Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोपण करेल काही दिवसांनी,
तोपण करेल काही दिवसांनी, आशुची बहीण उगवली तर
अरे..पण तिच्या आईचे घर
अरे..पण तिच्या आईचे घर डोंबिवली ला आहे ना? इतक्या दूर जाणे येणे कसे करणार ती? आशुतोष ला कल्पना तरी सहन होईल का?

अरे..पण तिच्या आईचे घर
अरे..पण तिच्या आईचे घर डोंबिवली ला आहे ना? इतक्या दूर जाणे येणे कसे करणार ती? आशुतोष ला कल्पना तरी सहन होईल का? >>>>>>>>>>>>चार दिवसासाठी आपल्याकडे आणून तर ठेवू शकते ना।
नवरा आणि सासूच्या धाकामुळे कधी तोंड खोलून आईला बोलवू शकली नाही चार दिवस राहायला मग आता एकटीच आहे तर बोलवायची ना
आशुतोष ला कल्पना तरी सहन होईल
आशुतोष ला कल्पना तरी सहन होईल का?>>> हा. मग तो डोंबिवलीत कार्यालय हलवेल. हायकायनायकाय!
हे बघा. त्यांना सिंगल
हे बघा. त्यांना सिंगल विमेनचा प्रश्न मांडायचा होता. त्यांना घर मिळत नाही. इ. मधून मधून थोडं समाजप्रबोधन पण करायचं असतं.
हे अजून एक नवीनhttps://www
हे अजून एक नवीन
https://www.loksatta.com/manoranjan/aai-kuthe-kay-karte-serial-new-twist...
अरू आणि अनिचा डान्स!https:/
अरू आणि अनिचा डान्स!
https://www.instagram.com/reel/Ca9eB1SAE0n/?utm_medium=copy_link
सगळे लोक आशुतोष कडेच नोकरी
सगळे लोक आशुतोष कडेच नोकरी करणार. अरुंधती, संजना झाल्या. यश झाला.अरुंधतीच्या भावाचा बायोडेटा घेतलाय. >>> हाहाहा. थोर तुझे उपकार आशु.
मग तो डोंबिवलीत कार्यालय हलवेल. हायकायनायकाय! >>> भारीच, मग मीपण जाते विचारायला, केळकर म्हणजे सासरचे आडनावबंधु. पार्ट टाईम जॉब देत असेल आशुतोष तर करेन.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan/aai-kuthe-kay-karte-serial-new-twist... >>>>>> कहर आहे हा अनिरुद्द!
अरू आणि अनिचा डान्स! >>>>>> काय हॉरिबल कपडे आणि मेकअप दिलाय त्यान्ना!
मला नाही वाटत. तो सांगतो तिला पण प्रेमाने असावं, लादत तर नाहीये निदान. >>>>>>>>> असही असेल कदाचित. पण त्याने अरुच्या हातून रिमोट खेचून घेऊन टिव्ही बन्द केला ते नाही आवडल.
त्यापेक्षा आई आणि भावाबरोबर राहाव की हिने.>>> ते नका सांगू. ते सोडून बाकी सगळ्यांचं करायचं आहे कायम. विचित्र बाई आहे. मी असते तर फक्त आणि फक्त आईलाच बघितलं असतं एवढ्या वर्षांनी सहवास मिळाला तर. >>>>>> अगदी अगदी
पण बिन्धास्त एकटी राहते. जॉब
पण बिन्धास्त एकटी राहते. जॉब करते, रेंट व इतर बिले भरते, मजा करते स्विगी झोमाटो वरून ऑर्ड र करुन खाते. मैत्रीणें बरोबर फिरायला जाते. जग बघते असं नाही दाखवायचं रिव्यु चांगला करते मेहनतीने, कामात स्वतःची प्रोफेशनल इमेज आदरणीय बनवते, स्वतःची काळ जी घेते हे नाही दाखवत. आता कुठे तरी होळीला जातात तिथे पण अन्या संजनाला धड कतात. त्याच त्या च परीघात गोल फिरत राहायचे.
होळी पार्टी हिंदी
होळी पार्टी हिंदी सिनेमातून हिंदी मालिकांत आणि आता मराठी मालिकांत आणली. आधी धुळवडीला लोक मुद्दाम जुने कपडे घालायचे . आता मालिका बघून पांढरेशुभ्र कपडे घालायला लागतील.
यावेळी स्टारच्या सगळ्या मालिकांत होळी आधीच झालीय. गेल्यावेळी गुढीपाडव्यापर्यंत होळ्या लावत होते.
अरुंधतीसाठी घर घेताना सेक्युरिटी हा एक निकष होता. मग अनिरुद्ध कसा शिरला? अप्पांकडे दिलेली चावी घेऊन घुसला का? म्हणजे हा त्या अनघाच्या एक्स सारखा करणार? यशने त्याला ओळखलं तरी तसं न दाखवता मस्त बदडून काढायला हवं .
अप्पांकडे दिलेली चावी घेऊन
अप्पांकडे दिलेली चावी घेऊन घुसला का? म्हणजे हा त्या अनघाच्या एक्स सारखा करणार?>> माझ्या मनात अगदी हेच आल होत, अन्या तरी कुठे मुव्ह ऑन होतोय त्याच्या लाइफ मधे हे तरी अभिने बोलुन दाखवायला हव होत पण अभ्या त्याच्या बापासारखाच दरिद्री विचाराचा आहे.
पुरण वाटण हे स्वतः ची कामे
पुरण वाटण हे स्वतः ची कामे स्वतः करा ह्या कॅटेगरीत कधीपासून आल? अनघा सन्जनाला ' स्वत:ची कामे स्वतः करा, स्वतः ची खोली, बाथरुम साफ करा ह्याव आणि त्याव लेक्चर देत होती. नन्तर तिच्या हातात पुरणयन्र ठेवते. पुरण वाटायला. सन्जना तिला एवढ कळवळून सान्गत होती की मला ऑफिसला जायला उशीर होतोय, जमणार नाही. तरीही हि तिला ऑफिसहून लवकर येण्याचा किव्वा उशीरा जाण्याचा आगाऊपणाचा सल्ला देते. बाई अनघा, इतकीच हौस आहे पुरणपोळया करण्याची तर तूच घे ना सुट्टी! एरव्ही आज्जेसासूला ' मला हे जमणार नाही, मी हे करणार नाही' हे सान्गतेच ना नाक वर करुन.
सन्जना पण तसलीच! स्वत: ची कामे स्वतः करा ऐकल्यावर नाक कशाला मुरडायच? ईशा जेव्हा तिच्याकडे राहायला आली होती तेव्हा सेम लेक्चर तिने इशाला ऐकवल होत. ' स्वतची कॉफी स्वतः कर, स्वतःची रूम आवरुन ठेव ब्ला ब्ला ब्ला' अन्याशी लग्न झाल्यावर ही आळशी झाली का?
पण बिन्धास्त एकटी राहते. जॉब करते, रेंट व इतर बिले भरते, मजा करते स्विगी झोमाटो वरून ऑर्ड र करुन खाते. मैत्रीणें बरोबर फिरायला जाते. जग बघते असं नाही दाखवायचं रिव्यु चांगला करते मेहनतीने, कामात स्वतःची प्रोफेशनल इमेज आदरणीय बनवते, स्वतःची काळ जी घेते हे नाही दाखवत. >>>>>>> अगदी अगदी. अशी बाई खलनायिका असते ना त्यान्च्या सिरियलमध्ये. सन्जनाच उदाहरण आहेच.
आज अरु म्हणत होती की, ' मला एकटे राहण्याची भीती वाटते" मग कुणी सान्गितल होत हा पराक्रम करायला? राहायच की आई आणि भावाबरोबर. राणा भीमदेवीच्या थाटात हिने घोषणा केली होती ' मला एकट राहायचय, मी एकटी राहीन' म्हणून.
यशने त्याला ओळखलं तरी तसं न दाखवता मस्त बदडून काढायला हवं . >>>>>>> अगदी अगदी
पुरणावरणाच्या स्वैपाकावर
पुरणावरणाच्या स्वैपाकावर मायबोलीवर एक गाजलेला आणि गांजलेला धागा आहे ना?
आधी संजनाने, या कामांसाठी आपल्याकडे अनघा आणि विमल आहेत , असं म्हटलं. So she asked for it.
शिवाय होळीची पूजा करायला मिळाल्याने आपण अरुंधतीचं सिंहासन बळकावल्याचं सुख तिला मिळालं तर सिंहासनाखाली जळणार्या विस्तवाची धगही एंजॉय करायला हवी. तिला पुरण वाटायला सांगितलं. पुरण शिजवणं , कणीक मळणं , पोळ्या लाटण, शेकणं ही कामं अनघा- विमलने केली असतील. तिने अनिरुद्धला पुरण वाटायला बसवायचं होतं.
अरुंधती एकट्याने राहायची भीती वाटते असे केव्हा म्हणाली? प्रोमोत का? नवीन घरात रात्री कोणीतरी शिरत असेल तर कोणालाही भीती वाटेल. अनिरुद्धविरुद्ध पोलिस कम्प्लेंट करायला हवी.
सगळे प्रौढ असलेल्या घरात आपली खोली आपण स्वच्छ ठेवा, कपडे धुवायला टाका हे सांगावं लागतं म्हणजे अरुंधतीने त्यांना किती ऐदी बनवून ठेवलं होतं. खरं तर इतक्या खोल्यांची स्वच्छता आणि एवढ्या लोकांचे कपडे अधिक बाकीची कामं एकच व्यक्ती करणे हे सुपरवुमन सिंड्रोम. आई कुठे काय करते तर हे.
इथे २००० प्रतिसाद होत आलेत.
इथे २००० प्रतिसाद होत आलेत.
पुढील चर्चेसाठी नवीन धागा….. https://www.maayboli.com/node/81325
लोकांचे कपडे अधिक बाकीची कामं
लोकांचे कपडे अधिक बाकीची कामं एकच व्यक्ती करणे हे सुपरवुमन सिंड्रोम. आई कुठे काय करते तर हे.……>>> आई आधी तेव्हढेच करायची. त्यानंतर ती हे करून बाहेरची कामे करायला लागली होती. मग समोरच्या घरात रहायला गेल्यावरही तिथले सारे काम आटोपून सासाला डबे देऊन कामावर जायची.
आजचा अनुपमाचा भाग नुसता देखणा
आजचा अनुपमाचा भाग नुसता देखणा आहे. अनुज फारच भारी आहे, पण बिचाऱ्याला वेडीसोबत रोमान्स करावा लागतोय
. तो जे काही बघतो तिच्या डोळ्यांत, हाय मै मर जावा 
आधी संजनाने, या कामांसाठी
आधी संजनाने, या कामांसाठी आपल्याकडे अनघा आणि विमल आहेत , असं म्हटलं. So she asked for it. >>>>>>> सहमत. आणि वरुन हिला अरुन्धतीशी सगळयाच गोष्टीत स्पर्धा करण्याची भारी हौस! भोग म्हणाव तिला आता.
तिने अनिरुद्धला पुरण वाटायला बसवायचं होतं. >>>>>>> अगदी अगदी नाहीतर कान्चनला.
अरुंधती एकट्याने राहायची भीती वाटते असे केव्हा म्हणाली? प्रोमोत का? >>>>>>>> नाही. परवा सुलेखाला अस म्हणाली होती. एकट राहायचा आत्मविश्वास अजूनही आला नाही ह्या अर्थाने.
१९९९
१९९९
२००० पुर्ण
२००० पुर्ण
Pages