Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
खेळायला गेलो Wordle पण झाले
खेळायला गेलो Wordle पण झाले Tetris

69 नाही जमला कारण तो शब्दच
69 नाही जमला कारण तो शब्दच माहित नव्हता.
पहिलं आणि शेवटची दोन अक्षर ओळखली 4 प्रयत्नात. पण पुढे अडकलो. शेवटी डिक्शनरी मध्ये बघून शब्द शोधला
(No subject)
I uploaded the image. How do
I uploaded the image. How do I paste it here using the Android app?
रिझल्ट पेस्ट केला की एरर
रिझल्ट पेस्ट केला की एरर येतेय
डेली शो मधे wordle >> https:/
डेली शो मधे wordle >> https://www.youtube.com/watch?v=DJcwoH84E8g
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
आजचे नाही सुटले मला.
आजचे नाही सुटले मला.
शब्द थोडा अनकॉमन आहे.
शब्द थोडा अनकॉमन आहे.
आजचे नाही सुटले मला.
आजचे नाही सुटले मला.
<<
ब्रौजर मधून पॉवरलॅन्ग्वेज साईटच्या कुकी डीलिट करा, मग पुन्हा खेळता येइल.
मला पण आजचा शब्द नाही ओळखता
मला पण आजचा शब्द नाही ओळखता आला.
मला वाटलं मलाच येत नाहीये!
मला वाटलं मलाच येत नाहीये!
(No subject)
Submitted by बोकलत on 24
Submitted by बोकलत on 24 January, 2022 - 07:07
>>>> बक्षीस घरपोच मिळेल तुम्हाला
(No subject)
Wordle 219 3/6
Wordle 219 3/6
खेळ खूप छान आहे.
खेळ खूप छान आहे.
(No subject)
(No subject)
आजचा शब्द केनेडींच्या हत्ये
आजचा शब्द केनेडींच्या हत्ये संबंधात pop culture मधे नेहमी दिसतो.
मला आज ५ पाय-या लागल्या उत्तर
मला आज ५ पाय-या लागल्या उत्तर मिळायला.
मला रांगोळी दिसत नाही. फक्त स्टटिस्टीक दिसते. आणि फोन वरून इथे कसे टाकायचे ते जमत नाही.
स्टॅटिस्टिक्स दिसते तिथेच
स्टॅटिस्टिक्स दिसते तिथेच "Share" सिम्बॉल आहे.
मी त्यावर क्लिक करून स्वतःला WA मध्ये शेअर करून, त्याचा स्क्रीन शॉट घेउन, तो क्रॉप करून मग इथे देतो.
(No subject)
वक्त बदल दिया, जजबात बदल दिये, जिंदगी बदल दी

हो. पण फोन वरून इथे टाकता येत
हो. पण फोन वरून इथे टाकता येत नाही. अपलोड होतो. पण नंतर डकवण्याची कळ दिसत नाही
मायबोली ऍप मधून दिसत नाही ती
मायबोली ऍप मधून दिसत नाही ती कळ.
फोटो देण्यास ब्राऊजर वापरा.
(No subject)
Pages