Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रिकॅपमध्ये अरुने ड्रेस
प्रिकॅपमध्ये अरुने ड्रेस घातलाय.
अरे तो पोरगा काय कमाल आयटम घेतलाय,, >>>>>>>> नैतर काय. बावळटच आहे. आता अन्या तमाशा करायला मोकळा.
आता अन्या जागेवरीच एक्स्प्लोड होतो कि काय >> झाला तर बरंच होईल, सोबत म्हातारीला पण घे. >>>>>>>> ++++++++११११११११
मला ते विकेण्ड होम आवडल.
हवामान बदलल्यामुळे आशुतोशची तब्येत बिघडली असेल.
संजना कामाला जायला लागल्यापासून चक्क सेन्सिबल वागतेय. >> तिची व्हीलनगिरी संपत आलीय वाटतं, आन्या आणि कांचन आहेत ना आता. >>>>>>>>>> थोडे दिवस थाम्बा. आशुतोष अरुला जास्तच महत्व देऊ लागल्यावर हिची व्हिलनगिरी पुन्हा चालू होईल. अन्याच्या ' जळफळाट गॅन्गमध्ये' ही सुद्दा सामिल होईल.
हुशार ड्रायव्हर स्टेपनी पण पंचर ठेवतो, ओढूनताणून situation निर्माण केलीय. >>>>>>>> तो ड्रायव्हर भलताच वाटतोय. आधीचा टँकर उलटल्याची बातमी देणारा ड्रायव्हर वेगळा होता ( तोच तो मख्ख ड्रायव्हर).
नवीन प्रोमो पाहिला.
फायनली जो तमाशा व्ह्यायला हवा तो झालाच. अरु घर सोडून जाते रागावून.
अरु घर सोडून जाते रागावून.>
अरु घर सोडून जाते रागावून.>>कितव्यादा?? याआधीही "य " वेळा अरु घर सोडुन जाणार सोडून जाणार म्हटली आहे आणि जावुन परतही आली आहे.
सीतेच्या चारित्र्यावर संशय
सीतेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वनवासात पाठवलं गेलं .
इथे आपल्या चारित्र्यावर संशय घेतला म्हणून अरुंधती घर सोडून जाईल (बहुतेक) . नाहीतर गेली नसती.
आताही तिला आशुतोषवर संशय घेतला म्हणून जास्त वाईट वाटेल.
हो..ड्रायवर बदलला...मधेच!
हो..ड्रायवर बदलला...मधेच!
अरु ला दिलेला ड्रेस इतका घोळदार आणि लांब होता.... प्रति साडीच!!
काही.....
द्यायचाच तर मग छान टॉप लेगीन तरी द्यायची ..!!
लोकसत्ता मध्ये बातम्या (पेड
लोकसत्ता मध्ये बातम्या (पेड न्यूज) देत आहेत - अरूंधतीचे बदललेले रूप पाहून आशुतोष झाला अवाक् वगैरे! >>
पाहिला तो टँकर पलटी अरूंधती फरार एपिसोड
- आधी ती अरूंधती आहे.
- ड्रायव्हर व तो केळकर यांच्यापैकी जो खोकत आहे त्याने मास्क लावलेला नाही.
- ट्रॅफिक जॅम असल्याने ते हॉटेल शोधत आहेत. तंत्रज्ञान १९ व्या शतकातील असल्याने सगळा शोध स्वतः हिंडत घेत आहेत. मोबाईल वर वगैरे नाही. किंवा तेथे कोणाला विचारूनही नाही.
- मग गाडी पंक्चर.
- स्टेपनीही पंक्चर. स्टेपनी आत ठेवण्याची स्टेप ही मूळ टायर रिपेअर होतो तेव्हा होते. त्यावेळेस स्टेपनी दुरूस्त न करता केवळ अरूंधतीची अडचण वाढल्याचे दाखवायला ती ड्रायव्हरला डिकीत परत ठेवायला लावणार्या स्क्रिप्ट रायटरला अॅवॉर्ड द्यायला हवे.
- केळकरला नेटवर्क नाही
- अरूंधतीच्या फोनची बॅटरी संपली आहे
- ड्रायव्हर हा प्रमुख कॅरेक्टर नसल्याने त्याच्या फोनचा उल्लेख नाही.
- पुढच्या एपिसोड मधे त्यांच्या चारित्र्यावर उडणार्या शिंतोड्यांचे प्रतिक एक कार दाखवून जाते.
मग नक्की अरूंधती व केळकर यांच्यात कोण कोणाला एकटे जाउ देत नाहीये हे ठरत नाही. ड्रायव्हरला तू कार मधेच बस म्हणतात. एरव्ही ड्रायव्हर लोक हे पहिले करतात. पण इथे त्याला फुटेज द्यायचे नसावे. मुळात वाहतूक ठप्प असताना तेथे शोधायचे सोडून यांना निर्मनुष्य भागात हॉटेल का शोधावे लागते माहीत नाही.
इकडे घरी तर्कवितर्क "एका वेळेस फक्त एका व्यक्तीचा संवाद, किंवा रिअॅक्शन" या रेट ने सुरू आहे. टँकर उलटल्याची बातमी टीव्ही लावल्यालावल्या लगेच दिसते. पाच मिनीटे सुद्धा थांबावे लागत नाही. पण ठीक आहे तेवढा योगायोग अलाउ करू. कारण ते सगळ्याच पिक्चर्/सिरीज मधे असते - मुख्य पात्रांना इंटरेस्ट असलेली गोष्ट रिमोटने टीव्ही ऑन केला की लगेच समोर दिसते. चॅनेल सुद्धा बदलावे लागत नाही.
हाहा
हाहा
त्याला अरू नामक नेटवर्क भेटलंय आता कश्शा कश्शाची गरज नाही लाईफ मध्ये.
केळकरला नेटवर्क नाही>>>
अरूंधतीच्या फोनची बॅटरी संपली आहे >>> ये तो होनाईच मंगता है, त्याशिवाय अशा प्रसंगांना जान येतच नाही.
ड्रायव्हरला तू कार मधेच बस म्हणतात. एरव्ही ड्रायव्हर लोक हे पहिले करतात >>> धन्य आहेत ते कारण. पण मग न्यायचच नव्हतं ना त्याला , असाही काहीच कामाचा दाखवला नाही तर.
मुळात वाहतूक ठप्प असताना तेथे
मुळात वाहतूक ठप्प असताना तेथे शोधायचे सोडून यांना निर्मनुष्य भागात हॉटेल का शोधावे लागते माहीत नाही.>> सगळ्यात सोप म्हणजे ज्याला बघुन " अय्या! आशुतोष केळकर" अस होणार नाही तो निलेश मोहरिरचा स्टूडियो अलिबागलाच नाहि का?पुढे जाण्यापेक्षा मागे गेले असते, बसल्या बसल्या अजुन चार गाणि उरकुनही घेतली असति.
फा...
फा...
तो केळकर फारच खोकत होता...मास्क नाही. Corona ची भीती वाटत नाही का यांना?
टँकर पलटी म्हणतात ...ड्रायवर लोक. त्यात काय एव्हढे?
आशुतोष जराही celebrity वाटत नाही...
मी तो रेकॉर्डिंगचा भाग बघितला
मी तो रेकॉर्डिंगचा भाग बघितला परवा हॉटस्टारवर. मला एक कळलं नाही, गायिका आणि संगीतकार थेट रेकॉर्डिंगच्या दिवशी पहिल्यांदा एकमेकांना भेटतात हे कसं काय? रिहर्सल वगैरे करत नाहीत का आधी एकत्र बसून? असं कसं काय?
भाग ५९०: सर्व लोक का ळजी
भाग ५९०: सर्व लोक का ळजी करत आहेत. अरु चा फोन येतो ती सर्वांना सांगते. तरी आई म्हणते ही काही नीट बोलली नाही. अन्या बसून आहे.
तिचे वेल बीइन्ग कळल्यावर सर्व रिलॅक्क्ष होतात. हे लोक्स अमर शानभाग मधुरा अनन्या अमर असे सुपर अर्बन फॅमिली आहे व अनन्या चा वाढदिवस म्हणून त्या बाबांनी तिला सर्प्राइज दिले आहे. हे भले माणस असल्याने त्यांना मॅरिडच समजतात. व वर कप डे बदलायला नेतात.
अरु मधुराक डे आशू साठी औशध पण मागते. उद्या सकाळी पोहे पन करुन देइल. बहुतेक. अरु लगेच वडिलांचे मुलीचे नाते वेगळेच असते वगैरे
सुवि चार टाकते.
अन्याला अरु आशूचे जवळिकी चे संबंध चे प्रसंग आठवतात व तो सड त बसला आहे.
संजना आता आशूचे अरु वर प्रेम आहे ते लगेच दिसते आहे. त्यात नर्वस होण्यासारखे आहे आशू अन्या पेक्षा किती ग्रेट आहे असं अन्याला काड्या घालत आहे. तो मिनिटो मिनिटी भडकत आहे. तिला पण अरुचा हेवा वाटतो आहे. तिने जुगार खेळला त्यात ती जिंकली व संजना हरली म्हणून.
लग्न करूनही संजना हरली कारण अन्या कमवत नाही. मग अन्या पण तिला तू पण जा सुखी राहा म्हणतो. तो फारच उखडला आहे.
इकडे मंडळी केक कापायला थांबली आहेत. आशू टीशर्ट बदलू न येतो. व अरु पण एक छान सलवार अनारकली नेसुन येते. आशू परत एकदा प्रेमात पडतो. १५ जुलै १९९५ ला ती जशी दिसत होती तशीच आता दिसत आहे असे तिचे प्रेम भरे वर्णन करतो.
ही केक कापल्यावर केक खात आहे.
परत आशू बघत आहे. व एक प्रेमाचे चां दणे टाइप गाणे पडले आहे. अरू एक ग्लासात सरबत पिउन टेबलावर ठेवते तो आशू ओठास लावतो.
जसे पूर्वी कॉलेजात केले होते. क्रीपी बाय फार.
मुले नाचत आहेत व आई बाबा आशू अ रु गप्पा मारायला बाहेर जातात व मग झोपायला जातील असे ती आई म्ह णते.
अन्या इकडे घरात अस्वस्थ आहे. घालमेल होत आहे. रात्रीच्या तीन वाजता तो फोन करतो तर मुले खात आहेत. त्यातला मुलगा फोन उचलतो त्याला अन्या मी तिच्या फॅमिलीतुन बोलतो आहे म्हण् तो. व तो मुलगा अंकल आंटी बेड्रूम मध्ये गेले झोपायला असे सांगतो. मग अन्या ला जबरी धक्का बसतो.
सर्व साम्राज्य हरलेल्या रोमन सम्रा टाचा भाव त्याच्या चेहर्यावर आहे. आता उद्या फायर्वर्क्स नक्की.
इथेच भाग संपला
आता लोक्स घरी आईची वाट बघत आहेत. व आशू अरू बदललेल्या कपड्यात गाडीत आहेत. गाडी चालू आहे. आरु ड्रेस बदलायला हवा होता म्हणते तर आशू म्हण्तो काही गरज नाही होउ दे सवय सर्वांना एकदम च.
कुत्रे झोपलेले असल्याने आरामात भाग बघून लिहून झाला. आता चहा टाकते. मी पण बेड्रूम मधूनच प्रतिसाद लिहिला आज.
हा इतका वयस्कर ( मध्यम वयीन
हा इतका वयस्कर ( मध्यम वयीन) माणूस , अमेरिकेत राहुन आलेला इतका अनभिज्ञ व पोरकट वागत असेल हे खरे वाटत न नाही. बहुतेक अरु बद्दल भावना मनात ठेवून इतर काही केले असेल किंवा नसेलही. ह्याला डिवोर्स्ड दाखवले असते त र जास्त शोभले असते. पण अरुला अबोध व अना घ्रात प्रेमीच शोभेल असे लेखिकेचे ब्रीफ असेल. तर हम क्या करते. देखेंगे और क्या.
"सर्व साम्राज्य हरलेल्या रोमन
"सर्व साम्राज्य हरलेल्या रोमन सम्रा टाचा भाव

<सर्व साम्राज्य हरलेल्या रोमन
<सर्व साम्राज्य हरलेल्या रोमन सम्राटाचा भाव >
नटसम्रीट कशावरून बेतलंय ? तो राजा आठवला.
जयंत नारळीकरांची पहिली विज्ञानकथा कृष्णविवर.
अंतराळयान अवकाशात ब्लॅक होलमध्ये काही वर्षे अडकते. तिथे काळ थांबून राहिलेला असतो. तो वीस वर्षांनी परत येतो आणि आल्यावर आपल्या मित्र्याच्या हा अंतराळात जाताना नुकत्याच जन्मले ल्या मुलीच्या प्रेमात पडतो. त्याच्यासाठी इतकी वर्षे काळ थांबलेला असल्याने तो तरुणच राहिलेला असतो.
आशुतोष अम्रिकेत होता तेव्हा त्याच्यासाठी काळ थांबून राहिला. त्यामुळे तो कॉलेज कुमारच राहिलाय आणि प्रेमात अर्धवट झाल्याने अरुंधती त्याला तेव्हाचीच दिसतेय . रेलिंगला हात लावत येणे, उष्ट्या ग्लासाने सरबत पिणे इज क्रीपी.
हे दोघे कर्तव्यदक्ष कनवाळू लोक ड्रायव्हर आणि गाडीला विसरले का? की ड्रायव्हरने कुठेही रात्र काढली तरी चालते?
----------------------------
ड्रायव्हरने टँकर पलटी झाला म्हणणे ठीक आहे. पण अप्पाही तेच म्हणाले. बातम्यांत काय शब्द वापरला आठवत नाही. पण अनेकदा पलटीच म्हटल्याचे आठवते.
सर्व साम्राज्य हरलेल्या रोमन
सर्व साम्राज्य हरलेल्या रोमन सम्रा टाचा भाव त्याच्या चेहर्यावर आहे>>>> आईग्ग
रेलिंगला हात लावत येणे, उष्ट्या ग्लासाने सरबत पिणे इज क्रीपी. >>> तर काय, कॉलेजमध्ये आहेत का काय आता ? आशु फारच मेंगळट आहे, काश समीर धर्माधिकारी असता, एकपण भाग मिसला नसता मी
आणि अरुला काय भयाण कपडे देतात
आणि अरुला काय भयाण कपडे देतात हे लोकं नेहमी,, मेन पात्र असूनपण. She is good looking , छान मेक ओव्हर द्या की बाबांनो तिला एकदाचा,झाले दोन वर्षे, किती वाट बघायची.
बादवे मॉडर्न अरु आणि समीर ही जोडी खरंच छान दिसली असती.
मॉडर्न अरु आणि समीर ही जोडी
मॉडर्न अरु आणि समीर ही जोडी खरंच छान दिसली असती.>> खरं समीर गोड आहे. आता परिस्थिती अशी आहे की समीर चौगु ले पण चालेल. ( छन आहे हं तो) रुपांच काय घेउन बसलात स्वभाव महत्वाचा.
समीर चौगु ले पण चालेल>>>>
समीर चौगु ले पण चालेल>>>>
हो अमा , स्वभाव महत्वाचा आहेच
आणखी एक राहिले - त्या फार्म
आणखी एक राहिले - त्या फार्म हाउसवरचे लोक अरूंधती व तो केळकर यांना "तुम्ही अलिबागहून आला आहात काय?" असे विचारतात. ते जनरल विचारतात की खवचटपणे हे बघायला हवे
५९० आधी पाहून मग अमांची पोस्ट वाचतो.
ते जनरल विचारतात की खवचटपणे
ते जनरल विचारतात की खवचटपणे हे बघायला हवे>> ते खरच अलिबागलाच रेकॉर्डिन्गला गेलेले असतात.
आशु फारच मेंगळट आहे, काश समीर
आशु फारच मेंगळट आहे, काश समीर धर्माधिकारी असता, एकपण भाग मिसला नसता मी >> १०००% सहमत ... या आशुतोष मध्ये काही दम नाही... कुठूनही अमेरिकेतून आलेला वाटत नाही... समीर धर्माधिकारी एकदम योग्य . ... बदला म्हणावं याला आता ..
बहुतेक अरु बद्दल भावना मनात
बहुतेक अरु बद्दल भावना मनात ठेवून इतर काही केले असेल किंवा नसेलही. >>>>>>> बहुधा एका एपिसोडमध्ये तो त्याच्या आईला म्हणाला होता की माझ्या आयुष्यात अनेक मुली आल्या पण मी अरुला विसरु शकलो नाही. असच काहीतरी म्हणाला तो. हिन्दीमध्ये पण तसच दाखवलय ना. अनुज ' व्हर्जिनल' असतो.
भाग ५९१:
भाग ५९१:
मागे पार्टी चालू आहे. व मधुरा आ. आ. बाहेर गप्पा मारत बसले आहेत. मुलांवर गप्पा मधुरा तिची परिस्थिती विदीत करते. तिला अमर भेटल्याने तिचे जीवन सुंदर झाले आहे. व ती एक पाउल पुढे टाकून अरूला तू पण असे कर असा सल्ला देते. तिची सुखी स्टोरी ती सांगते. मुलांनी पण तिची गरज समजून घेतलेली आहे. हे दहा मिनिटे . अमर पुराण मधुरा पुराण. रँडम पब्लिक.
आता आशूला खोकला येतो. मग अरु त्यांच्या स्वयंपाक घरात जाउन काढा करून आशूला देते. अरु व मधुरा एका खोलीत व आशू अमर अशी झोपायची विभागणी होते. मग अमर पर्सन ल प्रश्न विचारतो. आशू लगेच पर त स्टोरी रिपीट. हे दहा मिनिटे. अरु डिवोर्स अरू गायिका अरु ट्यालेंतेड नवा अल्ब म रेकॉर्डिन्ग.
अमर पण रिलेशन शिप पुढे घ्या असा सल्ला देतो आडून. काढा गरम आहे तो जपून प्य म्हणते आरू.
मधुरा लगेच सल्ला मोड मध्ये आहे. व अरू कौतुक. रिलेशन शिप मध्ये उडी मारा ह्याव अन त्याव सल्ला. कोणाचे प्रेम नाकारू नका अशी माणासॅ असे प्रेम व मैत्री परत परत मिळत नाही. नोट टु इग्नोर ब्यांक बॅलन्स
नेक्स्ट डॅ घरी अनघा चहा हातात आणू देत आहे. आज्जा म्हणतो आजीचे लक्ष घड्या ळवर आहे. व ती खोडकर मुलगी असल्याने तिच्यावर हा लक्ष ठेवतो म्हणे. बत्ता हाणला पाहिजे टाळक्यात.
यश सांगतो अरू निघाली आहे. लगेच संजना अरू टीका. हे दहा मिनिटॅ. मला कसा तिचा त्रास होतो . हे दोघे टेबला पाशी बसून ब्रेडला बटर लावत आहेत. व चहा पाणी करत आहेत.
इकडे अरू सी फेसिन्ग बसली आहे व चहा पीत आहे सूखी दिसते. डोळे बंद करू न आहे. मधुरा सां गते अमर खूप काम करतो. घरची कामे करतो. रोल रिवर्सल यु नो. मुले पण काम करतात. मुले शाहणी आहेत. आशू व अमर रस्ता उघडला आहे का विचारते. मधुरा तिला ड्रेस गिफ्ट देते. अरु लगेच लाजुन मी नाही घालत ड्रेस वगैरे.
बापे लोक आले रस्ता क्लीअर झालेला आहे. अमर त्यांना सें डविचेस करून देतो म्हणे किंवा नको तर केक.
संजना अरुंधती च्या वागण्याचा परिणाम माझ्यावर होत आहे म्हणून आई कडे कांगावा करत आहे. सर्व ऐकत आहेत. मी जॉब कर्ते मला त्यामुळे अरु चे कौतूक करावे लागत आहे मना विरुद्ध. जॉब अन्या प ण डाफरतो आशूचे नाव घरात घ्ययचे नाही. संजना अजू न अजून काड्या करत आहे. अन्याला भडकवायचे क्लेश टाकायचे मजबूत प्रय्त्न.
ह्या गोड जोडप्याला रिलीज फंक्षन ला बोलवायचे ठरते. आशू काढ्या मुळे एकदम बरा झाला आहे. पन पुढे कार मध्ये खोकतो एकाअ.
अरू उसासे टाकत मधुराचे आभार मानते. लगेच ही काही एक लेखी सुविचार टाकते. नफ ऑलरेडी. एक रात्री झोप व एक ड्रेस ह्या बोलीवर कया काय ऐकून घ्याय्चे माणसाने. काय फुटेज खाते आहे हे जोडपे व ती विचित्र दिसणा री मुले. मधुरा मुलांना उठवते. व ती बाय म्हणायला येतात.
आता कार मध्ये संवादः प्रेमा चा इजहार झालाच समजा. आशू एक एक धागा पुढे नेत आहे. फ्लर्ट ऑलमो स्ट. बाईला जोडिदार हवा असेल तर तिने शोधावा. ( मी पुढेच बसलो आहे) काय तो चश्मा काय ते कल्ले काय ते ध्यान. असे जनरल बोलणे चालू आहे. ह्याला पण त्यागमूर्ती बाईच्या इमेजचा वैताग आहे. लगेच मधुराचे उदाहरण देतो. देव त्यांचे भले करो. चिराबाजाराच्या क्रुस लेव्हल बाप्तिस्मा देत आहे. जवळीक साधायचा संवाद चालू आहे.
तू ड्र्स मध्ये छान दिसतेस म्हणतो. अरु लाजते. मग तिला घरची याद येते व पायातील साखळ्या घट्ट होतात. आशू मी घरी येउ का विचारतो. पण अरू नाही म्हणा ते.
अरु आशू कडे बघत आहे.
प्रोमो: आई आली असे इशा म्हणते. ड्रेस ब्घून आई वैतागते व अन्या खो चक प्रश्न करतो मेजर राडा अहेड.
आशुतोष मुलांच्या गाण्याच्या
आशुतोष मुलांच्या गाण्याच्या रिअलिटी शो मध्ये जज म्हणून आला होता , हे फक्त त्या वीकेण्ड होमवाल्यांनाच कळलं, बाकी कोणाच्या बोलण्यात तसा उल्लेखही नाही. त्या बाईने याला ओळखावं म्हणून काहीपण. पेपरात फोटो आला ते पुरेसं नाही का?
मुलांच्या स्पर्धेत जज म्हटल्यावर महेश काळे आठवला. तो नेमका ४६ वर्षांचा आहे. तो चालेल एक वेळ आशुतोष म्हणून.
प्राजक्ता तो विनोद वाया गेला
प्राजक्ता
तो विनोद वाया गेला
मी म्हणत होतो की ते "अलिबाग से आयेला है क्या" अर्थाने विचारत आहेत
फा, नाही गेला वाया तो विनोद,
फा, नाही गेला वाया तो विनोद, मला कळला होता पण आज वेळच मिळाला नाही इकडे यायला. महेश काळे आणि अमेरिका हेही आहेच पण तेवढेच. कुठे मका आणि कुठे आके. तो फोन चालू झाला, चला फटाके फोडूया हा विनोद होता का त्या विचित्र मुलाचा. अरु घराच्या दारापर्यंत गेली की कोणीतरी आर्त हाक मारणार की अरु लगेच यू टर्न. किती तो बोजड ड्रेस. त्यापेक्षा नाईट गाऊन मध्ये दाखवली असती तर चालले असते.
लगेच ही काही एक लेखी सुविचार
लगेच ही काही एक लेखी सुविचार टाकते. नफ ऑलरेडी. एक रात्री झोप व एक ड्रेस ह्या बोलीवर कया काय ऐकून घ्याय्चे माणसाने. >>>>>>>>> पण मधुरा काही चुकीच बोलली अस वाटत नाही. फक्त ते अरुला कळायला हव.
फ्लर्ट ऑलमो स्ट. तू ड्र्स मध्ये छान दिसतेस म्हणतो. >>>>>>>>> तेही ड्रायव्हरसमोर
But does one share internal
But does one share internal relationship status and thought process with strangers? These two characters were put in just to hammer the need for aaru to move on already. Ughda dole bagga neet. Type .
These two characters were put
These two characters were put in just to hammer the need for aaru to move on already.>>> अगदी. त्यातून मधुरा म्हणते माझ्या सासू-सासऱ्यांना ते आवडले नाही, मान्य नव्हते. तेव्हा माझ्या मुलांनी त्यांना समजावलं. त्यावेळी अशुतोषच्या चेहऱ्यावरचे भाव आपण हीला कसा ॲप्रोच करायचा? हा..आधी मुलांना पटवले तर बरे होईल असे दिसत होते.
भाग ५९२:
भाग ५९२:
आज सर्व खवट विचित्र भावनांचा आविश्कारच आहे. त्याची सुरुवात अन्या बाहेर बसून वाट बघत आहे. गाडी अरु ला सोडून जाते. ती उतरते व अन्या क डे एक नजर टाकून ती आत जाते.
सर्व जरा दचकतात चेंज्ड रूप बघून.
अन्या इज फुल टाइम चारित्र्यावर अॅटॅक मोड. तुझी रात्र कशी गेली. इत की छान कशी दिसतेस २५ वर्शात कधी अशी का दिसली नाही.
यश म्हण तो. रेकोर्डिन्ग कसे झाले छान्च झाले आहे.
अन्य फुल आरोप करत आहे. त्यांना एक्त्र झोपायचेच होते. बागडायचे होते नाहीतर सामान्य कुवतीच्या गायिकेला कोण एव्ढी लिफ्ट देते.
अन्या व आजी फुल अॅटॅ क मोड मध्ये आहे.
अन्या तिला एक्स प्लनेशन मागतो. खरे तर मी इथे नुसते ऐका यचे सोडू न भाग बघितला. व्हेरि गुड राय टिंग व अॅक्टिन्ग मुळातू नच बघा.
एकदम सुरेख झाला आहे. अप्रतिम संवाद. प्रोमो मह्ध्ये तेच कंटुनी आहे.
Pages