Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
(No subject)
२२२ - ४
२२२ - ४
इन्सर्ट बटन दिसत नाही असा
इन्सर्ट बटन दिसत नाही असा मुद्दा आहे
बरोबर सामो. निरु, मला ते असं
बरोबर सामो. निरु, मला ते असं दिसतंय -
ऍप मध्ये दिसत नाही पण
Insert बटन ऍप मध्ये दिसत नाही पण ब्राउजरमध्ये दिसते, (क्रोम/अग्निश्रुगाल), फोनवरही. पण वर ब्राउजर मध्येही दिसत नाही असे कोणी म्हणाले. तेव्हा काय इश्यू आहे कल्पना नाही. प्रकाशचित्रे कशी द्यावी धाग्यावर विचारून बघा तिथे जाणकार वाचून सांगू शकतील काय ते.
मला आलं
मला आलं
मानव धन्यवाद
मानव, तो वरचा फोटो ब्राउझरचाच
मानव मामा, तो वरचा फोटो ब्राउझरचाच आहे.
अग्निश्रुगाल >>

हा सगळा उद्योग प्रतिसाद
हा सगळा उद्योग प्रतिसाद चौकटीत राहून करायचा. प्रतिसाद चौकटी खालच्या इमेज हायपरलिंक वर टिचकी मारा.
तुम्ही हे माझे सदस्यत्व - खाजगी जागा मध्ये जाऊन करताय
नाही हो, प्रतिसाद चौकटीतच
नाही हो, प्रतिसाद चौकटीतच करतोय.
मी माझे सदस्यत्व - खाजगी जागा
मी माझे सदस्यत्व - खाजगी जागा मध्ये जाऊन पाहिलं. तिथे हे तीन पर्याय दिसतात. इन्सर्ट नाही.
सर्वांच्या सूचनांकरिता आभारी
सर्वांच्या सूचनांकरिता आभारी आहे. अजून प्रश्न सुटलेला नाही. पण इथे फारच विषयाला सोडून होत असल्यामुळे माझी पुढील चर्चा मोबाईलवरून लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करायचा? इथे करतो.
आज आले बाई एकदाचे.पण ते चौकोन
आज आले बाई एकदाचे.पण ते चौकोन,चौकोन फोटो कसे द्यायचे?
शेअरवर क्लिक करा. कोणालातरी
शेअरवर क्लिक करा. कोणालातरी whatsapp. करा. तिथे स्क्रीनवर नॉट, क्रॉप इमेज, इथे इन्सर्ट
आजची नक्षी
आजची नक्षी
माझी आजची रांगोळी (चित्र देता
माझी आजची रांगोळी (चित्र देता येत नसल्यामुळे शाब्दिक देतो) -
- - - - पि
पि हि हि - -
हि हि हि हि हि
(पि = पिवळी चौकट, हि = हिरवी, - = काळी)

१. शेअर वर क्लिक करा म्हणजे
१. शेअर वर क्लिक करा म्हणजे रां गोळी क्लिपबोर्डवर येइल.
२. ती ईमेल मधे पेस्ट करा
३ ईमेल चा स्क्रीन्शॉट घ्या
४. तो झुम करा
५. झुम्ड स्क्रीन्शॉट चा स्क्रीनशॉट सेव्ह करा
६. सेन्ड ईट टु एडीटर ईन माबो ...............................
///////////
आधी टॅबवरचं Upload बटण... मग choose file...
नंतर Upload button...
आणि मग insert file करायचे आहे परंतु माबोच्या एच टी एम एल एडिटरमधे ईन्सर्ट ऑप्शन दिसत नाहि पण त्याजागी सेंड टु एडिटर दिसेल निदान क्रोममधे दिसतो..////////////////
लिंक येइल. पेस्ट होइल.
(No subject)
हरचंद मलाही तुमच्यसारखाच problem येत आहे
धन्यवाद भरत, सामो!
धन्यवाद भरत, सामो!
मला वाटायचे वर्डलचे उत्तर शेयर करताना चौकोन येत असावेत.
(No subject)
(No subject)
हर्पा,
हर्पा,
१. शेअर वर क्लिक करा म्हणजे रां गोळी क्लिपबोर्डवर येइल.
२. ती ईमेल मधे पेस्ट करा
३ ईमेल चा स्क्रीन्शॉट घ्या
४. तो झुम करा
५. झुम्ड स्क्रीन्शॉट चा स्क्रीनशॉट सेव्ह करा
६. सेन्ड ईट टु एडीटर ईन माबो
आधी टॅबवरचं Upload बटण... मग choose file...
नंतर Upload button...
आणि मग insert file करायचे आहे परंतु माबोच्या एच टी एम एल एडिटरमधे ईन्सर्ट ऑप्शन दिसत नाहि पण त्याजागी सेंड टु एडिटर दिसेल निदान क्रोममधे दिसतो.
आता तो स्क्रीनशॉट आका इमेज तुमच्या गुगल फोटॉत अपलोड करा. व तिला पब्लिक अॅक्सेस द्या.
मग राईट क्लिक करुन त्या इमेजची युआरएल घ्या. (LLLLLL.png ..... धरुन चाला)
" < " img src="LLLLLL.png" width="500" height="500" >alt="Today's screenshot" " /> "
ते अॅन्ग्युलर ब्रॅकेटसच्या भोवतीची अवतरणचिन्हे तेवढी काढा. कोणतीही स्पेसही नको.
द्या
मग इमेज दिसू लागेल.
(No subject)
वत्सला, तुम्हाला पुढचे कोडे
वत्सला, तुम्हाला पुढचे कोडे लवकर कसे दिसते? मला अजूनही कालचेच दिसत आहे.
गजानन, दक्षिण गोलार्धात
गजानन, दक्षिण गोलार्धात असल्याचे फायदे!
मी ऑस्ट्रेलियात रहाते.
(No subject)
त्यांच्याकडे रात्रीचे बारा
त्यांच्याकडे रात्रीचे बारा वाजून गेले असतील.
जगभरात तेथील स्थानिक वेळे प्रमाणे ००:०० ला पुढले वर्डल ओपन होते.
(No subject)
वत्सला, असे आहे का?
वत्सला, असे आहे का!
(No subject)
Pages