ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या अनेक दिवसांपासून लिहायचे होते, पण धागा सापडत नव्हता.

मी २८ सप्टेंबरला फ्लिपकार्टहून पॅरागॉनची खालील चप्पल ऑर्डर केली होती, जी मला १८ ऑक्टोबर ला भेटणे अपेक्षित होते.

WhatsApp Image 2022-11-23 at 12.08.38 PM.jpeg

आणि माझे अहोभाग्य की २१ ऑक्टोबर ला मला खालील चप्पल भेटली.
Wrong Order 1.png

दिवाळीमध्ये नवीन चप्पल घालणार, खूप कौतुक करून घेणार असे मनोरथ रचले असतांना फ्लिपकार्टने चांगलाच हिसका दिला. जवळपास २२ दिवस वाट बघितल्यानंतर चुकीची चप्पल पाठवली, माझा संताप - संताप झाला (दोन्ही फोटो बघून कुणाचीही चिडचिड होणे साहजिकच आहे). केवढा विरोधाभास, एक वेळ मी ऑर्डर केलेल्या चपलेपेक्षा वेगळा रंग किंवा आकार असता तर समजण्यासारखे होते. पण त्यांनी वेगळीच चप्पल पाठवली होते. चप्पल ऑर्डर करतांना परत करायचा पर्याय असल्याने, लगेच रीक्वेस्ट टाकली. तर काही वेळाने फ्लिपकार्ट कडून मॅसेज आला की विक्रेता ऑर्डर परत घेण्यास असमर्थ आहे. तुम्ही थेट पॅरागॉनशी (ब्रँड) संपर्क साधावा, म्हणून तुमची विनंती रद्द करण्यात येत आहे. माझी तळपायाची आग मस्तकात गेली (एरवी मी खूप कूल असल्याचे माझ्या सभोवतालच्या लोकांचे म्हणणे आहे, कारण मला फार कमी वेळा राग येतो). मी ब्रॅण्डला का संपर्क करू, मी त्यांच्याकडून चप्पल घेतलीच नव्हती. फ्लिपकार्टने काहीही वाह्यात उत्तर दिले होते.

ह्यातच मला दुसऱ्याच दिवशी, संध्याकाळी दिवाळीनिमित्त मुंबईबाहेर जायचे होते. मग मी सौम्य भाषेत समज देऊन सगळी हकीकत फ्लिपकार्टला मेल वर पाठवली (अगदी फोटोंसह). त्यानंतर त्यांनी कॉल करून कुत्रिमपणे खेद व्यक्त केला आणि आमची व्यक्ती तुमची चप्पल परत नेणार म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो असतांना, माझ्या अनुपस्थितीत त्यांचा व्यक्ती ही आम्ही पाठवलेली चप्पलच नव्हे असा वाद घालून रिकामाच परत गेला (त्याने मी ऑर्डर केलेल्या मूळ चप्पलचेच फोटो आणून हीच चप्पल आम्ही पाठवली आहे आणि तीच मी नेणार. तुम्ही जी परत देताय ती आम्ही पाठवलीच नव्हती. तुम्ही चप्पल बदलवून फ्लिपकार्टवर चुकीचे आरोप करत असल्याचा कांगावा केला). मी घरी आल्यानंतर फ्लॅटमेटकडून सगळा प्रसंग ऐकून पुन्हा फ्लिपकार्टला सौम्य भाषेत मेल लिहलं, आणि पाठोपाठ त्यांनी दिलगिरी (कुत्रिम) व्यक्त करत २८ ऑक्टोबर पर्यंत तुमचे ऑर्डर परत नेण्याची हमी दिली.

मी निवांत होऊन मुंबईबाहेर निघालो. वाटेत परत फ्लिपकार्टकडून मॅसेज आला की विक्रेता ऑर्डर परत घेण्यास असमर्थ आहे, तुम्ही थेट पॅरागॉनशी (ब्रँड) संपर्क साधावा, तुमची विनंती रद्द करण्यात येत आहे. मी गंतव्य स्थळी पोहोचून जरा सेटल झाल्यावर त्यांना मेल लिहिणे, त्यांनी खेद व्यक्त करणारा कॉल करणे आणि चप्पल परत नेण्याची हमी देणे, आणि काही वेळाने विनंती रद्द करण्याचा मॅसेज पाठवणे असाच सारखा ३-४ दिवस सिलसिला चालला (मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या संभाषणावर फीडबॅक द्यायला आवर्जून सांगून लगेच स्मरणवजा मेल पाठवायचे).

आणि आतापर्यंत जे करायचं टाळलं होत ते करायचं ठरवलं. जरा खरमरीत शब्दांत कडक भाषेत सुनावणारा मेल लिहिला (काय ऑर्डर आहे त्याची शहानिशा न करताच डोळे झाकून पॅक करता काय? जरी रिटर्नचा पर्याय असला तरी तुम्ही चुकीची ऑर्डर पाठवून आणि परत न्यायला व्यक्ती पाठवून स्वतःच्या रिसोर्सेसचा केवळ अपव्यय करत आहेत. आम्हा ग्राहकांना मनस्ताप होतो त्याच काय?), त्यात ग्राहक मंचात जाण्याची धमकी दिली. ताबडतोब कॉल करून आम्ही चपलेची खरेदी किंमत तुम्हाला परत करतोय (त्यांच्या बोलण्याचा रोष केवळ मला माझे पैसे हवे आहेत, बाकी काही नको असा होता) आणि २८ ऑक्टोबर पर्यंत आमचा व्यक्ती चप्पल न्यायला येईल असे कळवले. मीही चांगलेच फैलावर घेतले. एकवेळ मला पैसे नकोत पण मी ज्या चपलेची ऑर्डर दिली होती, ती हवी आहे; कारण मी तिच्यासाठी सुमारे २२ दिवस वाट बघितली; मला ती चप्पल घालून मिरवायचे होते, त्याचे काय? जर तुमच्या सो कॉल्ड विक्रेत्याकडे उपलब्धच नव्हती, तर वेबसाईटवर का उपलब्ध दाखवत होतात; चुकीचीच ऑर्डर पाठवायची होती तर डिलिव्हरीला एवढे दिवस लावलेत आणि आता मी ती चप्पल ठेवून काय करू? ती लगेच घेऊन जा; मला ती नजरेसमोरही नको, असे सांगितले. मग मात्र वारंवार क्षमा मागू लागले आणि काही सेकंदात माझ्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मला बँकेकडून मॅसेज आला.

काही वेळाने कॉल करून आम्ही तुमचे पैसे परत केले आहे, तुमच्या खात्यातील रक्कम बघून खात्री करून घ्या आणि आपल्या संभाषणावर आवर्जून मेलवर फीडबॅक द्या. मी मुळीच लक्ष दिले नाही. यथावकाश २८ ऑक्टोबरला त्यांची व्यक्ती काहीही कांगावा न करता मुकाट्याने चप्पल परत घेऊन गेली.

इति संपुर्णम!

बापरे
फारच ताप झाला
अमेझॉन वरून चप्पल आणि इतर खरेदी चा माझा अनुभव चांगला आहे.
एकदा हिरवे पडदे मागवले पांढरे काळे आले.मग रिटर्न घ्यायला माणूस आला तो म्हणाला हे वेगळे पडदे आहेत, मला हिरवे पडदे परत घ्यायचे आहेत. मग त्याला रिटर्न रिक्वेस्ट मधलं वर्णन दाखवलं, मग ते वाचून काळे पांढरे पडदे घेऊन गेला.
पण फुटवेअर ऑनलाइन खरेदी काही जणांना लाभत नाही.माझ्या नवऱ्याने पण फ्लिपकार्ट वरून 3-4 वेळा बदली केलेले चुकीचे आलेत.

मी अगदी प्रथमच अमेझोनवरून एक मोबाईल मागवला. पार्सल आले तेव्हा मीच घेतले. ओनलाइनच्या फसवेगिरीच्या कथा ( मोबाईल मागवला आणि दगड आला वगैरे )डोक्यात होत्या म्हणून आणणाऱ्यालाच उघडायला सांगितले.
"आत मोबाईलच आहे का मागवलेला ते पाहायचे आहे. प्रथमच ओनलाइन वस्तू घेतो आहे."

"मी उघडून दाखवतो पण मी परत नेणार नाही, रिटन रिक्वेस्ट पाठवल्यानंतर दुसरा कुणी नेईल. आणि हे पाहा असं उघडायचं पार्सल. इथे बार कोड दिसतोय तो कापायचा नाही. परत नेणारा हा स्कॅन करून नेतो. "
"ओके."
उघडून तो खोका पाहिला.

"हाच ना?"

"हो"
नसता तर तो साक्षी होताच. आणि पुढील दिव्यातून जावे लागले नसते.

मी नुकताच फ्लिपकार्टवरून फोन मागवला. त्यांनी डिलिव्हरी पर्सन तुम्हांला तुमची वस्तू उघडून दाखवेल असं सांगितलं. तसंच झालं. ओटीपीही आला होता.

एकूण 4 फोन वेगवेगळ्या वर्षी ऑनलाईन मागवले.1फक्त क्रोमावरून, बाकीचे 3 अमेझॉनवरुन कदाचित एखादा फ्लिपकार्टवरून असेलही. सगळे उत्तम चालले.

अमेझॉन वरून basin varche कॅबिनेट मागवले होते.ते तुटक्या स्वरूपात आले.त्याचा फोटो काढा.त्यांना परत नेण्याबद्दल वेळोवेळी कळवा हा एक अनुभव वगळता बाकी सर्व अनुभव चांगले होते.फ्लिपकार्ट जास्त आवडते.पण यावेळी एक वस्तू मागवली होती.ती उद्या येणे अपेक्षित होते.पण मेसेज आला की 25 तारखेला येईल म्हणून.25 तरखेला मी बाहेरगावी जातेय.उद्या जर मिळाली नाही तर शक्य झाल्यास कॅन्सल करेन.हा एकच फ्लिपकार्ट चा वेगळा अनुभव!

दणादण ऑनलाईन खरेदी करते मी Happy
Mostly कपडे, baby care products, वगैरे मागवते.
१०००₹ च्या वर काही असेल तर फक्त amazon. किंवा मग नवऱ्याचं एक खास पैसे नसलेलं account आहे तिथून. त्याच्या हाताने मागवते Proud
फ्लिपकार्ट चा सध्या अनुभव एवढा खास नाही delay केल्या orders.
१५ऑगस्ट च्या वेळी सेल असतात. बऱ्यापैकी discoynt मिळतो. तेव्हा dishwasher घेतलं fliokart वर सर्वात जास्त swast होते.

राहुल सारखा अनुभव मला इंडस्ट्री बाईंग वर आला.
मी इन्व्हर्टर बॅटरी ठेवायला दोन मजली ट्रॉली मागवली होती. पॅकिंग नीट नसल्याने ती डॅमेज होऊन आली.
त्यांच्या मागे लागुन (मी दोन फार तर तीन वेळा सर्व नीट सविस्तर समजाऊन सांगतो त्यांना हवे ते सोपस्कार करतो नंतर मात्र भयंकर झापतो आणि एस्केलेट करतो. ) ती परत न्यायला आणि पैसे मिळायला महिना लागला.

तक्रार सोडवण्यात अमेझॉनचा आता पर्यंत तरी चांगला अनुभव आहे. पण बिझिनेस वाढला, नाव वाढलं की लोक complacent होतात आणि सर्व्हिस/कस्टमर सपोर्ट एकदम खालावतो. तेव्हा यशाच्या शिखरावर असताना कंपनी कसे मॅनेज करते यावर अवलंबून आहे.

मोठ्या किंमतीची वस्तू किंवा वेगळ्याच रंगाची/ पॅटर्नची येऊ शकेल अशी शंका असेल तर आलेला पॅक उघडताना सरळ शुटींग करावे. ते वस्तू परत करायची झाल्यास उपयोगी पडतं. रिटर्न बाबतीत अ‍ॅमेझॉन आणि मिंत्राचा अनुभव चांगला आहे.

मोठ्या किंमतीची वस्तू किंवा वेगळ्याच रंगाची/ पॅटर्नची येऊ शकेल अशी शंका असेल तर आलेला पॅक उघडताना सरळ शुटींग करावे.>>> हेच लिहिणार होते. अगदीच फुटकळ वस्तू सोडल्या तर बहूतेक वेळा आम्ही उघडताना व्हिडिओ बनवतो.
अमेझॉन चा आत्तापर्यंत नेहेमीच चांगला अनुभव आहे. फोन, हेडफोन, किंडल, फिटबीट अश्या महागड्या वस्तू घेवून झाल्यात. पुस्तके आणि क्राफ्टींग चे सामान बऱ्याचदा घेतलं जाते. नवऱ्याने शूज पण घेतले होते.
फ्लिपकार्ट वरून नवरा घेतो बऱ्याचदा. एकदाच ३ वस्तूंचा पॅक घेतला आणि एकच वस्तू मिळाली असे झाले होते. बदलल्यावर परत तसेच झाले. दुसऱ्यांदा परत करायला आलेल्या व्यक्तीने सांगितले की त्याच्याकडे सिंगल पॅकेट च दिले आहे, चेंज ऐवजी सरळ रिटर्न करा, ते सोयीचे होईल. मग तसेच केले आणि पैसे घेतले.
इंडस्ट्री buying वर मला हवे असणारे बरेच टूल्स दिसतात. पण साईट चा अनुभव नाही म्हणून कधी घेतले नाहीत. कालच एक टूल मागवले आहे, कॅश ऑन डिलिव्हरी करणार.

दणादण ऑनलाईन खरेदी करते मी >> आम्ही पण, मागच्या ३ वर्षात किराणा सोडुन कुठल्याच दुकानात गेलो नाही. फक्त अ‍ॅमॅझॉन , मिन्त्रा , अजिओ , Tatacliq किंवा मार्क आणि स्पेन्सर वर . पेन, रुमाल, प्रिंटर, फोन , कपडे सगळे ऑनलाईन घेतो.
एकदा अ‍ॅमॅझॉन ने चुकीची चप्पल पाठवली. परत करताना त्रास होईल हे विचारात घेउन कॉल करुन त्याना परत येण्यारा माणसाला नोट लिहण्यास सांगितले त्यामुळे त्रास नाही झाला.
ह्या दिवाळीला अ‍ॅमेझॉन मध्ये केबल मागवली. पटना वरुन येणार असल्याने २ आठवडे लागले. केबल ने फोन चार्ज होण्यास खुप वेळ लागत होता म्हणुन परत नेण्यासाठी फोन केला तर त्यानी स्संगितले की केबल परत करण्याचा पर्याय फक्त एकदा exchange केल्यावरच मिळेल. त्यामुळे exchange केले . नवीन केबल यायला पुन्हा २ आठवडे. नंतर तसाच बॉक्स परत केला. ह्यात पैसे परत मिळण्यास दिड महिना गेला . केबल घेताना अ‍ॅमेझॉन ची return policy बघुन घेणे.

कपडे फारसे घेतले नाहीत ऑनलाईन. गेल्या वर्षी मिंत्रा वरून दोन कुर्ते घेतले. दोन वेगवेगळ्या size. त्यातल्या M size चा कुर्ता लहान झाला म्हणून ठेवून दिला आणि L size च्या कुर्त्याला अल्टर करावे लागले.
मुलासाठी पण दोन वेळा घेवून बघितले टी शर्ट पण परत करावे लागले. कपडे हात लावून आणि साइज प्रत्यक्ष बघितल्याशिवाय नाही घ्यायचे हे ठरवले आहे आता.

मी भारत वारीत वेळ वाचावा म्हणून ७०% कपडे, पूजा साहित्य, बुक्स, डेकोर आयटम्स असं बरंच काही ऑनलाईन च घेते, साड्या तर ९०% ऑनलाईन च.
फ्लिपकार्ट अमेझॉन माईंत्रा अनुभव घेतले आहेत.
फ्लि.का. अनुभव उत्तम आहे, रीटर्न पण नीट होते, ५/३० वेळेस चुकीचे पर्सल पाठवले होते. ते रीटर्न झाले.

कपड्यांचे वेबसाइटवर दिसणारे रंग आणि प्रत्यक्षातले रंग वेगळे असतात. म्हणजे वेगळे कपडे पाठवतात असं नव्हे. फोटोग्राफी, वेबसाइटवर दिसणं आणि आपल्या घरी तिथल्या उजेडात, पार्श्वभूमीवर दिसणारे रंग वेगळे वाटतात. घालायच्या कपड्यांबद्दल फार प्रॉब्लेम येत नाही. नवा रंग ट्राय केला म्हणून आपली पाठ थोपटता येते. पण पडदे, चादरी तिथे जशा वाटतात तशा आपल्या घरात वाटत नाहीत. कपड्यांचा पोत कळत नाही.
पण तरीही मला ऑनलाइन खरेदीच आवडते. दुकानात जाऊन त्यांना हे दाखवा ते दाखवा करायची सवय मुळातच नव्हती. माझ्या कपड्यांची खरेदी पाच मिनिटांत होत असे. तीही सुटली.
एवढं असूनही गिफ्ट द्यायला म्हणून मी ऑनलाइन विकत घेतलेल्या साड्या छान निघाल्या आणि संबंधितांना आवडल्या.

कपडे वर्ष/दोन वर्षातून एकदा घेतो. त्यात पॅन्ट उंची कमी करून घ्यावी लागते. तेव्हा दुकानातूनच घेतो.

मी ऑनलाईन शॉपिंग टाळतो, किंबहुना आवडतच नाही. मला अजूनही दुकानात जाऊन वस्तूंचा स्पर्श अनुभवून, किमतीवरून थोडीफार हुज्जत घालून खरेदी करण्यात गम्मत वाटते. पण फ्लिपकार्टचा नवरात्री दरम्यान सीझनल सेल घोषित झाल्यावर, मीही वाहत्या गंगेत हात धुवायचे ठरवले. प्रत्यक्षात मी ऑर्डर केलेल्या चपलेवर काहीही सूट नव्हती, मला केवळ आवडली म्हणून खरेदी केली होती. मी क्वचितच फ्लिपकार्ट, ऍमेझॉन वा मिंत्राहून ऑनलाईन वस्तू खरेदी केल्या आहेत, आणि प्रत्येक वेळी बरा अनुभव होता. पण ह्यावेळी हद्दच झाली, मी ऑर्डर केलेल्या चपलेपेक्षा वेगळीच चप्पल पाठवली (त्यात मला आठ नंबरची चप्पल लागते, ती सहाची होती). एकवेळ मी ऑर्डर केलेल्या चपलेचा वेगळा रंग वा नंबर पाठवला असता, तेही समजण्यासारखे होते. इथे तर सारेचं धक्कादायक होते. त्यामुळे एवढे दिवस वाट बघूनही हाती काहीच न लागल्याने नुसताच संताप झाला होता. मला तर उध्वस्त झाल्याची भावना येत होती.

काही अनुभवांतून मी कपडे, जोडे, पट्टे, व वॉलेट दुकानांतूनच घेण्यात प्राधान्य देतो. ऑनलाईनवर उदा. कपड्याचा पोत किंवा रंग नीट समजत नाही.

कधीतरी एकदा लाइमरोडवरून 2 सूट मागवले होते.पण नव्हते आवडले.कपडे मगवण्याची पहिलीच वेळ असल्याने कमी किमतीचे मागवले होते.

कपडे फारसे घेतले नाहीत.घरी वापरण्यासाठी कॉटनच्या pants आणि long टीशर्टस घेतले.छान निघाले.बहुतेक फ्लिपकार्ट असावे.

मिशोवरून स्वस्त वाटले म्हणून 2 कुरते मागवले.एक खरोखर किंमतीच्या मनाने छान आहे.दुसरा नाही आवडला,पण सकाळी फिरायला जाण्यासाठी ठीक आहे.

हल्ली तांदळासाठी/गव्हासाठी फक्त सहकारी भांडारमध्ये जावे लागते.त्यावेळी बाकी किराणा घेतला जातो.एरवी big basket,dunzo , झेप्टोमधून लागेल तो किराणा, भाजी मागवली जाते. खरं चुकीचे होत चालले आहे.अगदी भाजीवालीने पण विचारले की भाभी किधर हो आप ?मग कधीतरी तिला तोंड दाखवते.

खरं चुकीचे होत चालले आहे.अगदी भाजीवालीने पण विचारले की भाभी किधर हो आप

हे मात्र मार्केट फिरविणारे ठरत आहे. एक मोठा समाज बेकारीत जाईल.

मला instamart वर असा अनुभव आला.
आम्ही बऱ्याच वेळा instamart वरून सामान मागवतो.
एकदा सकाळी माझ्याकडुन गडबडीत ३००/- रुपये bill झालं असताना ३३०/- रुपये ट्रान्स्फर झाले . सामाना बरोबर जे बिल आल ते ३००/- च होत...मी निघताना सामान आल्यामुळे मी बिल तसच पर्स मध्ये टाकलं...संध्याकाळी दिवसभराचा हिशोब check करताना लक्षात आल की मी ३०/- जास्त दिले. ..लगेच instamart चेक केलं तर ३०/- delivery charge mhanun lavale hote e bill madhe..pan बिलाची हार्ड कॉपी मात्र ३००/- ची होती...instamart वर कस्टमर केअर च्या chat ऑप्शन मध्ये कम्प्लेंट केली तर ती बाई म्हणे नाही हे delivery charges ahet...म्हणाले काय संबंध...जर तस असतं तर बिलामध्ये delivery charges ka nahit ? बिल का ३००/- च?
नंतर बऱ्याच चॅटिंग नंतर तिने finally ३०/- account la transfer kele.

कोरोना पासून सगळं ऑनलाइन घ्यायची सवय लागली आहे. कपडे चप्पल अस घेताना नीट बघून, टेपने मोजून, साईज गाईड बघून घ्यावं लागतं. मग झोल होत नाही.
किराणा तर dmart चा च बेस्ट वाटतो वाण्यापेक्षा. ऑरगॅनिक वगैरे खूप option असतात. प्लस छापील किमतीपेक्षा दोन पैसे स्वस्त ही मिळतं. कधी एखाद्या गोष्टीसाठी वाण्याकडे गेलं तर तो विचारतो ही " ताई हल्ली येत नाही? "

डार्क/ काळ्या रंगाचे कपडे/चपला/बॅग्ज इ. घेताना, सेम आयटम पांढर्‍या/लाईट कलरमधे असलेले फोटो पहावेत.
शिवण, प्रॉडक्शनमधली सफाई त्यात नीट दिसते.

अस्पष्ट वा झूम करता न येण्यासारखे फोटो असलेल्या वस्तू घेऊ नयेत.

रिव्हू नक्की वाचावेत.

रिव्ह्यू मध्ये काही जणांनी प्रॉडक्ट चे नैसर्गिक प्रकाशातले फोटो टाकलेले असतात, ते नक्की पाहावे.
प्रॉडक्ट कॅटलॉग फोटोग्राफी आणि मूळ प्रॉडक्ट यांच्या रंगात 1 शेड फरक असणे अगदीच अपेक्षित, पण तो 4-5 शेड असला तर रिव्ह्यू मध्ये हे नक्की लिहावे.तसेच रंग जात असल्यास, साईझ बद्दल काही सूचना असल्यास रिव्ह्यू मध्ये लिहावे.बरेचदा अमक्या रंगाचा कपडा हवा म्हणून घेतला जातो.अश्या वेळी तपकिरी ऐवजी बदामी सहन करून घेता येत नाही.

डार्क/ काळ्या रंगाचे कपडे/चपला/बॅग्ज इ. घेताना, सेम आयटम पांढर्‍या/लाईट कलरमधे असलेले फोटो पहावेत.
शिवण, प्रॉडक्शनमधली सफाई त्यात नीट दिसते.

रिव्ह्यू मध्ये काही जणांनी प्रॉडक्ट चे नैसर्गिक प्रकाशातले फोटो टाकलेले असतात, ते नक्की पाहावे.

>>>> बरोबर

मी स्वतंत्र वरून 2 साड्या घेतल्या.quality आवडली.ते सॅटिन साड्या सुंदर बनवतात.फोटो दाखवते एका साडीचा.(साईट वरचा)
Screenshot_2022-12-01-23-36-53-603_com.android.chrome.jpg

मामी साड्या विकायची तेव्हा2 घेतल्या होत्या होत्या त्याही आवडल्या खूप.

<< तपकिरी ऐवजी बदामी सहन करून घेता येत नाही. >>
काय मस्त कॉमेंट आहे. मला आयुष्यात या रंगातला फरक कळणार नाही.

सॅमसंग ऍपवरून टिव्ही मागवला होता.
दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरेदी म्हणून. पण दसरा उलटून गेला तरी टिव्ही काही मिळाला नाही. ट्रॅकिंग डिटेल्स मध्ये तो नक्की कुठे पोचलाय हे पण कळेना. कस्टमर केअर सर्विस एकदम माशाअल्लाहच आहे. त्या मुलांना काहीही माहिती नव्हतं. टिपिकल छापील उत्तरं देत. शेवटी वैतागून ऑर्डर कॅन्सल केली.
मग पैसे परत मिळवायची लढाई सुरू झाली.
जवळपास पंधरा दिवस झाले तरी पैसे परत मिळाले नाहीत. परत ककस आणि परत छापील उत्तरं.
शेवटी मी जरा हार्श भाषेत बोलल्यावर मॅनेजर फोनवर आला.
टिव्ही आमच्या गोडाऊन मध्ये पोचला की त्यानंतर आठ दिवसांत पैसे मिळतील म्हणाला.
मी म्हणाले,"तुमचा डिलिव्हरी पार्टनर जर वेळेवर डिलिव्हरी देत नाही तर ती माझी चूक नाही. तो तुमचा प्रश्न आहे. मी तर तो टिव्ही पाहिला पण नाही. आता रस्त्यात जर काही तूटफूट झाली तर ती माझी जबाबदारी कशी? माझे पैसे अडकवण्याचा काय संबंध?"
बरं. अमाउंट पण काही कमी नव्हती. मग "चार दिवसांत पैसे मिळाले नाहीत तर मी कंझ्युमर कोर्टात जाईन' असं सांगून फोन ठेवला. चौथ्या दिवशी पैसे परत मिळाले.

चुकूनही आता सॅमसंगच्या वाटे जाणार नाही.

Screenshot_20221202-083831_Gallery.jpg

Back end = Service Technicians Team
Front end = Show room
APIs = Customer Care Team

Pages