आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभ प्रभातः भाग ५७८

आताकाये रेकॉर्डिन्ग आहे ते दुसर्‍या लोकेशनला तर अरु व आशू ह्यांना एक दिवस गावा बाहेर राहायला मिळेल. ह्यात अन्याचा भरपूर जळ फळाट झालेला आहे. अरू चमकदार उत्तरे देउन मी जाईन रेकॉर्डिन्ग ला असे कन्फर्म करत आहे.

तर भाग ओपन्स विथ आशू स्टुडिओ बुकिन्ग बद्दल व त्याच्या स्वप्नांची संगीत क्षेत्रात काही बाही करायचे आहे व मग रिटायर व्हायचे बेत नित्यास
बोलुन दाखवत आहे. गडी एकदम उत्साहात आहे. आणि का नाही उपासाचे उद्यापन आहे न.

कट टू यश गौरी . हे अभी अनघाच्या सुहाग रात्रीची तयारी करत आहेत व स्वतः पण एक रोमँटिक क्षण व काही क्षण मिनिटे उपभोगत आहेत.
मागे एक रोमांटिक गाणे वाजत आहे. ते ह्या पुढील अल्बम मधीलच वाट्ते आहे. फुगे केंड ल्स वगैरे गौरीने आणले आहे. पण ते गाणे संपेपरेन्त
सर्व डेकोरेशन चा कचरा झाला आहे. अभी अनघा येतात व ही कचरा रूम बघून धक्का बसल्याचे अ‍ॅक्टिन्ग करतात. व त्यांना हे आवरायला सांङतात.

खाली आजी मान खाली घालून बसली आहे. संजना अल्बम पब्लिसिटी समजावुन सांगत आहे. सोफ्या ची जागा बदलली आहे असे दिसते.
अप्पा लगेच जुन्या आठवणी कॅपसु ल सिंगल अल्बम एक गाणे वगैरे संजना म्हातार्‍यास समजावून सांगत आहे.

अन्या येउन विरजण घालत आहे. शो बाजी आहे म्हणतो. इतकी मेहनत करून आता दोन्ही बायका आशुतो श च्या भजनी डोला रे डोला करु लागल्यात कोन पण फ्रस्ट्रेट होईल ना.

अरु आई अप्पांना चहा देत आहे. अन्या संजना ला रेकॉ र्डिंग ला जा असे भरीस घालतो आहे. मग अरू येउन स्त्री पुरुश मैत्री काम शहराच्या बाहेर व्यावसायिक काम वगैरे पट् टी पढवत आहे. पैसा वसूल संवाद. मस्त टोमणा टोमणी चालू आहे. चार आने के बैंगन को बारा आने का
मसाला असे ह्या गाण्याचे झाले आहे.

कट टू रात्र अनघा नवी सून घरात काम करत आहे व सर्व तिला वर घालवत आहे.त. इशा आजीला विचारते मग अरू तुझ्या जिभेला काही हाड. म्हणते. साठ सत्तर वरशा पूर्वीची भाषा. जी प्रेक्षकांना आव्डते. इशाला सर्व डॉक्युमेंट्री एविडन्स हवा आहे. आजी लाजत मुरकत नव्या लग्नाची जुनी कथा सांगत आहे.

गर्भदान संस्कार बद्दल सांगत आहे. आध्यात्मिक बैठक होती म्हणे. ( तरीच आठ नौ बाळंटपणे पुढे वाढून ठेवलेली असत.) अनघा सर्व प्रवचन स्मजुत दार पणे ऐकत आहे म्हातारीचे. आजी महिरत प्रेमाचे सांगत आहे.

प्रेक्षकांना त्यांचे जुने दिवस आठवत असतील नक्की. " पहिली रात्र जास्त निरागस असायची आमच्या वेळी"

कट टू गुळकिसे मावशे.इन प्रोमो. पूजा कशे झाली म्हटल्यावर एक दम आँ झाले. पण ती आशूला विचारत आहे.

अरू फायनली घरातुन जाईन म्हणते. की कांचन च्या डोळ्यास टिपे धरू लागली आहेत.

यन जॉय पीप्स.

अनिरुद्धबरोबर अभिषेकलाही झोडपायची संधी आहे.
लग्नाच्या तयारीत अरुंधतीची धावपळ होते आहे, असं अनघा म्हणाली होती तेव्हा - तिच्या मुलाचं लग्न आहे, तिने केलीच पाहिजे- असं त्याचं म्हणणं होतं.
आता ती गाणं रेकॉर्ड करायला जाते आहे म्हटल्यावर तुला झेपेल का? लग्नात किती धावपळ झाली आहे .

अनघाला घरच्या सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायला उद्युक्त करणार्‍या अरुंधतीला दोन्ही खांदे धरून गदागदा हलवलं पाहिजे. जे आपण भोगलं तेच सुनेला भोगायला लावताना तिच्या चेहर्‍यावर कृतकृत्य झाल्याचे भाव आहेत.

उपासाचे उद्यापन >>> Lol

पण मी म्हंटे हा आशुकुमार कामाच्या गोष्टी घरीच येऊन का बोलतो?
ते पण ही प्रजा हजर असताना. अन्याचे ड्वायलाक वाढवायला आणि कांचनचं तोंड अजुन वाकडं व्हायला.
बाहेर कुठेतरी, त्याच्या आफिसात, फोनवर बोलुच शकतात की.

आशुकुमार कामाच्या गोष्टी घरीच येऊन का बोलतो>>>अरुंधती तिथेच असते ना. ती कधी त्याला कामाचे विचारायला फोन करत नाही कि ॲाफिसला जात नाही.

वेलकम बॅक अमा.

मागे एक रोमांटिक गाणे वाजत आहे. ते ह्या पुढील अल्बम मधीलच वाट्ते आहे. >>>>>>>>>> नाही. स्वजोच्या ' तु ही रे' सिनेमातल आहे.

भाग ५७९: म्हातारी अजून पहिल्या रार्तीतच लपून आहे. आमच्या वेळी फार निरागस होते हे प्रकरण . इन जनरल आम्ही तीन मुले झाली तरी ह्या बाबतीत निरागस आहे मग एकदम भानावर येउन अप्पा कुठे गेले बघते.

अभी वरुन खाली आला आहे वाट बघून बघून व इशा त्याला पिडत आहे व इतर पार्टी अनघाला चिडवत आहे. आता एकदम खोडकर संगीत आहे. अनघा व अभीचा मूक संवाद चालू आहे. फारच अभिनय करत आहेत. बाकी लोक्स अंजान मारत आहेत. तिला सास्सूचे अनुमोदन मिळा ले पण
आजी तिला पाय चेपायला लावते. निरागस म्हाताअरी. अश्याने पणत वंडे कशी होतील? संजनाला लवकर बाळ होईल.

अरे आजी पण हाच ड्वायलॉक मारते घरात लव कर छोटी पावले फिरू देत. एकदाची ती वर येते व अभी रूम मध्ये चेक करत आहे. यश इशाने काही वात्र ट पणा केला आहे. एकंदर टी पी भाग दिसतो आहे. सुहागरात्र वेटिन्ग मोड . आता लाल लालालल्ल्ल्ल्ल असे महिला कोरस संगीत आले आहे.

अनघा अजूनही मला सोडून जाउ नकोस मी तुला सोडून जाणार नाही घट्ता धरोन ठेवेन असे च डायलॉग चालू आहेत. अभीने तिच्या साठी एक गिफ्ट आणली आहे. संतूर व गोड संगीत सूर आहेत. व्र प्रोग्राम सुरू झालेला दिसतो.

अरू खाली हात पदराला पुसत पुसत दमून येते व खुर्चीत बसते व लगेच बडिशेप द्यायला उठते. ( किती ती कर्तव्य परायण सून ) तरी म्हातारीचे
पाय चेपत बसते. तेल लावून कारण अवी फार जोरात पाय चेपतो म्हणए. हा तर वहिनीचे पाय पण तेल लावून चेपायला तयार आहे.
मी आहे परेन्त तीला चेपायला देते मग मी नसेन तेव्हा अनघा तिला पाय चेपून देइल म्हणे . हाइट ऑफ एंटाय टल मेंट. पावलाला जास्त तेल लावून ठेवावे. म्हण जे उठली की घसरे ल म्हातारी.

आता अरू सासूचे लांगुल चालन करता करता जाण्याचे सूतोवाच करते नेहमी प्रमाणे विरोध होतो आहे. व अरू उसासे टाकत आहे व समजावून देत आहे.

आता कट टू बलून्स व्हाइट पिन्क सेंटेड मेणबत्त्त्या केसात गुलाबाच्या पाकळया अनघा छान तयार झाली आहे व केस शांपू केलेले सेट केलेले आहेत ब्लो ड्राय. ह्याला दीड तास नक्की लागेल. बासरी वाल्याने सुहाग रात स्पेश ल नव्या बासर्‍या आण ल्या आहेत. मग वेस्टर्न संगीत व अजून एक गाणे चालू आहे. नको नकोरे असा अबोल आ रे. मिठीत ये ना रे. मिठीत घे ना रे तो अभी काय सेक्सी दिसत नाही पण तिला चालतंय.
मनातले सारे नको मनी ठेवू असा नको अनोळखी होउ . शोधु कुठे तुझ्यातला तुला जरा सांग रे( हे पण त्यानेच सांगायचे?!!)

काय फुटेज खाते आहे सुहाग रात्र. मग तो पलंगावर ओणवे होण्या चा सीन आलेला आहे. व होप फुली लाइट बंद

कट टू अरू गोइन्ग डिस्कशन. यश पहिल्यांदी उखडलेला आहे. व अरू त्याला समजावत आहे. माझ्या डोळयासमोर हे व संजना नवरा बायको म्हणून फिरतात ह्याचा मला त्रास होतो. आजी लगेच माज्या मुळे तुला काय त्रास होतो आहे. विचारते. अनघाच्या संसारात लुड बुड नको.
आजी एक बाई घराबाहेर पडली म्हणजे अनेक चुकीच्या गोश्टॅएंना आमंत्रण. त्या ऐवजी गौरी कडे रहा. मुले तुला बघती.ल. व तू मला रोज स्वयंपाक करून घालशील. तुला एकटॅ रहायला जमणार नाही. दिस वुमन नीड्स टू बी शट अप. तिला अरूच्या स्वाभिमानाची आजिबात कदर नाही. यश इशा कडे दुरल्क्ष करून नाही चालणार त्यांचे सर्व व्हायला पाहिजे ती तुझी जबाब दारी आहे.

परत अरू थोड्या दिवसांनी जाइ न म्हणते. व आई कडे जाईन म्हनते. खरे तर तिला अनघाच्या फ्लॅट मध्ये राहता येइल.

अवी वहिनीला अडकवून ठे वणे जमणार् नाही. मुले मोठी झाली आहेत पण आम्ही काय करायचे म्हन ते. हिला एक गुलाम हवी आहे. अरू ची नवी ध्ये ये स्वप्ने ह्या बद्दल अवी तिला समजावुन सांगत आहे.

खरंच काय गूळ किसतात

प्रोमो मध्ये अरु आशू चा फोटॉ आला आहे यश वाचून दाखवतो तर अन्या तो पेपर फेकून देतो. अरू संभ्र मित अवस्थेत बघते.

अभिमान सि नेमाचा प्रयोग सुरू होतो आहे.

ह्या सर्वा त अरू च्या आश्रमातल्या नोकरी चे काय झाले आहे? सोडली का आशू च्या मागे जाताना? हपिसातून एक फोन पण नाही.

हो. अरुंधतीला म्युझिक टीचर करता करता डायरेक्ट बिझिनेस असोसिएट करून घेतलं. मग दोन दोन कामं कशी जमणार म्हणून अरुंधतीने आश्रमातलं काम सोडलं. तिला खरं तर सोशल वर्क करायचं होतं. पण यशने तिला पैसा कमवून सोशल वर्क आणखी चांगलं करता येईल असं सांगितलं.

मागच्या एका भागात अभिषेकने अनघाला तू माझ्या हॉस्पिटलमध्येच रुग्णांचं कौन्सेलिंग करायला ये असं सांगितलं .

संजना म्युझिक स्कूलचं अ‍ॅडमिनिस्ट्रेशन पाहणार होती. त्यातून मध्येच म्युझिक अल्बमच्या लाँचिंगमध्ये पडली.

म्युझिक स्कूल आणि अल्बम - फेकायला काय जातं. यांची स्वतःची रेकॉर्डिंग, रिहर्सल रूम सुद्धा अजून दिसलेली नाही.

अनिरुद्धच्या मित्राच्या स्टार्ट अपचं काय झालं?

स्टार प्रवाह दुपारच्या एका मालिकेच्या प्रोमोत सुमुखी पेंडसे एकदम हडकलेली आणि वयस्कर दिसते आहे. आपल्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले सुमुखी पेंडसे तरुण असताना करायच्या तसे रोल करताहेत.

उंच, चांगली पर्सनॅलिटी असलेल्या बायांना नकारात्मक भूमिकाच देतात.

त्या मालिकेच्या प्रोमोत नायिका आजन्म मधल्या ज चा उच्चार जहाजातल्या ज सारखा करते.

अमा... भारी एकदम! Happy
परत अरू थोड्या दिवसांनी जाइन म्हणते....!! कशाला थाम्बते आहे आता?

त्या मालिकेच्या प्रोमोत नायिका आजन्म मधल्या ज चा उच्चार जहाजातल्या ज सारखा करते.
भरत Lol मनातल्या मनात म्हणून बघितलं.......

स्टार प्रवाह दुपारच्या एका मालिकेच्या प्रोमोत सुमुखी पेंडसे एकदम हडकलेली आणि वयस्कर दिसते आहे. आपल्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले सुमुखी पेंडसे तरुण असताना करायच्या तसे रोल करताहेत. >>> हिन्दी गूम है किसिके प्यार मे ची कॉपी. तिथे ही भूमिका किशोरी शहाणेने केलीय आणि जबरदस्त केलीय. मी प्रोमोज बघून लिहितेय, हिंदी बघते मी hotstar वर.

हो तो आजन्मचा उच्चार मलाही खटकला. सुमुखी किती वर्षांनी दिसली. आई आता रात्री साडेअकराला दाखवत नाहीत. पिंकी आणि नादखुळाचा विजय असो. देशमुख अतिशय मागास विचारांचे दाखवले आहेत. काय ते रांधा वाढा उष्टी काढाचे कौतुक. अनघा आणि गौरी बावळट आहेत.

अरे सगळा मूर्खपणा चाललाय, ती संजना काय आशु अन् म्युझिक अल्बमच्या मागे लागतेय, अन्या तणतण करण्यापुरताच ठेवलाय आता, अरु प्रचंड बोर करते. सारखं तेच तेच आई अप्पा आई अप्पा ,, अरे बास किती काळजी वाटते बाई तुला त्या म्हातारीची जिने आयुष्यभर तुला गुलामासारखं वागवलं आहे? मला आता वाटायला लागलय तो आशु राहीला बाजूला, ही बया कांचनशीच लग्न करून घेईल की काय पुढे.
त्यापेक्षा आपल्या स्वताच्या आईला बघेल कोणीपण, पण हीचं आपलं तेच आहे अजून. काहीतरी सहनेबल दाखवा, त्यापेक्षा अनुपमा बरी वाटते आता स्वत:साठी खंबीर झाल्यासारखी. हीने उसासे टाकणं बंद केले पाहिजे बाकी काही नाही केले तरी.
आणि वेड्यासारखे प्रत्येक गोष्टीचे explanation त्या अन्याला देत बसते ते तर डोक्यात जाते आता. निघून जायचं सरळ तिथून तो समोर काही पचकायला आला की.

देशमुख अतिशय मागास विचारांचे दाखवले आहेत. काय ते रांधा वाढा उष्टी काढाचे कौतुक >> ते तसं च राहणार कायम.

त्या मालिकेच्या प्रोमोत नायिका आजन्म मधल्या ज चा उच्चार जहाजातल्या ज सारखा करते. >>>>>>>>> पाहिला तो प्रोमो. 'जो माझ्या पित्याच्या मृत्यूला जबाबदार आहे त्याला मी माझा पती कधीच मानणार नाही' कोण लिहित हे असले डायलॉग्ज!

अनिरुद्धला अधिकाधिक वाईट दाखवण्यासाठी अरुंधतीला थांबवून ठेवलंय. त्यानिमित्ताने अरुंधतीला अपमानाची परतफेड करता येतेय.
ज्याने स्वतःच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर , तेही विवाहित . एक मुलगा असलेल्या स्त्रीशी केलंय त्याला आता तसलं काहीही होत नसताना चिडायला कारण असता नये. पण त्याला त्या दोघी एकाच वेळी हवा होत्या. एक मोलकरीण कम कुटुंबाची केअर टेकर कम अपमान करायला दुसरी बाहेर मिरवायला आणि मजा करायला.

शुभ प्रभातः भाग ५८०:

एकदम एच डी एफ सी ए टीएम संगीतानेच सुरुवात. अवी भरल्या आवाजात आईला वहिनीची बाजू समजावुन सांगत आहे. पॅट्रार्की दुरून तिच्यावर लक्ष ठेवेल म्हणे. सुरक्षिततेची काळजी घेइल पण आई ने तिचे पाउल मागे खेचू नये अशी विनंती करतो. म्हातारी एकटीच बासरी संगत अश्रुपात करत बसते.

कट टू आशू रूम आजी लहान मुली सारखा सलवार कमीज घालुन मुलाची चौकशी करायला येते. कशी झाली पूजा असे एका विचि त्र टोन मध्ये विचारते. दोघे अन्याची चीरफाड करत आहेत. तो टोचून बोलतो आशू ला. आशू रेकोर्डिन्ग ला जायचे आईला सांगतो अरू बरोबर जाणार म्हणून मग आई कल्टी मारायचे बघते. पण समजुतदार पणे. भारतात आल्यावर पहिला अल्बम पहिला अल्बम अरु ला गायचे समाधान मिळावे तिला यश मिळावे. ही पट्टी फार मारत असतो हा समजुतदार सजन. बासरी धून छान आहे.

ही आई एकदम सोळा वर्शाची असल्या सारखी मुलाला आशिर्वाद देते.

अरु गरम पोहे करते व सासुला वाढते. सासो लगेच दिवसाच्या ऑर्डर देतात इशा अनघाला वर पाठवत आहे. आजी मोजे विणायला घ्यायच्या नाजूक मो ड मध्ये चि डवते आहे अनघा लाजते. अरू पण खूश आहेस नंअसे विचारते. संजना येउन फार आवाज होतो आहे असे करवादते.
अन्या पण येउन खवट बोलणे मोड चालू आहे.

अरु प्रत्युत्तर देते अन्या खोचक बोलत आहे. अरु चे गाणे ह्या मोस्ट एक्स्पेक्टेड अल्बम मध्ये आहे. हा किती निगेटिव्ह व कुबट माणूस आहे.
संजना मला काम आहे मी काम करते मोड मध्ये आहे. छान साडी नेसुन ये म्हन ते संजना ते ही कुज कट पद्धतीने.
पण फोटो आधीच छापून आला आहे. अरु आशू फोटो म्हातारा घेउन येतो पेपर मध्ये यश बातमी वाचून दाखवतो. अन्या ह्या सर्कस ला वैतागून
आंजर्ल्याला जातो म्हणतो. पन सर्व इग्नोअर करतात. व अन्या पेपर फाडून फेकून देतो.

अरू फाइट मोड मध्ये तुमी माझी सगळी स्वप्ने चुरगळून टाकलीत( ते तंबोरा वरच्या गच्चीतून फेकून दिला ते विसरले का? मला तर शॉक बसला होता आमच्या घरी तंबोरा तबल्याची पूजा होत असे. घरी संगीत विद्यालय असल्याने)

तुम्ही मला मान दिला नाहीत. पण आता नाही. ब्ला ब्ला मग पेपर उचलून सरळ करते. मागे व्हायोलिन वर आई कुठे काय करते धून चालत आहे. कट टू नित्या आशू. हे म्हणजे अजून रेकॉर्डिन्ग नाही . आजी परत तू टेशन घेउ नको आम्ही आहोत. आशू अरूची काळजी करत आहे.
तो अरू ला फोन करतो.

अनघा मागून कढिपत्ता घेउन येते. अरू सासूचे बारकाईने वर्णन करत आहे. नाही तर ती म्हातारी खात नाही म्हणे. अनघा उत्साही कोकरू असल्याने सर्व शिकून घेइन म्हणते. अरू तुम्ही हनिमून ला कधी जाणार म्हणते. व तू कामाला सुरुवात कर म्हनते. तिने बातमी आई दादांना पाठवले आहे. म्हणते. इथे भाग संपला. हिच्या नव्या साड्या सर्व कट वर्क च्या बाजू असलेल्या आहेत. व त्यावर काँ त्रा स्ट बिलोज

प्रोमो: आजी उदार मनाने नात सुनेला सलवार कमीज घालायची परवानगी देते. मग अप्पा लगेच मग अरू ला पण परवानगी द्यायचे सुचवतो.
अभी आईच्या तक्रारी सांगत असतो तेव्हा अनघा त्याचे प्रबोधन करते. अभी डोक्यात प्रकाश पडल्याचा अभिनय करतो.

आता हे कार ने रेकॉर्डिन्ग ला जाणार तिथे घपले होत होत उशीर होणार. मग परपुरु शा बरोबर सत्वशीलेने रात्र घालवायची इमरजंट्सई येणे.

ते नुसत्या मित्राने कारच दर्वाजा हात लांब करून बंद करणे व सीट बेल्ट लावायला मदत करणे ह्याव अन त्याव खेळ्या होतील. पण घाबरू नका
सत्व शीला स्वच्छच परत येइल.

पार्किंग झाडून, सडा सम्मार्जन करून; दोन किमी चालून परत फिरताना जी विश्रांती घेतो त्यात तुमचे कमेंट्स वाचायचे अन परत चालत सुटायचे हा रोजचा शिरस्ता आहे. आता निघालो परत. गुड डे.

अमा.. Lol
समजूतदार सजन!
ते नुसत्या मित्राने कारच दर्वाजा हात लांब करून बंद करणे व सीट बेल्ट लावायला मदत करणे ह्याव अन त्याव खेळ्या होतील. ... हा फार आवडता सीन आहे मालिका वाल्यांचा...... गिल्ट फ्री जवळीक!
Happy

यो अमा इज बॅक! वेलकम अमा. तुम्ही , भरत आणि सगळेच जी अफलातून फटकेबाजी करता त्यामुळे मी ही सिरीयल अधूनमधून पहाते.

Pages