युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

मी व्हेज बिर्याणी करताना खाली कांदा कापून पसरतो , त्यावरच वरचे लेयर रचतो

काय तो बिरीस्ता अन फरिश्ता त्याचाच होईल

आहाहा.. काय मस्त टिप्स...

चिकन ओव्हर कुक होऊन ड्राय झाले तर >> हे हेउ नये म्हणुन काय करायचं ? यासाठी काही टिप्स असल्या तर द्या...... मागे हे एकदा झालं तेव्हा पासुन चिकन बिर्याणि घरी करयचा धीर नाही...

वैनी काल मोठा प्रतिसाद टंकला व तो उडाला ऑफिसच्या लॅपटॉप मध्ये काहीतरी गडबड आहे.

मी पण महिन्यातुन एक दोन दा बिर्याणी करते. चिकन वाली.

माझी मेथड अशी.

दावत बासमती घ्या हिरवे पाकीट अलहमदुलिल्लाह. त्यातील एक वाटी तांदुळ ( दोन व्यक्तींना) दोन वाटी ( चार व्यक्तींना)
हे पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा.

दुसरी कडे मोठे भांडे भर पाणी उक ळून घ्या. मोजले नाही तरी चालेल.

आता जाड बुडाच्या टोपात फोडणीस साजूक तूप घाला दोन चमचे तीन चमचे. त्यात खडा मसाल्या पैकी जिरे, शाहा जिरे, हिरवे वेल दोडे,
दालचिनी लवंगा जावित्री, व वरील तांदू ळ परतून घ्या. आता त्यात गरम आधणाचेच पाणी टाका व मीठ घाला. आता जरुरीपेक्षा जास्त भरपूर पाण्यात तो भात शिजवून घ्या. कणी मोड शिजला की चाळ णीत हलक्या हाता ने ओता.

आता कांदा तळेपरेन्त व चिकन ची ग्रेव्ही बनेपरेन्त भात गार होतो. बिर्याणी बिल्ड करताना हलक्या हातानेच भात उकरून शिवरा.
तळाशी परत थोडे तूप व वर त ळलेला कांदा पसरा. ( माबोकरीण मामी ह्यांची टिप) हा अगदी दाना दाना दाना खि लके असा भात होतो.
मी थोडा नुसतासुद्धा खायला ठेवते.

नेक्स्ट डे त्यात पनीर मटार घालुन पुलाव होतो

चिकन ओव्हर कुक होऊन ड्राय झाले तर >> हे हेउ नये म्हणुन काय करायचं ? यासाठी काही टिप्स असल्या तर द्या......
बिर्याणीमधे केशर टाकताना ते आधी वाटी-अर्धा वाटी कोमट दुधात चुरुन भिजवावे. बिर्याणी रचुन झाल्यावर मधे ग्लासरॉड/चॉपस्टिकने छिद्र पाडुन ते केशरवाले दुध टाकावे. ड्राय होईल असे वाटल्यास आधीच दुधाची क्वांटीटी वाढवावी.

यासाठी काही टिप्स असल्या तर द्या......
<<
ड्राय होऊ नये म्हणून त्यात अंगी ओलावा आणण्याच्या टीप्स पैकी केशर-दूध वाली जशी आहे तशीच चिकन ब्राईन करणे ही एक आहे. पण तरीही अगदी करी मधे उर्फ पाण्यात शिजवलेले देखिल ओव्हरकुक झाले की फ्लेकी ड्राय होतेच.

नेहेमीच्या चिकनच्या शिजण्याच्या वेळेचा अंदाज आपल्याला असतो. पोल्ट्रीतून चिकन सामान्यतः एकाच वयाचे निघते. तेव्हा मटणासारखे किंवा गावराणी कोंबडीसारखे कधी कोवळे कधी जून असे होत नाही.

पण बेसिक प्रॉब्लेम येतो तो चिकनचे रँडम पिसेस वापरले जातात तेव्हा. म्हणजे सीना/तंगडी/इतर पिसेस मिक्स.

१. बिर्याणीत लिव्हर कधीच टाकू नका.
२. एकच प्रकारचे चिकन पिसेस घ्या. ब्रेस्ट्स + विंग्ज, किंवा लेग या दोघांचा कुकिंग टाईम वेगळा आहे. तंगडी नीट शिजली तर सीना ओव्हरकुक होऊन ड्राय होईल, अन ब्रेस्ट शिजल्यावर तंगडी कच्ची राहील.
३. ३-४ तास तरी रेफ्रिजरेट करून ठेवलेले चिकन सॉफ्ट शिजते असे म्हणतात. याचा मला कन्व्हिन्सिंग अनुभव असा नाही.
४. कच्च्या पपईचा कीस वाळवून पावडर करून ठेवतात. ताजी कच्ची पपई, किंवा ही पावडर थोडी (पावशेर चिकनला चिमूटभर पुरते) मॅरिनेशनमधे टाकली तर मटन / चिकन फारच सुंदर गळते. पण अंदाज नीट यायला हवा. नाहीतर सगळे मीट ग्रेव्हीमधे गायब होऊन जाते.

यापेक्षा अ‍ॅडिशनल टिप्स माझ्याकडे नाहीत. कुणाजवळ असेल तर सांगा. माझ्या नेहेमीच्या कॉकरेल चिकनच्या पिसेसचा कुकर मधे व बिना कुकर टाईम मला आता अनुभवाने माहिती झाला आहे.

कोणत्याही भात पुलाव साठी तांदूळ भिजत ठेवून मग आधणात घातले तर मोडतात असे आज्जी सांगे. त्यामुळे आमच्याकडे आधणाचे बुडबुडे येऊ लागले की तांदूळ धुवायचे आणि लगेच खळखळ उकळत्या आधणात वैरायचे अशी पद्धत आहे. भिजवून किंवा धुवून ठेवायचे नाहीत.

हीरास अनुमोदन. मी तीन्ही प्रकारांनी (तांदूळ आधी नुसता धुवून ठेवणे, आधी २० -२५ मिनिटं भिजवणे आणि डायरेक्ट न धुता वापरणे) करून पाहीलं आहे. तीसरी पद्धत बेस्ट वाटली आणि पटली मला, जरा वेळही वाचतो.

भात मोकळा होण याची मेख तो कमित कमी स्टार्ची असण यात आहे त्यासाठिच तो निट स्वछ धुवुन घ्यायचा, उत्तम प्रतिचा बासमती असेल तर कणी मोडत नाही.बासमती पचायाला जड असतो त्यामुळे भिजवायचा
असो प्रत्येकाची सेट मेथड असते.

भात शिजवताना भरपूर पाणी घालुन शिजवायचा, त्यात चमचा भर तेल आणि चवीपेक्षा कमी मीठ घालायचं आणि काय त्या कण्या पाहिजेत तितक्या राहिल्या वाटलं की ताबडतोब गाळण्यावर टाकून पाणी लगेच काढून टाकायचं. मग ताटात पसरुन सुकवायचा. तोवर भाज्या/चिकन काय असेल ती ग्रेवी करायची. वर्डल सोडवायचं आणि व्यवस्थित थंड झाला की मग लेयर लावायला घ्यायचे.
पाणी भातात जिरवुन भात कोरडा करायचा नाही.

तांदूळ दोन तास भिजवून मग तुपात तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, हि वेलची, बडी वेलची टाकून भिजलेला तांदूळ टाकायचा हलक्या हाताने परतून मीठ टाकून भाताच्या चौपट पाणी टाकायचे. पाण्याला उकळी आल्यावर 4 एक मिनीटात भात बर्यापैकी शिजतो, आच मोठीच ठेवायची. लगेच भात गाळणीवर घ्यायचा आणि पाणी निथळले की नन्तर परातीत पसरून ठेवायचा. अगदी व्यवस्थित शिजतो, एक एक शीत मोकळे होते.

खूप छान टिप्स जमा होत आहेत.
मी चिकन बिर्याणीसाठी ड्रमस्टिक्स वापरल्यास ७५% शिजवून घेते. बोन-इन चिकन ब्रेस्ट किंवा बोनलेस थाईज वापरुन बिर्याणी करताना चिकन रात्रभर मुरवून घेते मात्र शिजवत नाही. थर लावताना जाड बुडाच्या पातेल्यात तेल तुपाच्या मिश्रणात एक पातळ कापलेल्या कांद्याचा थर, त्यावर बटाट्याच्या पातळ चकत्याचा थर लावते. त्यावर १. ड्रमस्टिक्स वापरल्यास एकच थरात चिकन आणि त्यावर भात आणि पुदीना, तळलेला कांदा.
२. बोन-इन चिकन ब्रेस्ट किंवा बोनलेस थाईज वापरल्यास चिकन आणि भात याचे दोन थर लावते. प्रत्येक भाताच्या थरावर पुदीना, तळलेला कांदा
शेवटी किती कप तांदूळ घेतलेत त्यानुसार (१कप तांदूळ असल्यास पाव कप पेक्षा थोडे कमी) केशर घातलेले दूध +पाणी -

कसलं भारी नाव आहे.

मला एकदम परदा है परदा, आणि ये जो चिलमन है, दुश्मन है हमारी गाणी आठवली.

Lol चिकन नि बिर्याणीचं गाणं नाय आठवलं होय गं - चौक चांदनी, चौधरी ढाबा, दे किचन से आवाज चिकन
ह्यात बिर्याणी बुखारी आहे....तापदायक बिर्याणी!!!!

तापदायक कोंबडीची बिर्याणी म्हणजे बिर्याणी बुखारी
लाजऱया कोंबडीची बिर्याणी म्हणजे परदा चिलमन बिर्याणी
असो, पण फार टेस्टी लागते.. बनवेन कधी तरी आणि इथे रेसिपि टाकेन

ड्रम स्टिक काय असते
म्हणजे चिकन मध्ये पोषक तत्व म्हणून शेवगा शेंगा घालतात की चिकन चा काही भाग शेवगा शेंगांसारखा दिसतो?

ऑ, वरच कोणीतरी लिहिलं आहे ना

मला वाटतं चिकन च्या शरीराच्या काही भागाला ड्रम स्टिक म्हणत असतील.
(हे लिहून झालं आणि वर फोटो पाहिला.आता कळलं.धन्यवाद.)

अमा, तुम्ही बिर्याणी च्या राजधानीतच राहील्याने तुम्हाला वेग वेगळ्या प्रकारची आणी चवीची बिर्याणी खायला मिळाली हे भाग्यच.

छान टिप्स दिल्यात.

मा. अ‍ॅडमीन, बिर्याणी साठी एक वेगळे संकलन करा जमल्यास.

हो. धागा लेखिकेने कोणीतरी समविचारी तिथे विचार मांडतील या अपेक्षेने धागा काढला होता. पण बिर्याणीप्रेमींनी तेथे अतिक्रमण केले.

आठवलं. "अशी कशी आवडत नाही? बिर्याणी खाल्ली नाही तर जीवन व्यर्थ" असे पण झाले होते तिथे. त्या विरुद्ध तिथे मी खिंड लढवत होतो तिथे दोन दिवस. Proud

Pages