ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एकदाच औषध ऑनलाइन मागवले होते. जवळपासच्या केमिस्टकडे उपलब्ध नव्हते , प्रिस्क्रिप्शन अपलोड करावे लागते.
आधी नेटमेड्सवर मागणी नोंदवली. पण एक दिवस झाले तरी काही हालचाल दिसेना, तेव्हा 1mg वरू मागणी नोंदवली . त्यांच्या डॉक्टरचा लगेच फोन आला आणि बारा तासांत म्हणजे रात्री दहा वाजता औषध हातात पडलं.
पण मला नेहमी हवी असलेली काही औषधे ठेवायला ऑनला इन फार्मसींना परवानगी नाही, त्यामुळे पुन्हा मागवली नाहीत.
हल्लीच pharmeasy वरून फूड आणि हेल्थ सप्लिमेंट्स मागवलीत. पहिल्या ऑर्डरनंतर त्यांचा फोन आला - या ऐवजी ते घ्या. स्वस्त आहे, डिस्काउंट आहे. इ. लोकल केमिस्टपेक्षा डिस्काउंट जास्त होता.
दुसर्‍या वेळी मात्र ऑर्डर केलेल्यातली दोन प्रॉडक्ट्स मिळाली नाहीत.
भांडुपच्या केमिस्टकडून बोरिवलीत डिलिव्हरी होते, त्यामुळे त्यांच्याकडून मागवायला जिवावर येतं.

होय, मेडप्लस व नेटमेड्सहून मागवली आहेत. औषधांच्या उपलब्धतेवर डिलीवरी वेळ अवलंबून असतो. मेडप्लसचे दुकान घराजवळच असल्याने लगेच आले होते, नेटप्लसहून सात दिवस लागले होते. भारत ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही काही औषधांसाठी प्रीस्क्रिब्शनही अपलोड करावे लागते, त्यांनंतर तिकडच्या डॉक्टरांचा फोन आला होता.

ऑनलाइन घरपोच औषधांसाठी मी कळवा जनरीकार्ट कडून ऑर्डर करते, तिथे जनरीक औषधे मिळतात आणि भारतभर फ्रि होम डिलिव्हरी आहे.
ओनर माझी मैत्रीण आहे त्यामुळे reliable आहे
कोणाला हवा असेल तर नंबर देऊ शकते

pharmeasy >+१

१०-१५ वेळा औषधे मागवली. सकाळी ऑर्ड्रर केले तर रात्री नाहीतर १ दिवसात येतात. डिस्काऊंट पण १८ ते ३०% मिळते. काही वेळा मुंबईत तर बाकीच्या वेळी पुणे मागवली पण दोन्हीकडे भांडुपच्या केमिस्टकडून औषधे आली. प्रिस्क्रिप्शन नसेल तर डॉक्टर कन्सलटन्सी फुकट आहे. सहसा MD-medicne डॉक्टर सल्ला देतात.

एकदा चुकुन मुंबई एवजी पुण्यात ऑर्डर केल्याने कॅन्सल करावे लागले तर रिफंड पण लगेच आला.

कुणी ऑनलाइन साइट्सहून जेनूईन लेदर बेल्ट खरेदी केला आहे का? मला साइट्एस नाव सुचवाल का? >>

मागच्याच आठवड्यात मिन्त्रा वरुन Louis Philippe बेल्ट घेतला. जी पॅट्ची साईझ त्याच साईझचा बेल्ट घेतला. फिटिंग आणि पॅकेगिंग पण खुप छान होते.

गुड अर्थ आहे ना ते रॉयल एन्फि ल्ड वाल्या आयशर ट्रक वाल्या फॅमिलीतील मुलीचे आहे. ह्यांचेच साउथ मुंबईत एक फार भयानक महाग दुकान पण आहे. जिथे फरा खान वगैरे शॉपिग्न करतात. एंड्रोइन्ड फोन व आय फोन मध्ये जसा इमेज चा भारा भरकम फरक आहे तसाच आपले अमेझोन वर कप बश्या डिनर से ट मिळतात बेड कव्हर मिळतात पण गुड अर्थ वर पण मिळतात. त्यात फरक आहे. फारच सुरेख पण फार महाग.

कोणाला हवा असेल तर नंबर देऊ शकते... नक्की द्या.

डिस्काऊंट पण १८ ते ३०% मिळते. ....हे भारी आहे. आमच्याकडे 10% डिस्काउंट मिळतो.

एकदा नेटमेड वरून आईच्या आग्रहास्तव औषधे मागवली होती.स्वस्त मिळाल्यावर आईच्या मनात संशय यायला सुरू झाला बनावट तर नसतील ना म्हणून. मग आय ड्रॉप्स,औषधे नंतर फेकून दिली.

धन्यवाद साहिल दादा! बेल्टचे मटेरियल कसे आहे?

मी जवळपास सहा वर्षांपूर्वी बडोद्याहून अस्सल चामडयाचे पाच पट्टे घेतलेले होते (मला तीन (काळा, ब्राऊन व जीन्ससाठी वेगळा) व वडिलांना दोन) आणि ते अजूनही वापरत आहे. अत्यंत मजबूत, व लवचिक आहेत, चकाकीही फार कमी झाली नाही आणि तुकडे पडले नाहीत. मात्र त्यातला एक अत्याधिक वापराने कुजून नुकताच तुटला. आता केवळ पट्टे घेण्यासाठी बडोद्याला जाणे अव्यवहार्य वाटत कारण आधी बहिणीच्या निमित्ताने तिकडे वारंवार जाणे होत असे. आता ती मुंबईला बदलून आल्याने बडोद्याला जाणेच बंद झाले. त्यापूर्वी जेव्हा जेव्हा नागपूर किंवा मुंबईतील चामडी वस्तूंच्या स्थानिक दुकानांतून पट्टे विकत घेतले, ते फार दिवस म्हणजे एखाद-दीड वर्षही टिकले नाहीत. लवकरच तुकडे पडायला लागायचे. त्यामुळे आता खरेदी करायची फार भीती वाटत आहे.

मंगळबाजारात एक साड्यांचे दुकान (नाव विसरलो आठवुन सांगतो) आहे त्याच्या आत मालकाचा कोणी नातेवाईक कोपरा सांभाळुन करतो व्यव्साय. किंवा मल्हार पॉईंटवरचा असावा.

बेल्टचे मटेरियल कसे आहे? Louis Philippe च्या शोरुम मध्ये जसे असते तसेच आहे. ५०% सुट होती. मी तर आधी Louis Philippe च्या शोरुम मध्ये चेक करुन तशाच बेल्ट ऑर्डर केला. आठवडा च झाला आहे त्यामुळे एक वर्षाने कसे असेल ते माहित नाही.

साहिल शाह: खूप खूप आभार. खरंच, वर्षभरानंतर बेल्टची स्थिती तुम्हाला नाहीच सांगता येणार.
निलूदा: रावपुरा रस्त्यावर मंगळबाजाराहून कोठी चार रस्त्याकडे जाताना डाव्या बाजूला दोन - तीन छोटी दुकाने होती. हे दुकान सुरूवातीलाच कोपर्यावर आहे. आणखी उल्लेख म्हणजे दुकानाचा मालक मुस्लिम (माफ करा) आहे, पण वाजवी किंमत सांगतो, थोडी फार बारगेनिंग ही चालते.

आभार बाॅंड आणि राहुल

रावपुरातील ती दुकाने पाहिलीत पण कधी घेतले नाहीत आता नक्की ट्राय करतो Happy ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

माझ्या ओळखीत एकीने maternity फोटोशूट साठी myntra वरून बरेच लॉंग गाऊन मागवून फोटो काढून काहीतरी कारण सांगून परत केले. फोटोशूट पण झाले आणि ते सगळे लॉंग गाऊन विकत पण घ्यावे लागले नाहीत.

ही ट्रिक कॉमन आहे का? असं एकदा घालून कपडे परत करणं सोपं आहे का? मला करायचं नाहीये. पण मी तिकडून मागवलेले कपडे असे कोणीतरी वापरून परत केलेले असले तर घालायला विअर्ड वाटेल.

कपडा चांगला असला तर त्याच्या प्रेमात पडायला होतं.शक्यतो हे परता परतीचे उद्योग जास्त कोणी करत नाही, अगदीच साईझ किंवा मटेरियल सांगितलेले नसेल तरच करतात.
शिवाय मॉल मधले कपडेही ट्राय केलेले असू शकतात, डोळ्यांना, हाताला स्पर्शाला आवडला म्हणजे झालं.घरी आणून धुवून वापरायचा, ते आपण करतोच.

ही ट्रिक कॉमन आहे का? असं एकदा घालून कपडे परत करणं सोपं आहे का~~खूपच कॉमन आणि सोपे आहे हे
अगदी बिर्थडे / पार्टी ला घालून रिटर्न करतात,
रिटर्न पॉलिसी असते त्यामुळे खूप सोपं असतं,

लोकांना झोप कशी लागते रात्री असले उद्योग करून ? एखादी गोष्ट आवडली नाही , क्वालिटी चांगली नाही म्हणुन परत करण आणि फक्त आणि फक्त वापरून झाल्यावर परत करण्यासाठी ती विकत घेण यात किती मोठा फरक आहे. असो. एकुणच माणुस भयंकर प्राणी आहे .

सीमा +१
टॅग न काढताच वापरतात का?
रिटर्न करायचे झाले तर टॅग़्ज चेक करतात ना परत घेण्याआधी?

ही ट्रिक कॉमन आहे का? असं एकदा घालून कपडे परत करणं सोपं आहे का~~खूपच कॉमन आणि सोपे आहे हे
अगदी बिर्थडे / पार्टी ला घालून रिटर्न करतात,

बरेचसे फॅशन इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स पण हे करतात म्हणे. टॅग्स लपवायचे पाठीमागे किंवा ड्रेसच्या आत.

कपडेच नव्हे तर इतरही काही प्रॉडकट्स..रिटर्न पोलिसी चा दुरुपयोग खूप जण करतात. अगदी कॉमन आहे हे.

असे लोक हायर करता येतात का? माझ्याच्याने जेन्युअन न वापरलेल्या/ दोन्ही घेऊ आणि न होणारे परत करू विचार करुन आणलेल्या गोष्टीही परत होत नाहीत.
आणल्या नंतर एका दिवसांत ते परत झालं नाही तर परत होण्याची शक्यता एक्स्पोनेन्शिअली कमी होत जाते असा डिमिनिशिंग लॉ ऑफ रिटर्निंग प्रोबॅबिलिटी काढायचा विचार आहे!

युएस मध्ये असताना एक mattress आणलेली कोस्को मधून.
कमी वापरले ली, 6 महिन्याची रिटर्न पॉलिसी होती आणि आवडली नाही हे कारण चालणार होत.
आम्ही भारतात परत येणार होतो तर एक मैत्रीण मागे लागलेली की करून टाक परत , आवडली नाही म्हणून सांगायचं.
आवरा! अस झाल! आणि मग भारतीयांना नाव ठेवली तर वाईट कशाला वाटून घ्यायचं!
मला आवडलीये आणि मी वापरली आहे त्यामुळे परत करू शकत नाही हे सांगूनही तिला ते झेपत नव्हतं!

मला माझ्या भाच्याला लहान मुलांची काही पुस्तकपाठवायची आहेत युरोपमधे. कुठल्या वेबसाईटवरुन खरेदी करावी ?

धन्यवाद अमितव : मी भारत्तात रहाते आणि मला तिकडे पाठवायची आहेत पुस्तके. Amazon शिवाय अजून काही पर्याय आहे का ?

Pages