Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
कालचे तुमच्या पायऱ्यांचे
कालचे तुमच्या पायऱ्यांचे अंदाज सांगायचे राहीलेच.
आज दुसरा शब्द तोच म्हणुन इथे सांगु नये पण आता कन्फर्म झाला.
तिसऱ्या पायरीत तुम्ही mince ट्राय केला असा अंदाज, अल्फाबेटीकली कॉम्बिनेशन करत. अन्यथा since कुणीही गेस करेल.
(No subject)
संग्रहित मधला क्रमांक 108
संग्रहित मधला क्रमांक 108 प्रयत्न करून बघा.
आव्हान आहे
ंमाझ्या मस्त स्टेप्स आलेल्या
ंमाझ्या मस्त स्टेप्स आलेल्या पण शेअर करता आल नाही
क्रमांक १०८
क्रमांक १०८
मधली तीन अक्षरं समजलेली. मग
मधली तीन अक्षरं समजलेली. मग दहा मिनिटं सगळ्या शक्यता शोधण्यात घालवल्या. बरीच महत्त्वाची अक्षरं आधीच बाद झालेली म्हणून फार कमी शक्यता शिल्लक होत्या
(No subject)
(No subject)
दोन स्वर पहिल्या प्रयत्नात,
दोन स्वर पहिल्या प्रयत्नात, दोन व्यंजनं दुसऱ्या प्रयत्नात त्यामुळे जास्त वेळ लागला नाही.
108>>> वा सर्वांचे अभिनंदन !
108>>> वा सर्वांचे अभिनंदन !
सर्वात शेवटचा पर्याय म्हणून * अक्षर घेतले जाते
हा पण एक भारीय...
हा पण एक भारीय...
मला जमलं आज
मला जमलं आज
स्क्रीनशॉट बघू जमतोय का द्यायला
(No subject)
शेअर केल्यानंतरच्या इमेजचा
शेअर केल्यानंतरच्या इमेजचा स्क्रीनशॉट
(No subject)
दोन्ही चांगले होते ६९ आणि १०८
दोन्ही चांगले होते ६९ आणि १०८.
क्र. १९ आणि ४८ सुद्धा करुन पहा
छान.
छान.
६९ हे काही संस्कृतींना प्रिय तर काहींना निषिद्ध ,अशी त्याची गंमत आहे !
१९ छान सुटले तिसऱ्या पायरीवर
१९ छान
सुटले तिसऱ्या पायरीवर
ते देवांग पटेल डॉट कॉम
ते देवांग पटेल डॉट कॉम माझ्याकडे उघडतच नाहीए. स्लो नेट मुळे का माहीत नाही.
माझ्याकडे पण त्याची गंमत आहे.
माझ्याकडे पण त्याची गंमत आहे. मोबाईलवर पटकन उघडते. लॅपटॉप वायफाय वर उघडतच नाही

अरे! माझ्याकडे पण मोबाइलवर
अरे! माझ्याकडे पण मोबाइलवर त्यांच्या डेटाने चटकन उघडलं.
६९, १९ शब्द माहीत नव्हते.
६९, १९ शब्द माहीत नव्हते.
कोडं सोडवल्यावर गिफ्ट मिळतं
कोडं सोडवल्यावर गिफ्ट मिळतं काय?
आणि हा शब्द तर भन्नाटच आहे !
आणि हा शब्द तर भन्नाटच आहे !
(No subject)
शेअर केल्यानंतरच्या इमेजचा
शेअर केल्यानंतरच्या इमेजचा स्क्रीनशॉट >>>
कधीकधी पिवळे चौकोन हिरवे
कधीकधी पिवळे चौकोन हिरवे करायला चावट शब्द वापरावे लागतात! मला त्या अनलिमिटेड साईटवर एका कोड्यात d, i आणि o अशी अक्षरं आली. मग मी कुणी बघत नाही असं पाहून एक शब्द टाईप केला आणि तिन्ही अक्षरं हिरवी झाली
इश्श्य!
इश्श्य!
१०८ चा शब्द ओळखला. कोडं
१०८ चा शब्द ओळखला. कोडं सोडवलं म्हणत नाही कारण अक्षरं एलिमिनेट करायला तीन वेळा खेळलो.
(No subject)
Pages