Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
(No subject)
(No subject)
आजचा शब्द मस्त टप्प्या
आजचा शब्द मस्त टप्प्या टप्प्या ने ओळखला
(No subject)
२१६ वा शब्द जा विचित्र होता.
२१६ वा शब्द जरा विचित्र होता. तो झाला ४ स्टेप्समध्ये पण मटका लागला.
व्यत्यय यांच्या पायऱ्यांचा
व्यत्यय यांच्या पायऱ्यांचा अंदाज आला.
उद्या सांगेन अंदाज.
कालचं माझं कोडं शेवटच्या एका
कालचं माझं कोडं शेवटच्या एका शब्दाने चुकलं.
महागड्या वस्तूच्या नादाला लागून पायात काटा घुसला..
अजून एक गोष्ट म्हणजे हे कोडं
अजून एक गोष्ट म्हणजे हे कोडं त्या त्या देशातल्या रात्री बारा वाजता बदलतं. म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना आपलं आजचं कोडं त्यांच्या स्थानानुसार दहा बारा तासांनंतर मिळतं.
५/६
५/६
आज सहा प्रयत्न लागले!
आज सहा प्रयत्न लागले!
(No subject)
(No subject)
आज कठीण होता . ५ प्रयत्न
आज कठीण होता . ५ प्रयत्न लागले
(No subject)
आजचे पहिल्या शब्दाचे फार
आजचे पहिल्या शब्दाचे फार विकल्प होते, आणि शेवटी ट्रायल अँड एरर शिवाय गत्यंतर न्हवतं, त्यात नाही जमलं
अमितव तुम्ही पहिल्या दोन
अमितव तुम्ही पहिल्या दोन शब्दात सगळे vowels येऊन जातील अस बघत नाही का? आजच्या शब्दासाठी पहिल्या दोघात फक्त एक लेटर निघालं हे unusual वाटलं.
(No subject)
आज कठीणच होता. मला हा शब्द
आज कठीणच होता. मला हा शब्द माहितीच नव्हता. फक्त पहिलं अक्षर राहिलेलं असूनही ओळखता येत नव्हता. शेवटी हा शब्द गूगल केला, अर्थपूर्ण आहे हे बघितलं आणि टाकला तर बरोबर आला.
खरं आहे, चुकलं आज.
खरं आहे, चुकलं आज.
मला पहिला शब्द आणि इतर दोन
मला पहिले अक्षर आले आणि इतर दोन अक्षरं 'तुझे आहे तुजपाशी परि तू....' मधे वेताळासारखी अडकले आहे.
आज फार वेळ लागला
आज फार वेळ लागला
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मला आता दैनंदिन शब्द साधारण
मला आता दैनंदिन शब्द साधारण सात मिनिटात जमतो. मग नंतर दिवसभरात मी संग्रहित संस्थळावर जातो. तिथे रँडम पर्याय निवडून दिवसाकाठी चार शब्द सोडवतो.
महिनाभर तरी ही व्यसनी अवस्था राहील असे वाटते
(No subject)
(No subject)
काल जे पाहिले २ शब्द वापरले
Pages