Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
मी पाच प्रयत्न करून सोडून
मी पाच प्रयत्न करून सोडून दिलं होतं पण एक क्ल्यू मिळाला दुसरीकडून त्यामुळे सहाव्या प्रयत्नात जमलं
(No subject)
आजचाही कठीण होता
आजचाही कठीण होता

(No subject)
(No subject)
Spoiler Alert:
Spoiler Alert:
मला ती इमेज डकवता येत नाहीये इथे पण 220 वा शब्द फार -- आहे
अतिशय सोपा आहे. मला वाटतं जगाच्या या भागात रात्रीचे 12 बऱ्याच देशांच्या आधी वाजत असल्याने शब्द आधीच सोडवला जातो आणि समजतो पण इथे लिहायचं टाळते. आज अगदीच राहवलं नाही!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
बोकलत _/\_
बोकलत _/\_
कर्णपिशाच्चने येऊन सांगितल काय कानात
एका ब्राउझरने सांगितलं ते
एका ब्राउझरने सांगितलं ते दुसर्यामधे पहिल्या जागी पेस्ट केलं..
अतींद्रिय शक्तीने साध्य केलं
अतींद्रिय शक्तीने साध्य केलं _/\_
एका ब्राउझरने सांगितलं ते
एका ब्राउझरने सांगितलं ते दुसर्यामधे पहिल्या जागी पेस्ट केलं..
>>>> करेक्ट
(No subject)
(No subject)
मला तुमच्या सारखे चौकोन का
मला तुमच्या सारखे चौकोन का दिसत नाहीत. सरळ स्टॅटिस्टिक्सच येते.
तिथे खाली शेअर बटन आहे,
तिथे खाली शेअर बटन आहे, त्यावर टॅप करा, क्लिपबोर्डावर चौकोन येतिल. ते कुठेही, उदा. व्हॉट्सॅपमधे पेस्ट करा, अन मग त्याचा स्क्रीनशॉट द्या.
शास्त्र आहे ते.
नाही ना. शेअर बटन दाबले की
नाही ना. शेअर बटन दाबले की स्टॅटच शेअर होते. ते चौकोन मला दिसतच नाहीत.
शेअर करताना कॉपी टेक्स्ट करता
शेअर करताना कॉपी टेक्स्ट करता ना?
चौकोन पेस्ट केल्या शिवाय
चौकोन पेस्ट केल्या शिवाय दिसणार नाहीत. कंप्युटर वर असाल तर आऊटलूक, वर्ड असं काही तरी ओपन करून तिकडे पेस्ट करा. पुढे काय करायचं ते समजेलच तुम्हाला.
पेस्ट करायचं आहे, हे लक्षात ठेवा. पेस्ट करून दिसलं नाही तर ते ॲप तो इनपुट घेत नाहीये, मग दुसरं ॲप ओपन करून तिकडे परत पेस्ट करा.
Wordle 221 4/6
Wordle 221 4/6
ते ग्रीड इथे पेस्ट केलं की प्रतिसाद सेव्ह करता येत नाहीये.
अगदीच सोपा सोपा म्हणत चार प्रयत्न लागलेच!
221 साठी गुडलक जगभरातील माबोकरांना!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
लेवा आणि अमितव, आता जमले. मी
वेवा आणि अमितव धन्यवाद, आता जमले. मी शेअर नंतर कौपी टेक्स्ट वापरत नव्हतो.
Pages