आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेमाचा त्रिकोण!
ते नुसत्या मित्राने कारच दर्वाजा हात लांब करून बंद करणे व सीट बेल्ट लावायला मदत करणे ह्याव अन त्याव खेळ्या होतील. पण घाबरू नका>>> Lol
बेल्ट लावायचा सीन दाखवला तर प्रेक्षकांनी काय समजायचे? अरूला गाडी चालवता येते, ती शिकली आहे(हे लेखकाने लक्षात ठेवायला हवे). ती जर बेल्ट लावताना अडखळली तर बाजूला अशू आहे म्हणून मन विचलीत झाले कि अशूने बेल्ट लावावा असे तिला वाटते? पण अरू निरागस आहे म्हणून बेल्टच खराब मानायचा Happy
गिल्ट फ्री जवळीक Proud

भाग ५८१:

भाग गे बाय माझे ने सुरू होतो. ही विमल आज वेळेत आलेली आहे. चक्क. अनघा व अरू किचन मध्ये खपत आहेत. व विमल पेपर मधील फोटो चे कौतूक करत आहे. म्हातारा अंगण्यातच बसला आहे पेपर घेउन. आल्या गेल्या ला दाखवत आहेत. आता अरू क्श्याला फोटो गाणे गायले की बास आहे म्हणतेच. हिला अगदीच प्रसिद्धीची हौस नाही हो. सप्त सुरांमध्ये विहरणारा कौमुदि आत्मा आहे . सो प्युअर सो गुड.
अगदी प्रसिद्ध्ही परा:मुख आहे हो ही आदर्श सून.

आज हिला ऑफिसची आठवण झाल्याने त्यांच्या साठी काहीतरी गोडाचे पटकन करून निघणा र म्हणे. हे ज्या वेळेत म्हण्ते आहे जेव्हा मुंबईकर सर्व आवरून लोकलची वाट बघत प्ला ट फॉर्म वर उभे अस्तात. पण ही किचन गॉडेस ना. अनघा विमल तिला तू तयार हो आम्ही करतो किच न काम म्हणून हाक लायचे काम करतात. पण हिचा पाय निघत नाही. कांचन अनघाला हाक मारते.

विशाखा आलेली आहे. तिने अनघाला ड्रेसेस व अरु ला साडी घेतली आहे. विशाखाच्या मैत्रीणीच्या प्रदर्शनातून घेतले आहे.
शेजारी अवे व अप्पा पण आहेत. जे संवादात फोडणी घालत आहेत. मग अनघाने ड्रेस घालावा तसा अरूने पण घालावा असे डिस्कशन होते. आजी अनघाला मुभा देते ड्रेस घालायची. अनघा व अरू वाकून नमस्कार करतात. सो संस्कारी.

अरूनेच साडी नेसावी असा का आग्रह. असे अप्पा आजी ला म्हणतो. तिचे तिला ठरवू दे. अरू जुने मॉडेल असल्याने साडीतच कंफर्टेबल आहे असे म्हणते. डिप्लोमॅटिक पण आहेच सून विशाखा रजा घेउन आलेली आहे. अरू ला आज फार कामे आहेत. पहिले केळकर ऑफिस मग तिचे ऑफिस. ते रेकॉर्डिन्ग परवा होते ना? किती काम करते हिरवीण. विशाखा जीन्स मध्ये सलवार कमीज मध्ये सुट सुटीत वाट्ते म्हणते पण ते सूख अरू ला नाही. कारण आई साडीतच छान दिसते.

अनघा पाकिटे ठेवायाला वर जाते तर अवी तिला लवकर खाली ये म्हणून चिडवतो. बाकीचे पण खवचट हसतात. ती लाजते.
अभी अनघा ह्यांचे प्रेमाचे संभाषण चालू आहे. हॉस्पिटल ला जाउ कि नको म्हणतो अभी. व लाड प्यार चालू आहे. अर्धा एपिसोड फक्त आणि फक्त कपडे फॅशन ह्यावर वेस्ट. काहीही घडत नाही. आई नेहमी साडीच नेसते. अनघा अरू वर साडी नेसायची सक्ती का बरं असा विचार सोडते.
संजना कशी काही ही घालते ( तिने काही ही घातले तर काय फरक पडतो?!)

अनघा एक मेंटल कंडिशनिन्ग कॅपसूल संत्रे सोलत आहे. दोन मिनिटे आई ची प्रायोरिटी समजावुन सांगत आहे. अभी आपलेच रिग्रेसिव्ह विचार रेटत, नाही आईला अँबिशनच नाही असे अभीच्या डोक्यात फिट आहे. शिक्षण गाणे बाजूला ठेवुन अरु कुटुंबासाठी झिजली आहे. आता ती बाहेर पडती आहे.

परत ते अरूची स्वप्ने संवाद तिला मोकळीक हवी व्गैरे अनघा आवा जात पट्टी. ती घरात असली की मला काळजी नाही. ती अबीचा दृ ष्टिकोण बदलायला प्रयत्न करत आहे. ह्यामुळे त्यांचया संसारात आग लागेल पुढे. पती परमेश्वरा पेक्षा वेगळे मत मांडत आहे. ती अरू ला सपोर्ट करणार आहे असा बाणे दार संवाद मांडते व नंतर तू आवरून ये मी टिफीन भरून ठेवते म्हणे मग काय उपयोग. वैचारिक झाशीची राणी किचन मध्ये भरी पाणी.

अन्या आता शेअर ट्रेडिन्ग करायचे म्हणत आहे. संजना ताई शी बोलू का म्हणते. तुझ्या बहिणीने मला मदत केली नाही. मला बायकांच्या हाताखाली काम करायला आव ड्त नाही. अ न्या त्याचे रिग्रेसिव्ह विचार सां ड त आहे. तो संजना सारखे मिळेल तो जॉब करणार नाही म्हणतो. जॉबलेस माणसाला काही रिस्पेक्ट नसतो. असे संजना क्लीअर करते. अनघा ने मोठे टिफिन पॅक केले आहेत. शिरा ऑफिस साठी.
व आशू साठी. मग अन्या म्हणतो आता रोज डबे जातील केटरिन्ग सुर झाले असे वाट्ते असा खट्टा टोमणा मारतो. अरू हो ते ही कर ता येइल म्हनून ऑफिसला जाते.

व्याख्या विख्ही वुख्हु इथे भाग संपला

आता प्रोमोम अध्ये अरू वर पब्लिसिटीचा फोकस असावा असे आशू क्लीअर करतो आहे. व संजनाला धक्क्क्यावर धक्के बसत आहेत. असे दाखिवले. म्हणजे आशू खळ्या पाड्त पण कडक बोलतो व फ्लॅश फ्लॅश फ्लॅश असे संजनाला ऐकून घ्यावे लागते.

ह्यांनी पुण्यात ल्या शॉर्ट्स टीशर्ट मधे मोका ट फिरणार्‍या एन आर आय सुना पाहिल्या नाहीत काय? कांचन ला हार्ट अ‍ॅटेक येइल.

मुख्य नायिका सोडून इतरा काही पात्रांना विमेन'स लिबचे वारे लागलेले आहे. पण ते वरवर. आत पॅट्रिआर्की खोल रुतून बसलेली आहे. किंवा फक्त बोलाचाच भात बोलाची कढी. स्वतःचा आराम, सोय पाहून. अविनाश एक अपवाद असू शकेल.
हिंदीचा एक एपिसोड पाहिला होता. त्यात अभि बाप आणि आजीच्या पार्टीत आणि अनघा अरुच्या असे दाखवले होते.

कालच्या भागात संजना अरुंधतीला, आज तुझी मुलाखत आहे असे सांगते ना. मग आजच्या एपिसोडची सुरुवात सकाळपासून कशी झाली?

रिकामटेकडा , दिवसरात्र अरुंधतीचा विचार करणारा आशुतोष प्रसिद्ध आणि यशस्वी संगीतकार आणि मल्टिपल बिझिनेसेसचा ओनर आहे हे पटवून घेणं कठीण आहे. सगळी लहान मोठी कामं नितीनला सांगत असतो.
त्याचं अरुंधतीवरचं प्रेम प्रियकरापेक्षा बापाचं वाटतं.

अरूनेच साडी नेसावी असा का आग्रह. असे अप्पा आजी ला म्हणतो. तिचे तिला ठरवू दे. >> पण आइकान्चन तर स्वतःच ड्रेस घालते ना?देविकाने बुक करुन दिलेल्या रिसॉर्ट मधे सगळे जातात तेव्हा आजि वेणीचा विग आणी पन्जाबी ड्रेस घालुन गेली आहे की एरवी हे दु:खत ते दु:खत करत असते पण कौडकवतिक मात्र सगळे पुरवुन घेते म्हातारी.
अन्याची चिडचिड बेकायदेशिर आहे हे अरु त्याला एकदाच ठणकावुन सान्गत का नाही की "बाबा रे मी तुझी बायको काय कुणिच नाही मी गाणे गाइल नाहितर नाचेल तु कशाला मधे बोलतोयोस??? पण हिची जिभ गुण्डाळुन ठेवलेली आहे जणू"
अभिचे रिग्रेसिव्ह विचार एकून अन्घा त्याच्या डोक्यात लाटण का नाही घालत?

अमा ! मस्त! म्हातारा- म्हातारी... शिवाय बात नाही! Lol
आईकांचन... Lol म्हणणारा गायब आहे इतक्यात?

तो संजना सारखे मिळेल तो जॉब करणार नाही म्हणतो. जॉबलेस माणसाला काही रिस्पेक्ट नसतो. >>>>>>>>>>> याचाही पुढे जाऊन 'शेखर' होणार आहे.

तिचे तिला ठरवू दे. अरू जुने मॉडेल असल्याने साडीतच कंफर्टेबल आहे असे म्हणते. >>>>>>> ++++++२२२२२२ अरुने काय घालायच हे तिच तिला ठरवू दे. जर तिला साडीमध्ये कंफर्टेबल वाटत असेल तर उगाचच तिचा जबरदस्तीचा मेकओवर नको. ज्याप्रमाणे एखादीला साडीच नेस अशी जबरदस्ती करणे चूक आहे त्याप्रमाणेच एखादीला साडीएवजी दुसर काही तरी ट्राय कर अशी बळजबरी करणही बरोबर नाही.

शुभ प्रभातः

विश्व कॅन्सर दिनाच्या शुभेच्छा. अनेक संस्था व व्यक्ति ह्या रोगाच्या निराकरणासा ठी प्रयत्न शील आहेत. नवे उप्चार रोज उपलब्ध होत आहेत. कॅन्सर पीडितांच्या चिं ता व दु:ख वेदना कमी होवोत व त्यांना बरे होण्याची शक्ती मिळो.

आता भागः अनघा जन्मो जन्मीची स्वयंपाकीण असल्यसारखी धापा टाकत अरु च्या हातत पिशवी आणू न देते. त्यात शिर्‍याचे दोन डबे आहेत.एक आशू ला एक ऑफिसला. अरू लगेच उसासे टाकत अगं मी आले असत ना किचन मध्ये हातात कशाला आनून दिलास म्हणते. ह्यांच्यात किचन मध्ये खपायची, मीच कशी जास्त करते दाखवायची छुपी स्पर्धा आहे.

अन्या केटरिम्ग चा संवाद टाकतो. अरू लगेच चांगल्या कामाची सुरुवात गोडाने करावी केटरिन्ग मी करेन म्हणतो. अवी लगेच मी पण तुला मदत करेन म्हणतो. अन्या मी मल्टिनॅशनल मध्ये काम केले आहे आता डबे नका पाठवू. संजना पण निघाली आहे ती गाडीच्या किल्ल्या मागते तर अन्या देत नाही अरू मी स्कूट र वरून जाते म्हणते. अनघा लगेच हेल्मेट घेउन येते. एक हेल्मेट डिकीत आहे म्हणते.

आता घरची गाडी व नवरा असून दोघी बायका स्कूटर वरून जात आहेत. अन्या लगेच स्टंट करू नका म्हणतो अरू मला बॅलन्स जमतो म्हणते. पण हिने स्कुटर वर बसताना पदर खोचलेला नाही. तो अडकू शकतो. दोघी बाय करून निघतात. अन्या जळफळत आहे.
अप्पा अनघा अवि हात हलवतात. अप्पा म्हणतो स्वप्नांना पंख मिळतील असे तिचे आजचे भविश्य आहे. तर अवि म्हण तो टायर मि ळेल असे चेंज करा म्हणतो.

आता कट टू ऑफिस. आशूला टेन्शन आले आहे. फारच नर्वस आहे. नित्या लगेच काही तरी खायचे ठरवतो. अरु लगेच शिर्‍याचा डबा काढते. दोघा मित्रांचे लुटुपुटीचे शाळकरी भांडण होते. आशू संजना प्रेस कॉन्सफर्न्स बद्दल बोलत आहेत. व संजना अरू कशाला कोण आहे अरुंधती असा चुकीचा संवाद टाकते.

अनघा ड्रेस घालून तयार होउ न कामाला जाते आहे. अप्पाला परत प्रत्येक बाब समजावून सांगत आहे. डिप्रेशन व्हिटामिन चेक महिलांचा अ‍ॅनि मिआ. जे काय लेखकाने गूगल केले आहे तो पसारा ओतला आहे. ही शुद्ध मराठीत ते वाचून दाखवत आहे. अप्पा लगेच जगाच्या शांतते साठी प्रत्येक माणसाने शांत रहायला पाहिजे असे मौक्तिक टाकतो. व लगेच आजी मुलाबद्दल प्रेशर टाकेल तू काही लक्ष देउ नकोस असे रिवर्स प्रेशर टाकतो.

संजना अरू कोण आहे तिला कशाला महत्व असे सांगतो. संजना कामा बद्दल फुटत आहे. अरू दोन गाणी रेकॉर्ड झाल्यावर प्रेस कॉन्फरन्स घेउ असे सुचवते. संजना तिला अपमानास्पद बोलते तुला काय कळते. आधी रेकॉर्डिन्ग व्हावे असा अरू आग्रह धरते. संजना हे तुझे फील्ड नाही तू लक्ष घालू नकोस. आशू तिचे बरोबर आहे व तिला बोलायला हक्क आहे असे सांगतो. संजना काड्या करत आहे. अ‍ॅग्रेसिव्ह मार्केटिन्ग
करायला हवे असे म्हणते.

अनघा अहो रुपम अहो ध्वनी मोड मध्ये आहे. अप्पाला आता अरुंधती बद्दल आपण असा विचार का नाही केला असा खेद व्यक्त करतो. मी ही बिझी होतो. अन्या अरु ला सांभा ळतो आहे ( गायी सारखे) असे अप्पा म्हणतो. अनघा लगेच उत्साही बंडू अप्पाला पण आधार देते.
यश आला व तो प्री रेकॉर्डिन्ग ची तयारी करून आला आहे. ती यश ला जेवण गरम करून घालते. म्हण ते. यश तिला घालवतो.

अ‍ॅग्रेसिव्ह मार्केटिन्ग. नको असे आशू सांगतो. संजनाला आशू किलीअर करतो. की फायनल डिसीझन माझा व अरूचा आहे असे सांगतो.
तो आर्टि स्ट्ला महत्व द्यायला पाहिजे असे क्लीअर करतो. तुम्ही इन्पुट द्या पण इन्सिस्ट करू नका असे क्लीअर करतो. ती परत पुढे पुढे करते.
तिला तो बाहेर हाकलतो नित्या बरोबर. गरम झाले वातावरण. आशू उठून दार बंद करून घेतो. ( अब क्या करता क्याकी!!) हा तोतरा बोलत आहे. हे काय आता नवीन. खूपच तो भावनिक झाला आहे व ब्लॅबर करत आहे. वाक्ये एकात एक घुस त आहेत. अरू हसत आहे. आशू फार चिड ला आहे. व वैतागून गप्प बसायचे ठरवतो. अरू सॉरी म्हण ते व शिरा भरवते बहुतेक. मला वाट् ले ही पण त्याला पोटाशी धरून पदराने डोके पुसते कि काय पन तसले काही नाही झाले.

परत तुझे पहिले गाणे तुझे यश पट्टी होउन भाग संपतो.

प्रोमो मध्ये अरु ऑफिसात आहे. आशू फोन करून तिला फायनल लिरिक्स ऐकायला कोफी शॉप मध्ये बोलवतो. आता हिचे सत्व धोक्यात आहे.
व तिकडे अन्या परत ती कशी आशू बरोबर फिरते चार लोक बोलतील वगैरे बोलून आईचे सुद्धा डोके फिरवत आहे. ही आद्य वॉट्सॅप आजी असल्याने लगेच फिरतेहिचे डोके. आशुतोश तिच्या स्किलचे कौतूक करतो आहे म्हणून तुला जेलस वाटत आहे असे अवी बोलून दाखवतो.
आता अन्याला काही शब्द च नाहीत. तेच तेच उगाळत आहे. निकम्मा बिनकामाचा नवरा झाला आहे.

अमा Lol
आशू उठून दार बंद करून घेतो. ( अब क्या करता क्याकी!!) हा तोतरा बोलत आहे. हे काय आता नवीन. खूपच तो भावनिक झाला आहे व ब्लॅबर करत आहे. वाक्ये एकात एक घुसत आहेत. अरू हसत आहे. आशू फार चिडला आहे. .. हे खूपच मस्त!
तो तोतरा का बोलायला लगला अचानक? असे होते का प्रेमात?

अमा, धम्माल लिहिलेय. आज सकाळीच भाग बघितला. ते दोन शिर्याचे डबे असतात त्यातील एक आशुतोषसाठी आणि दुसरा मोठा डबा बाकीच्यांसाठी असतो ना? ते दोघे भांडत असताना किंवा नंतर तो चिडून बोलत असताना तरी अरु त्याचा खास आणलेला डबा देईल असे वाटले पण बहुतेक ती तो गट्टम करणार असेल म्हणून काही बोलली नाही. Wink

हा तोतरा बोलत आहे. हे काय आता नवीन. खूपच तो भावनिक झाला आहे व ब्लॅबर करत आहे. वाक्ये एकात एक घुसत आहेत. अरू हसत आहे. आशू फार चिडला आहे. .. हे खूपच मस्त!
तो तोतरा का बोलायला लगला अचानक? असे होते का प्रेमात? >>>>>>> तो चिडला की तोतरा होतो म्हणे. रणबीर- कॅटरिनाचा ' अजब प्रेम
की गजब कहानी' कोणी बघितलाय का? त्यातही हिरो- हिरवीण ईमोशनल झाले की तोतरे बोलू लागतात.

शुभ प्रभातः

यशचे कौतूक चालू आहे. आव डीचे काम असले तर यश चांगले काम करतो. ते उद्या सात परेन्त निघतील. अकराचे बुकिन्ग आहे. स्टुडीओ आलिबा ग ला आहे. अरू मुंबई बाहेर फार कमी गेलेली आहे. त्यमुळे ती पालघरची सफर टाइप आठवनी काढते. लहान पणी ती आलीबागला गेलेली आहे.

वर्शाका ठी एकदा कुलदैवताच्या दर्शनाला जायचे . नातेवाइकांच्या लग्नाला सासू बरोबर मुलां ना घेउन जात असे पूर्वी. लेडीज स्पेशल टूर बरोबर
जाईन म्हन ते. देविका बरोबर जाई न म्हणते. आता अरू घरी जायला निघाली आहे आशू स्कूटर वर एक ट्रिप मागतो पन अरू त्याला गप्प करते.
व स्कूटर वरून निघते. हा जिना लोकेशान पूर्वी अंकिता व अभीचे कन्फ्रंटेशन झालेले होते तीच आहे का?

ही युनिवर्सल मद र असल्याने बॉयफ्रेंड ला पण पोटाशी धरेल एकदा नक्की. ( पण नं दा प्रधा न लेव्हल नाही यायची अनुनयात)
नित्या मागून प्रेमाचे संवाद ऐकत आहे. व मग आशूची टर खेचतो व त्याला घेउन जातो.

क ट टू ऑफिस परत कौतूक चालू आहे. ऑफिसात धूळ झटकत आहेत त्याचा हिला त्रास होतो. परत तेच तेच . मग प्युन तिला तू कॉलेज पण पूर्ण करणार् । होतीस आठवण करून देतो. ती आता सोडण् च्या मोड मध्ये सर्वांचे आभार मानते. आता स्कूल अच्या कामात बिझी झाली
तरी शनिवारी रविवारी येउन कामे करेल. हे प्युन ला पण बाळा बाळा करतात. हिची ध्येय लिस्ट वाढतच चालली आहे

१) मशहूर गायिका बनणे
२) डिग्री शि क्षण पूर्ण करणे
३) संगीत स्कूल सुरू करणे.
४) शनिवार रविवार ऑफिसातील कामाचे राडे ओढणे.
५) घरकाम करणे
६) स्वैंपाक करणे व पुढे केटरिन्ग.

ओएम जी व ऑफिसातले सर्व पण किती सपोर्टिव्ह आहेत. हे एक अजून फॉल्स सिकुरिटी.

आता म्हातारी करवादते आहे. अनघा संजना अरु सर्व बाहेर व बाप्ये घरी. आजी ला तिच्या अपेक्षा बदलायला सांगतो आजोबा.
विशाखाला पण तू मुभा दिलीस मग अनघाला का नाही?!

आजीला घरी बाई नाही ते पटत नाही. स्वतः का बूड हलवत नाही?

आता अरू काय फिरत आहे. अन्या आशू अरूला फिरवून सोडून देइल व परदेशी जाईल. त्यांना एकां त हवा आहे म्हणूण ते अलीबाग ला जातील हे किती स्टुपीड कारण आहे असे अन्या ला आजोबा म्हणतो. अन्या चा मस्त जळफळा ट होतो आहे. आता आजी एका पर पुरुषा बरोबर
बाहेर फिरते आहे हे ह्यांना ए कदम अब्रू चा फलुदा टाइप वाटते आहे. अन्या म्हणतो तिला खूप वर्शांनी मजा करायला मिळते आहे ती नक्कीच करणार् अवि म्हण्तो तू का तिच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत?! तिला कौतूकाची हाव आहे. अन्या अजूनही अरुला मी म्हणतो ना ती चांगला स्वयं पाक करते तिने तेच करावे. शी शुड बी ग्रेट फुल

अवी तू कधी तिच्या स्किलचे कौतू क केले नाहीस ते आशू करतो आहे तर तुला बघ वत नाही म्हणतो. सुरी अगदी काळ जात व्यवस्थित फिरवतो.

प्रोमो मध्ये: आशू अरू लिरिक्स डिस्कस करत आहेत व अन्या मागे बसून आहे. लोक मुले क्लास ला गेली की बाहेर थांबतात तसा
मग अरू ला एक सेल्फीची रिक्वेस्ट येते. अन्या वेटरला धडकतो व उखडतो मारामा री करू लागतो. आशू मधे पडून त्याला हाकलायला बघतो. अरू थंड चेहर्‍याने बघत आहे.

ते पालघ र ची सफर नाही: लाडघरची सहल हवे. श्यामची आई पुस्तकातील एक function at() { [native code] } फार सुरेख व हृद्य भाग. माझ्या फार आवडीचा आहे. बैलगाडीतून लाडघर ला शा म व आई जातात. गडबडीत पोस्टले. आज शनिवार म्हणून जासत वेळ झोपलो गुरफटून.

अनिरुद्ध त्यांच्या मागे रेस्टॉरंटमध्ये जातो?
मग याच्यात आणि त्या अनघाच्या एक्समध्ये काय फरक राहिला?
लाडघर मला पण आठवतं.

काल आशुतोष चिडलेला नव्हे तर बावरलेला वाटत होता. मल्टिपल बिझिनेसेस आणि अल्बम्स केलेला नसून नुकताच कॉलेजातून बाहेर पडून इंटरन्शिप करतोय असं वाटत होतं. ओंकार गोवर्धनने महात्मा जोतिराव फुले चांगलेच कणखर रंगवले होते. इथल्या टीमने त्याचं भजं केलं. चष्म्याची एक फ्रेम धड ठरवता येत नाही.

गाण्याच्या रेकॉर्डिंगची तारीख कधी नक्की, कधी नाही. आता लिरिक्स बदलणार. हाच कविता पण लिहितो.

हा जिना लोकेशान पूर्वी अंकिता व अभीचे कन्फ्रंटेशन झालेले होते तीच आहे का?>>>> हो वाटतं, त्याच जिन्याजवळ शेखर संजनाचे पण भरपूर सीन्स झालेत. संजनाचं घर होतं वाटतं ते तेव्हा, आता आशूचं घर (कि ऑफिस ? )असेल.

अरु तर कार शिकली होती ना अनघाकडून? मग स्कूटय कशी काय चालवती? Proud
हिंदी अनुपमा पळवत पळवत बघते अधेमधे, मला तीचे आणि अनुजचे सीन्स आवडतात काही काही. त्याचं तिच्याशी अगदी सहज वागणं, तिचं हळूहळू त्याच्या प्रेमात पडणं आणि ते त्यालाही आत कुठेतरी माहीत असणं, जमलीये केमिस्ट्री. स्टोरी कुठच्या कुठे नेलीय पण, फारच ताणतात बाबा.

उद्या रेकॉर्डिंग. आज फायनल लिरिक्स आले.
उठा ले रे बाबा.
आणि याची स्वतः:ची कविता होती ना?
बाकी कशातलं कळलं नाही तर एकवेळ माफ करू. पण कला , मनोरंजनाच्या क्षेत्रातलं पण कळत नाही?

ओंकार गोवर्धनने महात्मा जोतिराव फुले चांगलेच कणखर रंगवले होते. इथल्या टीमने त्याचं भजं केलं. >>> हो ना. लव लग्न लोचा मध्येही सर्वात मला तोच आवडत होता, झी युवा सुरू झाल्यावर सुरुवातीला बघायचे ती सिरियल.

अमांचे लेखन समजून घ्यायला थोडे पाहात आहे Happy काहीतरी गाण्याचा सीन होता. नीट समजले नाही. मी हीच ती निवेदिता जोशीवाली सिरीज समजत होतो - ज्यात ती हेलिकॉप्टर मधून मुंबईत उतरते (की त्या दोन वेगळ्या आहेत?) पण ही तिसरीच आहे.

आई कोठे काय करते हे वाक्य कोणी चालीत म्हणू शकेल असे वाटले नव्हते.

आई कोठे काय करते हे वाक्य कोणी चालीत म्हणू शकेल असे वाटले नव्हते.>> Biggrin

मी हीच ती निवेदिता जोशीवाली सिरीज समजत होतो - ज्यात ती हेलिकॉप्टर मधून मुंबईत उतरते (की त्या दोन वेगळ्या आहेत?) पण ही तिसरीच आहे.>> ती अगंबाई / आधी सूनबाई नंतर सासुबाई सिरियल. Happy संपली बहुतेक.

मी पण अमांचे अपडेट फक्त वाचते. सिरियल बघणं डोक्यात जातं खास करुन अन्याचं आणि अरुंधतीची पात्र. डिवोर्स झाल्यावरही सासरच्याच घरात राबत बसणं इज टू मच.

Pages