Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
घरी वेलीला भरपूर पडवळं आली
घरी वेलीला भरपूर पडवळं आली आहेत. भाजी सोडून काय करता येईल? कमी कष्टात?
तळणं शक्यतो नको.
पडवलच्या फोडी घालून कढी, आत
पडवलच्या फोडी घालून कढी, आत बटाट्याचे सारण भरून रोल्स (तव्यावर शालो फ्राय करून), चकत्या कापून मीठ मसाला लावून परतलेले काप....
पण शेवटी ते पडवळ आहे..हे लक्षात ठेवावे...v चवीच्या फार अपेक्षा ठेवू नयेत! फार मेहनतही घेऊ नका....फळ मिळणार नाही
प्रज्ञा
प्रज्ञा
पडवळाची पीठ पेरून किंवा डाळ घालून भाजी फारशी आवडत नसेल तर पडवळ-डाळिंब्या छान होतात, तशा करून पहा.
<<पण शेवटी ते पडवळ आहे..हे
<<पण शेवटी ते पडवळ आहे..हे लक्षात ठेवावे...v चवीच्या फार अपेक्षा ठेवू नयेत! +१
रोल्स ची आयडिया चांगली आहे.
डाळिंब्या? म्हणजे वालाची डाळ
डाळिंब्या? म्हणजे वालाची डाळ घालून का?
कोवळ्या पडवळाची पडवळ बारीक
कोवळ्या पडवळाची पडवळ बारीक चिरून किंवा जाड किसणीने किसून मग त्यात मीठ मिरची , दा कू, दही घालून कोशिंबीर मी खूप वेळा करते. अप्रतिम लागते. सेम टू सेम काकडीच्या कोशिंबिरी सारखी लागते. घरच्या कोवळ्या पडवळाची तर जास्तच छान लागेल.
पडवळया च्या बिया बारिक करुन
पडवळया च्या बिया बारिक करुन त्यात बेसन पिठ कांदा कोथिम्बीर घालुन धीरडे करता येते.
शेंगदाणे आवडत असतील तर पडवळ
शेंगदाणे आवडत असतील तर पडवळ शेंगदाणे रस्सा भाजी छान होते. मला शेंगदाणे आवडत नाहीत पण मध्ये मला पीठ पेरून भाजी करायची होती आणि नवऱ्याला रस्सा हवी होती (माझा थोडा उजवा हात दुखत होता म्हणून परतून करण्याऐवजी रस्सा करायचा विचार केला). डाळिंब्या, चणाडाळ काही घरात नव्हतं. मग आठवलं शेंगदाणे आहेत आणि नवऱ्याला ते आवडतात फार हयात त्यात अगदी फणसाच्या भाजीतही आवडतात मग केली शेंगदाणे घालून भाजी, त्याला आवडली.
दुसरा प्रकार म्हणजे कोवळे पडवळ असेल तर त्यातला आतला भाग, त्यात गोडा मसाला किंवा गरम मसाला, शेंगदाणे कूट, ओले खोबरे, थोडं बेसन, बाकी तिखट मीठ ओवा हिंग मिरपूड (थोडं ताक किंवा लिंबुरस आवडत असेल तर) वगैरे घालून सारण करायचे आणि पडवळाचे दोन पेराएवढे तुकडे करून त्यात भरून मावेत थोडं शिजवून घ्यायचे आणि मग ते जरा जास्त तेलाच्या फोडणीत खरपूस परतायचे.
डाळिंब्या? म्हणजे वालाची डाळ
डाळिंब्या? म्हणजे वालाची डाळ घालून का? >>> नाही. पावटे किंवा कडवे वाल भिजवून मोड आल्यावर सोलून करतो तो प्रकार, काहीजण बिरडे म्हणतात त्याला.
मनीमोहोर, साल काढायची का
मनीमोहोर, साल काढायची का कोशिंबीर करताना? कोवळे नसेल तर साल काढून केलेली चालेल ना?
बिया चिरून, अमुपरी? हे नव्हते ऐकले.
अन्जू, म्हणजे कांदा टोमॅटोचा रस्सा दाणे घालून ना? माझा नवराही दाणेखाऊ आहे !
कोवळं असेल दारचं तर नका काढू
कोवळं असेल दारचं तर नका काढू साल किंवा हवं असेल तर काढू ही शकता. त्याने काही फरक पडणार नाही.
मी आजच केली होती , दोरीवाल्या चॉपर ने चॉप केलं पडवळ
कोवळं असेल दारचं तर नका काढू
कोवळं असेल दारचं तर नका काढू साल किंवा हवं असेल तर काढू ही शकता. त्याने काही फरक पडणार नाही.
मी आजच केली होती , दोरीवाल्या चॉपर ने चॉप केलं पडवळ.
दह्यातली नको असेल तर पडवळ चॉप करायचं त्यात थोडी भिजवलेली मुगडाळ घालायची मीठ मिरची लिंबाचा रस साखर दा कू घालून वर फोडणी द्यायची. ती पण मस्त लागते.
हो स्नेहा पडवळ च्या बिया
बिया चिरुन करतात पण बिया कोवळ्या हव्यात..
धन्यवाद सगळ्यांना. छान आहेत
धन्यवाद सगळ्यांना. छान आहेत आयडिया सगळ्या..
धन्यवाद सगळ्यांना. छान आहेत
धन्यवाद सगळ्यांना. छान आहेत आयडिया सगळ्या..
अन्जू, म्हणजे कांदा टोमॅटोचा
अन्जू, म्हणजे कांदा टोमॅटोचा रस्सा दाणे घालून ना? >>> नाही, त्यातही आवडेल त्याला पण मी त्यात दाणेकूट घालते.
करून बघीन मी
करून बघीन मी
घरी जवळ जवळ १ किलो sour cream
घरी जवळ जवळ १ किलो sour cream उरलय आणि expiry एका आठवड्यात आहे. काही पाकक्रुती , आयडिया सुचवा जेणेकरुन ते वापरता येइल.. धन्यवाद ..
आम्रखंड करू शकता!
आम्रखंड करू शकता!
इथे विविध पाककृती आहेत….
इथे विविध पाककृती आहेत…..
https://www.allrecipes.com/gallery/ways-to-use-up-sour-cream/?
"तू गेल्या वर्षी पाठवलेल्या
"तू गेल्या वर्षी पाठवलेल्या आहेत या" हे ऐकून अक्षरशः त्यांचा घास हातात तसाच राहिला!!>>>>
पण "आपली मुलगी पुपो करु शकते?" असा प्रश्न त्या काकूंच्या मनात आला पण नाही? 
आधी कोणी विचारले असेल तर
आधी कोणी विचारले असेल तर माहित नाही, प्रवासात न्यायचे सोप्पे सुटसुटीत पदार्थ काय करू शकते.? आठ दिवस बाहेर खाऊन पोट बिघडेल. हॉटेलात गॅस शेगडी असेलच असे नाही, microwave असावा. महत्त्वाचे मी सुगरण नाही म्हणुन करायला आणि टिकणारे असे सोप्पे पदार्थ हवेत.
लाडू, चिवडा, करंजी चकली हे
लाडू, चिवडा, करंजी चकली हे सर्व न्या. ठेपले लोणचं, घारग, ति.मि. पु-या.
तसंच मायक्रोवेव्ह असेल तर उपमा, पोहे वगैरेची रेडी मिक्स करून किंवा विकतची घेऊन जा.
मावे असेल तर रेडी टू ईट
मावे असेल तर रेडी टू ईट भाज्या हल्ली खूपच चांगल्या मिळतात. पूर्वीसारखा प्रिझर्वेटिव्हचा वास अजिबात येत नाही. गिट्सचे पंजाबी छोले, अमृतसरी छोले छान होते. फ्रिजर असेल तर फ्रोजन नान ठेवा जवळ. गरम केलं की पटकन जेवण तयार होते.
फ्रोजन आयटेम्स आणि
फ्रोजन आयटेम्स आणि प्रिझर्वेटीव्ज आयटेम्स खाण्यापेक्षा लोकल स्वच्छ ठिकाणी ताजे अन्न जेवणं पोटासाठी अधिक योग्य राहील.
कुठे जायचंय?
कुठे जायचंय?
मेथी ठेपले, शेंगदाणा चटणी,
मेथी ठेपले, शेंगदाणा चटणी, लिंबू लोणचे, ओवा तिमि. पुरी, भडंग/ चिवडा, खाकरा, दशम्या, मावे मधे होणारे पोहे/नुडल्स्/उपमा पण नेऊ शकता.
पण हे खूप कोरडे होते, सोबत ताक्/सूप वगैरे विकत घ्यावेच लागेल बाहेरून
व्वा छान छान ऑप्शन आहेत.
व्वा छान छान ऑप्शन आहेत. तिथे गेल्यावर इंडियन स्टोअर गाठून ही खरेदी करून ठेवू. फ्रोझन रेडी मिक्स कधी आणलेच जात नाही म्हणून जास्त माहिती नव्हती. धन्यवाद सर्वांना.
अनु, ही लॉस एंजेलिस, वेगस आणि आजूबाजूची ट्रीप आहे.
मीरा, बाहेरचं खाणं होईलच, पण दररोज बर्गर सँडविच पिझ्झा नको वाटेल म्हणुन पर्याय शोधतेय.
हमखास पर्याय
हमखास पर्याय
1. डाळ तांदूळ मसाला मीठ सगळं तेलावर भरपूर भाजून पंख्याखाली कोरडं वाळवून खिचडी मिक्स(इतकं भाजायचं की मायक्रोवेव्ह मध्ये खिचडी झाली पाहिजे)
2. अश्याच प्रकारे घरी बनवलेले उप्पीट मिक्स
3. अग्रज मधून शिरा मिक्स
4. घरी केलेल्या तिखट मीठ पुऱ्या किंवा दशम्या
5. चालत असल्यास सामानात व्हीबा चे साऊथवेस्ट चिपोटले सॉस आणि आपला पॅकबंद वर्हाडी ठेचा
6. मोठ्या प्लॅस्टिक डब्यात मखाना पाकीट
7. सकस च्या रेडी चपात्या.घरी थोडे बटर/तेल लावून तापवल्या की फ्रेश लगेच खाता येतात
8. अग्रज चे शेवभाजी मिक्स(बरेच तिखट आहे)
9. ऍक्ट चे छोटे मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न पाकीट
10. नेचरझेस्ट च्या साईट वर डिहायड्रेटेड कडधान्ये आहेत ती.
11. हे सर्व फार जास्त बाहेरचे वेगळ्या चवीचे रोज दोन्ही वेळ जाणार नाही/घरात पाव बेस्ड अन्न न पचणारी मंडळी या हिशोबाने सांगतेय.फार महाग नसेल आणि हॉटेलला ब्रेकफास्ट पॅकेज असेल तर खूप स्थानिक पर्याय मिळतात.फ्रेश फळं, ब्रेड, जॅम, स्प्रेड्स, नटेला.कुलचा आणि नान ब्रेड पण मोठया सुपर मार्केट मध्ये मिळतात.
12.ढोकळा मिक्स आणि मायक्रोवेव्ह चे केक पॅन.
13. शंकरपाळे गुळपोळी इत्यादी.
14 अन्नपुर्ण किंवा रसोई मॅजिक चे बिर्याणी मिक्स मिळते ओलसर.भातात नीट मिसळून उकडले तर बिर्याणी चवीच्या जवळचा भात बनतो.
15. कच्चे पोहे मेतकूट नेऊन दही पोहे
हे खूप पर्याय आहेत, त्यातले आवडते निवडता येतील.
अनु तुस्सी ग्रेट हो! मस्त
अनु तुस्सी ग्रेट हो! मस्त पर्याय आहेत, कितीतरी मला जमण्यासारखे आहेत. पाव बेस्ड खाणं खरंच नको वाटेल तिन्ही वेळेस , असे झटपट पदार्थ बरे पडतील. अनेकानेक धन्यवाद. स्क्रीनशॉट घेण्यात आला आहे.
Pages