर्डीनेशन
डेव्हलपमेंटल को-ऑर्डीनेशन
उच्चरक्तदाब. बरोबर !
उच्चरक्तदाब. बरोबर !
..
ऋन्मेऽऽष
हे वाचा ना :
उत्तर फक्त मराठीतच लिहा.
आता दुसरा शब्द राहिला. मराठी
आता दुसरा शब्द राहिला.
मराठी भाषेत व देवनागरी लिपीत
दुसरा शब्द स्वतंत्र आहे. ( निदान १ व २). पैकी १ झालेय.
जोडाक्षर = एकच अक्षर
दोन वेगवेगळी निदानं आहेत का?
दोन वेगवेगळी निदानं आहेत का?
हृदयविकार?
हृदयविकार? नाही. (निव्वळ र
हृदयविकार? नाही. (निव्वळ र.दा वरुन तसे नसते.)
होय, २ वेगळी.
एक निकष नीट पाहा.
जलदश्वसन?
जलदश्वसन?
पण हे असे एका शब्दात लिहीत नसावेत म्हणुन आधी लिहिले नाही.
श्वसन *** दिशा योग्य.
श्वसन ***
दिशा योग्य.
श्वसनावरोध?
श्वसनावरोध?
श्वसनावरोध / श्वसनबिघाड/ ..
श्वसनावरोध / श्वसनबिघाड/ ...विकार
तिन्ही चालतील.
छान !
Pages