ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

swiggy genie हव्या त्या वस्तु शहरातील दुकानातुन घरपोच देतात. त्यांना यादी द्यायची काही दुकाने थेट ऎपवर आहेत . एखादे दुकान नसेल तरी आपण पत्ता सांगीतला तर जातात

मागच्या आठवड्यात grofers वरून भाज्या किराणा इ. मागवले. अक्षरशः 10 मिनीटात दारात हजर. भाज्या ओके होत्या.. किराणा नेहमीच्या brands चा मिळाला. वाण्यापेक्षा स्वस्त आणि डी मार्ट पेक्षा महाग.
बाहेरच्या देशातील कार्ड बद्दल काही कल्पना नाही.

मागच्या पानावर भरत यांनी साईट्स दिल्याचं आहेत. ग्रोफर्स वापरली नाही.पण big basket ani फ्लिपकार्ट मस्त आहेत.
भाज्यांसाठी / फळांसाठी big basket,suprdaily changale आहेत.फ्लिपकार्टने अलीकडेच भाज्या चालू केल्या आहेत.
जियो mart पण चांगले आहे.

माझी बायको सासु-सासर्‍यांसाठी बिग बास्केट वरुन ऑर्डर करते. उत्तम सर्विस मिळालेली आहे आजवर. ती भारतीय बँकेत असलेले अकाउंट वापरते (नेट बँकिंग). तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरायचे असेल तर विसा वा मास्टर कार्ड चालेल, मला तरी काही प्रोब्लेम दिसत नाही.

आता माझे सासु सासरे स्वतःही बिग बास्केट अ‍ॅप वापरुन खरेदी करतात. त्यांना फक्त पेमेंट करण्यास थोडी भिती वाटते. त्यामुळे ते कार्ट हव्या त्या वस्तुंनी भरतात, पेमेंट इथून बायको करते.

चीऊ उत्तम प्रश्ण .. माझे आई वडिल बिग बास्केट वरून मागवत होते लॉक डाऊन च्या काळात.
फक्त पेमेंट करण्यास थोडी भिती वाटते>>>> +१ हो जवळपास सर्व जे.ना ना हिच भिति असते..अचानक उठुन बँक मधिल सर्व रक्कम गायब होईल क्रे. का वापरले तर असे वाटते त्यांना Happy

मी आईपप्पा करिता झोमॅटॉ वापरते. उत्तम आहे अनुभव. ईथुन ऑर्डर करता येते. लोकेशन डिसेबल़ करायचे ऑर्डर करण्यापुर्वी. गु़गल पे/
ICICI NRI अकाउंट जोडले आहे.
बाकी वस्तुकरीता Amazon is best. ईथले कार्ड वापरता येते.

इन्स्टामार्ट पण चांगलं आहे. लहानसहान वस्तू येतात तासाभरात.
( स्वगत - आजकालची कार्टी हालत नाहीत जागेवरून कोप-यावरून काही आणायचं तर. बरं हालतात तेव्हा कोप-यावर जायलाही दुचाकी लागते त्यांना. त्यांच्या मागे लागण्यापेक्षा हे बरं. पंधरावीसात काम होतं. ती उलट उत्तरंही नकोत आणि ते तमाशेही नकोत लहान सहान कामांवरून)

आज zepto वरून भाज्या, मागवल्या.अक्षरशः 15 मिनिटात मिळाल्या. ॲप चांगले वाटतेय.सुपरडेलीसारखेच तरी रिझनेबल आहे.भाज्याही फ्रेश होत्या.नारळ मस्त मोठे आणि स्वस्त आहेत.
याच धाग्यावर हे नाव कळले.

मिशो उत्तम आहे
आत्तापर्यंत 4 item मागवले
उत्तम सेवा अनुभव
फक्त एक पथ्य पाळायचं(अर्थात प्रत्येक ऑनलाइन खरेदी करताना पळावे हेमावैम) की आधीचे review फोटो पाहूनच मागवायचे म्हणजे व्यवस्थित अंदाज येतो, कपड्याचा पोत, डिझाइन वगैरे

बिग बास्केट वरून फळांची ऑर्डर केली. पेमेंट वगैरे पण झाले. पण दुसर्‍या दिवशी त्यांनी पैसे परत दिले आणि ऑर्डर कॅन्सल केली. बहुदा कोल्हापुरला फ्रेश प्रोड्युसची डिलिव्हरी होत नाही. पण इमेल मध्ये कारण काहीच नाही दिले. तसे ऑर्डर देतानांच लोकेशन अव्हाईलेबल नाही असा क्रायटेरीया ठेवला तर बरं होईल. पण अ‍ॅप मस्तच आहे. टाटाच असल्याने विश्वास पण वाटतो.
आता स्नॅक्स वगैरे ऑर्डर करून पाहीन त्याची तरी डिलिव्हरी अव्हाईलेबल आहे का ते.
या धाग्यामुळेच बिग बास्केट अ‍ॅप कळाले. धन्यवाद.

भाज्यांच्या बाबत बिग बास्केटवर हा प्रकार अनेकदा होतो, मुंबईतही.
ग्रोसरी, पॅक्ड फूड आयटम्स, क्लीनिंग मटेरियल इ. बाबत असा प्रॉब्लेम आला नाही.

बिग बास्केट वर फळे भाज्या चांगल्या असतात कधी कधी सप्लाय चेन मध्ये प्रोब्लेम असले तर माल मिळ त नाही त्यांना. मग ते पैसे परत करतात. किंवा साइट/ अ‍ॅप वर आउट ऑफ स्टॉ क लिहितात.

ब्रोकोली, ऑरगॅनिक पालक काही फळे असे पदार्थ मिळत नाहीत. कधी कधी. मध्यंतरी इथे पाउस वादळ झाले होते सप्लायर ची शेते असतात तिथे
तेव्हा सप्लाय झाला नव्हतात.

जग भर सप्लाय चेन डिसरप्क्षन्स आहेत.

पुण्यात सुपरडेली, निसर्ग ऊर्जा आणि आता स्विगी इंस्टामार्ट वर चांगल्या भाज्या असतात.सुपरडेली वाले जरा गंमती करतात, म्हणजे भरपूर सालं वाला आत अगदी लहान गड्डा असलेला फ्लॉवर देणे वगैरे.पण सकाळी आपण उठायच्या आत भाज्या पिशवीत असतात ही सर्वात मोठी गोष्ट.बेसिक पेस्ट, ब्रश, साबण, क्लिनिंग सप्लाईज पण मिळतात.सकाळी 5.15 ला गुलाबी थंडीत आपण पांघरुणात गुरफटलेले असतो तेव्हा सुपरडेली ची मुलं वस्तू मांडून फोटो काढून, मग दाराचा फोटो काढून डिलिव्हरीज करत असतात.
निसर्ग ऊर्जा पण भाज्या ताज्या असतात.ब्रेडस वेगवेगळे चांगले असतात.

इन्स्टामार्टवर एक 'डीप रूटेड' म्हणून ब्रँड आहे त्यांच्या भाज्या खूप छान असतात. पण बहुतेक फक्त बंगलोर आणि हैदराबादला आहे तो. हायपोपोनिक (म्हणजे मातीशिवाय ना?) पद्धतीने वाढवलेल्या पालेभाज्या असल्यामुळे एकदम स्वच्छ. कांद्याची पातही स्वच्छ. मेथी, गवती चहा हेही मस्त ताजे होते. मेथी तर खूपच चविष्ट होती. पण, यामुळे प्रभावित होऊन आम्ही डीप रूटेड ही ॲप घेतली आणि त्यावरून दोन वेळा मागवली भाजी आणि फळं, तर ती चांगली नव्हती. (रिफंड मिळाला) परत एकदा इन्स्टामार्टवरून मागवून बघायला पाहिजे.

बिग बास्केट चा अनुभव मुंबई व नवी मुंबईत चांगला आहे, lockdown पूर्वीपासून वापरत असे.organic, Exotic fruits veg असतात.
आउट ऑफ स्टॉक हे भाज्या फळं ई बाबतीत होत असे पण लगोलग रिफंड करतात, स्टॉक आल्यावर ई-मेल नोटिफिकेशन येतं (तोवर मी विसरून गेलेले असते) , तसेच खराब मालाचा फोटो काढून पाठवल्यावर रिफंड ही मिळालाय. डिस्काउंट पण असे (₹१००० वर ₹७५)
सुपर डेली मुंबईत वापरलंय चांगलं आहे, पहाटे पहाटे कधी येतात समजत पण नाही.

फ्राझो १०-११ महिन्यांपासून कधी कधी वापरतेय. भाज्या मस्त असतात.एकदाच लंगडा आंबे घेतले होते. पण दबलेले निघाले,त्यांना कळवल्यावर लगेचच रिप्लेस केलेही.सिमला मिरची मात्र कधीही ऑनलाईन घेऊ नये. एकदम मोठी देतात.

निवडलेल्या भाज्या मिळतात का?>>>> भाजी निवडून नाही मिळत,पण देठ कापून स्वच्छ भाज्या मिळतात.चिरलेल्या भाज्या मिळतात.खवलेला नारळ मिळतो.

सुपर डेली मी पण वापरते. दूध आमच्या कडे खपत नाही. त्यामुळे दहा दिवसातून एकदा अर्धा लिट र टाइप लागते. प्लस इमर्जन्सीत डॉग फूड

ट्रिटोज. ह्यात सबस्र्काइब करायची पण सोय आहे. रतीब लावायचा असेल तर लाव्ता येतो.

नॉन व्हेज साठी मीटिगो व लिशिअस छान आहेत.

बिग बास्केट वर पण बासा फिश, प्रॉन , मटन व चिकन खिमा झोरा बिअन चिकन छान मिळते.
मॅरिनेटेड चिक न पण मिळते. घरी ग्रिल करायचे.

कापलेल्या भाजी पैकी मी गाजर बीन्स मागवते, सोललेले लसूण, कधी मधी फोडलेला नार ळ तुकडे.

कापलेला भोप ळा सोललेले डाळिंब कापलेले सुरण मिळ ते. एका डब्यात दोन वेळा भाजी होउ शकेल.

मीटिगो व लिशिअस वर फ्रोझन मोमो मिळ तात ते छान असतात. एका पाकिटात चोवीस. दोन लोकांचे एकवेळी जेवण होते. प्लस सूप करायचे

हर प्रकारची नॉन व्हेज स्प्रेअड मिळतात. ह्याचे सेंडविच बनवता येते.

बिग बास्केट विषयी अपडेट.
पहिल्यांदा ऑर्डर कॅन्सल झालेली. (कारण आमचे घर गुगल मॅप वर येत नाही. त्यामुळ डिलिव्हरी पर्सनने फोन केला पण तो मिस झाला. कस्टमर केअरला फोन केला आणि आणखी एक आईचा फोन अ‍ॅड केला. ) पण आता व्यवस्थित ऑर्डर मिळते.
आता मी उठसुठ ऑर्डर करीत आहे. Lol उत्तम आहे अ‍ॅप. क्वालीटीही मस्त आहे एकदम.
छोट्या गावात रहाणार्‍या लोकांकरीता मस्त सेवा .
भरत तुमचे खुप धन्यवाद हे अ‍ॅप सांगितल्याबद्दल.

छान झालं.
स्विगीने डिमार्ट सोबत टाय अप केलं आहे. स्विगी अ‍ॅप वरून जवळच्या डिमार्टमधलं सामान अर्ध्या तासात मागवता येतं.

(आमच्या भागातला किराणावाला रडतोय - दुकानात कोणी येत नाही म्हणून)

आता मी उठसुठ ऑर्डर करीत आहे. Lol उत्तम आहे अ‍ॅप. क्वालीटीही मस्त आहे एकदम.>>+१

रात्री १० वाजेपर्यन्त अ‍ॅपवर ऑर्डर केले की सकाळी ६ वाजता दारात माल येतो. एका क्लिक मध्ये ऑर्डर जाते.

भाज्या ताज्या असतात आणि चांगल्या पॅकेज मध्ये असतात. पालेभाज्या छान धुतलेल्या ताज्या असतात. किंमत पण वाण्यापेक्षा कमी आहेत. भाज्याचे दर मार्केट्च्या दरानुसार कमी जास्त होतात. सध्या पालेभाज्या १५-२० रुपये, केळी २०रु किलो , गाजर ,टोमॅटो ३५रु किलो, कांदा , आले, बटाटा वगैरे डि-मार्ट / टाटा स्टार च्या दरात.

टाटानी बिग बास्केट विकत घेतल्या पासुन सर्विस खुप चांगली झाली आहे.
रोज रात्री झोपताना काय पाहिजे ते ऑर्डर करायची सवयच लागली आहे

हो bbdaily अगदी उत्तम आणि सोयीचं आहे. फक्त रात्री दहाच्या आत आठवणीने ऑर्डर करायची, सकाळी सामान हजर. जे आलेले नसेल तर ते सांगितले की लगेच रिफंड करतात‌.

पहिल्या लॉकडाऊन मध्ये हॉटेल्स बंद झाली तेव्हा स्विगीने हव्या त्या दुकानांमधून (एकाच ऑर्डर मध्ये एका पेक्षा जास्त दुकानातून) किराणा समान आणि भाज्या दोन तासात डिलिव्हर करणे सुरू केले होते.
काही दिवस त्या सेवेचा चांगला उपयोग झाला, कारण तेव्हा बिगबास्केट मध्ये स्लॉट मिळणेच कठीण झाले होते, नाकारत होते.
पण मग केसेस वाढल्यावर स्वीगीची ही सर्व्हीसही बंद करण्यात आली.
मग नंतर त्यांनी तशी सर्व्हीस परत सुरू केली नाही.

स्विगी इन्स्टामार्ट छान आहे - खूप गडबडीत सामान आणून घ्यायला, पण बिगबास्केट डेलीचा वापर माझा जास्त होतो. दिवसभरात शांतपणे जसं आठवेल तसं कार्टमध्ये टाकत राहाते. रात्री नऊच्या सुमारास ऑर्डर द्यायची. ब्रेड, दूध, दही, अंडी, कधीकधी भाज्या हे असतंच पण इडलीचं ओलं पीठ पण मिळतं (इतकी वर्षे आमच्याकडे सहजी मिळत नसे). त्यामुळे फार सोयीचे झालेय.
बिगबास्केटच्या कस्टमर सर्विसचा कायमच उत्तम अनुभव आहे, टाटांनी घ्यायच्या आधीपासूनच.
माझा एरवीही महिन्याचा किराणा बिगबास्केटवरून येतो. बरेचदा चांगले डील्स मिळून जातात. एकतर मालाची, वजनाची खात्री. एका रपाट्यात महिन्याचं किराणा आणि इतर सर्व सामान भरलं जातं. त्यामुळे जवळपास गेली आठेक वर्षे मी बिगबास्केटची निष्ठावंत ग्राहक आहे.
पण चिकन आणि मासे मात्र बिगबास्केटवरचे आवडले नाहीत कधीच. कधी कधी लिशस किंवा सहसा इथे टोटल म्हणून ब्रँड आहे स्थानिक त्यांच्या कडचं चिकन आणवतो - स्विगी किंवा मग थेट त्यांना फोन करून. मासे आणि भाजी स्थानिक बाजारात उत्तम आणि घरपोच मिळत असल्याने ऑनलाईनच्या फंदात पडत नाही.

इडलीच पीठ पण मिळत ? माहितच नव्हत मला. असो . आता ऑर्डर करत नाही. ( अलरेडी आई-पप्पा माझ्या डिलिव्हरीजना घाबरलेत. रेमंडच्या फ्रुट बास्केट्चा एपिसोड झालाय लास्ट वीक मध्ये. ) पीठ वगैरे तयार आणुन दिल तर मला इस्टेटीमधून बेदखल करतील. Lol
इथली देसी ग्रोसरी दुकान बोरिंग आहेत असं ते अ‍ॅप बघितल्यापासून वाटायला लागलय. आणि डी मार्टला भेट दिल्यापासून. So I am hooked.

Pages