Wordle! एक मस्त ऑनलाईन खेळ

Submitted by व्यत्यय on 17 January, 2022 - 06:40

Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत

कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.

हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.

तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा Happy

तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/

तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे वा रोचक आहे !
मी CHAIR ने सुरवात केली व ४ थ्या प्र ***** बरोबर आले.

छान खेळ.
Audio पासून सुरवात करता येईल.

छान धागा सुरु केल्या बद्दल धन्यवाद.

पहिला गेस करण्यासाठी काही शब्द सुचवतो. लोक generally तीन किंवा दोन vowels असलेल्या शब्दांनी सुरुवात करतात.
3 vowels चे काही शब्द -
About
Ideal
Rogue/Vogue
Opium
Media
Suave
Biome
Adore
Ratio/Patio
Mouse/Douse/House/Rouse
Outer

2 vowels चे काही शब्द -
Staid
Braid
Laugh
Stare
Spare
Stake
Brake/break
Motif
Swear
Brave
Mover
Mange
Table
Gloat
Stoic
Clout
Roast

Happy playing!

<<माझा शब्द होता shire>>
बहुतेक सगळ्यांचा तोच शब्द असतो रोज.
तेव्हा आजचा शब्द आजच इथे फोडू नका.

आजचा शब्द कधी ऐकला नव्हता. एक अक्षर ओळखता आलं नाही.

या खेळाबद्दल ट्विटरवर कमेंट्स पाहिल्या होत्या. काय ते पाहिलं नव्हतं.
इथे ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

ओ च्रप्स, एका दिवसाचा शब्द सगळ्यांना सारखाच असतो. म्हणुन त्या दिवसाचा शब्द उघड करु नका.
म्हणुन मी उदाहरण कालच्या शब्दाचं दिलं होतं.

@मानव / @नाबुआबुनमा : छान शब्द सुचवलेत सुरुवात करायला.

दुर्दैवाने मायबोलीवर हे चौकोन सरळ कॉपी-पेस्ट करता येत नाहीत जसे ट्वीटर वर करता येतात.
इथे इमेजचा स्क्रीनशॉट घेउन टाकावा लागतोय. Sad

आम्ही कॉलेजात मागच्या बाकावर बसून cows and bulls खेळायचो, त्याची आठवण झाली. फरक इतकाच की त्यात ५ अक्षरी शब्दाऐवजी ४ आकडी संख्या ओळखायची असे.

हो ना.
एकच अक्षर एकापेक्षा जास्त वेळा असणारे शब्द नसतील यात. मी तसा शब्द ट्राय केला होता, एक अक्षर दोनदा असणारा. तेव्हा त्यातील एकाला पिवळा आणि एकाला राखाडी रंग दिला.

अच्छा. आपण गेस केलेल्या शब्दात ते अक्षर एकदाच असेल तर, ते एकापेक्षा जास्तवेळा असण्याचा क्लु मिळणार नाही. जसे पुढे गेस करत जाऊ तसा अंदाज येईलच म्हणा.

मस्त खेळ आहे हा. आज प्रथमच खेळलो. शेवटच्या दोन अक्षरांनी घामटे काढले...%$@#
Screenshot 2022-01-18 at 10.39.09 AM.png

अवघड आहे इथे टाकणे.
Screenshot_20220118-110323_Facebook.png

Pages