Wordle! एक मस्त ऑनलाईन खेळ

Submitted by व्यत्यय on 17 January, 2022 - 06:40

Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत

कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.

हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.

तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा Happy

तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/

तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

विक्रम, तुम्हाला न्हवतं ते. तुमच्या नंतर एक प्रतिसाद होता त्यात शब्द होता. मला वाटतं वेमांनी काढून टाकला असावा तो प्रतिसाद.

Submitted by Anagha_Gokhale on 19 January, 2022 - 11:10

एकही पिवळा चौकोन नसणाऱ्या चार ओळी पहिल्यांदाच बघतोय.
तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कुठले शब्द वापरलेत हे सांगाल का प्लीज?

IMG_20220120_001406.jpg

हे आजचं. काल दुसऱ्याच पायरीला बरोबर उत्तर सापडलं होतं. आज दोन पायऱ्या जास्त लागल्या. Happy दुसरं अनलिमिटेड पण खेळून बघितलं, त्यातही मजा येते पण रांगोळी जनरेट नाही होत. Proud

मस्त गेम आहे.

माझी रांगोळी चिकटत नाहीये इकडे. पण आज पाच अटेंप्ट लागले.

https://www.devangthakkar.com/wordle_archive/
इथे 1 ते 214 पर्यंत या सर्व शब्दांचा इतिहास आहे. आपल्याला जर सोडवून एखादा शब्द खूप आवडला असेल, तर आपण आपल्या मित्राला त्या क्रमांकाचा ओळख पाहू असे सुचवू शकतो.

डॉक्टर तुम्ही तर खजिनाच उघडून दिलात
नंबर 2 बद्दल माझी रांगोळीच तुम्हाला सांगेल. एवढे शब्द शक्य आहेत हे पण मला माहित नव्हतं Lol
पण बहुतेक आता समजलंय कोणता शब्द होता ते

Screenshot_20220120-130937.jpg

शेवटचे 4 Lol Lol त्यात तुम्ही p (pun unintended Wink ) सुद्धा try केले असणार असा एक अंदाज Proud

Btw नंबर 10 सुद्धा चांगले आहे

2 मला तर शेवटी वाटायला लागले बॉलिवूड दिग्दर्शकाचे नाव तर नव्हे ना. तसेही मला तो शब्द माहीत नव्हता.

ओह्ह... म्हाळसाची रांगोळी बघुन या गेम मध्ये बग/ कनफ्यूजन आहे दिसतंय. हीच शक्यता वाटत होती.
एकच शब्द अक्षर दोन वेळा असेल, आणि दिलेल्या एका जागी बरोबर असेल तर आणखी एक चौथा रंग हवा. आणखी बोलत नाही. नाही तर क्लू मिळेल, पण ज्यांना शब्द माहित आहे त्यांना समजेल.
मी चहा आणायला गेलो आणि अक्षराचं शब्द झालं लक्षात आलं, चूक दुरुस्त करे पर्यंत आलीच पोस्ट. ही आमची पूर्वीची खरी मायबोली हो! Lol

एकच शब्द अक्षर दोन वेळा असेल, आणि दिलेल्या एका जागी बरोबर ..
<<
त्या आर्काईव्हमधे एकच अक्षर ३-३ दा आलेलेही शब्द आहेत.

Afterall there are only so many 5 letter words in English..

Pages