युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

अतिशय कंजूस आणि चक्रम वाटेल पण मी 15 दिवसाच्या पॅरिस स्टे ला 40 कॉफी क्रीमर च्या छोट्या डब्या एका मोठ्या डब्यात घालून नेल्या होत्या.मार्केटस लांब आणि हॉटेल ला रेस्टॉरंट नव्हते.
आता ते एअरपोर्ट वगैरे चे एपिसोड बघते तर वाटतं त्यावेळी मेथ वगैरे नेतेय समजून अटक झाली असती.
तसं एक मध्यम ग्रोसरी शॉप चालण्याच्या अंतरावर असेल तर सर्व जवळपासचे पर्याय मिळतात.
पुढच्या वेळी जाण्याची संधी मिळाल्यास लोकल व्हेज डिशेस खाईन.

रेस्टॉरंट नसलं तरी क्रिमरची पावडर दिली असती की. मेथ म्हणताय म्हणजे लिक्विड बारके कप नसणार. मग शंभर पावचं नेण्याऐवजी एकच मोठा डबा का नाही नेला क्रिमर चा? माझे भाकड प्रश्न Wink

त्यावेळी एका मॉल मध्ये ते छोटे छोटे कप वाले पाकीट होते.एक डबी एका कपात रिकामी होऊन दूध बनते ते.लिक्विड होते.
मुळात हे क्रीम बीम चहात दूध म्हणून कसं वापरतात वगैरे फार माहिती नव्हतं.एक दोन वेळाच पाहिलं होतं.
क्रीमर म्हणजे दूध पावडर ना बहुतेक?

ट्युलिप, पिझ्झा बर्गर सँडविच ह्या शिवाय बरेच ऑपशन्स आहेत की.. मेडिटेरेनिअन, मेक्सिकन, थाई रेस्टॉरंट्स मध्ये जा. खूपसे आपल्या चवीला मिळते जुळते ऑपशन्स आहेत. व्हेज मधेही मिळतील.

तुम्ही LA ला जात असाल तर मेक्सिकन नक्की खा. इथले मेक्सिकन सर्वात बेस्ट आहे. आणि चिपोटले, टाको बेल मध्ये कृपया बिलकुल जाऊ नका. ते खरे मेक्सिकन नाही.

मुळात हे क्रीम बीम चहात दूध म्हणून कसं वापरतात वगैरे फार माहिती नव्हतं.एक दोन वेळाच पाहिलं होतं. >> हे मला अजूनही माहीत नाही. पण आमचा तो विषय काळी कॉफीची सवय लागून सुटला. जेव्हा काळी कॉफी नको वाटायची तेव्हा त्या छोट्या दुधाच्या डब्या वापरायचो, पण ती पांचट कॉफी काही घशाखाली उतरायची नाही. त्यापेक्षा काळी कॉफीच बरी.
आरती, धन्यवाद रेको बद्दल. ते नक्की ट्राय करणार. अजून लोकल खादाडी माहित असेल तर नक्की सांगा.

ही लॉस एंजेलिस, वेगस आणि आजूबाजूची ट्रीप आहे >> या सर्व भागात तुम्हाला पिझ्झा / बर्गर वगळता भरपूर पर्याय सापडतील. मेक्सिकन आणि इतर दक्षिण देशातले प्रकार खाऊ शकता . ट्रेडर जो , होल फूड सारख्या दुकानातून सॅलड, फळे, दही वगैरे आणू शकता. फ्रोझन आणि मायक्रोवेव्ह मधे गरम करुन खाता येणासारखे प्रकार पण भरपूर मिळतील.

केक करायला म्हणून कोको पावडर आणली पण मुहूर्त काही निघाला नाही. ती दुसऱ्या कुठल्या पदार्थात वापरता येईल. कमी गोड किंवा बिना साखरेचा असेल तर बरे.
दुध नको कारण कोणीही दुध पीत नाही.

सम प्रमाण कोको पावडर, निम्मे प्रमाण आयसिंग शुगर, कोको पावडर इतके व्हर्जिन कोकोनट ऑईल हे सर्व मॅजिक बुलेट च्या छोट्या भांड्यातून काढून साच्यात/प्लेट मध्ये घालून फ्रीज केल्यास मऊसूत डार्क चॉकलेट बनते, जे पटकन संपेल.
आता फोटो देणे आलेच.
IMG_20210806_203455.jpg

अनु धन्यवाद.
सो 2 कप कोको, 1 कप शुगर 2 कप ऑइल. सोपे आहे. Happy
स्वस्ति ठेवली असती. पण मला जरा ओसीडी आहे पदार्थांच्या बाबतीत. संपत नाही तोपर्यंत सारखा डोक्यात तोच किडा वळवळतो.

हो.एक लॉकडाऊन रेसिपी म्हणून चॅनल होता त्यावरून.पोत चांगला येतो.खोबरेल तेल आहे वगैरे खाताना कळत नाही.फक्त विकतच्या चॉकलेट प्रमाणे खूप वेळ बाहेर कडक राहत नाही.लगेच गट्टम करावे लागते.
मोल्ड मुळे पब्लिक ची नजर एकदम आदराची होते चॉकलेट बद्दल आणि लगेच संपते.

ही मूळ रेसिपी असेच काहीतरी शोधताना मिळालेली
https://youtu.be/_k57wGaWJFw

बेसन लाडू थोडा कच्चा राहिलाय . नेहमी सारखं बेसन पीठ चांगलं भाजून घेतलं होत ..फक्त यावेळी पीठ रवाळ होण्या साठी चनाडाळ मिक्सवर ला बारीक करून पिठा सोबतच भाजली... आणि तिथेच चूक झाली ..डाळ पहिलेच भाजून आणि मग मिक्सर ला बारीक करून परत पीठासोबत भाजायला हवी होती.
कच्चा पणा घालवायला काहीतरी कोणी मला एखादी युक्ती सांगू शकेल का?

३० सेकंद -१ मिनीट मायक्रोवेव्हच्या शक्तीनुसार मायक्रोवेव्ह करून बघा. थोडा बसेल लाडू कारण तूप वितळेल पण कदाचित कच्चेपणा जाईल... आधी एकच करून बघा. Lol नायतर- असा काय सल्ला दिलास, आता अख्खे लाडू वाया गेले... म्हणून माझ्यावरच उखडाल.

सी Lol

अमूल फ्रेश क्रीम चा एक व्हाइट पास्ता सॉस मध्ये उपर्योग कर्तो आम्ही. प्लस पार्मेजान चीज घालायचे. यम्मी

वर लिहिले आहे तसे घट्ट बनवून डीप फ्रीज केले तर आइसक्रीम मध्ये पण छान टेस्ट येते. इथे आइसक्रीम ची कृती आहे नॅचर ल्स सारखे घरच्या घरी त्यात वापरता येइल.

मी साखर व थोडा नॅच रल व्हॅनिला एक्स्ट्रॅ क्ट घालून नुसतेच खाते. स्वस्त डेझर्ट. पॅन केक किंवा वाफल्स बनविल्या तर त्या वरही फेटून घालता येइल.

ट्युलिप : एल ए मधे तरी इंडियन ग्रोसरीची बरीच दुकाने आहेत आणि रेस्टॉरंट्स सुद्धा. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही जिथे जिथे जाणार आहात त्याच्या आसपासची खाऊची ठिकाणं हवं तर जाण्यापूर्वीच गूगल करून ठेवा. म्हणजे अंदाज येईल. आणि त्याप्रमाणे तुम्ही बरोबर काय न्यायला हवं ते ठरवू शकाल.

ठेपले लाह्या पीठ तिखट मिठाची पुरी दिवाळीचा घरगुती फराळ ह्यात हर प्रकारचे लाडू चिव डा नेता येइल दूध पाव्डर व टीबॅग साखर न्या.
डाळ तांदूळ झिप लॉक बॅग मध्ये व बेबी प्रेशर कुकर नेलातर वरण भात आमटी करता येइल. तूप पण डबा फ्रोझन करून नेता येइल घरचे.
कांदे बटाटे तिथे घेता येतील

डाळ तांदूळ झिप लॉक बॅग मध्ये व बेबी प्रेशर कुकर नेलातर वरण भात आमटी करता येइल. तूप पण डबा फ्रोझन करून नेता येइल घरचे.
कांदे बटाटे तिथे घेता येतील >>> असं अर्ध किचन घेऊन फिरायच असेल तर मग त्यापेक्षा एल.ए घरीच व्ही.आर मध्ये बघावं, नाही? Wink

फिरत वाट वाकडी करून इंडियन रेस्टॉरंट मध्ये खाणे, हॉटेल च्याच रेस्टॉरंट मध्ये स्थानिक प्रसिद्ध गोष्टी खाणे आणि कधी वेळी यावेळी पोहचलो तर पटकन मायक्रोवेव्ह मध्ये खिचडी उकळली.
15 दिवस मुक्कामात सगळ्याचं मिश्रण करून जे सूट होईल ते.

पत्ता विपू करते. मला पाठवू शकता. Wink मी काहीही तक्रार न करता संपवेन.
मायक्रोवेव्ह करून बघू शकता पण त्याने फार फरक पडेल असे वाटत नाही. पीठ कसं घट्ट्/मोहन इ त्यावर खुसखुशीत आवरण ठरते. बाकरवडी चाट करून त्यात संपवता येतील. त्यात जरा नरम बाकरवडी चालून जाते.

कुरकुरीत व्हायला बाहेरचे समोसे कचोरी वाले माल दोन दा फ्राय करतात. एक ट्रायल म्हणून परत तळून बघा. किंवा एअर फ्रायर मध्ये

Pages