आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधती रात्रभर बाहेर राहणार हे ऐकून कांचनला हार्ट अ‍ॅटॅक आणि अनिरुद्धला ब्रेन हॅमरेज नाही का होऊ शकणार?

परवाच्या एपिसोडमध्ये हेरिटेज शेल्टर (हेच नाव होते ना?) हे नाव ठळकपणे दिसेल असा एक शॉट खूप वेळ ठेवला. हॉटेलची जाहिरात.

निलेश मोहरिर म्हणजे जेलिबीच्या पाकात बुडवुन काढल्यासारखी गोड्ड गाणी असणार, एक्दम टिपिकल स्टाइल आहे त्याची. मोरपखि,चान्दणे,धुके,रेशमी,बन्ध टाइपचे शब्द असलेली गाणी असतात.

निलेश मोहरिर म्हणजे जेलिबीच्या पाकात बुडवुन काढल्यासारखी गोड्ड गाणी असणार, एक्दम टिपिकल स्टाइल आहे त्याची. मोरपखि,चान्दणे,धुके,रेशमी,बन्ध टाइपचे शब्द असलेली गाणी असतात.> असा खरा माणूस आहे?

ज्याची आपण खडूस पणे वाट बघत होतो तो परपुरुषा बरोबर एक रात्र बाहेर घालवायला लागण्याचा क्षण. कारण हायवे बंद झाला आहे... Lol अमा..!!
अगदी!
पण आपला अपेक्षा भंग होणार!

पण आपला अपेक्षा भंग होणार!>> पदराने डोके पुसणे, नाक पुसून देणे, शाल पांघरणे इतपरेन्त आले आहेत. ह ह्यांच्या मुलाचे नाव अश्रू ठेवता येइल अरु प्लस आशू.

अनुपमा मध्ये तर सासूने पार चाळीत राडा केला होता. ती सीरीअल फारच भडक आहे. त्यामानाने हे सौम्य आहेत.

काल अरूने आशुला कंठ सुधारक वटी दिली वाटतं, डबी तशीच वाटली.
निलेश मोहरीरची गाणी चांगली असतात की.. हा, साखरेचा पाक जास्ती असू शकतो कधीकधी.

प्रॉडक्ट प्लेसमेंट करायची संधी अशी कशी सोडली?
मालिकेत व्हिक्सची पण जाहिरात पाहिलीय. यशचं डोकं दुखतं तेव्हा पण कसली तरी जाहिरात केली होती.
टी आर पी घसरला वाटतं Wink

असा खरा माणूस आहे?>> हो ! सन्गितकार आहे,मोस्टली टिव्ही सिरियलचे टायटल ट्रॅक केलेत.

मला आवडतात निलेश मोहरीरची गाणी. सुखाचे चान्दणे बेस्ट आहे गाण. अमा म्हणतात त्याप्रमाणे लिरिक्स अर्थपूर्ण आहेत.

हो ! सन्गितकार आहे,मोस्टली टिव्ही सिरियलचे टायटल ट्रॅक केलेत. >>>>>>> येस्स. राधा ही बावरी सिरियलची गाणी त्यानेच केलीत.

मालिकेत व्हिक्सची पण जाहिरात पाहिलीय. यशचं डोकं दुखतं तेव्हा पण कसली तरी जाहिरात केली होती. >>>>>>>>> हिने हिच्या भाच्याबरोबर आणि यशबरोबर सेपरेट व्हिक्सची अ‍ॅड केली होती. तसेच अप्पाबरोबर एडल्ट डायपरची अ‍ॅड केली आहे.

अरुंधती रात्रभर बाहेर राहणार हे ऐकून कांचनला हार्ट अ‍ॅटॅक आणि अनिरुद्धला ब्रेन हॅमरेज नाही का होऊ शकणार? >>>>>>>> अस झाल तर कित्ती बरे होईल. रिकाम डोक सैतानाच घर ह्याच उत्तम उदाहरण आहेत ही दोघ. स्वत: कधीच बूड हलवणार नाहीत, रिकामटेकडे असतात पण दुसर्यान्चे पाय खेचायला सदैव तयार!

अरूला झोप लागली आहे म्हणून आशू इअर फोन ला हात लावून उठवतो. >>>>>>> नाही. शालीच टोक तिच्या कानात घालून तिला उठवतो.

व्हिक्स ची जाहिरात मालिकेतच घुसवली होती. प्रॉडक्ट प्लेसमेंट. यश म्हणतो डोकं दुखतंय. ही व्हिक्स लावते. लगेच बरं वाटतं.

अरुंधती संगीतकाराला म्हणते, मी ओळखते तुम्हाला. मी तुमचं नाव ऐकलंय असं असायला हवं.

पण तो जर मालिकांनाच संगीत देतो, तर नाव कुठून ऐकलं असेल? ही कधी टीव्ही बघताना दिसत नाही. कधी गाणी ऐकतानाही दिसत नाही.

निलेश मोहरीरला मालिकेत दाखवलेली गाण्याच्या निर्मितीची प्रक्रिया मान्य आहे वाटतं!

अनिरुद्ध डबली फ्रस्ट्रेटेड. घरात तो एकटा रिकामटेकडा. कांचनला गायब केल्याने जास्तच. त्यात अरुंधती त्याच्याच पावलावर पाऊल टाकून चालतेय. आपण संजनासोबत काय काय आणि कसं कसं केलं ते आठवून , अरुंधती आता तेच करणार या कल्पनेने त्याचा आता थरकाप आणि थरथराट होतोय.

भाग ५८८:
कांचन अस्वस्थ आहे. इकडे तिकडे उभी राहून फिरत आहे चक्क. तिला कसे तरी होत आहे. अरुंधती अजून का नाही आली. मालकी का गाजवते ही बाई. अन्या तेल ओततो. इतका का उशीर आजी ने चौकशीचा आग्रह धरला आहे. अप्पा फोन करायचा नाही असे बजावून वर जातात.
मग सोसायटीतल्या ओळखीच्या दोन बाया आल्यात. आजी लगेच अरुंधती नाही मी करते कॉफी. अरु चा फोटो पाहिला म्हणून विचारायला आल्या आहेत. इतकी वर्शे तिला का नाही करू दिलेत. आम्हाला खूप आनंद झाला आहे असे अरूचे कौतूक करत आहेत. किती टुकार दिग्दर्शन. कांचन च्या भिशी पार्टनर आहेत.

अरु आशू निघत आहेत. अरू परत गाणे ऐका यचे म्हणते. आता हे गाणे परत परत ऐकावे लागेल का? अरू चे कौतूक कार्यक्रम परत चालू आहे. निलेश व आशू करत आहेत.

इकडे घरी त्या दोन बाया अनिरुद्धला नोकरी वरून विचाअर्त आहेत. आमचा मुलगा पण सिंगापूरला गेला आहे तिथे शब्द टाकू का विचा रते.
घर्च्या लक्ष्मी ला हाकलले की बाहेरची पण नाराज होते. अन्या लगेच मी नोकरी सोडत आहे आधी घटस्फोट झाला दोन्हीचा काही संबंध नाही. असे ठण कावून सांगतो.

ती बाई अरू ला फार पैसे मिळतील असे कौतूक करते. पण अन्या काही फार पैसे नाही नुसती फिरायची हौस . अनघा येते व सरबत घेणार का विचारते. त्या नाही म्हणतात व जमेल तितके आगीत तेल ओतून निघत आहेत अरु आशू संबंध बद्दल फोटो बघून वेगळेच वाट्ते.
अनघा आजीला रोखते. मग आजी अरु च्या चारित्र्याबद्दल लोक शंका घेत आहेत त्यामुळे ती भडकते. स्त्रीचे चारित्र्य फार महत्वाचे आहे आम्हाला. अनघा लगेच कौस्नेलर मोड . आजी ला गॉसिप सहन होत नाही. एक एक शब्द वाक्य बोल्ड कॅपिटल मध्ये बोलत आहे ते ही डोळे मोठे करून.

हाय टाइम अरूने संभंध तोडून टाकावेत.

अन्याला अनघा चहा आणून देते. तो कपाळाला हात लावून बसला आहे. आता ही कौन्सेलर मोड मध्ये आहे पट्टी चालू आहे. पुस्तक वाचल्या सारखे बोलत आहे. हिला ताईचे वकील पत्र घेउन लहान तों डी मोठा घास घ्यायची काय गरज. पण ही मेजर कन्फरंतेशन मोड मध्ये आहे. अन्या मला जास्त कळते तू नवीन आहेस म्हणतो. मी अरू ला खूप जपले आहे. तिला काहीच कळत नाही. आता ह्या वयात तिला ही साहसे कराय ची काय गरज आहे.

ती तों डावर पडली तर आपल्यालाच मेहन्त करावी लागेल. ही रडू रडू काय पट्टी पढवत आहे. अन्या उखडून तिला नक्की कानफटवेल डोके सरकलेतर. ती माफी पण मागून ठेवते.

अरू आशू कार अंधार गाणे छान झाले हे ती आशू कडून कन्फर्म करून घेते. हिला च पुढे जायचे नाही आहे. आशू तिला मॅनेजर होईल असे सांग तो. ( गाइड मोमेंट.) ग्रोथ कशी होणार. पण ही म्हणजे लाजा ळू फूल आहे. स्वतःच्या टॅलेंटची कल्पना नाही. कमर्शिअल सेन्स नाही.

परत आशूला खोकला. पाणी संपले आहे. मग टपरीवर चहा प्यायला जातात.
इथे भाग संपला

प्रोमो:

टॅकर पल्टी झाल्याने यायला उशीर मग अन्या खवट बोलतो.

ह्या न घ डणार्‍या पहिल्या रात्रीवर पुढील आठवडा निघेल.

मस्त वर्णन अमा. हे वाचून ही मालिका खरं तर बघावीशी वाटते. एखादा एपिसोड बघतेही पण कंटाळा येतो. त्यापेक्षा वाचायलाच मजा येते.

अंघा डोक्यावर पडलीये कधीची. सासूला ताई म्हणते. खरंतर त्याही आधीची पडलीय, म्हणून अभिशी लग्न केलं.

शेखर पाहिजे होता मधे मधे तरी, मस्त आन्याच्या चिडचिडीत तेल ओतायला , मजा आली असती.

अन्या लगेच मी नोकरी सोडत आहे आधी घटस्फोट झाला दोन्हीचा काही संबंध नाही. असे ठण कावून सांगतो. >>>>>>>> ह्याने लफड केल म्हणून तर त्याची नोकरी गेलीय ना.

हाय टाइम अरूने संभंध तोडून टाकावेत. >>>>>>> +++++++१११११११

स्त्रीचे चारित्र्य फार महत्वाचे आहे आम्हाला. >>>>>>>>> फक्त स्त्रीचे चारित्र्य? पुरुषाचे चारित्र्य महत्वाचे नसते का? अन्या आणि अभिने शेण खाल्ल तेव्हा ही लोक बोलत असतीलच. हिच कानात बोळे घालून बसली असेल.

खरंतर त्याही आधीची पडलीय, म्हणून अभिशी लग्न केलं. >>>>>>>>> +++++++++ अगदी अगदी.

तिला अरुला ' ताई' म्हणण्यात कमफर्टेबल वाटत असेल.

आता ह्या वयात तिला ही साहसे कराय ची काय गरज आहे. >>>>>>> त्याला म्हणाव, तूही तेच साहस केलस तेव्हा काय सोळा वर्षाचा होता का? पडलास ना तोण्डावर?

अनिरुद्ध डबली फ्रस्ट्रेटेड. घरात तो एकटा रिकामटेकडा. कांचनला गायब केल्याने जास्तच. त्यात अरुंधती त्याच्याच पावलावर पाऊल टाकून चालतेय. आपण संजनासोबत काय काय आणि कसं कसं केलं ते आठवून , अरुंधती आता तेच करणार या कल्पनेने त्याचा आता थरकाप आणि थरथराट होतोय >>>>>>>>>> करु दे ना तिला जे काय करायच ते? ह्याच्या पोटात का दुखतय? घटस्फोट घेतलाय तिच्यापासून सो ती काय करतेय, कुठे जातेय, कुणाबरोबर जातेय ह्या सगळयाशी ह्याला काहीही देणघेण नाही.

हिला ताईचे वकील पत्र घेउन लहान तों डी मोठा घास घ्यायची काय गरज. पण ही मेजर कन्फरंतेशन मोड मध्ये आहे. >>> तिला अनिरूद्धला शांत करून अभिचे तोंड बंद करायचे आहे. ती म्हणते ना कि तुमचा दृष्टीकोन बदलला तर तुमच्या मुलाचा बदलेल.

त्या घरी आलेल्या दोन बायकांची मात्र कमाल आहे. घरात येऊन तोंडावर बोलून गेल्या आणि त्यातून फक्त स्वत:ला हवा तो अर्थ काढून हे दोघे अरूंधतीला नावे ठेवत होते.
आता अरुंधतीला घरी आल्यावर सत्वपरिक्षा द्यावी लागेल कारण मी काहीही केले तरी मला बोलायचा तुम्हाला अधिकार नाही किंवा विश्वास ठेवायचा तर ठेवा नाहीतर बसा बोंबलत असे सांगायला तिला जमणार नाही.

घरी आलेल्या बायका कांचनपेक्षा अरुंधतीच्या वयाच्या वाटत होत्या. कांचनसुधा तिच्या अपेक्षित वयापेक्षा बरीच लहान दिसते. त्यांच्या तोंडून लोकांचं गॉसिपिंग दाखवायचं असेल. पण त्या करणार नाहीत इतकं गॉसिपिंग अनिरुद्ध आधीपासूनच करतोय.

भाग ५८९: अरे वा होउ घातलेली पहिली रात्र वालां टाइन डे ला असेल का?

भाग ओपन होतो तेव्हा रात्र झालेली आहे व आजी अजून आरू आलेली नाही म्हणून वैतागलेली आहे. सर्व तिची समजूत घालत आहेत. अनघा रेक. चान झाले म्हणून खूश होते. इथे उगीच भौ तोरसकर कसे काही नाही तर न मो नमो करतात तसे उगीचच निलेश मोहरीर आद्य खंग्री मॅन चे नाव घेतो यस्य. मग अनघा उत्साहाने ( हया उत्साहाचा निचरा होत नाही वाट्टॅ) ताईच्या आव डी ची खीर व इतर स्वयंपाक करायला घेते पाले भाजी मोडत आहे.

आशू खोकत आहे टीबी ची लागण झाली का. हिच्या फोन ला चार्जिन्ग नाही आहे. पण ती कळवते की यायला उशीर होणार आहे. मग घरात अन्या पिसाळतो. व संजना पण सांगते की रस्ता बंद आहे.

हे आता कुठे तरी हॉटेल शोधायला निघालेत पण गाडीचे टायर पंचर झाले आहे. नेट वर्क नाही. अरुंधती क्षणो क्षणी जास्त जास्त अपसेट होत चालली आहे. त्यात पाणी उडून आशू भिजतो. त्या ची तबेत खराब आहे.

ह्यात अरू पहिले म्हटलेली की आजू बाजू ला छोटी स सुरेख घरे आहेत. हे आशूने लक्षत ठेवलेले आहे कारण अरू ने म्हटलेले सर्व हा लक्षात ठेवतो. आता आजी रात्र भर कुठे राहणार नेट वर्क नाही. वडखळ दहा किलो मीटर आहे. खरे तर निलेश कडे जाउन मस्त घरात झोपता
जेवता येतील.

घरच्या बायका रोड वर बाथरूम असेल का. ताईच्या मोबाईल ला नेटवरक मिळाले असेल तर अशी आशा अनघा व्यक्त करते.
संजना कूल आहे असे होते ट्रावलिन्ग मध्ये रस्ता क्लीअर झाला की येइल ती. इतके काही त्रासेस नाहीत. झोपा निवांत असे सांगून संजना झोपायला जाते.

घरचे function at() { [native code] }इचे चिंताक्रांत आहेत.

अप्पा सुलेखाला पण फोन करून विचारतात

आशू सारखा खोकत आहे. मास्क नाही. दोघे पाण्याने भिजले आहेत. मग एका घरात बेल वाजवून औशध माग णा र म्हणे. आशू लगेच इंग्रजीत चालू करतो. सॉरी वगैरे. अमेरिकेतच आहे वाट् ते. फोन करू का. घर वाला आम्ही तुम्हाला ओळखत नाही. फुटा म्हणतो. आशू आधार कार्ड देउ का विचारतो. किंवा नेट सर्च कर व ह्या घरातली बाई पण आपण ?! हिने आशूला बघितले आहे. व ओळखते. लहान मुलांच्या गाण्याच्या शो मध्ये मधे जज आला होता म्हणे . हा खोकत आहे. व ती बाई एकदम एंग्रजी बोलत आहे. इथे मुलांची पार्टी चालू आहे. हे घर एकदम फॅन्सी आहे.
अरू च्या पद्धतीचे छोटे खेडव ळ कोकणा तले घर नाही.

हे कोणाचॅ तरी नो नेट वर्क झोन मधले पण लँडलाइन असलेले वीकेंड होम आहे. इथून अरू फोन करत आहे. ते लोक कामाचा व मोबाईलचा
़ कंटाळा आला की इथे हेउन राहतात.

इथे भाग संपला.

प्रोमोमध्ये एक गाणे आहे व अन्या रात्री कॉल बॅक करतो तर त्या घरातला एक मुलगा अंकल आंटी कधीचे गेले झोपायला बेडरुम मध्ये विचारतो.
आता अन्या जागेवरीच एक्स्प्लोड होतो कि काय असा आविर्भाव आणला आहे.

ओंकार गोवर्धन खोकायचा अभिनय चांगला करतोय. आतापर्यंत तेवढंच नीट जमलंय.

तिने उतरताना कठड्याला हात लावला म्हणून त्या कठड्याकडे प्रेमाने पाहत त्याला हात लावत मोहरून उठणे हे टीनेज प्रेमात ठीक आहे. पंचेचाळीसच्या बाप्याने ते केलं तर क्रीपी वाटतं.

अनिरुद्ध आणि कांचन आशुतोष - अरुंधती या दोघांत तसं काही होण्याची अपेक्षा ठेवून वाट बघताहेत असं वाटतं.
अनिरुद्ध खूपच डेस्परेट झालाय.

संवादलेखिकेची आई प्रसिद्ध लेखिका आहे. चुकीच्या मराठीबद्दल अनेकदा लिहिलंय त्यांनी.
टँकर पलटी झाला हे वाक्य आजच्या एपिसोडमध्ये अनेकदा आलं. त्याबद्दल आई मुलीचे कान उपटेल का?
( मराठीत टँकर उलटला असं असतं)

संजना कामाला जायला लागल्यापासून चक्क सेन्सिबल वागतेय. कामाच्या ठिकाणी तिचं म्हणणं डावललं गेलं तेही तिने मनाला लावून घेतलं नाही.

अरे तो पोरगा काय कमाल आयटम घेतलाय,,, अंकल आंटी कधीच गेले बेडरूममध्ये Lol मुद्दाम तमाशे दाखवायला, असं कोणी फोनवर बोलतं का ? फुटलेच मी प्रोमो बघून Lol

आता अन्या जागेवरीच एक्स्प्लोड होतो कि काय >> झाला तर बरंच होईल, सोबत म्हातारीला पण घे.

मालिकेचा टीआरपी घसरला असावा. लोकसत्ता मध्ये बातम्या (पेड न्यूज) देत आहेत - अरूंधतीचे बदललेले रूप पाहून आशुतोष झाला अवाक् वगैरे!

संजना कामाला जायला लागल्यापासून चक्क सेन्सिबल वागतेय. >> तिची व्हीलनगिरी संपत आलीय वाटतं, आन्या आणि कांचन आहेत ना आता.

आशुतोषला करोनाची लक्षणं दिसताहेत
फेब्रुवारीत रस्त्यात पाणी कसं साचलं?
आणखीही एका मालिकेत असंच मोटारीने पाणी उडवलंय.

अगदी अगदी, भरत, ते टँकर पलटी झालाय हे खटकलं. अरु, अप्पांशी फोनवर बोलताना टँकर उलटला म्हणाली, संजना आणि बाकीचे घरचे पलटी झालाच म्हणत होते.
ज्या घरी शिरले तो दार उडणारा काय ओव्हर acting करत होता!

Pages