खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे

Submitted by कुमार१ on 13 February, 2022 - 01:39

शब्दखेळ हे विरंगुळा विभागाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहूच.

पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :

प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्‍या कोणीही नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.

१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.

२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.

३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.

४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.

५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आणि एकाच शब्दात उत्तर असलेला नसावा.
नमुना म्हणून मी एक सुरुवात करतो.

खेळ क्रमांक १
तुम्हाला एका दोन खोल्यांच्या घरात नेले आहे. दोन्ही खोल्यांमध्ये भिंत आहे. एका खोलीत असताना दुसऱ्या खोलीतील काहीही दिसणार नाही हे लक्षात घ्यावे.
पहिल्या खोलीत एका भिंतीवर ओळीने तीन इलेक्ट्रिक स्विचेस आहेत. मात्र इथे एकही दिवा बसवलेला नाही. यातीन स्विचेसनी नियंत्रित केलेले तीन वेगवेगळे दिवे दुसऱ्या खोलीत आहेत. प्रत्येक दिव्याचा स्विच स्वतंत्र आहे. पहिल्या खोलीत फक्त एक खुर्ची ठेवली आहे. त्या खोलीत असताना तुम्ही 3 स्विचेसची उघडझाप कितीही वेळा करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार ते स्विचेस चालू /बंद स्थितीत ठेवू शकता.

असे करून झाले की तुम्ही पहिली खोली सोडणार आहात व दुसऱ्या खोलीत प्रवेश कराल. एकदा का तुम्ही इकडे आलात की तुम्हाला पहिल्या खोलीत पुन्हा जायला बंदी आहे.

आता दुसऱ्या खोलीतील दृश्य पाहू. इथे घरात असते तसे सर्व फर्निचर आहे. इथल्या तीन भिंतींवर प्रत्येकी एक याप्रमाणे बल्ब बसवलेला आहे. तुम्ही पहिल्या खोलीत स्विचेसची जी अवस्था ठेवली असेल, त्यानुसार तुम्हाला आता हे बल्ब चालू किंवा बंद अवस्थेत दिसतील. आता याच खोलीत थांबून तुम्हाला सांगायचे आहे की -

पहिल्या खोलीतील कुठला स्वीच( क्रमांक 1, 2 व 3 सर्व) इथल्या कुठल्या बल्बला नियंत्रित करतो ?

चला तर, खाजवा डोकं आणि द्या उत्तर !
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव विश्लेषण छान आहे.
..................
" तू अनौरस आहेस का ?" या सारखा वर्मी लागणारा प्रश्न विचारायला हवा आहे.
अशा प्रसंगी फक्त सत्यवचनी माणूसच खरे बोलतो

मस्त मानव..
मी सकाळपासून असा प्रयत्न करत होते..
Question(sub question)
Sub question- आत्ता दिवस आहे का?
Question- आत्ता दिवस आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर तू तुझ्या स्वभावाला अनुसरून देत आहेस का?

पण, अर्थात ह्या फॅार्मुल्याने कोडं सुटत नव्हतं कारण कदाचित हा प्रश्न प्रत्येकीला विचारावा लागला असता..
पण हे तुम्ही दोन Sub questions वापरून सोडवलंत

मानव उत्तम तर्क आणि उत्तर!
एक थोडीशी गोम आहे. तुम्ही दिलेल्या तर्कानुसार तुमचे उत्तर बरोबरच आहे पण technically हा एक प्रश्न झाला तरी त्यात तीन उपप्रश्न आहेत, आणि तिन्ही उपप्रश्नांच्या सामग्रीवर तुम्ही तुमची निवड करता.
म्हणजे
१. तू थोरली आहेस का?
२. आणि दुसऱ्या घरातील मधली आहे का?
३. या दोन्ही प्रश्नांचे उत्तर सारखेच आहे का?"
याऐवजी केवळ एकच प्रश्न (म्हणजे technically एकच प्रश्न आणि त्याच्यात अजून उपप्रश्न नाहीत, तो प्रश्न हाच उपप्रश्न) विचारून निवड करता येईल का? विचार करून बघा.
बाकी तुमच्या तर्काने उत्तर बरोबरच आहे. अभिनंदन !

थोडी व्यस्तता असल्याने मायबोलीवर पुढील काही वेळ येता येणार नाही. पण दिलेल्या मुदतीच्या आत नक्कीच २-३ दा फेरफटका मारून अजून काही वेगळे उत्तर आले का ते बघीन.
धन्यवाद सर्वांना!

मानव अभिनंदन !
चिकू छान.
…………………………..
सुचवणी
त्या उपप्रश्नांचा एक प्रश्न करणे हे मानव यांच्या दृष्टीने आता किरकोळ आहे. ते उत्तर देतील अशी खात्री आहे. चिकू यांच्या समारोपानंतर उद्यासाठी एक पर्याय सुचवत आहे.

लागोपाठ दोन गद्य खेळ झालेले आहेत. म्हणून उद्यासाठी मी एक अंकखेळ तयार केला आहे. आज दिवसभर विचार करून आपण थकलेले आहोत. आता ७ तास विश्रांती घेता येईल. मग मी अंकखेळ द्यावा असे म्हणतो.

प्रश्नच बदलायचा तरी लॉजिक तेच. थोरली आणि धाकटीने सारखेच उत्तर दिले पाहिजे.

तर मग हा प्रश्न पहिल्या घरातल्या मुलीला उद्देशून: "मी जर धाकटीला विचारले की दुसऱ्या घरातली मधली आहे का तर ती काय उत्तर देईल?"
या प्रश्नावर दुसऱ्या घरात मधली असेल तर थोरली आणि धाकटी दोघींचे उत्तर "नाही"
आणि तिसऱ्या घरात मधली असेल तर दोघींचे उत्तर "हो"
आणि मधली पहिल्या घरात असेल तर हो/नाही काहीपण.

परत तेच लॉजिक (आधीच्या उत्तरात हो च्या जागी नाही आणि नाहीच्या जागी हो करून):

उत्तर "नाही" केव्हा येते? मधली दुसऱ्या घरात असेल किंवा पहिल्या घरात असेल तर. म्हणजे तिसऱ्या घरात मधली नक्कीच नाही, तिला निवडेल.

उत्तर "हो" केव्हा येते? मधली तिसऱ्या घरात असेल किंवा पहिल्या घरात असेल तर. म्हणजे दुसऱ्या घरात मधली नक्कीच नाही, तिला निवडेल.
-----
खरं तर " जर धाकटीला विचारले आज सोमवार आहे का तर ती काय उत्तर देईल?" असा प्रश्न तपासून पाहिला होता सकाळी. पण मग नंतर कामात ती कल्पना पुढे नेण्याचे राहून गेले.
मग संध्याकाळी वेगळ्याच दिशेने जाताना, प्रश्नात प्रश्न करत करत आधीच्या पोस्ट मधील प्रश्न तयार झाला.

मानव पृथ्वीकर तुमचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक! तुम्ही अतिशय योग्य तर्क वापरून बरोबर उत्तरे दिली आहेत.
या प्रश्नातही एक उपप्रश्न आहे (मी जर धाकटीला विचारले की दुसर्‍या घरातील मधली आहे का?), अर्थात तुमचे उत्तर बरोबरच आहे.
मला जे उत्तर माहिती आहे त्यात उपप्रश्न नाही, म्हणजे उदाहरण म्हणून द्यायचे झाले तर तो direct प्रश्न विचारेल 'दुसर्‍या घरातील मधली आहे का?'

असो. पण मला अजून कोणाच्या डोक्याचा भुगा करायचा नाही Happy तेव्हा कुमार यांनी सांगितल्याप्रंमाणे उद्या अंकखेळ सुरु करायला हरकत नाही.
या कोड्यासाठी अजून कोणाला वेगळे उत्तर द्यायचे असेल तरी हरकत नाही पण आता सगळ्यांच्या सहनशक्तीची परिसीमा न पाहाता उद्या फायनल उत्तर नक्की टाकीन Happy

थोरली - सत्य, मधली - सत्य असत्य, धाकटी - असत्य
वरचेच घर घर वापरूया..

त्यातील पहिल्या घरातील मुलीला खालील प्रश्न विचारायचा
प्रश्न - जर मी तुला विचारले ही दुसर्‍या घरातील मुलगी मधली आहे का तर तुझे उत्तर "हो" असेल का?

आता जर ती पहिली मुलगी मधली असेल तर ती भंजाळून जाईल. कारण त्या प्रश्नावर तिचे उत्तर हो असेल की नाही हे तिलाही माहीत नसेल आणि ती शांतच राहील. थोडक्यात काहीच उत्तर न आल्यास मधली मुलगी पहिल्याच घरात आहे हे समजेल.

आता जर पहिली मुलगी थोरली असेल तर या प्रश्नावर तिचे उत्तर
हो असेल जेव्हा खरेच दुसर्‍या घरात मधली मुलगी असेल
नाही असेल जेव्हा तिसर्‍या घरात मधली मुलगी असेल

आता जर पहिली मुलगी धाकटी असेल तर या प्रश्नावर तिचे देखील उत्तर
हो असेल जेव्हा दुसर्‍या घरात मधली असेल (प्रत्यक्ष प्रश्नाच्या वेळी तिचे उत्तर नाही असणार, पण आपण उत्तर हो असेल का असा प्रश्न विचारताच ती नाही उत्तर कबूल न करता मुद्दाम हो बोलणार)
उत्तर नाही असेल जेव्हा तिसर्‍या घरात मधली असेल ((प्रत्यक्ष प्रश्नाच्या वेळी तिचे उत्तर हो असणार, पण आपण हो असेल का विचारताच ती कबूल न करता मुद्दाम नाही बोलणार)

म्हणजेच हो उत्तर असल्यास मधली दुसर्‍या घरात
नाही उत्तर आल्यास मधली तिसर्‍या घरात

चला हे उत्तर बरोबर असेल वा चूक, काय ते चीकू सांगतीलच, आज ना उद्या मधली पोरगी कोण ते कळेलच..
पण दिसायला ती जान्हवी कपूर, वहिदा रहेमान वा गेला बाजार माधुरी दिक्षित असेल तर काय कराल Happy

आता जर ती पहिली मुलगी मधली असेल तर ती भंजाळून जाईल. कारण त्या प्रश्नावर तिचे उत्तर हो असेल की नाही हे तिलाही माहीत नसेल आणि ती शांतच राहील.>>
मधली राजकुमारी हो किंवा नाही यातील काहीही उत्तर देऊ शकते, तिच्या मनाला त्या वेळी येईल ते. ती निरुत्तर राहाणार नाही.

प्रश्न - जर मी तुला विचारले ही दुसर्‍या घरातील मुलगी मधली आहे का तर तुझे उत्तर "हो" असेल का?>> यातही उपप्रश्न आलेच Happy

पण दिसायला ती जान्हवी कपूर, वहिदा रहेमान वा गेला बाजार माधुरी दिक्षित असेल तर काय कराल Happy>> राजाने गुराख्याला तिघीही सारख्याच सुंदर आहेत हे सांगितलेले आहेच. त्यामुळे मधली मुलगी माधुरीसारखी असेल दिसायला तर थोरली आणि धाकटीही ऐश्वर्या वा मधुबाला असू शकतात Happy

उद्या माझे उत्तर्/उकल टाकीन. अनेक धन्यवाद सर्वांना!

<<<मला जे उत्तर माहिती आहे त्यात उपप्रश्न नाही, म्हणजे उदाहरण म्हणून द्यायचे झाले तर तो direct प्रश्न विचारेल 'दुसर्‍या घरातील मधली आहे का?'>>
वॉव! असे पण उत्तर आहे का? ग्रेट!
तुम्ही म्हणताय तसे उत्तर उद्या पर्यँत राखून ठेवा, अजून कोणी या दिशेने पुढे जाऊन तसे उत्तर दिले तर. उद्या मी पण अजून विचार करून बघेन.

मानव ब्रिलियंट
तुमच्या उत्तरावरून आणि चिकू च्या पॉईंटर वरून असा प्रश्न आला मनात.
पहिल्या घरातील मुलीला विचारायचे की तुम्ही तिघी तुमच्या वयाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने उभ्या आहात का?
(मी सगळ्या शक्यता मांडून पाहिलेल्या नाहीत अजून)

छान चर्चा.
खेळ मस्त रंगला आहे. चिकू यांचे अंतिम उत्तर आणि समारोप आज दिवसभरात होईल. त्यामुळे 22 फेब्रुवारी (24.00 वाजेपर्यंत) संपूर्ण दिवस या खेळावरील उर्वरित चर्चेसाठी राखून ठेवू. त्यानंतर काही काळ श्रमपरिहार ! Happy

उद्या दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मी माझा अंकखेळ देईन.
धन्यवाद !

चीकू, यात फक्त हो/नाही उत्तरावर निर्णय नाही होत पण सुचलेय ते लिहीते.
गुराखी सोबत ६ वासरे / कोकरे नेईल. ३ काळी ३ पांढरी. आणि एका खोलीत बंद ठेवेल.
एकेका राजकुमारीने त्यातील २ निवडून दुसर्‍या खोलीत जायचे. गुराख्यासमोर यायचे नाही.
नियम हा की --- खरे बोलणारीने २ पांढरी, खोटे बोलणारीने २ काळी आणि खरे/खोटे बोलणारीने २ मिश्र रंगाची जोडी अशी कोकरे घ्यायची आहेत.

शेवट्च्या राजकन्येला गुराखी विचारेल -- तुझ्यासाठी एकाच रंगाची कोकरे उरली आहेत का?
उत्तर हो / नाही येईल. पण शेवटची राजकन्या खोटे बोलणारी निघाली तरीही गुराखी उत्तराचा खरेखोटेपणा कोकरे बघून पडताळू शकतो.

मी लावलेल्या लॉजिकमध्ये थोरली आणि धाकटीला सारखेच उत्तर द्यायला लावणे भाग आहे आणि त्यावरून मधली कुठल्या घरात आहे किंवा कुठल्या घरात नाही याचा अंदाज लावायचा. मग मधली काय उत्तर देते याच्याशी काही देणे घेणे रहात नाही कारण उत्तर देण्यास तिला पहिल्या घरात असणे आवश्यक.
असली लॉजिक कोडी सोडवायला मी logic gates चा आधार घेतो.
आता धाकटी आहे NOT gate आणि थोरली Buffer gate.
मी आधी त्यांच्या पुढे OR gate (यापैकी निदान एकाचे तरी उत्तर हो आहे का?) , AND gate (या दोन्हीचे उत्तर हो आहे का?) ठेवून पाहिले. पण धाकटीचे NOT gate त्यांचे अनुक्रमे NOR आणि NAND करून वेगळे उत्तर देत होती.
तेव्हा असे gate हवे की जे सरळ असताना आणि invert झाल्यावरही त्यातून input A जर 1 असेल तर input B 0, 1 काहीही असो output 1 आले पाहिजे, पण जर input A हे 0 झाले तर input B 0, 1 काहीही असो output 0 आले पाहिजे.
Input A: दुसऱ्या घरात मधली आहे का?
Input B : इतर कंडीशन
A... B... O/P
1.... 0.... 1
1.... 1.... 1
0... 1.... 0
0... 0... 0

मग अतिविचार करून EXclusive NOR gate घेतले (दोन्ही प्रश्नांचे उत्तर सारखे आहे का? ). थोरली XNOR output देते पण धाकटी NOT gate असल्याने invert करून त्याचे XOR output देते. Input B आता "तू थोरली आहेस का?" असे आहे.
थोरली साठी Input B नेहमी 1 रहाते.
तेव्हा तिचे equation A XONR 1 असे होते.
धाकटी साठी input B नेहमी 0 रहाते
तिचे equation A XOR 0 होते.
त्यामुळे दोघींची उत्तरे सारखी येतात.

मग लक्षात आले की एवढे कॉम्प्लेक्स करण्याची आवश्यकता नाही. धाकटी NOT gate आहे, तर थोरलीच्या पुढे NOT gate ठेवला तर दोघीही NOT gate चे - म्हणजे सारखेच- output देतील. त्यामुळे "जर धाकटीला विचारले" हे वाक्य प्रश्नात येते. (जेव्हा धाकटीलाच हे विचारले जाते तेव्हा ती स्वतः धाकटी असल्याने तिच्या करता ते 'जर तुला विचारले" असे होते, आणि सिंगल NOT gate च रहाते. (यावर मतांतर होऊ शकते.))
दोघींचेही equation आता 'A NOT' होते, आणि दोघींचे उत्तर सारखे येते.
प्रश्न XNOR पेक्षा सोपा होतो, पण त्यात 'जर तर' अट येते.

असा 'जर तर' असल्याशिवाय दोघींकडून सारखे उत्तर काढणारा प्रश्न मला सुचत नाहीये.

किंवा मग दोघींकडुन 'मधली कोणत्या घरात' याचे सारखे उत्तर काढणे या व्यतिरिक्त दुसरे लॉजिक शोधायला हवे, ज्यात अशा जर तर अटीची गरज रहाणार नाही.
हे फारच चॅलेंजींग आहे.
किंवा इतके सोपे आहे की त्याचा आपण कुणीही विचार करत नाही आहोत, पण याची शक्यता फार कमी वाटतेय.

कोणी तसे उत्तर देतंय का याच्या उत्सुकतेत.

प्रश्न एकीलाच आणि एकच विचारायचा आहे.
त्या कुठल्या क्रमाने समोर येणार हे माहिती नाही.
जिला विचारू तीच मधली निघाली तर काय? इथे अडले मी.

पहिल्या घरातलीला प्रश्न विचारला " दुसऱ्या घरातली तिसऱ्या घरातलीपेक्षा लहान आहे का?"
यातही तेच लॉजिक लावता येते.
उत्तर हो आलं मधली दुसऱ्या घरात नक्कीच नाही.
उत्तर नाही आलं तर मधली तिसऱ्या घरात नक्कीच नाही.

चीकू, यात फक्त हो/नाही उत्तरावर निर्णय नाही होत पण सुचलेय ते लिहीते.
गुराखी सोबत ६ वासरे / कोकरे नेईल. ३ काळी ३ पांढरी. आणि एका खोलीत बंद ठेवेल.
एकेका राजकुमारीने त्यातील २ निवडून दुसर्‍या खोलीत जायचे. गुराख्यासमोर यायचे नाही.
नियम हा की --- खरे बोलणारीने २ पांढरी, खोटे बोलणारीने २ काळी आणि खरे/खोटे बोलणारीने २ मिश्र रंगाची जोडी अशी कोकरे घ्यायची आहेत.

शेवट्च्या राजकन्येला गुराखी विचारेल -- तुझ्यासाठी एकाच रंगाची कोकरे उरली आहेत का?
उत्तर हो / नाही येईल. पण शेवटची राजकन्या खोटे बोलणारी निघाली तरीही गुराखी उत्तराचा खरेखोटेपणा कोकरे बघून पडताळू शकतो.>>

कारवी उत्तर चांगले आहे पण त्यात आपण जास्तीची सामग्री (कोकरे, बंद करून ठेवायला वेगळी खोली) या गोष्टी कोड्यात समाविष्ट केल्या नाहीत. आणि मधली व धाकटी प्रामाणिकपणे नियम पाळतील याचीही शाश्वती नाही Happy पण विचार नक्कीच वेगळा आहे.

पहिल्या घरातलीला प्रश्न विचारला " दुसऱ्या घरातली तिसऱ्या घरातलीपेक्षा लहान आहे का?"
यातही तेच लॉजिक लावता येते.
उत्तर हो आलं मधली दुसऱ्या घरात नक्कीच नाही.
उत्तर नाही आलं तर मधली तिसऱ्या घरात नक्कीच नाही.>>>

मानव YOU GOT IT!!!! हाच तो साधा प्रश्न आहे Happy
खूप खूप अभिनंदन तुमचे!!
माझे उत्तर (साधारण हेच आहे) आणि स्पष्टीकरण थोड्या वेळातच डकवेन इथे.

कोड्याची उकल पुढीलप्रमाणे. मानव पृथ्वीकर यांनी योग्य उत्तर दिले आहे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!

आता गुराख्याला समोर तीन राजकुमारी दिसतात. तो मनातल्या मनात त्यांना नाव देतो. डावीकडच्या राजकुमारीला तो नाव देतो 'अ '. मध्ये उभ्या असलेल्या राजकुमारीला तो नाव देतो 'ब ' आणि उजवीकडच्या राजकुमारीला तो नाव देतो 'क'. म्हणजे ब मध्ये उभी आहे, तिच्या उजवीकडे अ आहे आणि तिच्या डावीकडे क आहे.

आता पुढील प्रश्न तो 'ब' ला विचारतो.
' तुमच्या उजवीकडे उभी असलेली राजकुमारी तुमच्या डावीकडे उभ्या असलेल्या राजकुमारीपेक्षा वयाने लहान आहे का?'

ब थोरली सत्यवचनी आहे असे समजू.
उत्तर हो: अ धाकटी आहे आणि क मधली
उत्तर नाही: अ मधली आहे आणि क धाकटी
आता गुराख्याला ब खरं बोलतेय, खोटं बोलतेय ते काही माहिती नाही.
ब ने दिलेल्या माहितीनुसार,
ती हो म्हणाली तर: अ वयाने लहान आहे .
ती नाही म्हणाली तर: क वयाने लहान आहे.
मधली राजकुमारी वगळण्याचा हमखास उपाय म्हणजे ब जी राजकुमारी वयाने लहान आहे असे सांगेल तिची पत्नी म्हणून निवड करायची.
हो म्हणाली तर अ ची निवड जी धाकटी राजकुमारी आहे
नाही म्हणाली तर क ची निवड जी धाकटी राजकुमारी आहे

ब धाकटी असत्यवचनी आहे असे समजू
उत्तर हो: अ थोरली आहे आणि क मधली आहे
उत्तर नाही : अ मधली आहे आणि क थोरली आहे
आता परत गुराख्याला ब खरं बोलतेय की खोटं बोलतेय ते कळायला मार्ग नाही.
तिने दिलेल्या माहितीनुसार त्याला एवढंच कळतं
हो : अ वयाने लहान आहे
नाही: क वयाने लहान आहे.
मधली राजकुमारी वगळण्याचा हमखास उपाय म्हणजे ब जी राजकुमारी वयाने लहान आहे असे सांगेल तिची पत्नी म्हणून निवड करायची.
हो म्हणाली तर अ ची निवड जी थोरली राजकुमारी आहे
नाही म्हणाली तर क ची निवड जी थोरली राजकुमारी आहे

ब मधली आहे
आता ब चे उत्तर खालील काहीही असू शकते
असत्य बोलत असेल तर
उत्तर हो: अ थोरली आहे आणि क धाकटी आहे
उत्तर नाही : अ धाकटी आहे आणि क थोरली आहे
आता परत गुराख्याला ब खरं बोलतेय की खोटं बोलतेय ते कळायला मार्ग नाही.

तिने दिलेल्या माहितीनुसार त्याला एवढंच कळतं
हो : अ वयाने लहान आहे
नाही: क वयाने लहान आहे.
मधली राजकुमारी वगळण्याचा हमखास उपाय म्हणजे ब जी राजकुमारी वयाने लहान आहे असे सांगेल तिची पत्नी म्हणून निवड करायची.
हो म्हणाली तर अ ची निवड जी थोरली राजकुमारी आहे
नाही म्हणाली तर क ची निवड जी थोरली राजकुमारी आहे

सत्य बोलत असेल तर
उत्तर हो: अ धाकटी आहे आणि क थोरली आहे
उत्तर नाही : अ थोरली आहे आणि क धाकटी आहे
आता परत गुराख्याला ब खरं बोलतेय की खोटं बोलतेय ते कळायला मार्ग नाही.
तिने दिलेल्या माहितीनुसार त्याला एवढंच कळतं
हो : अ वयाने लहान आहे
नाही: क वयाने लहान आहे.
मधली राजकुमारी वगळण्याचा हमखास उपाय म्हणजे ब जी राजकुमारी वयाने लहान आहे असे सांगेल तिची पत्नी म्हणून निवड करायची
हो म्हणाली तर अ ची निवड जी धाकटी राजकुमारी आहे
नाही म्हणाली तर क ची निवड जी धाकटी राजकुमारी आहे

तर कोडे सोडवण्यासठी सोपी गुरुकिल्ली म्हणजे, ब जी राजकुमारी वयाने लहान आहे हे सांगेल तिची पत्नी म्हणून निवड. ती नक्कीच थोरली अथवा धाकटी यापैकीच एक असणार.

वरील प्रश्न गुराखी अ अथवा क लाही विचारू शकतो. जर त्या मधे उभ्या नसतील तर बाकीच्या दोघींकडे बोट दाखवून. पण logic तेच!

चीकू धन्यवाद!
फार छान कोडे होते. आधी मामीचे मग तुमचे यामुळे छान रंगत आली. अशा कोड्यांचे उत्तर येवो न येवो पण त्यात डोके खाजवणे आणि उत्तर आले की ते समजून घेणे यातही मजा असते.

तुम्ही प्रत्येकाचे उत्तर/प्रश्न नीट तपासून अगदी योग्य उत्तरे आणि प्रोत्साहन दिले.

या पुढेही अशी छान छान कोडी येतील अशी अपेक्षा.
-----------
वेगळी पोस्ट करण्याऐवजी याच प्रतिसादात भर घालून लिहितो:
अशा लॉजीक कोड्यांमध्ये "एकच प्रश्न विचरायला परवानगी आहे." याचा अर्थ असा असतो की एक प्रश्न विचारून त्याचे उत्तर माहीत करून त्यावरून दुसरा प्रश्न विचारायला परवानगी नाही. विचारलेला प्रश्न उपप्रश्नांनी बनलेला असो/नसो प्रश्न असा हवा ज्याचे शेवटी उत्तर एकच उत्तर आहे हो किंवा नाही असे येते.
या कोड्यात अर्थात हे उपप्रश्न नसलेल्या सरळ प्रश्नाने साध्य होते, तेव्हा शेवटी तशा उत्तराची अपेक्षा ठेवणे रास्तच आहे.

पण स्वर्ग नरक द्वार कोड्यात जिथे एक द्वारपाल नेहमी खरे दुसरा खोटे बोलतो त्यात एकाला उद्देशून 'मी जर त्याला विचारले हे नरकाचे(किंवा स्वर्गाचे) द्वार आहे का तर तो काय उत्तर देईल?" असेच विचारावे लागते ना?
सांगण्याचा उद्देश हा की यापुढेही कदाचित अशी कोडी येतील ज्यात एकच किंवा दोनच वगैरे प्रश्न विचारण्याची परवानगी असेल. त्यात विचारावा लागणारा प्रत्येक प्रश्न हा उपप्रश्नासहीत कॉम्प्लेक्स असू शकतो, जर तर अटीं सकट वगैरे, जसा स्वर्ग - नरक द्वार मध्ये आहे. तेव्हा कुणीही प्रश्न कॉम्प्लेक्स होतोय म्हणुन उत्तर देण्यापासून परावृत्त होऊ नये यासाठी हा खुलासा.

+111
विचारमंथन छान झाले
खूप रंगत आली.

तुम्ही प्रत्येकाचे उत्तर/प्रश्न नीट तपासून अगदी योग्य उत्तरे आणि प्रोत्साहन दिले.
>>
याला +७८६

चीकू छान होते कोडे. अजून घाला नंतर, असतील तर. डोक्याला खुराक बरा वाटतो.
उत्तर समजून घेतेय, मग विचारेन काही अडले तर.

धन्यवाद सर्वांना! मी जेव्हा प्रथम हे कोडे ऐकले तेव्हा माझी कोडे सोडवायची प्रक्रियाही मानव यांच्याप्रमाणेच होती, तीन उपप्रश्न, दोन उपप्रश्न असं करत करत शेवटी उत्तर आले Happy त्यामुळे सगळ्यांचे तर्क वाचतानाही खूप मजा आली.

मित्रहो
23 फेब्रुवारी रोजी सामान्यज्ञानावर आधारित एक अंक खेळ सादर करेन.
सर्वांचे स्वागत आहे !

अशा लॉजीक कोड्यांमध्ये "एकच प्रश्न विचरायला परवानगी आहे." याचा अर्थ असा असतो की एक प्रश्न विचारून त्याचे उत्तर माहीत करून त्यावरून दुसरा प्रश्न विचारायला परवानगी नाही. विचारलेला प्रश्न उपप्रश्नांनी बनलेला असो/नसो प्रश्न असा हवा ज्याचे शेवटी उत्तर एकच उत्तर आहे हो किंवा नाही असे येते.
या कोड्यात अर्थात हे उपप्रश्न नसलेल्या सरळ प्रश्नाने साध्य होते, तेव्हा शेवटी तशा उत्तराची अपेक्षा ठेवणे रास्तच आहे.

पण स्वर्ग नरक द्वार कोड्यात जिथे एक द्वारपाल नेहमी खरे दुसरा खोटे बोलतो त्यात एकाला उद्देशून 'मी जर त्याला विचारले हे नरकाचे(किंवा स्वर्गाचे) द्वार आहे का तर तो काय उत्तर देईल?" असेच विचारावे लागते ना?
सांगण्याचा उद्देश हा की यापुढेही कदाचित अशी कोडी येतील ज्यात एकच किंवा दोनच वगैरे प्रश्न विचारण्याची परवानगी असेल. त्यात विचारावा लागणारा प्रत्येक प्रश्न हा उपप्रश्नासहीत कॉम्प्लेक्स असू शकतो, जर तर अटीं सकट वगैरे, जसा स्वर्ग - नरक द्वार मध्ये आहे. तेव्हा कुणीही प्रश्न कॉम्प्लेक्स होतोय म्हणुन उत्तर देण्यापासून परावृत्त होऊ नये यासाठी हा खुलासा.>>

मानव तुमचे म्हणणे अगदी बरोबरच आहे. २-३ उपप्रश्न आले तरी तुमची सुरवातीची दोन्ही उत्तरे बरोबरच होती, आपण कोड्यामधे 'उपप्रश्न नसलेला प्रश्न' विचारायची condition टाकली नव्हती त्यामुळे ती उत्तरेही अगदी अचूकच आहेत. त्यामुळे प्रश्न complex होतोय म्हणून कोणीही उत्तर देण्यापासून परावृत्त्त होऊ नयेच. स्वर्गनरकाच्या कोड्यात उपप्रश्न लागणारच आहेत. या कोड्यात उपप्रश्न नसणारं उत्तरही होतं ते कोणी देतय का याबाबत मला उत्सुकता होती आणि त्यामुळे अजून जरा रेटलं एवढंच Happy पण तुम्ही कसोशीने पाठपुरावा करून तेही उत्तर बिनचूक ओळखून काढलंत त्यामुळे तुमचे डबल अभिनंदन Happy

चीकू, उलट या कोड्यात सरळ प्रश्नाने हे साध्य होते हे सांगून, आणि तशा उतराची अपेक्षा धरून तुम्ही चांगलेच केले आणि त्याबद्दल तुम्हाला मी जास्तीचे धन्यवाद देतो. (तसे करणे रास्तच आहे हे मी लिहिलेच आहे Happy ) असे साधे सरळ उत्तर असताना तशा उत्तराचा आग्रह धरायला काहीच हरकत नाही.

तुमच्या कोड्यावरुन मला पुढे कोडे सुचलेय, त्यात प्रश्न कॉम्प्लेक्स असेल, आणि इथे झालेल्या चर्चेतून कोणाला एकच प्रश्न म्हणजे त्यात उपप्रश्न नकोत असे वाटू नये यासाठी खुलासा केला. आता लागोपाठ दोन लॉजिक कोडी झाली, तेव्हा मी नंतर कधीतरी देईन कोडे.

Pages