Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यशला फार खुमखूमी आहे.
यशला फार खुमखूमी आहे. टायरमध्ये घालून बदडला पाहिजे चांगला. >>>>>>>> अगदी अगदी
घटस्फोटाला इतकी वर्ष होऊनही गिरिश अनघाला का त्रास देतोय? तेच कळत नाही.
तिने पोलिसात तक्रार
तिने पोलिसात तक्रार केल्यामुळे त्याची नोकरी गेली. आईवडिलांनाही काहीतरी त्रास झाला- तुरुंगवास - नक्की आठवत नाही.
आज अॅक्चुअल लग्न घटिका
आज अॅक्चुअल लग्न घटिका खूपच टीपी चालू आहे. संजना जास्तच खंग्री ड्रेसिन्ग केले आहे. व गावठी दिसत आहे. लाल साडी पिन अप नाही फुग्याचा ब्लाउज कसलीतरी भिकार कॉस्टुम ज्वेलरी. व हेअर स्टाइल पण एकदम सेंड्रा फ्रॉम बँड्रा. एरवी अंगाबरोबर नीट साडी पिन अप केलेली व स्लीवलेस असते त्यामुळे बांधा उठून दुसतो. ते आज नाही . तरी अन्या छान दिसतेस म्हणतो म्हणजे थापा मारतो आहे बेकार. हा अवतार बघायला तरी एपिसोड बघाच. ह्यांचे अंतर्गत काही काही टोमणे मारणे कुचके बोलणे चालू आहे.
आशू व यश नेत्रपल्ल्वी चालू आहे. आता गिरीश यायचेच बाकी आहे. हा बहुतेक अॅटम बाँब व बिर्याणीचा हंडा घेउन आलेला आहे केटरर चा माणूस म्हणून ड्रेस बदलून आलेला आहे. त्यात मास्क . आपला खंग्री मॅन साबुदाण्याची खिचडी खाउन एक दम जोशात ड्बे बडवत आहे.
उशीर करु करु माळा गळ्यात पडल्या आहेत. करवली ने ओवा ळ णे व लगेच कन्यादान. गुरुजी पट्टी कन्यादान कसे छान आहे ते समजावुन सांगत आहेत. अन्घा व आई रडत रडत आहेत. व अभीला पर्पल पैठणी बॉर्डर चा फेटा दिला आहे. लग्नाची साडी पर्पल.
सर्वांचे मटकून झाल्याने भाग संपला व उद्या काही भांडण असावे.
हो आजचा एपिसोड नक्की बघणार.
हो आजचा एपिसोड नक्की बघणार. नेहमी हा धागा आवर्जून वाचते. अमा आणि भरत, सुलू, सगळेच मस्त लिहिता. तुमची टिप्पणी वाचायला मजा येते.
आशुतोषचं कॅरॅक्टर जराही
आशुतोषचं कॅरॅक्टर जराही इम्प्रेसिव्ह नाही. दिसण्यात आणि वागण्यातही. गोग्गोड, मुळूमुळू, स्वप्नाळू आहे. तो नितीन नसता तर हा बापाने कमवलेले पैसे फुकत राहिला असता.
यशने त्या गिरीशचे डिटेल्स त्याला पाठवले होते त्याचं त्याने यश रात्री धडकेपर्यंत काहीच केलं नव्हतं. वर गिरीश कोण हे विसरला. आणि मग फोन केला कोणाला तर नितीनला.
अनघा छान दिसतेय. पण
अनघा छान दिसतेय. पण राणूआक्काची झलक दिसते. अभि अजिबात नवरदेव वगैरे वाटत नाही. त्यापेक्षा अन्याला मुंडावळ्या बांधल्या तर तो शोभून दिसेल. मला वाटलं होतं अरूचे आई आणि भाऊ निदान हळदीपासून तरी दाखवतील. पण डायरेक्ट मांडवातच. जवळच्या लोकांना बोलवायची पद्धत नाही बहूतेक यांच्यात. संजनाचा लूक टोटल गंडलेला आहे. विशाखा आणि आजी मस्त दिसतात. बाकी सगळे लोक नॉर्मल वेषात छान दिसतात यापेक्षा.
गिरीषची पोलिसात तक्रार केली असेल, तर पोलिस काही action घेत नाहीत का? एवढं किडनॅप वगैरे केलं तरी पोलिस प्रोटेक्शन देत नाहीत? आणि आशु एवढा मोठा बिझनेसमन, त्याच्याकडे सिक्युरिटी गार्ड्स नाहीत? ते तरी उसने द्यायचे देशमुखांना. यश स्वत:ला जेम्स बॉंड समजायला लागलाय.
अनघा ची आई तिला अंघा म्हणते!
अनघा ची आई तिला अंघा म्हणते! अगदीच गावंढळ! वडिलही उसनी अॅक्टींग करतात .... डोळे मोठे करुन आणि हातवारे करुन!
बास आता ते दोघे!
झाले का एकदाचे अभी - अंघा चे लग्न?
भरत म्हणतात तसं..... आशुतोषचं कॅरॅक्टर जराही इम्प्रेसिव्ह नाही. दिसण्यात आणि वागण्यातही. गोग्गोड, मुळूमुळू, स्वप्नाळू आहे. तो नितीन नसता तर हा बापाने कमवलेले पैसे फुकत राहिला असता......... जराही बिझीनेसमन वाटत नाही. त्यापेक्षा 'बडे अच्छे लगते है " मधला राम कपूर काय सॉलीड दिसायचा!..किंवा अनुपमा मधला अनुज ही....हँडसम आहे किती! हा अगदीच गरीबी हटाओ कार्यक्रम!
त्याची आई तर गोग्गोड पणाची परीसीमा!
हो आशुतोष अगदीच चम्या दिसतो
हो आशुतोष अगदीच चम्या दिसतो आणि वागतो. गिरीश बद्दल मलाही प्रश्न पडलाय. इतक्या वेळा पोलिसात तक्रार करूनही काहीच सकारात्मक होत नाही. मग गिरीश फारच पोचलेला असेल. तसं असतं तर अनघाला धमकी द्यायला स्वतः धडपडला नसता प्रत्येक वेळी, माणसं पाठवली असती. पोलिसांची बदनामी करतात हे लोक.
संजना जर नीट ड्रेस करत नसेल तर बघायचं काय? अरु उठून दिसावी म्हणून केलं असेल असं. आशुतोषला काय फरक पडत नाय. अरुने सुती साडी नेसली तरी त्याला तिच्च आवडणार. आशुआई रात्री पण कोटन ड्रेस इस्त्री केलेले घालून झोपते आणि झोपेतून उठून आली तरी एक सुरकुती नाही ड्रेसवर. आशुतोष बावळट रात्री व्हिडीओ बघत लाजत होता. अगदीच ओल्ड स्कूल आहे.
संजनाचा खरंच अवतार केलाय आज.
संजनाचा खरंच अवतार केलाय आज. बाकीच्या सगळ्या
नीट चापूनचोपून असताना हिलाच वेगळं दिसायला असं ढगळ दाखवलं.
मुलीच्या मामान्ना बोलवा- "
मुलीच्या मामान्ना बोलवा- " मुलीचे मामा गेले कधीच वरती, अविनाशकाका चालतील का? (इति शुभ्रा).
अनघा ची आई तिला अंघा म्हणते! अगदीच गावंढळ! >>>>>>> चालतय की!
आशुतोशच्या फोनची साउण्ड सिस्टिम खरच बेक्कार आहे. तो फोन आणि चष्मा बदलावा.
चष्मा रोजच बदलतात. आशुतोषच
चष्मा रोजच बदलतात. आशुतोषच बदला. अंतर्बाह्य.
लग्न पुढे चालू:
लग्न पुढे चालू:
कन्यादाना मुळे अरु ढसा ढसा रडत आहे व सोबत इशा व गौरी पण रडत आहेत. बाळा तुझंसासरी छान होईल. भयानक अश्रुपात. इशा ला अगं वेडाबाई म्हणून रडारड चालू आहे. आशू हे बघून खळ्या पाळ त पारो सा दिसत आहे व हसत आहे. निदान ह्याचे ज्ञानी एन आर आय छाप विधान व म्हातारीचा गूळ किसलेला नाही. एका शॉ ट वरच भागवले आहे.
आता गुरुजी कंक ण बंधन करत आहेत. नव्या जोड प्याभोवती सर्वांनी धागे दोरे गुंडाळले आहेत. आता तरी अभी पळून जाउ नये म्हणून.
अरु मोठ्या मनाने संजनाला मंगळ सूत्र आणून द्यायला सांगते व गुरुजींना तिच्या हस्ते देववते. आता तो विधी आहे. संजना एकदम गावाकडची हौशी धाक टी बहीण असावी तशी दिसत आहे. जास्त मेकप ड्रेसिन्ग. सिनेमे बघून केलेली तयारी. लैच विनोदी.
हे गिरीश ची वाट बघत आहेत यश आशू व केदार बाहेर भंकस करत आहेत
आता भिकार मुझिक वर विवाह होम चालू आहे. अनघाची पर्पल साडी व वर व्हेलवेट चा शेला आहे. लाल काठ शिवलेला. गौरीने डिझाइन्ड दिसतो आहे. तो शेला होमात पडेल कि काय असे वाटत आहे.
किंवा एक शेला लाल आहे व तो सोडलेला पदर आहे बहुतेक. अवीने आता ठरलेला जोक मारला व अरु भाव जी काय हो हे. करून लाजत मुरकली. ६०-७० वर्शा पूर्वीचे प्रसंग
आजी हेमा नाव ठेवा म्हणते. पण तो अनघाच ठेवतो. व नाव आ ड नाव तिचे तिने ठेवावे किंवा बदलावे. असे म्हण तो. सर्व खूष होउन अन्या
म्हणतो माय सन( एक चुकार स्पर्म!!) आशूची म्हातारी एकदम गुळ किसून एक फटका मारते.
आता लग्न संपले व जेवाय ची तयारी सुरू होते आहे. गिरीश प्राणी घरात आलेला आहे.व मास्क बँडेज लावुन अरू कडे बघत आहे.
सुलेखा ताई व विद्याताई गो ड गिट्ट प्रेमळ संवाद चालू आहे. त्यातही अरुंधती function at() { [native code] }इशय गुणी गुणी कीर्तन चालू आहे. गाणयचे कौतूक चालू आहे. आई पण न समजता कुठे ही काही ही बोलुन अरुची काळजी वाटते ह्याव अन त्याव. पंचेचाळीशीच्या मुलीची काळजी करते आई. हौ क्युट.
गिरीश मास्क आडून अरु कडे बघत आहे.
प्रोमो मह्द्ये आशू अरू मैत्री चापटर आहे बहुतेक. भरल्या पानावरुन ऊठ्णे अन्याचे चिडणे हे ते कदाचित उद्या पेशल भाग असावे.
सन्जना एरवी एवढि टकाटक असते
सन्जना एरवी एवढि टकाटक असते की हिन्दी सिरियलच्या सेट वरुन चुकुन इकडे आल्यासारखी वाटते,लग्नात मात्र एकदम खड़़की -दापोडी लुक अरेरे!! अन्घा,अरुला छान छान दाखवण्यासाठि असेल, गौरी मात्र कितिही मेकओव्हर केला तरी रडकीच दिसते.
गौरी व इशा ह्यांचे कामच
गौरी व इशा ह्यांचे कामच तोंडे वेडी वाकडी करणे हसणे रडणे व चिरकणे अश्या तीन मुद्रा करणे हे आहे.
आजचा अनुपमाचा भाग फार छान आहे. जरूर बघा. भाग ४६९ जाने वारी आठ. मी काही रोज बघत नाही पण आज ट्विटर वर ट्रेंडिन्ग आल्याने बघत आहे. अनुज ची बहि ण मालविका हिला ३१ डिसेंबरच्या रात्री मेजर डिप्रेशन व डिलुजन चा अॅटेक आला आहे. व अनुपमा अनुज तिला सांभाळत आहे.
तेव्हा अनूज तिची कथा सांगतो. तिला नवरा फार मारत अस्तो. बहिणीचे प्रेम संबंध असता त ते तोडून तो एका सो कॉल्ड चांगल्या घरात तिचे लग्न करतो पण तिथे नवरा फार मारतो. ती डिप्रेशनच्या गोळ्या घेत असते. व अनुज स्वतः ला गिल्टी समजत आहे.
गुड अॅक्टिन्ग. ही बहीण खूपच लाडात सेन्सिटिव्हिटी मध्ये वाढवलेली आहे.व आपल्यामुळे तिला हे सर्व सहन करावे लागले म्हणून तो ही रडतो.
इकडे त्यांची संजना व फॅमिली तिघांची वाट बघत आहे पण इथे क्रायसिस सुरू आहे. ती लगेच आता कशाला अनुपमा येइल मालविका बरोब्र ते कुठे तरी क्लब मध्ये गेले असतील वगैरे फाटे फोडते. पण सासरे तिला गप्प बसव तात.
गुजराती समाजात बायकांवर सुनांवर function at() { [native code] } टॉर्चर व अब्युज चे प्रमाण फार आहे त्या डोमेस्टिक व्हायलन्स वर बोट ठेवले आहे. हा भाग ट्रेंडिन्ग होणे म्हण्जे फार वाइट वाटले.
३ म्हणजे गेल्या सोमवारी
३ म्हणजे गेल्या सोमवारी संध्या़काळी दाखवलेला मेंदीवालाच एपिसोड परत दाखवताहेत.
काल एक तास दाखवणार होते ते
काल एक तास दाखवणार होते ते शिळेच भाग होते का. आज गिरीश लग्न लागून झाल्यावर अरुला मारायला आला. मग लहान मुलांसारखा हट्टीपणा करत बसला होता. त्याच्याबरोबर यशलाही पोलिसांनी घेऊन जायला हवे होते. आशुतोषचं मध्येच नाटक माफी माग. बावळट आहे आशुतोष. संजनाला बघून हसू येते. अगदीच गावंढळ दिसतेय ती.
तो अनुपमा वाला अनुज काय सही
तो अनुपमा वाला अनुज काय सही आहे यार, नुसतं दिसणं नाही, ॲक्टींगपण. हा आशु फारच मेंगळट वाटतो,, not a single reason , कि अरूने त्याच्या प्रेमात पडावं,, आता ती पण डोक्यावरच पडलीये म्हणा, त्यामुळे पडेलच कधी ना कधी.
त्याच्याबरोबर यशलाही पोलिसांनी घेऊन जायला हवे होते.>>> हाहाहा, घरचा गुंड . आन्या कधीचा घरी बसलाय तेपण बायकोसकट तरी सारखा का माज करतो? हा कोणे ठरवणारा अरूने आशु ची मैत्री करायची का नाही ते?
अरूबाईंनी अन्याचे आताचे डायलॉग त्यावेळी संजनावर वापरले असते तर... काय करु शकले असते ते ? पण मग शिरेलीत पाणी कसे घातले असते..
आज अन्या ओरडा अप मान नाट्य.
आज अन्या ओरडा अप मान नाट्य.
तरी आशू झंटल म्यान सारखा सर्वांना विश करून निघायचे बघतो. अन्या जाताना पण त्याला खेटरतो. तुमचे अरुचे रिलेशान प्रोफेशनल ठेवा पर्सनल करू नका. घरात घुसून घरचे होउ नका. ही इज बीइन्ग सो रूड. एक प्रचंड बोअरिन्ग सीक्वे मध्ये अरू परत परत आशू माझा मित्र आहे बिझनेस पार्टनर आहे ह्याव अन त्याव परत सांगते.
अरूने स्वतः मैत्री अधोरेखित केल्याने आशू खू श आहे. केस हटत चालले आहेत वाट बघता बघता. ती त्यांना थांबायला विनंती करते पण आजी गूळ किसून ( एच डी एफ सी एटीएम संगीत) चला आता सोट्यांनो म्हणते व ते जातात.
पूर्ण संवादात एक माणूस आता कधी वाढायला घ्यायचे भाताच्या गार गोट्या झाल्या नं भाव घेउन वाट बघत उभा आहे तो बघा.
संजना चा एक फ्रंट व एक बॅक शॉट आहे. त्यात तिचे केस मागून पण बघा. कुरळे करून वर एक मोठी पिन लावली आहे शोभेची. मध्यमवयीत्न मराठी स्त्रिया अश्या ड्रेस अप करतात का लग्नात.
हे लटांबर गेलयवर अरू लगेच अश्रू पुसून पाने घ्यायला लगबग चालू करते. एक एक पात्र आर्गुमेंट करायला लग्नाच्या वेदीच्या उंच प्लाट फॉर्म वर येते ते लैच विनोदी दिसते. अन्या तिथेच उभा राहून भा श ण देतो. यश उर्मट पणे तिथेच आहे. अरू चढते दोन पायर्या व बोलते. मग अप्पा पण चढून हात जोडून जेउन जा म्हणतात.
बाकी सर्व पब्लिक नटुन थटून फक्त दहा पैस्याचे एक्स्प्रेशन देते ते ही भारी.
पुढील भागात अनघा बिदाई रडारड आहे. आता ते कपडे सर्वां नी बदलले नाहेत तर मीच ढसा ढसा रडेन. व्याख्ह्या विखिई वुखु
फॉर द चेन्ज वर आणी वधु
फॉर द चेन्ज वर आणी वधु पक्षाच्या भुमिका बदललेल्या दिसल्या ही एकच जमेची बाजु बा़की सर्वकलागुण सपन्न अरु आहेच म्हणा.
आशुतोषचा माफी माग बावळटपणा
आशुतोषचा माफी माग बावळटपणा कहर होता.
संजना मॅडम कोरोना पॉझिटिव्ह
संजना मॅडम कोरोना पॉझिटिव्ह आल्यात म्हणे
आजचा अविनाश आणि यशचा संवाद
आजचा अविनाश आणि यशचा संवाद खूप छान होता.
यशला पडलेले प्रश्न गौरीला
यशला पडलेले प्रश्न गौरीला सुद्धा पडत असतील. तिला काय समजावून सांगणार काकासाहेब ?
भाग ५६५: शुभ प्रभात हॅपी
भाग ५६५: शुभ प्रभात हॅपी संक्रांति. आज नवी सून किचन मध्ये आलेली आहे. मँगो कलर साडी मुहुर्त मणी वगैरे जय्यत. विमल भांडी घासत आहे.
अनघा घरात एकदम कामास लागली आहे. व तिच्यात आणि विमल मध्ये पहले आप पहले आप चालू आहे भांडी घासा यच्या कामा बद्दल. अन्गहा चहा करत आहे. व विमल अरु क्शी ग्रेट तिचे काम ग्रेट अशी एक कॅपसूल दोन मिनिटे. मग अनघा पन तेच कवतीक व देवावर विश्वास ब्ला ब्ला चालू आहे मग विमल ला रडू येते वहिनीच्या नशीबाबद्दल मग अनघा व ती चहा घेतात.
function at() { [native code] } आता अप्पा व अवि ह्यांचा लांब संवाद आहे जो अजूनही चालू आहे. वटवट म्हातारी नाही आहे त्यामुळे शांततेत चालू आहे. अनघा चहा घेउन येते. तिला दोघे तू का चहा आणलास कौतूक चालू आहे. हिला नये फकीर को भीक की जलदी न्यायानुसार कामा ची व पॉजिटिव्हिटीची फारच हौस ( खाज) दिसते. सारखी इथे तिथे फुटत आहे. व ही महिला स्वातंत्र्याचे दोन वळसे देते आहे. भाषण चालू. ही काम करणारी अरू आहे पन ज्युनिएअर वटव ट मावशी आहे. प्रत्येक घटनेचे विचाराचे पदर सोडवून दाखवायचा अट्टहास.
function at() { [native code] } आजेसासर्याचे कौतूक चालू आहे. अप्पा हंबल ब्रॅगिन्ग मुलीचा बाप दुसृयाच्या मुलीला जपले पाहिजे.
अन्याचे लफडे का घरी घेतले मग.
अनघा उत्साही लांड रु फुटत आहे. आता ही इशाच्या खोलीत नॉक करोन येते व तिला कॉफी आनुन देते. ( आता अन्यासंजनाला पन दुकानातून आवश्यक सामान आणून देइल की कॉय?! जरा गप बस फुटाणे) आई व आजी पुजेची चौ कशी करायला देवळात गेलय आहेत. तरी दर दोन दिवसांनी पूजा घालत असतात सामानाची यादी हवी आहे म्हणे.
आता इशा तिला न्युली मॅरीड लाइफ कसे वाट्ते असा लीडिन्ग प्रश्न विचारत आहे. मग अनघा मी किती समजुतदार मी किती मिळून मिसळून राहणार्अॅअॅ हे संत्रे सोलुन देते. वा वा. अंकिताचा काही काँटॅक्ट झाला का असे अनघा विचारते.( इशाने विशय काढला) अंकिता सारखी काँपिटिशन करत असे. अभीने व सर्वांनी तिचे कौतूक केले पाहिजे अशी तिची अपेक्षा होती असे इशा म्हणते. आता अनघाला लोण्याचा गोळा मिळाल्याने तिला अंकिताबद्दल पण सहानु भूति वाटत आहे. आता ही साहिलचे इशाचे लग्न जमवायच्या कामाला लागली आहे. तो लग्नाला का नाही आला वगिअरे चौकशी करत आहे. व लगेच त्याचे आहे इ का तुझ्यावर प्रेम असा अवगह्ड वैयक्तिक प्रशन इशाला विचारते. व त्याला भेटायला पण बोलव्ते. पहिल्या दिवशी इतके कामअ!!
देवा! अमा मस्तमस्त
देवा!
मस्तमस्त
अमा
शरद भाई आपके लिये आजसे रोज
शरद भाई आपके लिये आजसे रोज लिखेगा आपुन. सस्मित धन्यवाद. तिळगूळ घ्या गोड बोला.
गोडगोड
गोडगोड
अमा भारी लिहिता
अमा भारी लिहिता
अमा...:खोखो:
अमा...:खोखो:
अभि काय लोण्याचा गोळा?
काही....
अमा काय भारी लिहिता.
अमा काय भारी लिहिता.
Pages