Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरंच रँबलिंग केलंय.
बरंच रँबलिंग केलंय.
<<
हे या प्रतिसादांचं सार आहे.
असो.
आ.रा.रा. >> +१११११११११११
आ.रा.रा. >> +१११११११११११
ही सगळी चर्चा वाचून विंदांची एक कविता आठवते.
इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर ना घेऊन नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढूनी त्यावरी भविष्य वाचा
असो.
>>>>>>>>याच हिरिरेने समर्थन
>>>>>>>>याच हिरिरेने समर्थन केले असते का?
समर्थन करणे दूरच. मी असे म्हणते आहे की काही सूज्ञ लोकांनी त्या घटनेचा म्हणजे 'पोलिसांनी कायदा हातात घेण्याच्या घटनेचा' निषेध केला होता जो की योग्य नव्हे अगदी बरोबरच होता. पण तेच लोक आज 'शाई फेकण्याच्या दंडेलशाहीचा विरोध' का करत नाहीत? - हा माझा प्रश्न होता.
बाकी निश्चेट यांनी दिलेला दुवा - कोळसेपाटलांना जीवे मारण्याची धमकी
त्याचाही निषेध आहे. नक्कीच अशी धमकी देणे दूषणास्पदच आहे.
अरेरे !
अरेरे !
मेहेंदळें नी इति + हासा बद्दल एकदा सांगितल्यावर आपण पुन्हा त्यावर बोलू नये.
मी फेसबुक, इतर काही मीडीया आणि आता मायबोलीवर वाचले. ईर्शाद हा धागा बरेच दिवस वाचूनही मला कधी लिहावेसे वाटले नाही.
शाईफेक झाली यावर सर्वांनी लिहीले. त्यामुळे कुबेरांची चूक यावर जर कुणीही लिहीलेले नसेल तर एखाद्याने ते लिहीणे म्हणजे शाईफेकीचे समर्थन अशा थाटात माझ्या प्रत्येक प्रतिसादानंतर म्हणून ते शाईफेक समर्थनीय नाही असे मला बजावणारे प्रतिसाद आले आणि त्याला प्लस वन पण येत गेले.
मला शाईफेक या विषयावर लिहायचेच नाही तर ही सक्ती का ? कशासाठी ? तुम्ही निषेध केला. कुणी विचारले का कुबेरांचा निषेध केला का ?
असे असताना माझ्या बाजू मांडण्याला व्हॉट अबाऊटरीचे लेबल लावणे हास्यास्पद आहे.
दुर्दैवाने मूठभर लोक सोडले तर अन्य लोक व्होकल नाहीत. त्यांना आपली मतं मांडता येत नाहीत. बाजू मांडणे फार लांबची गोष्ट. त्यांना जे समजलेले असते ते व्यवस्थित न मांडता आल्याने टर उडते. आयसोलेशन मधे कुणी असेल तर त्याला आपण एकटेच असे बोलतो आणि इतर सगळे एकमेकांना प्लस वन देत आहेत म्हणजे आपले काही चुकतेय का असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण होते.
६०० पोस्ट्स होऊन गेल्यानंतर शाईफेकीचा मनासारखा आणि भरपूर, पोटभरून निषेध करून झाल्यानंतर कुबेर चुकले हे ऐकून घेणे आणि त्या संदर्भातच बोलणे योग्य नव्हते का ? शाईफेकीचा निषेध केल्याशिवाय मला हे लिहीता येणार नाही असा माझा ग्रह झाला.
व्याख्याही प्रत्येकाच्या निराळ्या असतात. अशा वेळी प्रमाण काय हे पाहिले पाहीजे. भले ते आपल्या मताप्रमाणे नसेल. आपण जास्त हुषार असू. पण आपली हुषारी जास्तीत जास्त लोकांच्या हिताच्या आड येत असेल तर ते त्या भागात प्रमाण नसेल.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याला मर्यादा घालण्याचा निर्णय भारत हा देश ओळखणार्या चलाख लोकांनी घेतला, त्यांना काहीही समजत नसेल म्हणून का ? इथे स्वातंत्र्याचा दुरूपयोग होतो. अगदी न्याययंत्रणाही अधिकारांचा दुरूपयोग करते. पण प्राप्त परिस्थितीत न्याययंत्रणेवर विश्वास ठेवणे आणि व्यवस्था सुरळीत होईपर्यंत किंवा पर्याय सापडेपर्यंत ती चालू ठेवण्याला इलाज नाही. न्यायाधिश सुद्धा याच समाजातून येतात. जोपर्यंत सामाजिक सुधारणा होत नाहीत तोपर्यंत शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था चालवणारे लोक असेच राहणार.
या गोष्टींचे भान सुटले की फक्त आदर्शवादी चर्चा होत राहतात.
कोणत्या गोष्टीने दंगल भडकते हे चांगले ठाउक असलेल्या देशात राहतो आपण.
इंग्लंड अमेरिकेत जी पुनर्जागराची चळवळ झाली, पुनर्भरणाची क्रांती झाली, प्रबोधनाचे पर्व नांदले तोच विषय कुबेरांचा आहे. तो विषय मांडताना ऐतिहासिक चुका झाल्या. त्यामुळे पुस्तक गंडले आहे. प्रत्येक वेळी चुकीच्या पुस्तकाला दुसरे पुस्तक लिहीणे आणि ते प्रकाशित कराणे शक्य नसते. त्या ऐवजी या भानगडीत पडणार्यांनी त्यातली शिस्त पाळायला हवी. ती ज्यांना ठाऊक नाही त्यांच्या मतांना काही अर्थ नाही.
या दोन घटनांचा काहीही संबंध
या दोन घटनांचा काहीही संबंध नाही. त्या घटनेचा ब्राह्मण्/अब्राह्मण असण्याचाही संबंध नाही. अ या घटनेचा निषेध करण्या पूर्वी अजिबात संबंध नसलेल्या ब घटनेचा निषेध करणे जरूर आहे अशांसाठी वेगळाच बीबी उघडला आहे.
नवीन Submitted by vijaykulkarni on 16 Decemb
शिरच्छेद घटना साहित्य संमेलनाच्या वादानंतर झालेली आहे. एका निरुपद्रवी काव्यवाचन गायन कार्यक्रमात कोणती आडनावे आहेत यावर इतका कांगावा करणारे लोक राज्यात एका गर्भवती विवाहित तरुणीचा तिच्या कुटूंबियांकडून शिरच्छेद होतो यावर अस्वस्थ होत नाहीत. व्यक्त होत नाहीत. हे फक्त इथे नोंदवून ठेवत आहे. अगदी लक्षात येण्याइतका सन्नाटा आहे. हेच जर यूपीत झालं असतं किंवा महाराष्ट्रातच ब्राह्मण समाजाचा दुरान्वयाने संबंध जोडता आला असता तर पुरोगामी प्रतिक्रिया वेगळी असती.
बाकी टवणे सर याना उद्देशून ती पोस्ट नव्हती. ते नाही वचावचा लिहीत. पण त्यांच्या पोस्ट मला प्रायव्हेट जेटने क्लायमेट चेंजची चर्चा करायला जावं , किंवा मुकेशभाई अंबानींच्या नातवाच्या बर्थडे पार्टीला जाऊन घरी परत आल्यावर 'या देशात गरिबांवर अन्याय होतोय' असा मध्यरात्री इंस्टावर गळा काढावा इतक्या निरर्थक वाटतात. असो.
आरुन फिरुन गंगावेस!!
आरुन फिरुन गंगावेस!!
सगळेजण परत परत तेच तेच का बोलतायत??
आयसोलेशन मधे कुणी असेल तर
आयसोलेशन मधे कुणी असेल तर त्याला आपण एकटेच असे बोलतो आणि इतर सगळे एकमेकांना प्लस वन देत आहेत म्हणजे आपले काही चुकतेय का असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण होते. >>> अहो इथे जे लोक वर्षानुवर्षे एकमेकांशी गप्पा मारतात त्यांची वेव्हलेंथ जुळल्यामुळे पोस्टी सहजपणे समजतात, आणि त्या पटल्या की आपोआप सहमती दिली जाते. ती मला दिली म्हणजे तुमच्याविरूद्ध आहे असे नसते. तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे लोकांना समजले नसेल.
मी गेली ३-४ पाने लिहीताना कधीही तुमचे म्हणणे खोडून काढतोय, तुम्हाला जाब विचारतोय किंवा विरोध करतोय अशा टोन मधे, हेतूने लिहीलेले नाही. अजूनही जाउन बघा. तुम्ही जर या वादाची सुरूवात बघितलीत तर तुम्ही दोन वाक्ये लिहीली होती - एक कुबेरांच्या समर्थनाबद्दल व दुसरे कुबेरांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे काय असा प्रश्न - मी फक्त त्याबद्दल मला काय वाटते ते लिहीले. या बाफवर जी जनरल चर्चा आहे त्याबद्दल माझी मते होती (जी अजूनही तीच आहेत). तुमच्या किंवा आणखी कोणाच्या विरोधात नव्हती.
अहो इथे जे लोक वर्षानुवर्षे
अहो इथे जे लोक वर्षानुवर्षे एकमेकांशी गप्पा मारतात त्यांची वेव्हलेंथ जुळल्यामुळे पोस्टी सहजपणे समजतात, आणि त्या पटल्या की आपोआप सहमती दिली जाते. ती मला दिली म्हणजे तुमच्याविरूद्ध आहे असे नसते. तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे लोकांना समजले नसेल. >>> इथे म्हणजे मायबोलीवर का ? तर मग विनोदाच्या धाग्यावर सुद्धा स्पेसिफिक नाव वगळून इतरांना प्लस वन दिले जाते. तुमच्या कुणाशी वेव्हलेंग्थ जुळल्या आहेत हे नवीन माणसाला माहिती असणे गरजेचे नाही आणि नसते. तसेच मुद्दामून केले जात नसेलच असे कसे म्हणता येईल ?
कंपू आहे किंवा नाही या गोष्टींवर चर्चा करणे जसे व्यर्थ आहे तसेच आहे हे. कुणाला काय वाटायचे ते आपण रोखू कसे शकतो ? मी बोलून दाखवले. इतर दाखवत नसतील.
माझ्यासारख्याला त्याने फरकही पडत नाही.
सत्याला +१ ची गरज नसते. तसेच +१ मिळालेले अंतिम सत्यच असेल असेही नाही. वेगळा चष्मा असलेल्या गोष्टींशी सहमत नसणे असे असू शकते.
थांबूयात का ?
थांबूयात का ?
मूळ मुद्द्यावर वेगळे मत असेल आणि ते माझ्या मागच्या पोस्टीत दिलेले नसेल तर इथे येईन. माझ्या मागच्या पोस्टी मोठ्या आहेत म्हणून न वाचता विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणेही शक्य नाही. कामे आहेत.
इतके नवीन?
इतके नवीन?
माझी मदत करा. मला एक गोष्ट लक्षात आली नाही.
शाई फेकली तर अभयव्यक्ती चु गळचेपी असे भोकाड का पसरतात?
त्या विकृत माणसाने चिखलफेक केली. त्याच्यावर चिखलफेक केली असती तर फिट्ंटफाट झाली असती.
पण सिक्युरिटी, पोलीस बंदोबस्त बघता मातीचा पाणी कालवून चिखल बनवेपर्यंत अठक झाली असती.
शेण आत आणू दिलं नसतं. शाई पेनातेऊ पण आणता येते.
शाई म्हणजे acid आहे का?
शाईफेकीने जीव गेलाय का
शाईफेकीमुळे कागदापासून
शाईफेकीमुळे कागदापासून तोंडापर्यंत सर्वकाही काळे/निळे होते.
आश्चर्य याचंच वाटतं की तोंड काळे/निळे झालेले सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत.. सर्वांची कुकर्मे सारखीच आहेत.. अन महत्त्वाचे म्हणजे सर्वजण अनाजी पंतुकड्या विखारी विचारसरणीचेच आहेत..!!
या शाईफेकीमुळे कुणाचाच जीव गेला नसला तरी हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले बेंबीच्या देठापासून ते शेंडीच्या टोकापर्यंत केकाटत असतात परंतू त्याच वेळी म. गांधी, दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांचे मुडदे पाडणार्यांबद्दल चकार शब्द काढत नाहीत.. आहे की नाही मज्जा..!!!!
गौरी लंकेश नाव आठवत नव्हते.
गौरी लंकेश नाव आठवत नव्हते. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
म्हणजे खून करा पण निषेध म्हणून शाई फेकू नका.
हा धागा पण शाईफेक नाही का?
विकृताला तुडवले नाही हे चुकले का?
या शाईफेकीमुळे कुणाचाच जीव
या शाईफेकीमुळे कुणाचाच जीव गेला नसला तरी हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले बेंबीच्या देठापासून ते शेंडीच्या टोकापर्यंत केकाटत असतात परंतू त्याच वेळी म. गांधी, दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांचे मुडदे पाडणार्यांबद्दल चकार शब्द काढत नाहीत. >>> +१
साहीत्य संमेलनाला खरेंना
साहीत्य संमेलनाला खरेंना बोलवले यात काय चुकले ?
जातवार रिप्रेझेंटेशन का द्यायचे ?
या सर्व प्रश्नांना एकच प्रश्न विचारला पाहीजे. अखिल भारतीय साहीत्य संमेलन या ऐवजी अखिल ब्राह्मण साहित्य संमेलन असे नाव ठेवा. शासनाकडून एक पैसाही घेऊ नका. कुणी काहीही म्हणणार नाही. या वेळी जो निधी मिळाला आहे तो अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी असलेल्या निधीतून दिला आहे.
जर अखिल भारतीय आणि मराठी असे शब्द वापरायचे असतील, आमचे सम्मेलन सर्वसमावेशक आहे असे म्हणत असाल तर खरेंच्या कार्यक्रमात सगळे ब्राह्मण असणार नाहीत याची काळजी घ्यायला नको ? ब्राह्मण सोडून एकही लायक नसेल का ? कुणीही टक्केवारी मागितलेली नाही.
पण ज्या साहीत्य संमेलनाची मुख्य बॉडी ही फक्त ब्राह्मण मतदार निवडतात, इतरांना मतदानाचा हक्क नाही त्या मंडळांची नावे अखिल ब्राह्मण साहित्य मंडळे का नको ?
मग काहीही गोंधळ घाला , बारबाला नाचवा नाहीतर सगळे अनाजी पंतुकड्यांचे वंशज बोलवा कोण विचारतं ?
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांची वैचारिक-सांस्कृतिक-राजकीय चिकित्सा होणे नितांत गरजेचे आहे!
पडघम - माध्यमनामा (अक्षरनामा)
सुनील बडुरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/5659?fbclid=IwAR3HxfL8Z...
यंदाच्या नाशिक येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनातही अपेक्षेप्रमाणे मानापमान आणि वादाचे प्रसंग घडले. त्यात शेवटच्या दिवशी ‘लोकसत्ता’चे संपादक आणि ‘रेनेसान्स स्टेट : दी अनरीटन स्टोरी ऑफ दी मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या इंग्लिश पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी महाराजांची बदनामी केल्याच्या आरोपावरून ‘संभाजी ब्रिगेड’च्या दोघा जणांनी बुक्काफेक केल्याची घटना घडली. ती अर्थातच निषेधार्ह होती. परंतु याचा अर्थ, वादाच्या केंद्रस्थानी असलेले कुबेर ज्या वातावरणाचा संस्कार, प्रभाव आणि पाठिंबा मिळवत अभिव्यक्तीतले आपले स्थान बळकट करते झाले, त्याची चिकित्सा होऊच नये असे नव्हे...
..................................................................................................................................................................
अधूनमधून काही कारण तयार होते, ‘लोकसत्ता’चे विद्यमान संपादक गिरीश कुबेर चर्चेत येतात. पण त्यांचे हे अधूनमधून येणे आकस्मात नसते, तर त्यात एक सातत्य आहे. ही एक बाब महत्त्वपूर्ण आहे, हेच आधी सगळ्यांनी लक्षात घ्यायचे आहे.
गिरीश कुबेर यांची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. त्यांचे नावाचे वजन आणि त्यांची उंची खूप मोठी आहे. गिरीश कुबेर काय म्हणतात, म्हणत आहेत, काय म्हणतील याकडे जवळपास सगळ्यांच वाचकांचे लक्ष असते. याचे नेमके कारण काय, हेसुद्धा आधी लक्षात घेतले पाहिजे.
..................................................................................................................................................................
खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.................................................................................................................................................................
महाराष्ट्रात हजारो मीडियाकर्मी आहेत, लेखक-साहित्यिक-संपादक-पत्रकार आहेत. त्या सगळ्यांपेक्षा गिरीश कुबेर यांच्याबद्दल अधिक का बोलावे लागते वा बोलले जाते? त्याचे गणित मराठी माध्यमे आणि त्यांचा घडणीचा इतिहास यात दडलेले आहे. या प्रक्रियेला सूत्र, इंगित वा गुपित न म्हणता, त्यात एक निश्चित असे गणित दडलेले आहे, हे लक्षात घ्यावे लागते.
प्रस्थापित वृत्तपत्रांची पूर्वापार प्रतिष्ठा
‘इंडियन एक्स्प्रेस’ ग्रूप हा एक मोठा व्यावसायिक माध्यम ग्रूप आहे. भारतात ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या समूहांना त्यांच्या त्यांच्या व्यावसायिक यशामुळे प्रतिष्ठा आणि वजन प्राप्त झाले. त्या दोघांची अपत्ये म्हणजे, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘लोकसत्ता’ ही दोन मराठीमधील दैनिके. या दोन दैनिकांची छपाई अर्थातच मुंबईतून होत असे. प्रकाशनदेखील तिथूनच. मुंबईच्या एकदम ‘हॉट प्रॉपर्टी एरिया’त यांच्या उत्तुंग इमारती आहेत. मुंबईची लोकसंख्या पाहता यांचा खप त्याच ठिकाणी जास्त असणे क्रमप्राप्त आहे.
वाचकांची ओळख आणि मध्यमवर्गाचे पर्यावरण
या दोन्ही दैनिकांचा वाचक वर्ग नेमका कोणता, हा एक प्रश्न आहे. पण त्याचे उत्तर सरळ नाही. कारण दर दहा वर्षांनी शिकलेल्या आणि वाचणाऱ्या लोकांची संख्या वाढत असते. पण या दैनिकांचा जन्म झाला, त्यानंतर पुढची किमान ३० वर्षं यांचा वाचक हा मुख्यतः मुंबईतील उच्चवर्णीय मध्यम, वरिष्ठ मध्यमवर्ग होता. वाचणारा, बोलणारा, चर्चा करणारा आणि जमेल तितकी चळवळ करणारा हाच वर्ग होता. जवळपास सगळे एकाच वर्णीय, वर्गीय समूहातील असल्यामुळे त्यांना एकमेकांना भेटण्यात, चांगले म्हणण्यात किंवा चुका दाखवण्यात काही वावगे वाटत नव्हते. हा समूह ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांचा हमखास हक्काचा वाचक बनला. आणि ही दैनिके या वर्गाची मुखपत्रे बनली. त्या काळात अस्तित्वात असलेल्या शिक्षण संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, ग्रंथालये यांच्यावर युरोपीय छाप होती आणि त्या ठिकाणी हा वर्ग शिकायला, शिकवायला, राबायला, वावरायला होता. त्यामुळे इकडूनतिकडून सगळीकडून एकमेकांना सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळू देण्याचा तो काळ आणि ते वातावरण होते.
..................................................................................................................................................................
तत्कालीन उच्चवर्णीय मध्यम, वरिष्ठ मध्यम समूह इतर तीन भागांत सामावलेला होता. एक भाग आहे काँग्रेसमधला- ज्यात स्वातंत्र्य चळवळ, गांधी नेहरू, जागतिक राष्ट्रीय चळवळी यांचे आकर्षण, इच्छा आणि तत्त्वे मान्य होती. दुसरा भाग होता कम्युनिस्ट पक्ष, संघटना युनियन्स, सिनेमा, नाटके इत्यादीमध्ये. तिसरा भाग होता समाजवादी प्रवाहाचा- ज्यांच्यावर गांधी आणि लोहियांचा संमिश्र प्रभाव होता. गांधी मात्र सगळ्यात कॉमन होते. पण या तीन भागांतील या ‘कॉमन मिनिमम’ समूहाला एकमेकांना सांभाळून घेण्याची, साथ देण्याची सांस्कृतिक गरज होती. त्यांचे प्रश्न, राहणीमान जवळपास समान होते. युरोप-अमेरिका, कोकण, मुंबई, हे त्यांचे आकर्षण होते. जवळपास सगळे प्रकाशक मुंबईत होते.
मध्यवर्गीय इच्छा-आकांक्षांचे पाठिराखे
या सगळ्यांची दुसरी आणि तिसरी पिढी अधिक इंग्रजी शिक्षण घेऊन अधिक वेगवगेळ्या वाटेने घरांतून, इच्छांतून, पद्धतींतून बाहेर पडली. संकुचितपणाला प्रतिष्ठा हा एक संस्कार घरांतून पेरला जाऊ लागला. त्याला साहजिकच त्यांच्या उच्च असण्याच्या जाणिवांचा आधार होता. म्हणूनच सर्व माध्यमे आणि अभिव्यक्ती यामध्ये याच समूहाच्या इच्छा आवडी, जाणिवा, गरजा यांचीच चित्रे येऊ लागली. त्यामुळे वाढत गेलेला प्रेक्षक वाचक वर्ग हा त्यांच्याच अनुसरणातून आकार घेत गेला. पुरस्कार, सत्कार, हळहळ, तळमळ, कौतुक, मदत, पाठिंबा, या गोष्टी याच समूहातील दुसऱ्या- तिसऱ्या पिढीतील मोठ्या वर्तुळातच तळ ठोकून राहिल्या.
अर्थात हे सर्व संक्षिप्त प्रातिनिधिक स्वरूपात मांडले आहे. अधिक तपशील आणि घटना यासाठी स्वतंत्र पुस्तक लिहावे लागेल. पण त्याच समूहातील सर्वांसाठी ज्यांनी आपली बौद्धिक श्रम, कष्ट, संकल्पना उपयोगात आणायचे धोरण घेतले, त्या सर्वांपैकी एक गिरीश कुबेर आहेत. त्यांनी पत्रकारिता हा व्यवसाय निवडला. पण त्यासाठी त्यांनी अन्य जुन्या पिढीतील पत्रकारासारखे देशसेवा, राजकीय चळवळ असे काही ठरवलेले नाही. पण म्हणून त्यांना ‘राजकीय भूमिका’ नाहीच असे नाही. त्याला ते थेट राजकीय म्हणत नाहीत. इतकंच.
गिरीश कुबेर जर समजा ‘लोकसत्ता’ दैनिकात संपादक नसते, तर कुठे नोकरीला असते? तेव्हा त्यांना आजच्या एवढा ‘फॉलोअर’ मिळाला असता का?
त्या उच्चवर्णीय-उच्चवर्गीय समूहाचे दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतील सगळ्यांचे एकूण भारत, एकूण महाराष्ट्र, एकूण संस्कृती, एकूण समाज रचना इत्यादींबद्दल काय काय मते व विचार आहेत, हे पाहायला हवे. समजा, या सर्व इंग्रजी पाया असलेल्या मराठी अहंकारी स्वभाव नि बौद्धिकता असणाऱ्या लोकांची संख्या एक लाख आहे, त्यापैकी किती जणांना महाराष्ट्राची जडणघडण माहीत आहे? त्यांच्यापैकी किती जण स्वतःहून अभ्यास, चिंतन-मनन करतात? समाज आणि संस्कृती यांचा कसलाच अभ्यास नसेल, तर या प्रचंड मोठ्या समूहाचे मानसिक संवर्धन कसे होणार, याची कुणालाही फिकीर नसते. पण मग यांचा जो सामाजिक- सांस्कृतिक वावर अलीकडच्या ३० वर्षांत कोणत्या गोष्टीत वाढलेला आहे? तो कोणी कसा वाढवला? हेही समजून घ्यावे लागते.
चलाखीने राबलेला मिक्स अजेंडा
दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतील सर्व उच्चवर्णीय-वर्गीय व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाना एकच एक साचा आयता हातात देण्यात आलेला आहे. त्या साच्यात एकाच वेळी शिवाजी राजाला ‘हिंदू’ म्हणायचे, त्यांचे राज्य म्हणजे ‘स्वराज्य’ म्हणायचे आणि त्याच वेळी त्याला ‘शूद्र’ आणि ‘कमअस्सल’ही म्हणायचे. असा मिक्स अजेंडा तयार कोणी केला? शोध-संशोधन हाच जर अभ्यास आणि अभिव्यक्ती याचा प्राण आणि आधार असेल तर तमाम मीडियाकर्मी आणि संपादक याबाबत संशोधन का करत नाहीत? एक मोठा समूह शिवाजी महाराजांबद्दल अभ्यास न करता तुच्छतेची भावना बाळगतो, उगाळतो, पसरवतो. तो ते नेमके कशासाठी करतो? हा समूह गांधींच्या निर्जीव छायाचित्रांवर गोळ्या घालण्याचेसुद्धा समर्थन का करतो? हा संपूर्ण समूह आसपास घडणाऱ्या प्रत्येक हिंसाचाराचे समर्थन का करतो? अशा सर्व राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक घटनांचा शोध मीडिया म्हणून घ्यायचा आहे की नाही? असा जर प्रश्न गिरीश कुबेरांना विचारला तर त्यांचे उत्तर काय असेल? याचा अंदाज प्रत्येकाने बांधायचा आहे.
गिरीश कुबेर हे तिसऱ्या पिढीतील समूहाचे माध्यम प्रतिनिधी आहेत. त्यांच्या हयातीत त्यांना छापील-टीव्ही-इंटरनेट-डिजिटल असा सर्व मीडिया उपलब्ध झालेला आहे. त्यांच्या हयातीत बाकी वर्तमानपत्रांनी आपापली विश्वसनीयता पूर्ण घालवलेली आहे. आपल्या दैनिकाची आठ-दहा-पाने कोणत्या मजकुराने भरायची यासाठी ही दैनिके स्थानिक उठवळ नेत्यांवर अवलंबून आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ची मालकी आणि स्वरूप बदलले. त्यामुळे त्यातल्या त्यात चांगला वाचनीय मजकूर आणि त्यास जागा देणारे वर्तमानपत्र म्हणून नवीन आणि जुना वाचक हा ‘लोकसत्ता’ पसंत करतो आहे. राजकीय आणि सांस्कृतिक विषयात जास्त मजकूर मिळू शकणारे हे वर्तमानपत्र आहे. अशा या अभावग्रस्त माध्यमकाळात गिरीश कुबेर हे यशस्वी आणि प्रातिनिधिक संपादक ठरतात. त्यांचे वलयांकित असणे यातून आलेले आहे.
गिरीश कुबेर टाटासमूहाबद्दल अभ्यास पूर्ण लेखन करतात, पण अंबानीबद्दल रिपोर्टिंग अभावानेच ‘लोकसत्ता’त दिसते. अमेरिका आणि युरोपमधील संसदेत काय काय अचंबित घडते, हे मोठ्या रसभरीत वर्णने करून आणि त्यात लज्जत वाढवत ते सांगतात, पण भारताच्या संसदेत काय-काय घडावे, घडते हे मात्र सांगत नाहीत. एका मजबूत पण, एककल्ली मनोवृत्ती असलेल्याच्या हातात देशाची सूत्रे असणे किती अपरिहार्य आहे, हे बिनदिक्कत सांगणारे कुबेर नंतर मात्र हळूच ती भाषा झाकून, तेच सत्य इतर मार्गांनी वदवून घेतात. म्हणूनही त्यांच्या लेखनातील दिलेले तपशील, उदाहरणे आणि न उल्लेख केलेली मते याकडे वाचकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. पण वाचक फक्त कौतुकाने अचंबित होतात. गिरीश कुबेर हे पत्रकार म्हणून जगभर फिरतात आणि जगभर त्यांची चांगली ओळख आहे, नाव आहे; जगातील मीडियाबद्दल त्यांचा अभ्यासही आहे.
पत्रकारितेतील जी तत्त्वे जगभर गौरवली जातात, त्याबद्दल गिरीश कुबेर काही मतभेद व्यक्त करू शकत नाहीत. पण व्यक्तिगत/सार्वजनिक जीवनात कोणती तत्त्वे अधिक सर्वसमावेशक पोषक ठरतील, याकडे गिरीश कुबेर कसे पाहतात, काय ठरवतात? त्याबद्दल त्यांची काय मते, विचार आहेत, याची चिकित्सा ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी आणि त्यांची सर्व पुस्तके वाचलेल्या वाचकांनी करायची आहे.
मुद्दा आणि आग्रह इतकाच की, गिरीश कुबेर यांची वैचारिक-सांस्कृतिक-राजकीय चिकित्सा होणे नितांत गरजेचे आहे.
हा मूळ लेख ‘अभावग्रस्त माध्यमकाळातल्या कुबेरांचे इंगित’ या नावानं ‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ डिसेंबर २०२१च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
.................................................................................................................................................................
सुनील बडुरकर
badurkarsunil@gmail.com
लोकसत्ता सध्या मराठी जगतात
लोकसत्ता सध्या मराठी जगतात नंबर एकचे वृत्तपत्र आहे असे माझे मत आहे, जरी मी गेली ५० वर्षे मटाचा सुद्धा वाचक आहे. पण कुबेरांबद्दल मी त्यांचा चहाता आहे असे म्हणता येणार नाही. नाहीतरी सध्या मराठी वृत्तपत्र संपादकात ताठ कणा असलेले कोण आहे?.
१)वरील लेख अक्षरनामावर वाचला
१)वरील लेख अक्षरनामावर वाचला होता. थोडासा सुपर्फिशियल वाटला.
२)महाराष्ट्रात साधारणपणे भाषेवर प्रभुत्व असणारे आणि व्यवस्थित व्यक्त होऊ शकणारे लोक बहुतांशी काही जातींपुरते मर्यादित आहेत हे सत्य स्वीकारायला हवे. ही स्थिती का आहे तो प्रश्न वेगळा. ही स्थिती सुधारण्यासाठी काय केले पाहिजे हाही प्रश्न वेगळा.
लेखनावर टीका करायचा, त्यातले दोष, उणीवा दाखवायचा हक्क निर्विवादपणे सर्वांना आहेच.
ही स्थिती हळूहळू बदलताना दिसते आहे ही आनंदाची गोष्ट.
आपापल्या चमू,( कंपू नव्हे,)टीम बनणे किंवा बनवणे हे आपोआप होत असते. एकमेकांच्या गाढ संपर्कातून समान आवडीचे लोक एकत्र येतात. ट्रेकर्सची मंडळे बनतात, पक्षीनिरीक्षण, वनस्पती निरीक्षण अशा आवडी असणारे, ब्रिज खेळणारे, संगीत ऐकणारे/ आवडणारे एकत्र येतात तसेच हे.
लोकसत्ता सध्या मराठी जगतात
लोकसत्ता सध्या मराठी जगतात नंबर एकचे वृत्तपत्र आहे असे माझे मत आहे>> लोकसत्ता सध्या मराठी जगतात नंबर एकचे ( कॉमेडी )वृत्तपत्र आहे ...असे माझे मत आहे.
शुद्धलेखनाच्या , एडीटिन्गच्या अनेक चुका,बातम्यामधे नविन निर्माण केलेले धेडगुजरी शब्द जस नेटकरी , इन्ग्रजी वाक्याचे शब्दशः केलेले भाषातर जस अमुक तमुक सेलेब्रेटीनी कपल गोल्स दिले.सनसनाटी मथळे देवुन काहितरी फुसक्याच बातम्या त्यातही बातमी म्हणाव अस काहीही नसत.
मधे मधे तर लोकसत्ता पुर्णपणे सामनात काय लिहलय हेच छापत होता.
सपान्द्कच्या कार्यकुशलेतेबद्दल तर बोलायलाच नको,स्वतःचाच अग्रलेख मागे घेण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.
इथे काही लोकांनी अकलेचे तारे
इथे काही लोकांनी अकलेचे तारे तोडताना प्रत्येक जातीला घ्यायचे तर किती लोकांना बोलवावे लागेल अशी कुत्सित टीका केली आहे.
त्यांना इतकेच सांगणे आहे, इतकीच टक्केवारी पाहीजे असेल तर ३% च्या ऐवजी ५% ब्राह्मण घ्या. बाकीचे मोकळे सोडा. आणि जेव्हढे बोलवायचे होते त्यापेक्षा एकही जास्त न बोलवता इतर सर्व बोलवा. मग त्यात सगळ्या जातींचे नसले तरी चालतील. तुमचा गर्दीचा प्रश्न सुटला.
सगळेच ब्राह्मण बोलवलेले चालतात. यातल्या किती माजी अध्यक्षांचे पुस्तक वाचलेय ? राजेन्द्र बनहट्टी एकदा अध्यक्ष होते. यांची पुस्तके कोण वाचतो ? बाकीच्या पदाधिकार्यांची नावे पण माहिती नाहीत. सुमार दर्जाच्या लोकांना साहीत्यिकाचा दर्जा दिला आणि लोकांनी मराठी पुस्तके वाचण्याचे बंद केले की तिकडून पण बोंबा मारायच्या. ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी ब्राह्मणांकडून ब्राह्मणांना आवडणारे साहीत्य खपवणारे संमेलन अशी व्याख्या केली तर मग इतरांचा तिकडे येण्याचा काहीच संबंध नाही. कुणीच फिरकणार पण नाही. पाहीजे तर विर्दोही ब्राह्मणी साहीत्य संमेलन म्हणा. ते विद्रोही वाले पण ब्राह्मणी साहीत्याला पूरक असाच अजेण्डा घेऊन चालतात. त्यांनाही कुत्रं पण विचारत नाही. पण ते सरकारी अनुदानाशिवाय संमेलन भरवतात हे कौतुकास्पद आहे.
एखादा भाले पाटील, फाले पाटील
एखादा भाले पाटील, फाले पाटील त्याच्यातल्या प्रसिद्धीच्या लालसेची ओढ लक्षात घेऊन कमिटीत घ्यायचा. त्याच्या प्रभावाने मग साखर सम्राट, सहकार सम्राट यांच्या पैशाने भोजनावळी झोडायच्या, शामियाने टाकायचे हे चालते. पैशाच्या बाबत कोणत्या जातीचे लोक पैसे पुरवतात त्यांची पण टर उडवावी की. ती फक्त जातीच्या लोकांना घेतले की किती लोकांना बोलवावे लागतील असा हिशेब करतानाच उडवाविशी का वाटते ? ब्राह्मणांकडे आता पैसे नाहीत का ? जर १००% ब्राह्मणच स्टेजवर असतील तर ब्राह्मणांनी(च) पैसे का उभारू नयेत ? त्यांच्या भीकेवर जगताना लाचारीने वागावे. उर्मटपणा कशाला ?
पूर्वी तर सत्कार करताना तू मला फुले वहा मी तुला वाहतो असे प्रकार चालत. कोणताही ब्राह्मण जातीचा साहीत्यिक असेल की त्याचे कौतुक करताना त्याला देवत्वाला पोहोचवले जायचे. महर्षी वगैरे उपमांचा सुळसुळाट असायचा. लता मंगेशकर सरस्वती असायची. एके काळी संपूर्ण महाराष्ट्रात सुनील गावस्कर, लता मंगेशकर आणि पुल देशपांडे या तीन लोकांनाच पुरस्कार दिले जायचे. शेवटी गावस्करने पुरस्कार बास झाले असे म्हटले. असे ब्राह्मण वेचून वेचून त्यांना देवत्व बहाल केले जायचे. कुणी त्यांच्यावर टीका केली कि मग त्याची जात पाहून त्याची टर उडवा, शुद्धलेखनाच्या चुका बघा असे प्रकार सुरू होत. मुद्दे बाजूला पडत. आजही तीच गुन्ह्याची पद्धत शाबूत आहे.
आणि दुसरीकडे महापुरूषांना जातीत बंद केले, महापुरूषांबद्दल बोलता येत नाही, त्यांना देवत्व बहाल केले म्हणून गळे काढायचे. हाच डबल ढोलकी बामणी कावा !
जातीत बंद केले म्हणजे काय ? तुम्ही महात्मा फुलेंचा फोटो घरात लावला म्हणून तुमच्यावर हल्ला झाला का ? शिवाजी महाराजांचा उपयोग करून हिंदू मुसलमान दंगली घडवण्याचा डाव खेळला तेव्हां महाराजांचे नाव का घेता म्हणून कुणी मारहाण केली का ? विरोध शिवाजी महाराजांच्या चारीत्र्याशी खेळ करून हिंदू मुसलमान दंगली घडवण्याला आहे.
हे चांगले माहिती असून पण भलत्याच गोष्टींवर गळे काढण्यात ब्राह्मणांचा हात कुणीच धरू शकणार नाही. आताही शाईफेक शाईफेक करून कुबेरांच्या याच प्रकारच्या विकृत उठाठेवींना संरक्षण दिले जात आहे. शाईफेकीवर गळे काढणार्ञांना कुबेरांच्या या उठाठेवी दाखवल्या कि टर उडवण्याचा ब्राह्मणी कावा मायबोलीवर पण दिसतो.
तू तेव्हां काआ नाही बोललास, त्या वेळी तू नाही बोललास मग आत्ता का बोललास अशी टर उडवण्यासाठी एकत्र येणे याला कंपू म्हणतात. यात कोणता ट्रेकींगचा इंटरेस्ट आहे की पर्यावरणाचा इंटरेस्ट आहे ? इथे फक्त ४५% ची वेव्हलेंग्थ जुळलेली आहे. म्हणून कुबेरांच्या विकृतीकडे केलेले दुर्लक्ष हा इश्यू लक्षात येऊ नये, त्यावर बोलूच नये यासाठी टर उडवण्याची मोडस ऑपरेण्डी निवडली गेली आहे.
हे इतके स्टिरीओटाईप झाले आहे कि आता कुणाला काही वाटेनासे झाले आहे. आता ब्राह्मण टर उडवण्याची मोहीम काढणार ही जाणिव आधीच झालेली असते. ठोकाठोकीची भाषा हेच या काव्याला उत्तर आहे. अशी भाषा वापरली कि बिळात जाऊन लपून बसतात मग.
अरे व्वा!!
अरे व्वा!!
समस्त ब्रिगेडी इथे जमा झालेले दिसतायत
की एकच ब्रिगेडी आयडी बदलून बदलून लिहतोय?
>>ठोकाठोकीची भाषा हेच या काव्याला उत्तर आहे. <<
)
कुबेरांचे उघड समर्थन करताना इथे कुणीही दिसले नाही पण तरीही ते तसे करतायत असा कांगावा करुन गळे काढणारे शाईफेक आणि मारझोडीचे उघडउघड समर्थन करणाऱ्यांबद्दल मूग गिळून गप्प बसतील याची खात्री आहे!!
(आता कदाचित या पोस्टनंतर नाईलाजास्तव निषेधाची दोन वाक्ये लिहतीलही
आजकाल सर्व क्षेत्रात सर्व जातीधर्माचे लोक आघाडीवर आहेत..... ब्राम्हणेतर लोक जे स्वताच्या अंगभूत गुणांवर आणि मेहनतीवर तिथपर्यंत पोहचले ते सहसा अश्या मुद्द्यांवर संतुलित मते मांडाताना दिसतात
पण स्वताच्या नाकर्तेपणामुळे जे ठराविक चाकोरीत अडकून राहिले ते शक्यतो अशी ब्रिगेडी भाषा बोलताना दिसतात आणि त्यांच्याबद्दल फक्त कीवच करु शकतो.
आणि हेच मत आरक्षणाबद्दल गळे काढणाऱ्या ब्राम्हणांबद्दलही अलीकडे झालेले आहे..... ज्या ज्या ठिकाणी आरक्षण आले त्या त्या ठिकाणी गुणात्मक घसरण झाली हे उघड दिसत असूनही त्याच नोकऱ्यांवर डोळा ठेऊन राहणारे आणि अंगात गुण असूनही सरकारी नोकऱ्यात डावलले जाते असे म्हणणारे परत एकदा एका चाकोरीत अडकलेलेच लोक असतात.
आजकालच्या खुल्या वातावरणात स्वताच्या अपयशाचे खापर जर कुणी इतिहासातल्या अनाजीपंतावर फोडत असेल तर उपलब्ध संधींचा वापर स्वताच्या उत्कर्षासाठी करुन घेण्याची पात्रता आणि मानसिकताच त्या व्यक्तीच्या ठायी नाही याउपर दुसरे कारण असू शकत नाही.
नवीन निश्चेट तुम्ही फार
नवीन निश्चेट तुम्ही फार बारकाईने निरिक्षण करून मुद्दे मांडले आहेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. यात फार लवकर बदल होईल असं वाटत नाही. ज्या दिवशी सरकारी अनुदान बंद होईल त्या दिवशी हे असे फालतु माणसांनी, फालतू माणसांसाठी, फालतूगिरी करण्यासाठी चालवलेले उद्योग बंद होतील.. तोवर यांचा अनाजीपंतुकडा कावेबाजपणा जमेल तसा सर्वांसमोर आणणे एवढेच आपण करु शकतो.
तोवर यांचा अनाजीपंतुकडा
तोवर यांचा अनाजीपंतुकडा कावेबाजपणा जमेल तसा सर्वांसमोर आणणे एवढेच आपण करु शकतो. >> सहमत आहे. तुम्ही वापरत असलेला वाकप्रचार गरजेचा आहे. माझी चूक दुरूस्त करून तोच वाकप्रचार इथून पुढे वापरत जाईन.
काय पुणेकर ?
सनातन प्रभातचे खूनी तुमचे काका कि मामा ? गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांच्या विचारांना विचाराने प्रत्त्युत्तर दिले का ? सनातन प्रभातमधले हे खूनी आरक्षण घेत असतात का ? मेरीटवाल्यांचे असले मेरीट असेल तर बाकीच्यांनी तो आदर्श घ्यावा का ?
पळता भुई थोडी होईल. बुक्काफेक झाली तर कोकलायला लागलेत.
<< आंध्रातल्या बलात्काराच्या
<< आंध्रातल्या बलात्काराच्या केसमध्ये, पोलिसांनी गुन्हेगारांना रातोरात मारुन टाकलेले. म्हणजे पोलिसांनीच परस्पर कायदा हातात घेउन, न्याय दिलेला. जी की नक्कीच दंडेलशाही होती आणि त्या गोष्टीचे समर्थनही चूकच होते. अनेक सूज्ञ आय डिंनी त्या बाबीचा निषेध केलेला होता.
तेव्हा माझे व अनेकांचे मत असेच होते की - झाले, केले गेले ते बरोबर आहे , गुन्हाच इतका गर्हणिय आहे की - पोलिसांनी न्याय हातात घेउन, गुन्हेगारांना शिक्षा दिली ते योग्यच केले.
पण या बहुमताविरुद्धही, त्या कृत्याचे खंडन करणारे काही आय डि होते माबोवरती. का तर दंडेलशाही इन इटसेल्फ इज अ क्राइम.. त्यांनी घातलेला वाद, त्यांची त्यामागील भूमिका व कळकळ कौतुकास्पद होते.
----------------------------
ते आय डी आता गप्प का आहेत? त्या आय डिज चे काहीच म्हणणे नाही? मत नाही? का प्रत्येक जण आपापल्या जाती-समाजापुरता सूज्ञ होतो? 'शाई फेकणे' हा निषेधाचा मार्ग दंडेलशाहीतच येतो की. चुझ युअर बॅटल्स असे काहीसे शहाणपण यामागे असले तरी एका वाक्यातही भूमिका मांडत नाहीत?
Submitted by सामो on 15 December, 2021 - 02:07. >>
-------- दोन घटना टोकाच्या भिन्न आहेत आणि कुठल्याही अर्थाने त्यांची तुलना करता येत नाही.
हैद्राबाद घटनेत, पोलिसांनी ज्यांना मारले ते "गुन्हेगार" होते हे कुठल्या कोर्टात सिद्ध झाले आहे? पोलिसांनी चार लोकांना मारले नाही, त्यांचे चक्क खून केले आहेत. पोलिसांचे काम गुन्हेगारांना पकडणे, आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करणे , तो पुरावा कोर्टासमोर ठेव - गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्याचे देण्याचे काम कोर्टाचे आहे , पोलिसांचे नाही.
अनेकांनी या extra judicial killing हत्येबद्दल आणि झटपट शिक्षा प्रकाराबद्दल आनंद व्यक्त करणे हे जास्त चिंताजनक आहे असे तेव्हाही आणि आताही माझे मत आहे.
शाई फेकणे याला दंडेलशाही म्हणायचे आणि कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनी चार लोकांचे खून करणे याला पण दंडेलशाहीच म्हणायचे का?
उदय>>+++++++++
उदय>>++++++++++११११११११११११११११
उदय>>+++++++++
उदय>>++++++++++११११११११११११११११
>>>>>>>>अनेकांनी या extra
>>>>>>>>अनेकांनी या extra judicial killing हत्येबद्दल आणि झटपट शिक्षा प्रकाराबद्दल आनंद व्यक्त करणे हे जास्त चिंताजनक आहे असे तेव्हाही आणि आताही माझे मत आहे.
होय! खरे आहे. त्रिवार सत्य.
>>>>>>शाई फेकणे याला दंडेलशाही म्हणायचे आणि कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनी चार लोकांचे खून करणे याला पण दंडेलशाहीच म्हणायचे का?
वेल!! .... होय. अर्थात दोन्ही घटनांच्या गंभीरतेत फरक आहे. पण दोन्हीचे रिपर्कशन्स फार चांगले नाहीत. असो.
मी बातमी सुद्धा न वाचता इथे वाद घालते आहे. थांबते
पळता भुई थोडी होईल. बुक्काफेक
पळता भुई थोडी होईल. बुक्काफेक झाली तर कोकलायला लागलेत.>>>>> कोणाला पळता भुई थोडी होईल?
मी परत तेच लिहीते की पवार व राऊतांनी शाई फेकीचा निषेध केला, मग ते ब्राह्मणात जमा झाले का? तुमचा मुद्दा मला मान्य आहे की शाई फेकीला जे कारण घडले त्यावर कुबेरांनी माफी मागायला हवी होती, ती मागीतली नाही. किंवा मागणार असतील तर माहीत नाही. झाले ते चूक झाले. पूर्ण अभ्यास न करता त्यांनी प्रसिद्धी पोटी ते लिहायला घेतले. म्हणजे कुबेर हे अख्ख्या ब्राह्मण समाजाचे प्रतीनिधीत्व करतात, जसे पवार अख्ख्या मराठा समाजाचे असे म्हणावे का?
दुसरी गोष्ट पण नक्कीच मान्य आहे की काही मुर्खांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची निंदा नालस्ती केली, इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. मग ह्या सर्व लोकांना तुम्ही ब्राह्मणांचे प्रतिनीधीत्व देणार का? आम्हाला नाही मंजूर असल्या लोकांची बाजू घेणे. अपराध हा अपराधच आहे, तिथे जात आलीच नाही पाहीजे. तुम्ही म्हणता की तुमच्या घरात मग महात्मा फुले किंवा इतर समाजसुधारकां चे फोटो का नाहीत. तर मी विचारते की कुठल्या सोनार / शिंपी / वाणी / सुतार/ मराठा/ कुंभार / न्हावीच्या घरात संत ज्ञानेश्वर किंवा एकनाथ महाराज किंवा संत चोखामेळा यांचे फोटो वा प्रतिके दिसली का? कारण प्रत्येक माणसाला त्याच्या जातीचा व संतांचा व थोर पुरुषांचा फार अभिमान असतो. अपवादात्मक निश्चीत असतील त्याचे कौतुक आहे. मग एकट्या बामनांनाच तुम्ही का नेहेमी धरता? महात्मा फुले आणी सौ सावित्रीबाई फुले या दोन्ही कर्मयोगींना त्या काळातल्या कर्मठांनी प्रचंड त्रास दिला, पण त्यांना शाळा चालवण्यासाठी ज्यांनी जागा दिली ते बामनच होते हे कधी संगीतले जात नाही. त्या भिडेंना पण त्रास झाला होता. जशी काळी बाजू मांडता तशी दुसरी प्रकाशाची पण मांडा की.
शिवाजी हा क्षुद्र होता, हे कोणत्या हलकटाने लिहीले? खूप चुकले आहे त्या व्यक्तीचे. आज आपण सारे आहोत ते केवळ महाराजांमुळे. विझलेल्या राखेत स्फुल्लिंगे पेटवणे सोपे नसते. ते या वीराने केले, प्रतीकार करणे शिकवले, स्वाभिमानाने जगणे शिकवले. तरी जर कोणी या दोन्ही पिता पुत्रांना बोल लावत असेल तर तो नक्कीच आत्मकेंद्री स्वार्थी असेल. पण गंमत ही पण आहे आम्ही ९६ कुळी मराठा आहोत व भोसले हे कुणबी असा अपप्रचार पण त्या काळातल्या काही वतनदारांनी केला व महाराजांना सहकार्य नाकारले याचे स्मरण झाले का कोणाला? मग इथेही बामनच जबाबदार कसे?
प्रत्येक वेळी अनाजीचे नाव येते, का तर तो समाज व स्वराज्य द्रोही . हो बरोबरच आहे, मग त्याच बरोबर गणोजी व मल्हारराव शिर्के, चंद्रराव मोरे, सुर्याजी पिसाळ, मंबाजी घोरपडे, सुर्वे यांचे थोर असामान्य कर्तुत्व का विसरले जाते? की ते बामन नाहीत म्हणून? ब्राह्मण खूप ठिकाणी चुकलेत. हो, मान्य आहे, म्हणून त्यांचे काम व मदत नाकारायची? कुठला न्याय आहे हा? बोलायला व लिहायला खूप आहे हो.
ज्यांना महाराजांसाठी प्रेम आहे त्या सर्वांनी ( यात ब्रिगेडी पण सामिल ) एक गोष्ट करता येते का ते बघावे. उगाच सतत याच्यावर शाई फेक, त्याला हाण, हे तोड , ते फोड करण्यापेक्षा एरोजगार तरुण तरुणींना हाताशी धरावे, दुर्गवेड्यांना पण सामिल करावे आणी महाराजां चे सारे गड किल्ले ( बाकी लोकांचे पण ) सुधरवण्याची शपथ घ्यावी. तिथे साफ सफाई करावी. वरती व पायथ्याशी पाणी + खाणे + आणी बाकी गोष्टींची सोय करावी. पर्यटनाला जास्त चालना मिळेल. या गड किल्ल्यांवर जाऊन बघा लोकांनी काय विद्रुपता आणलीय ते. लोकांना लाज नाही, पण निदान अशा तरुणांना जर रोजगार मिळाला तर ते पण खुश आणी ऐतिहासिक वारसे पण जपले जातील. जमेल हे ब्रिगेडींना? जर जमले तर ब्रिगेडींचे नाव बदलुन त्यांना मावळे म्हणता येईल.
वैनी... वैनी... जरा शांत व्हा
वैनी... वैनी... जरा शांत व्हा. एवढं काही उचकण्यासारखं नाही त्यात.
ब्रिगेड म्हणजे एका उत्तुंग ध्येयाने चालणारे सैनिक...! मावळे म्हणजेच इंग्रजीत ब्रिगेड असाही अर्थ होऊ शकतो. त्यात अनाजी पंतुकडी विखारी विचारधारा प्रमाणे शिवी वगैरे वाटावे असं काहीही नाही..
इर्शाद...नौशाद....दंगाफशाद
इर्शाद...नौशाद....दंगाफशाद (हो हो फशादच)....इति हरियानाचा एक मित्र.
डोक्यावर पडलेल्ल्यांना समजणार नाही. पण त्याने काही साध्य होतं? (वाडोखुबश).
फालतु इकडे तिकडे आगी लावणार्यांच्या पार खोलवर आघात उन्मळुन (अस्मितांचे गळवे हळवे होताय) पडतात असे वाटतेय.
Pages