Wordle! एक मस्त ऑनलाईन खेळ

Submitted by व्यत्यय on 17 January, 2022 - 06:40

Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत

कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.

हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.

तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा Happy

तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/

तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Screenshot_2022-01-26-06-11-30-495_com.whatsapp~2.jpg

पहिल्या दोन शब्दांत सगळे स्वर वापरले. शेवटचं अक्षर मिळाल्यावर जो पहिला शब्द आठवला तो तुक्का लागला

अरे काय कमाल आहे! माझा कसे पेस्ट करावे त्याचा प्रतिसाद उडवला?
लोकांना मदत पण करू नये का म्हणे आजकाल?

प्लीज परत लिहाल का आरारा? (अडमीननी उडवला असेल का तो प्रतिसाद? का?)
मला पण इथे कसं शेयर करता हे जाणून घ्यायचं आहे.

wordle 221.jpg

हुश्श!!

मला पण इथे कसं शेयर करता हे जाणून घ्यायचं आहे.
>>>>>
मी वर दाखवल्याप्रमाणे WhatsApp वर एखाद्या मित्राला शेअर करतो, मग crop करून ही इमेज save करतो.
नंतर तीच इमेज मायबोलीवर डकवतो

हेच कालपर्यंत मीही करत होते, पण आज शेअर दाबल्यावर ते पर्याय येतच नाही आहेत.

आले..आले Lol
मगाशी ब्राऊजर हिस्टरी डिलीट केली होती. कुकीज क्लिअर केल्या होत्या. त्यामुळे काही उपयोग झाला की काय ते माहिती नाही, पण आता शेअर करता येतंय.

IMG-20220126-WA0004.jpg

नंतर तीच इमेज मायबोलीवर डकवतो >> ते कसं करता? मी माबो ऍप किंवा फोन वरून ब्राउझर वरून माबो वेबसाईट उघडली तर त्यात फोटो अपलोड करता येतो, पण प्रतिसादात इन्सर्ट करता येत नाही.

पहिल्या प्रयत्नात बरोबर निशाणा साधला Lol

खूप सोपा आहे आजचा शब्द!
Screenshot_20220127-001625_WhatsApp.jpg

221- 5

धन्यवाद वावे. परंतु मला 'Upload' 'Thumbnail' 'Delete' एवढेच पर्याय दिसत आहेत. ऍपचा घोळ असेल म्हणून ब्राउझर उघडला तर त्यातही हाच घोळ. फक्त संगणकावरून इन्सर्ट हा पर्याय दिसतो. मी आतापर्यंत तेच वापरत आलो. मोबाईलवरून फोटो अपलोड करून मग संगणकावर जाऊन इन्सर्ट करायचा का?

Screenshot_20220127-081004_Edge.jpg

हपा... आधी टॅबवरचं Upload बटण... मग choose file...
नंतर Upload button...
आणि मग insert file..
हे केल्यावर Back बटण press करायचं. चौकटीत लिंक copy झालेली असते.

Pages